[ ९२ ] श्री. १७२८.
राजमान्य राजश्री भगवंतराव रामचंद्र यांसीः-
आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें, तें प्रविष्ट झालें. लिहिला अभिप्राय सर्व कळों आला. व गोविंद वेंकटाद्री पाठविलें याणीं तुमचा भाव गर्भ विदित केला ऐशास, तु्ह्मीं राज्यांतील पुरातन सेवक. वडील परंपरेनें सेवा करीत आला आहां. ज्यामधें धण्याची रजावदी त्याप्रो। वर्तावें, उचित, ऐसें असता अवलंबिला प्रसंग तुह्मां योग्य आहे ऐसे नाहीं अैशानें कोणाचे परिणाम लागले आहेत ? या उपरी त-ही धण्यासी निष्ठा धरून आज्ञेप्रमाणें वर्तणूक करणें आपल्या कदीमाईस बोल न लागे तो विचार करणें तेही तुमचे पूर्ववतप्रों। सर्वस्वें चालवीतील सूज्ञ असा.