Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ५७२

श्री.
१७२४ वैशाख

श्रीमद्वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नानाजी दीक्षित स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थि गणेश शिवराम साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथें आज वर्तमान दाट ऐकण्यांत आहे कीं, यशवंतराव होळकर यांची धुळ्यावर खासा स्वारी आली त्याजवरून आपणास लिालें आहे. तरी मालेगांवीं आपला गडी गेला तो कालच यावासा आपलें लिहिण्यांत काल होतें. त्यास, माणूस आलें असल्यास, तेथील काय पत्र आलें असेल, तें पाठवावें. अथवा मालेगांवचें माणूस आलें नसल्यास, आज आलियावर सविस्तर कळविण्यास आज्ञा असावी. येथें आज वर्तमान ऐकतों, येविशींचे आपलें ऐकण्यांत कसें आहे, तेंहि लिा लें पाहिजे, सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

पत्रांक ५७१

श्री.
१७२४ वैशाख अखेर

वेदशास्त्रसंपन्न राजमान्यु राजश्री दीक्षित बाबा स्वामीचे सेवेसी:-

रमाबाई जाधवराव दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष, बहुत दिवस जाले. पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास, ऐसें नसावें. सदैव येणाराबराबर पत्रद्वारें आनंदवीत असावें. यानंतर होळकर यांजकडील फवजा बहुत देशीं घांट चढून आल्या. यामुळें बहुत चिंता लागली आहे. कांठीपिंपळगांवावर पठाण यांची फवज आली, ह्मणोन वर्तमान ऐकतों. त्यास, येविशींची बातमी आपल्यास पक्केंपणें असेल. त्यास पठाण कोठें आला आहे, पुढें कोण्हीकडे जाणार, खंडण्या घेतात, किंवा लूटलबाडी करितात, हें सविस्तर वर्तमान लिहून पा व खासा होळकर यांचे लष्करची बातमी असल्यास तेही ल्याहावी, बहुत काय लिहिणें लाभ करावा हे विनंति.

त्यामागे माहादपंताचा लेक विठलपंत कारभार करूं लागला त्याबराबर त्रिंबक गोमदेऊ करूं लागले करीत असतां नवाब अमीरलउमराऊ शास्ताखान साहेब सुबा पुणियासि आले ते वख्ती बहिरो नारायण वादिया उभा राहिला की प्रा। सुपांची देसपांडगिरी आपली आहे त्यावरून विठ्ठल माहादेऊ व त्रिंबक गोमदेऊ ते हि हजूर नवाबसाहेबाचे बादगीस गेले तेथे हकीकती जाहीर केली त्यावरी कचेरीवर इनसाफ टाकिला कचेरीस कुल मुतसदी बसोन मनास आणिता ना। मा।स पुसिलें की तू उभा राहिलास तर तुझी सनद असनाद टाकणे तो ह्मणो लागला कीं सनद असनाद आपणाजवळ काही नाही व भोगवटा वरसे ७२ नाही ऐसी तकरीर केलियावरी विठल माहादेऊ व त्र्यबक गोमदेऊ यासि पूसिलें याही जाहीर केले की आपण काबीज मुतशरीफ आहो व सनद असनाद हि आहे सदरहू हकीकती मुतसदियानी नवाब अमीरलउमराव यासि जाहीर केली नवाबसाहेबीं फर्माविले की हरगाहा की काबीज मुतशरीफ बाहात्तर वरसे नाही आणि सनद असनाद हि नाही मर्द तुफानी आहे ना। मा।र दूर करून विठल माहादेव व त्रिबक गोमदेऊ यासि परवानीयाचा हुकूम केला की परवाना देणे त्यावरून परवाना मर्‍हामत जाला याउपरि रुकसत होऊन पा। मा।रास आले तो मागून सुबियाचा हुकूम आणिला की पा। मारी तहकीक करणे कुल परगणा जमा करून तहकीक करणे त्यावरून राजश्री नारोजी यशवंतराव व उदाराम वगैरे उमराव बैसोन परगणा मेळऊन तहकीक केले तेथे परगणाचे मोकदम जमा होऊन सांगितले की विठल माहादेऊ व त्रिबक गोमदेऊ याचे वडील देसपाडे तहकीक आहेत पिढी दर पिढी खात आले आहेत या वेगळा दुसरा कोण्ही नाही ह्मणून महजर करून दिधला माफीक महजर दुसरा परवाना नवाबसाहेबाचा घेतला याउपेरी सुबा मिर्जा राजा जाला त्याचा परवाना करून घेतला त्या उपरि हजरत पातशहाजादेसाहेब अलम औरगाबादेस साहेबसुबा जाला ते वख्तीं माहाराज राजश्री सीवाजी राजे याचा सलाह जाला आनदराऊ व प्रतापराऊ दाहा हजारा स्वारानिसी चाकरीस दिधले नीराजी राहूजी वकील हजूर औरगाबादेस राहिले ते वख्तीं अबाजी तुराफ वादिया याने पताजीपत सरकारकून याजवळ भीड देखोन त्यास सटाबटा करून राजश्रीजवळ पताजीपतानी जाहीर केले की सुपाचे देसपाडेपण आपले आहे साहेबी आपणास ते वतन दिधले पाहिजे त्यावरी राजश्री राजेसाहेब बोलिले की आपण वतनाचा कजिया मनात आणीत नाही हे काम औरगाबादेस साहेबसुबा हजरत बाहादूरशा आहेत तेथे जाऊन कजिया करून तेथे जो कजिया फइसल होईल तो आपणास मजूर आहे त्यावरून पंताजीपंती अंबाजी तुराफ औरगाबादेस पाठवि तेथे अमानताचा परवाना चाली लाविला तो खबर औरगाबादेहून मल्हार विठल गुमास्ता याणे लिहिली मग कासीद सुपियासि आला तो गगाजी मुद्गल हवालदार याचे कचेरीस विठल माहादेऊ व त्रिंबक गोमदेऊ व रामाजी बाबाजी व तिमाजी मल्हार कुळकर्णी कसबाचे करीत होते ते हि बैसले होते तो खबर एकाएकी च आली मग गगाजीपती कागद पाहोन बहुत कष्टी जाले वादिया सरकारकून जबरदस्त पडिला हे गरिबे ब्राह्मणे कैसे वतन राहेल हे न कळे मग चौघे जण तैसे च उटोन पठेतून कसबियात चालिले तो दरवाजियाजवळ त्रिंबक गोमदेऊ रामाजीपंतास ह्मणो लागले की रामाजीपतो तुह्मी वडील घरचे आहा वडीलपण खाता वतनावर सरकारकून जोरावर उभा राहिला याउपेर वतन कैसे राहेल ह्मणौन बहुत कमदिमतीने बोलिला मग रामाजी बाबाजी बोलिला की ऐकतोस त्रिंबक गोमदेव आपले घर वडील आहे वडीलपण करीत आलो आहो तर वादियास मारून बाहेर घालून आणि वतन राखोन तरी च तोड दाखवीन ह्मणौन बोलोन पेठेत राहिले

पत्रांक ५७०

श्री
१७२४ वैशाख अखेर

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गंगाधरपंत तात्या स्वामीचे सेवेसीः-

सेवक लक्षुमण उमाजी मुा। सोलेगांव रामराम विनंती उपरी तुझी महादूबराबर पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर कळला. लष्करचें वर्तमानं तर: बंगस याचा मु। मौजे काठीपिंपळगांवावर होता, अशी बातमी होती. परंतु, सतेमिथे हें कांही पुरतें कळलें नाहीं. दुसरें श्रीमंत येशवंतराव होळकर याचा मुकाम पुनतांब्यावरच आहे. त्याचा रोख वैजापूरचा दिसतो. ऐसें पत्र मेसीभालगांवचे सोलेगांवकरी यांसी आलें, मेसीपासून खंडणी बागसानें रु।

तीनसें घेतली. परंतु मोंगलाई गांवचाही धीर.......भामगांवास आले. को सेंदूरवदें हेंही पळतें. ऐसें वर्तमान आहे. आह्मी बुधवारीं कायगांवास जाऊं. आपले गांवचे दरोबस्त गुढेंगांवाकडे गेलें. आपणास कळावें, इ. इ.

पत्रांक ५६९

पौ जेष्ठ वद्य १३
श्री

१७२४ वैशाख वद्य ११

हकायेक व नारफ अगाह नाना दीक्षित सलामतः-

अजतरक शाहमादखां बहावर बाद बंदगी आंकी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. आपण फौजेचे दहशतीकरिता हावलदिल जालांत, म्हणोन राजश्री नारो बल्लाळ यांनीं सांगितलें. त्याजवरून आपणास पत्र लिहिलें असे. तर, आपण फौजेचा वसवास चित्तांत न आनितां खातरजमा राखोन मौजे कायगांवी स्थिता करावी. आपणाकडेस कांहीं उपसर्ग लागणार नाहीं, बहुत काय लि। ? रा छ २४ मोहरम हे किताबत. *

पत्रांक ५६८

श्री
१७२४ वैशाख वद्य ११

( फारशी शिक्षा आहे. )

ता। मो। मौजे कायेगांव प्रो। गांडापूर. सुा इसन्ने मयातैन व अलफ. तुह्मी फौजेचे दहशतीकरितां हवालदील जालांत, म्हणोन राजश्री नारो बल्लाळ यांनीं हुजूर विदित केलें. त्याजवरून कौल सादर केला असे तर, तुह्मीं खातरजमा राखोन मौजे मजकुरीं आबाद राहणें. फौजेचा उपसर्ग तुह्मांकडे कांहीं लागणार नाहीं. रा छ २४ मोहरम, मोर्तबसूद.

पत्रांक ५६७

श्री.
१७२४ वैशाख वद्य ११

यादी खिजमजगार निा शागिर्दपेशा स्वारी राजश्री पंतप्रधान, सु। इसने मयातैन. कामगारीस येशवंतराव होळकर यांजकडेस जातात. सबब रो दुमाही छ १ सवालचा रु।।
५ सकोजी बिच्यारा
६ शिदोजी सावंत,
------
११

११ छ १ जिल्हेजचा रोजमुरा दुमाही.
-------
२२

दोन खिजमतगार येशवंत होळकर यांजकडे कामगिरीस जातात. सबब, रोजमुरे दुमाही दोन एा। बेवीस रुपयें देणें. ( पो ) छ २४ मोहरम, वैशाख सन इसने मयातैन. चिठी लिहिणें.

[ ६२ ]                                            श्री.                                              २८-२-१७०८.

राजश्री खेमसावत भोसले सरदेसाई पा। कुडाळ व महालनिहाय गोसावी यासी- छ अखडितलक्ष्मीअलकृतराजमान्य प्रतिराजश्री राजा शिवछत्रपति उपरि साप्रत राजश्री शाहूराजे याचा फितवा निर्माण होऊन राज्यात डोहणा जाहला. कितेक सेवकलोकी अवक्रिया करून जाऊन, त्यास मिळोन, अनसारिखी वर्तणूक आरभिली आहे या प्रसंगे तुह्मीं स्वामीशीं निष्ठा धरून, निर्व्याजत्वें , एकरूप निष्ठेनें वर्तणूक केली व राजश्री विश्राम अनंत व जीवाजीराम यास कितेक आपले निष्ठेचा अर्थ -हद्गत सागोन पाठविले कीं, आपण त्रिकर्णशुद्धीनें स्वामींशीं निष्ठेनें वर्तणूक करून, शाहूराजे यांकडे अनुसंधान लावणार नाहीं सर्व प्रकारे स्वामीची सेवा करून प्रयोजनप्रसंगीं स्वामीचे आज्ञेप्रमाणें आपणाकडील हशमांचा जमाव स्वामीचे सेवेसी देऊन, आणि त्यांचा पराजय करून, सर्वस्वे स्वामीची सेवा करून, स्वामीस संतोष पाववून, स्वामीनीं कृपाळू होऊन आपणाकडे पा। कुडाळ व बांदे व डिचोळी व साखळी व गणेरी व पेंडणें, हे सहा महाल वतनदाखल मुकासा चालवावे. ह्मणोन विनंति सागोन पाठविली ते या उभयतांनीं हुजूर येऊन निवेदन केली. त्यावरून स्वामींनीं तुमचे प्रामाणिकतेचा व एकनिष्ठतेचा अर्थ चित्तात आणून राजश्री रामचद्र नीळकंठ अमात्य हुकमतपन्हा यास व राजश्री गिरजोजी यादव यास आज्ञा केली याचे भेटीस तुह्मीं माणगावीचे मुक्कामीं येऊन भेटी घेतली आणि आपलें वृत्त यास निवेदन केलें की, आपण राजश्री स्वामीसीं एकनिष्ठेनें वर्तत आहों, पुढेंही स्वामीची सेवा एकरूप निष्ठेने करून शाहूराजे याकडे अनुसधान लावणार नाहीं, त्यांसी विरुद्धाचरणे वर्तोन, ये गोष्टीस अंतर पडणार नाहीं ह्मणून, एकान्त करणे, आपल्या आराध्य देवाची क्रिया करून वर्तावयाचा निर्वाह केला. तो अर्थ विशदेकरून यांही स्वामीस श्रुत करून तुमचें चालवायाविशीं विनति केली त्यावरून मनास आणितां तुह्मीं ह्मणजे वशज घराणदार, प्रामाणिक, एकवचनी आहा सदरहू लिहिल्याप्रमाणें अकृत्रिमभावें स्वामीची सेवा करून स्वामीस संतोष पाववाल, क्रियेस अतर करणार नाहीं, हा अर्थ दृढतर चित्तारूढ जाला. आणि स्वामी संतोषी होऊन तुमचें मनोभीष्ट सिद्धीस पाववावे हें अगत्य जाणून पा। कुडाळ व बादे व डुचोळी व पेडणें व सांखळीं व मणेरी या महालीं देवाब्राह्मणांचे इनाम सर्वमान्य स्वामीचे सनदेने आहे तें व वतनदारांचे इनाम खेरीज करून व वरकड गडाकिल्लेयाचाचा व जजिरियाचा तनहा व हशमांचा दुमाला सालाबाद तागायत सालगुदस्ता चालत आला असेल तो पुढेंही साल दर साल पाववीत जावा आणि सदरहू माहाल तुह्माकडे वतनादाखल चालवावे. ऐसी आज्ञा करून सनद निराळी सादर केली आहे. त्याप्रमाणें स्वामी तुमचे चालवितील हालीं स्वामीने तुह्मांकारणे हत्ती १, घोडा १, उरानडाव १, गुस्त १, येणेप्रमाणे पाठविलें आहे. घेणें आणि लिहिलेप्रमाणें स्वामीसीं निष्ठेनें वर्तणूक करीत जाणें. स्वामी तुमचे चालवाया अतर करणार नाही. सुहुरसन समान मया व अलफ. छ १७ माहे जिल्हेज. बहुत काय लिहिणें.
                                                                                                                 मर्यादेयं
                                                                                                                 विराजते.

पत्रांक ५६६

श्रीसांब.
१७२४ वैशाख वद्य ९

श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री लक्ष्मीनारायण दीक्षित स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी बापू गोखले यांचे अनेक सां नमस्कार विज्ञापना विशेष, ता। वैशाख वैद्य ९ पावेतों आपले आशीर्वादेंकरोन श्रीसमीप खुशाल असों विशेष, आपण पत्र व बर्फी पाठविली ती पोंहचती केली. त्याचें प्रत्योत्तर आणोन आपणाकडे पाठवावें, त्यांस प्रविष्ट केल्यावर दुसरे दिवशीं ज्वर येऊन अस्वस्थ पडलों. त्यावर, पोर्णिमेअनंतर स्नान केलें. आतां शरीर स्वस्थ जालें, त्यास, हाली जाऊन कागदाचे प्रत्युत्तर पाठविले आहे. पावेल, अणखी वो चिंतु जोशी कायगांवकर आले होते. त्यांनी श्रीमंताची भेट बकंभटद्वारा घेतली. परंतु मोरोपंत गोडबोले यांच्या बंधूची भेट उत्तम झाली होती. याचा विचार काय असेल तो यावरून ध्यानास येईल. तथापि भेटीनंतर श्रीमंत वो हरिहर दीक्षित साता-यास असतात. सांप्रत ते आपल्या भेटीस येणार ह्मणोन सांगितलें. त्याजवरून रा। विसोबा नाईक थत्ते यास विचारिलें कीं हरिहर दीक्षित कोणते ? तेव्हां विसोबानाईक यांणीं सांगितलें कीं, श्रीमंत रा। वो रामचंद्र दीक्षित तात्या यांचे बंधू. ते बहुत थोर आहेत. पुण्यास त्यांचे येणें बहुत नाहीं. स्नानसंध्या बहुत कर्तात. साता-यास असतात. याचा विचार काय असेल तो लिहावा. मलाहि पुसलें कीं, त्यांचा संप्रदाय बोलावण्यावांचून यायचा नाहीं. त्यास, श्रीमंत वो नानाजी यांस लिहून काय विचार असेल तो समजवावायाकर्ता लिहिलें आहे. आणीक चिरंजी. वानीं पत्र पाठविलें आहे. त्यास, तेंहि आपल्याकडे पाठविलें आहे. हालींवर्तमान तरः पुण्याकडील सखाराम घाटग्या नगरास दो चौ दिवसीं येतील, पुण्यांत नाकेबंदी श्रीमंताची बसली. हालीं कारभार श्रीमंतच स्वतां कर्तात. कळावें. कांहीं दिवसीं विदुराचे पारपत्य होईल. कळावें. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.

रा बाबाइगोळे यांनी याद पाहून अधेली मागारी दिल्ही. यादहि मागोन पाठऊन देतो. हे विज्ञापना. *

पत्रांक ५६५

श्री ( नकल )
१७२४ वैशाख वद्य ७

राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा गोसावी यांसीः-

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो। बाजीराव रघुनाथ प्रधान आशीर्वाद विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. आपणाकडे संस्थान गढेमंडळे रेवाउत्तरतीर याजबाबत ऐवज पेशजीं सरकारांत घ्यावयाचा करार केला आहे. त्यापैकी, बद्दल देणें, नारायण बाबूराव वैद्य यांचे गुजारतीनें कंठी मोत्यांची एक सालमजकुरीं सरकारांत खरेदी केली. त्याची किंमत रुपये ११९००० एक लक्ष एकोणिस हजार रुा देविले असेत. तर पावते करून पावलियाचें कबज घ्यावे. रा छ २१ मोहरम, सुा। इसन्ने मयातैन व अल्लफ, बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति. सिका बार.