पत्रांक ५२४
श्री.
१७२३ चैत्र वद्य ५
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसीः-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना. येथील क्षेम ता चैत्र वद्य ५ भृगुवारपर्यंत वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण गेलियावर काल गुरुवारी पेंढारी कंपूची गडबड बहुत जाली. राहोरीचे मुक्कामी बुधवारी होते गुरुवारी कूच करून खंडाळ्यास, नजीक पुणतांबें, येथें मुकामास गेला, कोन्ही ह्मणूं लागले कीं, आपलें गांवावरून येतो ह्मणून तिन्ही गांव बहुत घाबरले ! श्रीमंत ती त्यांनी मातोश्री माईस व आपा वगैरे मंडळीस गाणगापुरी वाटेस लाविले होतें. पाठऊ नका ह्मटलें. परंतु त्यांचे धैर्य पुरेना, म्हणोन वाटे लाविले. मग सायंकाळीं मागती आणिलें. वाणी याचे हिशेब एकदों रोजां तयार करून पाठऊन देतों. तूर्त बेलदारांस खर्चाची फार अडचण आहे. या करतां तृर्त बाळा गुरुवाबरोबर अगत्य दहा रुपये तरी पाठवावे. अनमान न करावा. आपले वाट्याचा कडबा एकादों रोजांत वसूल करतों. तात्याकडील त्यांजकडे पोंहचवितों. साता-याचा साता-यास पाठऊं. कळावें. बावनपागे यांसी व जरीपटके मे पानसे वगैरेसी लढाई जाली. बावनपागेचा मोड होऊन, तमाम बुणगें लुटलें. बावनपागे सडी फौज पांच सात हजारानसी निघून गेला. याप्रों वर्तमान ज लें. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञप्ती.
स्वामींचे सेवेसी मल्हार रामचंद्र कुळकर्णीसां नमस्कार लिखितार्थ परिसोन लोभ करावा. वाणीयाचे हिशेब व तगटाची वाटणी तयार करून पाठवितों. हे विज्ञाप्ती.