[ ९५ ] श्री. १७ एप्रिल १७२८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५४ कीलकनाग संवत्सरे अधिक वद्य पंचमी सौम्यवासरे क्षत्रिय कुलावंतस श्रीराजा शंभु छत्रपति स्वामी यांणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकमतपन्हा यांसीं आज्ञा केली ऐसी जे- तुह्मीं चित्तांत एक प्रकार आणून तेथें श्रीमंत मातुश्री साहेबापाशीं आज्ञा मागता ह्मणोन वर्तमान विदित जालें. तरी तुह्मीं स्वामीचे यखतियारी सेवक आणि साहेबाची ममता विशेषाकारें तुमचे ठायी हें पत्रीं विस्तारें लिहावें तर मनोमन साक्ष असे. तुमचा हेत स्वामीचे ठायीं व स्वामीची ममता तुह्मांवर असे. स्वामी सेवक एक, ऐसे असोन कोणी सागणारांनीं काय सागोन तुमचें चित्ताचा विपर्यास केला हे न कळे ! या उपर कोणेक प्रसग चित्तातं न मानिता समाधान असो देणें. राजश्री पंतीं या राज्यांत श्रम साहास करून कीर्त संपादिली त्याचे पुत्र तुह्मीं आहां. पताचे घराशीं स्वामीचा द्वैत विचार नाहीं, हा निशा असो देणें या उपर चित्तांत संदेह मानाल तरी तुह्मांस पंताची व श्री रामचंद्राची व स्वामीचे पायाची शपथ असे. समाधान असो देणे उदईक साहेबाचा मुकाम गड मुडसिंगी येथें असे. तुह्मीं तेथे जमावानिसी स्वामीचे दर्शनास येणें दर्शनांतीं सर्व चित्ताचा खुलासा होईल समागमें राजश्री कोंडाजी सुभेदार यांसी घेऊन येणें. वरकड वृत्त शेख महंमद आज्ञेप्रमाणें सांगतां कळेल. सारांश गोष्ट जे, साहेबाचा तुह्मांस भरवंसा असिला तर दुसरा अर्थ न समजतां दर्शनास येणें जाणिजे. किमपी लक्ष प्रकारें चित्तांत संदेह न मानितां मुडशिंगीचे मुकामीं दर्शनास येणें. जाणिजे. सुज्ञ असा.