श्री
मार्गशीर्ष शुा १३ रविवार शके १७१५ ता. १५ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. नवाब कमठाण्याहुन फिरोन वेदरास येणार, याप्रा वर्तमान लोकमुखें दाट आहे. बेदरचे किल्यांतील हवेलीही झाडून नीट करावयास लाविली आहे. छ १ १ जावलीं अथवा छ. १५ रोजीं येणार, यैसें येक वर्तमान. दुसरें, वंजरातीरीं डेरे देऊन आठ पंधरा दिवस आणिक सैर षिकार करावी हेही वार्ता आहे. परंतु, बेदरास हवेली दाखल होण्याचीच खबर गरम आहे. ठरेल त्याप्रा। विनंती मागाहुन लिहिण्यात येईल. रा। छ. ११ माहे जावल हे विज्ञापना.
श्री
मार्गशीर्ष शु। १३ रविवार शके १७१५ ता. १५ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. दौलाची तबियत कसलमंद, सबब मीरअलम रात्रंदिवस त्याचे समीप असतात. मीर अलम यांनी सुवाई नाईक जासुदांचा यास बोलाऊन विच्यारिलें की येथुन कुहीर किती आहे ? तेथुन हैदराबाद किती कोस ? कुहीरास झाडी डोंगर गवत काडी लस्करचे सरबराई जोगी महिनापंधरादिवसाचे बेगमीची आहे कीं नाहीं ? नाईक याने सागितलें की कमठाण्यापासोन कुहीर आठ नउ कोस आहे. तेंथुन हेदराबाद तीस कोस. कुहीर जागा पान पत्री लांकुड फांटे चारा पुष्कळ अबा (द). हवाही चांगली आहे. याजवर मीर अलम यानें कलबर्ग्याचा रस्ता विच्यारला. नाइकानें सांगितला. त्याच्या फर्दा येक कुहीरची व येक कलबर्ग्याचे रस्त्याची व वंजरा तीरची जागा या प्रा। तीन फर्दा तयार करुन मीरअलम यांनीं समागमें घेतल्या. दौलासी मीरअलम यांचें बोलणें जालें. यांतुन कोणते ठरलें हें समजण्यांत आलें नाहीं. ठरेल त्याची विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल. रा। छ. ११ माहे जावल हे विज्ञापना.