पत्रांक ५३०
श्री.
१७२३ आषाढ शुद्ध ४
विद्यार्थी गोपाळभट दामले सां नमस्कार विज्ञापना ता। आषाढ शुद्ध ४ मंगळवार पावेतों क्षम असों, विशेप, पत्र पाठविलें तें पावलें. सरजेराव महादुष्ट ! कायगांवचे मार्गे आल्यास विश्वास नाहीं ! या अर्थी सातारियाहून भांडीं वगैरे आलीं तीं व कायगांवची भांडीं रा। करावीं व एक मजल मागेंच आहे तो गुरें रवाना करावीं, ह्मणोन लिहिलें. ऐसियास, सरजेराव काल पावेतों जामगांवींच होता. नेवासें वगैरे महालची चुकोती सोनईस बाणाजी शेट्ये याजकडे ठरावयासी सांगितली. त्याजवरून नेवासें वगैरे माहालची खंडणी पंचवीस हजार का ठरले ऐसें परस्परें वदंतेनें ऐकतों. गांडापुरीहून बाळाजी येशवंत यांचे कनिष्ट चिरंजीव गेले आहेत. तिरस्थळीचे बोलणें जाल्यास सोईचें पडेल. याप्रों पत्र सोनईहून काणी गृहस्थानें प्रवरासंगमीं पाठविलें. त्यावरून टोंकेकर व प्रवरासंगमकर व आपले येथील गणोबा धर्माधिकारी सिदू गाईकवाड सोनईस गेले आहेत. तेथील बातमी आज सायंकाळपावेतों येईल. त्यावरून कुचमुकामाचें वर्तमानहि समजेल. कोणत्या मार्गे जावयाचा रोंख, हेंहि समजेल. त्याअन्वयें आज्ञेनुरूप वर्तणूक करावयासी येईल. बहुधा नेवासें व गांडापूर या महालाची चुकोती जाली, त्या अर्थी आपलाले माहाल चुकऊन बेलापुराहून मार्ग निघाल्यास काढतील, असें भासतें. याऊपरे न कळे, + + + हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)