Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री
मार्गशीर्ष शुा १३ रविवार शके १७१५ ता. १५ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. नवाब कमठाण्याहुन फिरोन वेदरास येणार, याप्रा वर्तमान लोकमुखें दाट आहे. बेदरचे किल्यांतील हवेलीही झाडून नीट करावयास लाविली आहे. छ १ १ जावलीं अथवा छ. १५ रोजीं येणार, यैसें येक वर्तमान. दुसरें, वंजरातीरीं डेरे देऊन आठ पंधरा दिवस आणिक सैर षिकार करावी हेही वार्ता आहे. परंतु, बेदरास हवेली दाखल होण्याचीच खबर गरम आहे. ठरेल त्याप्रा। विनंती मागाहुन लिहिण्यात येईल. रा। छ. ११ माहे जावल हे विज्ञापना.

श्री
मार्गशीर्ष शु। १३ रविवार शके १७१५ ता. १५ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. दौलाची तबियत कसलमंद, सबब मीरअलम रात्रंदिवस त्याचे समीप असतात. मीर अलम यांनी सुवाई नाईक जासुदांचा यास बोलाऊन विच्यारिलें की येथुन कुहीर किती आहे ? तेथुन हैदराबाद किती कोस ? कुहीरास झाडी डोंगर गवत काडी लस्करचे सरबराई जोगी महिनापंधरादिवसाचे बेगमीची आहे कीं नाहीं ? नाईक याने सागितलें की कमठाण्यापासोन कुहीर आठ नउ कोस आहे. तेंथुन हेदराबाद तीस कोस. कुहीर जागा पान पत्री लांकुड फांटे चारा पुष्कळ अबा (द). हवाही चांगली आहे. याजवर मीर अलम यानें कलबर्ग्याचा रस्ता विच्यारला. नाइकानें सांगितला. त्याच्या फर्दा येक कुहीरची व येक कलबर्ग्याचे रस्त्याची व वंजरा तीरची जागा या प्रा। तीन फर्दा तयार करुन मीरअलम यांनीं समागमें घेतल्या. दौलासी मीरअलम यांचें बोलणें जालें. यांतुन कोणते ठरलें हें समजण्यांत आलें नाहीं. ठरेल त्याची विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल. रा। छ. ११ माहे जावल हे विज्ञापना.

श्री.
मार्गशिर्ष शु। १३ रविवार शके १७१५ ता. १५ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. कमठाण्यास नबाब, डेरे दाखल जाल्यापासोन नित्य शिकारीस जनान्यासहित बाड्याआंत प्रातःकालीं स्वार होउन जावें. दौला व पागावाले सलाबतखान वगैरे लोकांस बाड्या बाहेर शिकारीस जाण्याची ताकीद. त्याप्रा त्यांनीं परभारां जाऊन दीड प्रहर पावणें दोन प्रहर पर्यंत जे शिकार साध्य होईल ते घेऊन डे-यास यावें. याप्रा क्रम चालत आला. बाडा बारा तेरा कोसांचा येकेहली चरकपली पर्यंत बसला. रमण्यांत हरणें बहुत, यैसी खबर पहिली होती. परंतु रोज शिकारीची कस्त होत आहे यांत नित्य दोन हरणें, केंव्हां येक मोठी शिकार साधल्यास च्यार पांच हारणें पराकाष्ठा, येखादे दिवशी शिकार होतही नाही. याजकरितां नवाबाची मर्जी खफा. सार्वकाल राग, असा काहीं प्रकार तीनचार दिवसां पासोन आहे. रा। छ ११ जावल हे विज्ञापना.

श्री
मार्गशीर्ष शु। ५ रवीवार शके १७१५ ता. ८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. दौला शिकारीकरितां श्रीक्षेत्र प्रमेर या राणांत छ २६ राखरीं गेले. शिकार करुन नंतर क्षेत्रानजीक श्रीचें देवालयानजीक आंबराई आहे तेथें बसले. गांवातील ब्राह्मणांची घरे वगैरे जागा पाहाण्यास कोन्हा कोन्हास पाठऊन शोध करविला. पुढे चंपांशष्ठी यात्रेचे दिवस. हाजरत येथें रवान लाअपजा१ होणार ह्मणोन बोलोन करोडगिरीकडील मुतसदी व पंचोत्र्य वाले कारकुन यांस बोलाऊन सांगितले की ' लश्कर क्षत्रा समीप. याजकरितां बेपारी उदमे येण्यास व पंचोत्र्याचे दहशती मुळें व गाफिली करतील, त्यांस दिलशाचें२ कौल ज्याबज्या पाठऊन मामुल प्रो यात्रा करवणें ' व त्यावरुन करोडे यांणीं हुमणाबाद कलबर्गे व सुळेपेठ वगैरचे बेपारी यांस कौल पा कीं तुह्मीं खातरजमेनें बवसवास माल घेऊन यात्रेस येऊन खरीदी फरोख्ती करणें, या प्रो तेथें येक प्रहर बसोन कारभार केला. षोहरत आम जाली कीं ब्रह्मणांचीं घरें खाली करवितात. नवाब येथें येणार. त्याजवरुन क्षेत्रींचे ब्राह्मण समस्त भयभीत होऊन अह्मांकडे आले आणि वर्तमान सांगितलें की “हे क्षेत्र प्राचीन यास कधींही उपद्रव जाला नाहीं. तो आतां होणार. आह्मां ब्राह्मणांचे वाली श्रीमंत किंवा प्रसंगी तुह्मीं अहांत. हें अरीष्ट निवारण होय तें करावें" ह्मणोन बहुत घाबरे जाले. त्यावरुन दौलांकडे सांगुन पा। की “हें क्षत्र देवब्राह्मणाचें येथें मागें उपद्रव जाला नाहीं, आणि पुढेंही होऊं नये. ब्राह्मणांनी वर्षाचा धान्य संग्रह संसारकृत्याचा व सांप्रत यात्रेमुळें येजमान येणार याजविसीं आधिक संग्रह करून ठेविला आहे. व घरोघर बालातनी व दुखनाइत मुलें लेंकरें. यास या हिंवाळ्या दिवसांत कोठें घेउन जावें? कदाचित नबाबांची मर्जीच जाण्याविशीं असल्यास, यात्रेचा तमाषा पाहाणें तरी गांवा पासेन फासल्यानें डेरे उभे करून येक दोन राहिल्यास चिंता नाही. परंतु ब्राह्मणांस उपद्रव करून घरें खालीं करवणें हें चांगलें नाहीं" याप्रों सांगुन पाठविल्यावरुन दौलांनी उत्तर पा। कीं आह्मीं क्षत्रास जाऊन जागा पाहुन आलों, त्या प्रों हाजरतीस अर्ज केला. परंतु अद्याप निश्चय नवता. हाल तुमचे लिहिल्यावरुन अर्जही करितों. बहुत करून ते जागा नापसंत होईल. तथापी मागती इरादा केला तरी पुन्हां अर्ज करितों. तुह्मीं ब्राह्मणाची खातरजमाकरून क्षेत्रास वाटे लाऊन द्यावें. या प्रों उत्तर दौलांकडील आल्यानंतर सर्वत्र ब्राह्मणांची खातरजमा करून क्षेत्रास पा. रा। छ ४ माहे जा। दिवल हे विज्ञापना.

छ ११ जावलीं डांकेवर
मार्गशीर्ष शुा १३ रविवार शके १७१५ ता. १५ डिसेंबर १७९३..
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचें पत्र-

लेखांक १०९                                                                                                                                    १५८३ ज्येष्ठ वद्य १२
                                                                                                            
                                                                                          
(फारसी मजकूर)

कौलुनामा अज दिवाण पा। वाई ता। अंतोजी बिन शंकराजी लस्करीचाकर ठाणा पा। मजकूरु सु॥सन इसने सितैन अलफ बाबे कौलनामा ऐसा जे पेसजी गनीमानी कोट बलाविला होता त्यावरी हुजरून दिवाण नामजाद बिवखत सिदी जोहर काबिजाति आले सर गुऱ्हो नाइकवाडी व देसाई पा। मजकुरु पेशवाज गेले त्याबराबरी तुवा जाऊन भेटलास ठाणा लस्करीपणाचे चाकरीचे उमेद धरून मशाखत केले गनीम दबाब खाऊन गेले तुझे मशाखत पाहून सरफराज करून लस्करी त्याचे तनखो ठिकणाती जमीन चावर दोनी मर्‍हामत केले सनद देऊन यावे तलग मधवाजी कृस्ण हवालदार माजी पा। मजकुरु यासि बुर्‍हानखान गोरी नामजाद पा। मजकूरु याने दस्त करून कोट बलाऊन राहिला होता त्यावरी पा। मजकूर               हजरती साहेबाचे खासखेलीस मर्‍हामत जाहाले बुर्‍हानखान गोरी जमायतीदार कोट सोडून गेला दिवाण नामजाद कोट कबज केला सरगुऱ्हो नाइकवाडी चाकरी करीत गेले त्याबराबरी तुवा चाकरी करीत गेलास तुझे चाकरी पाहून मेहरबान होऊन सरजाम करून लस्करीयाचे तनखा मर्‍हामत करून दिल्हे लस्करी देखील अस्पस्वार १ एकून मु॥ दर माहे टके २०० दोनी से एकून सालीन टके २४०० दाहा माहीप्रमाणे खुर्दा टके २००० वजा एक राज टके ६६॥८ बाकी बेरीज टके १९३३४ पैकी मेबायद हुजूर देण बेरीज टके ७३३।४ बाकी तनखो टके १२०० दर चावर बा। महताज हसम टके ६०० एकून सदरहू बेरीज टके बारासे ठिकणाती दिल्हे ठिकाण जमीन अवल बा। खालिसातीपैकी जमीन चावर २ दोनी एकून दुमाले बेरीज

नखत दर      चावरे मा।  व      ना। टके                                               गला दर        चावरे गला        कैली खंडी
१२०                एकून               टके                                                   ३ एकून          गला कैली        खंडी ६
१८०                                     २४०
६०                माहासूल
----             नखतयाती
२४०

यासि गावगना दुदेह

मौजे पिपरी    जमीन चावर                                              मौजे जलगाउ    जमीन चावर  १ यो। बेरीज
१ एकून          बेरीज                                                        एकानि टके       गला कैली खंडी
एगानि टके     गला कैली खंडी                                                 १२०                ३305
१२०                      ३305

येणेप्रमाणे लस्करीयाचे तनखो ठिकणाती मिरासी करून महताजी जमा केले तुवा चाकरी करीत असता पा। मजकूरु हजरत                   साहेबास मुकासा जमजम अर्जानी जाहाला तुवा चाकरी करून असता सदरहू ठिकणाती तनखा दुमाले मिसेली देणे ह्मणौऊन मागतां तुज रजा फर्माविले जे तुवा पेसजी कारकीर्दी दर कारकीर्दी सदरहूप्रमाणे लस्करीयाचे तनखो ठिकणाती चावर २ दोनी मिरासी करून घेतले आहे त्यास माजी कारकीर्दीस सेरणी दिल्हे नाही मिरासीचे काम आहे आता काही सेर्णी कबूल करून बिलाकुसूर सदरहू ठिकाण मिरासी करून घेऊन तनखा सदरहू ठिकण खाऊन ठाणाचे चाकरी अलग नोबत करून असणे ह्मणौऊन फर्माविले मग तुझेबाबा सरगुऱ्हो नाईकवाडी व देसाई पा। मजकूर इलतमेस केले जे साहेबी सदरहू तनखोप्रमाणे दुमाले करून सेर्णी देणे ह्मणौऊन फर्माविले तरी नफर मजकूर तुटवड गैरमवसरदार आहे सदरहू ठिकणतीचे चाकरी करणे लागते लस्करीयास व घोडीयास खर्च साज इराख लागते तरी साहेबी बिलाकुसूर अजरामर्‍हामत मिरासी करून देऊन जीवन पाहून सेर्णी खडलीया नफरमजकूर तनखा खाऊन चाकरी करून सेर्णी खडिले बेरीज उसूल करून देईल ह्मणौऊन तरी बराय इलतमेसी अर्ज सुरगुऱ्हो नाईकवाडी व देसाई पा। मजकूरु खातिरेस आणून तुझे तनखो ठिकण सदरहू चावर दोनी बिलाकुसूर अजरामर्‍हामत करून देऊन सेर्णी नाणे होन २५ पचवीस तुजपासी घेऊन लस्करीयाचे तनखो दुचावर सदरहूप्रमाणे मिरासी करून तुज खासिखास दिल्हे असे यास दाईज गोत्रजास नि॥ नाही तुवा लेकुराचे लेकुरी कारकीर्दी दर कारकीर्दी चाकरी करून सदरहू आपले तनखा खाऊन सुखी असणू पेस्तर मुसलमान अगर हिदु होऊन जो कोण्ही इस्कील करील त्यास आपलाले महजदाचे सवगद असे तनखा खाऊन ठाणा चाकरी करून सुखे असणे दरीबाब कौल असे

तेरीख २५
सौवाला

[ १३८ ]                                    श्री.                                          
                                         

तीर्थस्वरूप राजश्री काका वडिलाप्रति प्रीतीपूर्वक सकल सौभाग्यादिसपन्न मनाबाई सरदेसाईण प्रात कुडाळ व माहालनिहाय दंडवत विनति येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे विशेष. बहुता दिवशीं आशीर्वाद पत्र पाठविले प्रविष्ट होऊन बहुत समाधान झाले याचप्रकारें सर्वदा पत्र पाठवून स्नेहाची अभिवृद्धि जाली पाहिजे यानंतर पत्रीं कितेक स्नेहभाव आणून वडीलपणें बुद्धिवाद लिहिला तो यथार्थच आहे. आह्मींही आपणाठाईं किमपि दुसरा अर्थ धरीत नाहीं. आपले स्नेहाची जोडी केली ते दिवेदिवस वृद्धीतें पावोन विशेषाकारें व्हावी हेंच आह्मांस आवश्यक. यांत दुसरा पदार्थ नाहीं. मातु श्री आह्मांठायी स्नेह धरीत होती तैसा तुह्मीं धरावा ह्मणून विशदार्थे लिहिलें. तरी वडिलांठाई आह्मीं आपणास मानितों. हरयेकविशीं आपणच प्रीति संपादोन स्नेह वर्धमान करावा हें उचित. वरकड भेटीचा मजकूर लिहिला यापेक्षा अधिकोत्तर आणिक काय आहे ? असते पदार्थ तुमचे स्नेहाची जोडी केली आहे येविशीं मुख्यांसही परम आवश्यक आहे. तो विस्तार लिहितां पुरवत नाहीं हाली तुह्मीं भाद्रपदमासीं भेटीचा निश्चय लिहिला तो येथूनही करार करून आपणास पत्रें पाठविलीं आहेत. भेटीच्या प्रसंगास एक महिना आवध राहिली आहे याउपरि अविलंबेंच भेटी होऊन उभयपक्षीं जो कर्तव्यार्थ करणें तो आपले चित्तानुरुप होईल. आह्मीं अपत्यासमान, निरतर पत्रीं परामर्ष करून स्नेह वर्धमान करवीत असावें बहुत काय लिहिणें. हे विनति.

दोन हरिणाची शिकार करूनं पा, ते गुजरली. दोन प्रहर पांच घटिकेस नवाब डे-यास आलें. दौला मैलाराहुन आले, त्यांचा अर्ज जाला. रात्रीं खैर सला. छ २७ रोज सोमवारीं दोन घटिकां दिवसां नवाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस गेले. येक प्रहर च्यार घटिकेस माघारे आले. रात्री खैर सला. छ २८ रोज मंगळवारीं प्रातःकाळीं दौला स्वार होऊन शिकारीस पुढें गेले. तीन घटिकेस नवाब गदीचे हाथीवर स्वार जाले. शिकारीस गेले. पागावाले यांणी येक हारणाची शिकार केली. दौलांनी च्यार हारणांची शिकार करुन गुजराणली. असदअलीखानानीं परिंदाची शिकार केली. नवाबाची अंगठी गमावली, ते खिजमतगारास सांपडली त्यानें आणुन दिल्ही. त्यास इनाम दिल्हा. येक प्रहर पांच घटिकेस डे-यास आले. दौलांस व पागावाले यांस हुकुम जाला जे वाड्याबाहेर शिकारीस जात जावे. रात्रीं खैर सला, छ २९ रोज बुधवारीं दोन घटिका दिवसां नवाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस गेले. दौला व असदलीखान व रावरंभा शिकारीस परभारां गेलें. पागवाले अलाहिदा गेले. नवाबांनी दोन हारणांची शिकार केली. दिलदारखानानें पांच हारणांची शिकार करुन गुजराणली. दौलांनी येक हरण धरलें. दोन प्रहराचे अमलांत नवाब डे-यास आले. हैदराबादेहून नव तोफा दाहा दाहा सेर गोळ्यांच्या आल्या व वीस शेर गोळ्याच्या तोफा ४. च्यार पेटारे बारूत गोळ्याचे. सदरहु सरंजाम बेदरचे किल्यांत दाखल जाला. छ माहे जावल गुरुवारी प्रातःकाली जनान्यासहित नबाव वार होऊन शिकारीस गेले. दौला व पागावाले व सलाबतखान बाडाबाहेर शिकारीस गेले. नवाबांनीं तीन हरणांची सिकार करून डबापुरास गेले. तेथील उंसांचे गु-हाळ तयार जालें, जनान्यासुधां उसाचा रस घेतला. भोजन जालें. दोन प्रहरास डे-यास आले. रात्रीं खैर सला. रा। छ ४ जमादिलावल हे विज्ञापना.

श्री.
मार्गशीर्ष शु. ५ रविवार शके १७१५. ता० ८ दिसेंबर स १७९३.

विनंती विज्ञापना, चेनापटणांहून व्यंकटरामदिला याजकडोन अखबार आली ते पाठविली आहे. रा गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्ट करतील. अवलोकनें मजकूर ध्यानात येईल. उत्तरें रवाना व्हावयास आज्ञा जाली पाहिजे रा। छ, ४ जावल हे विज्ञापना.

श्री.
कार्तीक शु. ५ रविवार शके १७१५. ता. ८ दिसेंबर स. १७९३.

विज्ञापना यैसीजे. येथील वर्तमान ता २० माहे राखर सोमवार पावेतो अखबार पत्रीं लेखन करुन सेवेसीं पत्राची रवानगी केली, त्यावरुन ध्यानास आलें असेल. तदनंतर येथील वर्तमान छ मजकुरीं रात्रीं दौलाची अर्जी गुजरली, छ २१ रोज मंगळवारीं प्रथम च्यार घटिकां दिवसां ख्वाबगाहामधें नवाब बरामद जाले, सैद उमरखान व अबदुल करींम व महमदषाबान यांचा सलाम जाला, लालन हज्यामाची याद केली. तो हाजर जाला, हाज्यामत होऊन येक प्रहर च्यार घटिकेस बरखास्त जाले. छ २१ रोज मंगळवार भारामल यांची अर्जी व शंकरराव भोंग यांचे दोन डबे जवाहिराचे व पोषागी सणगें वगैरे सरंजाम आला, तो गुजरला. रात्रीं दौलाची अजीं गुजरली. छ २२ रोज बुधवारीं दिवसां दरबार जाला नाही; रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ २३ रोज गुरुवारीं सवारीचा हुकुम होऊन लवाजमा हजर जाला. दोन घटिका प्रथम दिवशीं खिलवतीमध्यें नवाब बरामद जाले. दौला व सरबुलंद जंग व धांसीमियां व अजमखान व रायेराम व मुनशी व मीरआलम व रावरंभा वगैरे मामुल इसमांचा सलाम जाला. हाथीवर जर्द अंबारीमध्यें नवाब सवार जाले. दोला मीर अलम उभयेतां खवासीमध्यें होते. किल्याबाहेर स्वारी आल्यानंतर फौज व गारद यांचा सलाम जाला. येक प्रहर तीन घटिका दिवसां कमठाणें येथें स्वारी डे-यास दाखल जाली.सर्वांच्या नजरा होऊन बरखास्त जालें. चार घटिका दिवस शेष राहिला असतां बंगल्यामध्यें नबाब बरामद जाले. मामुली लोकांचा सलाम जाला. दुरबीण लाऊन चहुकडील बाड्याचें राण पाहिलें, मगर हेच समंई बरखास्त जालें. रात्रीं खैर सला. छ २४ रोज शुक्रवारीं सवासे रथ व ध्यार हाथी गदीचे वगैरे स्वारीचा लवाजमा प्रातःकालीं हाजर जाला. दोन घटिका दिवसां नबाब स्वार होऊन जनान्यासहित शिकारीस गेले. शिकार करून येक प्रहर पांच घटिकेस डे-यास आले, आंबराईमध्यें डेरे देण्याचा हुकुम फरासखाण्याचे दारोग्यास जाला. रात्रीं रोषनींनें नवाब दौलाचेथे आले. त्याची व साहेबजादेची नजर जाली. च्यार धटिकेस आपलें मंकानांस आले. छ, २५ रोज मंदवारीं तीन घटिका दिवसां नबाब स्वार होऊन शिकारीस गेले. दौला समागमें होते. पांच परिंदाची शिकार करून आंबराईतून आले. दौला शिकारीस पुढें गेलें. त्यांस येक हारण फांशांत सांपडलें तें त्यांनीं गुजराणलें. बाड्यांत तीन माणसें सांपडलीं, त्याचे हात तोडावयाचा हुकुम जाला, आंबराईत भोजन दौलसहित जालें, येक प्रहर च्यार घटिकेस मकानास आले. रात्रीं साहा घटिकेस नबाब बरामद जाले पागावाले वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला. जासुदाचे दारोग्यास हुकुम जालाजे वाड्या आंत कोण्ही माणु ( स ) न ये येसा बंदोबस्त करणें, छ. २६ रोज रविवारीं दोंन घटिका प्रथम दिवसां नबाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस गेले. दौला स्वार होऊन मैलाराकडे गेले. अर्ज जाला. नवाबांनीं पांच परिंदाची शिकार करून अंबराईत आले. तेथें भोजन जालें. दोन खाने रवाना दौलाकडे मैलारास पाठविला. दौलांनीं चिते सोडोन

श्री.
मार्गशीर्ष शु. ५ रविवार शके १७१५. ता०८ दिसेंबर स १७९३.

श्रीमंत रावसाहेब यांस मामुली प्रों हवाल्याचें पत्र*.... पृष्ठ टीप पाहा.


श्री.
कार्तीक श• ५ रविवार शके १७१५. ता. ८ दिसेंबर स. २७९३

विनंती विज्ञापना, यैसीजे. कमठाण्यास शिकारगाहाकरीता नबाब बेदरादून निघोन डेरे दाखल छ, २३ माहे राखिरीं जालें. बाडा बारा कोसाचा भारी बसला. नित्य प्रात:कालीं नी नबाबांनीं स्वार होऊन शिकारीस पांच सात कोस, केव्हां जनान्याचे बंदोबस्तानसीं, कोण्हे दिवसीं मर्दान्याची शिकार या प्रो रोज होत आहे. बाड्या बाहेरही कितेक लोक शिकारीस हुकुमा प्रो जाऊन शिकार करून गुजराणितात. या प्रों शिकारीचा तुर्त हररोज ज्यारी आहे. र॥ छ. ४ जमादिलावल हे विज्ञापना.


श्री.
मार्गशीर्ष शु. ५ रविवार शके १७१५. ता० ८दिसेंबर स १७९३.

मिनंती विज्ञापना- मोलेंगांव प्रा वरवाल येथील यात्रा सालाबादी चंपाषष्टीपासोन सुरु होती. चहूंकडून घोडीं, तटें, उंट वगैरे जनावरें विकरीस येतात. त्यास सालमजकुरीं नबाबाचे सरकांरांतुन असदअलिखान यांस पं. नास हाजाराचीं घोंडीं व पागेंकडे चालीस हजारांची खरीदी करण्याचा हुकुम जाला, असदअलीखान घोडीं खोस रवाना होणार. रा छ. ४ जावल हे विज्ञापना.

श्री.
श्रीमंत राजश्री---------रावसाहेब स्वामीचे

सेवसीं----------------
विनंती सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार विनंती विज्ञापना ता २३ माहे राखर बेदर येथें स्वामीचें कृपावलोकानेंकरून सेवकाचें वर्तमान येथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पेशजी छ २२ माहे मजकुरीं लेखन करुन पत्राची रवानगी सेवेसीं केली त्यावरुन ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमान छ मजकुरीं रोज गुरुवारीं प्रथम दोन घटिका दिवस आल्यानंतर नवाब जर्द अंबारींत स्वार जाले. खवासींत दौला व मीरआलम होते. वरकड साहेब जादे ज्यांस समागमें यावयाची आज्ञा जाली ते व आणिक अमीर उमराव तयार होऊन आले. व जनान्याचा रथ व गाड्या व अंबा-या वगैरे सरंजाम सिद्ध जाला. या समुदायानसीं कसबे कमठाणें पार मजकुर बेदरापासोन तीन कोसांचे फासल्यानें आहे, तेथें शिकारीचें मकान करार केलें आहे. स्वार होऊन गेले. कमठाणें याचे उत्तर व पूर्वभागीं गारद्याचा बाडा शिकारचे मैदान मध्यें सात कोस घेऊन बंदोबस्त करविला. याजमुळें बेदराहून लोकांस जाण्यास येका मार्गे नबाबाचे डे-यास पांच कोस व पश्चमेकडून व पूर्वेकडोन जाण्यास बारा कोस, याजकरितां सर्वलोक, सरदार, मुतसदी आदिकरून समागमें गेले ते किल्याचे दरवाज्यावर परवानगी आंत जाण्यास नाहीं. दौला यांचे सांगण्यांत कीं नबाब कमठाण्यास वीस दिवस राहणार. आणि सरंजाम महिन्याचा तेथें करविला आहे मग पाहावेंवीस दिवस राहतात किंवा महिना राहतात, नबाबाची प्रकृति या दिवसांत काहींसी बेआरामाची दिसण्यांत आली. परंतु जाहेरदारींत दाखविण्यात कटाक्ष दाखऊन आहेत. बेदरची हवा तो कोणासच मानत नाहीं. कमठाणें येथील हावा कसी आहे हें आतां पुढें समजेल त्या प्रो विनंती लिहिण्यांत येईल रा. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
छ. ४ जमादिलावलीं पत्राची रवानगी डांकेवर.

श्री.
विनंती विज्ञापना, यैसीजे. येथील वर्तमान ता छ. १५ माहे राखर

बुधवार पावेतौं अखबार पत्रीं लेखन करून सेवेसीं पत्राची रवानगी केली, त्यावरून ध्यानास आलें असेंल. सांप्रत येथील वर्तमान छ मारी दौला कमठाण्यास जाऊन जागा पाहिली. तेथील लोकांचीं घरें खालीं करून मरामतीस बेलदार व कामाठी लाविले. येते समंई पांच हरणांची शिकार करून तीन प्रहराचे अमलांत किले बेदरास आले. नबाबास तीन दस्त जाले. रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ. १६ रोज गुरुवारीं तमाम सरदार व मनसबदार मुतसदी यांजकडे चोपदार पाठऊन ताकीद केली कीं, ‘ कमठाण्यास आपलाले डेरे दांडे पाठऊन मिसलबंदीनें उतरणें,' प्रात:कालापासोन दोन प्रहर पर्येत नवाबास पांच दस्त जाले.चराईहुन पंचवीस हाथी व शंभर उंटें आले. दिवसां दरबार नाहीं. रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ १७ रोज शुक्रवारीं हैदराबादेहुन अलीज्याह-बाहादुर -साहेबजादे यांची अर्जी व नजर व मिठाई आली ती गुजरली. महमदपन्हा दारोगा हरका-याचा यास हुकुम जाला कीं 'कमठाण्यास जाऊन सरकारी व तमाम सरदार म ( न ) सबदाराचे झेंडे उभे करणे.' त्या प्रा झेंडे घेऊन तो गेला. येक प्रहर दिवसां खिलवतीमध्यें नवाब बरामद जाले. सरबुलंदजंग व अजमखां व यकरामुदौला वगैरे इसमांचा सलाम जाला. येक प्रहर दोन घटिकेस बरखास जाले. रात्रीं जनान्याचा बंदोबस्त होऊन कंचन्यांचा नाच होता.छ १ ८रोज मंदवारीं मुसारेहमुकडील गाडद हजार आली. याचा अर्ज जाला. दिवसां दरबार नाहीं. रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ १९ रोज रविवारीं फरेदुज्याह साहेबजादे यांनीं आपलीं सालगिरे जाल्याची नजर केली. मीर पोलादअली व सुभानअली यांची याद केल्या प्रा ते हजर जाले. त्यांस जनान्यांत बोलाऊन घेतलें, शुतरखाना शंभर उंट व च्यारसे बैत रथगाडयायाचे आले.दिवसां दरबार जाला नाहीं.दोन घटिकादिवस शेष असतां चराईहून पंचवीस हाथी आले. छ २० रोज सोमवारी दौलांकडे हुकुम गेला कीं रावजीस व मिस्तर किनवीस घेऊन येणें. साहा घटिका प्रथम दिवसां खिलवतीमधें नवाब बरामद जाले, दौला व मीरआलाम व सरबुलंदजंग व घासीमियां व अजमखान वगैरे मामुली इसमांचा सलाम जाला, रावजीची याद केल्याप्रा.ते आले. त्यांचाही सलाम जाला. दौला व रावजी व मीर आलम तिघांसीं खिलवत जाली. त्यानंतर मिस्तर किनवी व इष्टवट लपटन इंग्रजाकडील वकील आले. त्यासुधां बोलणें होऊन यक प्रहर च्यार घटिकेस किनवीस वाटे लाविलें.त्या नंतर यक घटिका निषस्त होऊन येक प्रहर पांच घटिकेस बरखास जालें. रा छ २२ राखर हे विज्ञापना.
छ २३ गुरुवारीं टपा रवाना पुण्यास.