Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४.
विनंती विज्ञापना. असद अलिखान यांनीं मालेगांवचे यात्रेंतून घोडे खरीद करून आणिले ते दौला पाहात असतां ‘घोडे किती खरीद केले' ह्मणोन मीं विचारलें. दौलांनीं वोलण्यांत आणिलें कीं, ‘असदअलीखान मुजफरुलमुलिक यांची जामियत पांच हजारांची सुलमानषाहासाहेब जादे यांचे पागा रिसाल्यापैकीं हाजुरजचे हुकमाप्रा. पैकीं चार हजार वार घोडा याजपासी. हजार बाकी. येक हजाराची भरती व्हावयाची. त्यास चार हजार जमावांत कुलसिदर समशेर असे लोक आहेत. करोल बिलकुल नाहींत. याजकरितां येक हजार करोलाची जमियत करण्याचा ईर्षाद. हजार घोडीं खरीद व्हावयाचीं. पैकीं मालेगांवचें यात्रेंत यांनीं तीनसें घोडे पंच्यायेसी हजारांस खरीद करून आणले. आणिकही यैवज जेथें घोडीं खरीद मिळतात तेथें पाठविला. मग खरीद होऊन काय येतात पाहावें, याप्रा। बोलले. रा। छ. २ जाखिर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११३ १५८६ आषाढ शुध्द २
श्री
येकवीरा
शके १५८६ क्रोधी नाम संवत्सरे आषाढ शुध्द द्वितीया तद्दिनी नरशीभट व शंकरस नारायणें लेहून दिल्हे ऐसे जे तुमचे व आमचे वाडे दोनि येक वाडा पिटकियाचे शेजारी वाडा १ दुसरा वाडा अराध्ये व ढेकणे याचे शेजारी याचा विभाग ब्रह्मसभेने ती ठाई तुंह्मास अह्मांस व शंकरास वाटून दिल्हे व पिटकियाचे शेजारील देशकुलकर्णी याचे शेजारील वाडा तो ही तीन ठायी वाटून दिल्हा याउपरि तुह्मी व शंकरे मिळोन अह्मास पिटके व देशकुळकर्णी याचे शेजारिला वाड्यामध्ये अश + + + + + + स दिल्या व अह्मी अराध्या शेजारिला वाडेयामध्ये अमचा अश आहे तो तुंह्मास प्रतिकोश दिल्हा असे याउपरि पिटक्याचे व देशकुलकर्णीयाचे शेजारील वाडियामध्ये तृतीयांश उरला तो तुह्मी इमारति बांधोन सुखे असणे तुमचा प्रतिकोशावरि अह्मी इमारति बांधूनि सुखी असावे व अमच्या ठायावरि तुंह्मी इमारति बांधोननु सुखी असावे याउपरि मध्ये तुह्मास व अह्मास वाड्याविषई बोलायास स्थळविषयी अर्थाअर्थ संबंध नाही अपले वडिलाचे सत्य
साक्षी
भानंभट्ट पुराणीक
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४.
विनंती विज्ञापना. दौलाकडें छ. २७ जावलीं मी गेलों. च्यार घटका प्रथम दिवसां नवाबांनीं यांस आपला बंगला दिल्हा, त्या बंगल्यांत अंगांत डगला घालून जवळ असदअलीखां व हाकिम महमदमाखां वगैरे पांच सात इसमेंसहित होते. असदअलीखान यांनी मालेगांवचे यात्रेंतून घोडीं खरीद करून आणिलीं तीं पाहिली. त्याजवर षाबेखान बीडवाला याजकडील घोड्याचीही हजरी इसमनवेसी होती. तबियत मादंगीमुळें बसच्याउठण्याची शाक्त पहिल्याप्रा नाहीं व बोलण्याचा आवाजही हालका. मुखावर कांही म्लानता. तशांत कामाचा क्रम चालिलाच आहे. हाकिमाची दवा नित्य घेत असतात. सांप्रत तबियत बरी आहे. रा छ. २ जाखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४० ] श्रीविठ्ठल.
° श्री ˜
सामंतकुलेशोभानु-
र्मागलाख्यमहेश्वर:।
श्रीनागसामंतमुद्रेयं
जनभूत्यै विराजते।।
राजश्री पंतअमात्य गोसावी यांसीः -- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।।
नाग सावंत भोसले सरदेसाई पा । कुडाळ व माहालनिहाय रामराम विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. बहुत दिवस जाहले ; परंतु स्मरणपूर्वकपत्र पाठवून परामृश केला नाहीं येणेंकरून स्नेहास युक्त नव्हे. समयोचित कर्तव्यानुरूप आठवण झाली नसेल. याजउपरि सर्वकाळ स्वानंद वृत्त लिहून संतोषाभिवृद्धि केली पाहिजे. यानंतर आह्माकडील वृत्त पत्रीं लिहितां पुरवत नाहीं. सविस्तर वृत्त राजेश्री धोंडोपंत मुखता सांगतां विदित होईल. बहुत काय लिहिणें.
विशेष. बहुता दिवशीं स्मरण करून तुह्मीं रा. धोंडो त्रिमळ याजबराबर पत्र पा। तें उत्तम समयीं प्रविष्ट झालें. बहुत संतोष झाला पत्र पाठवीत नाहीं ह्मणून बोल ठेऊन लेख केला. तर आह्मींच एक दोन पत्रें तुह्मास पा। परंतु मनावर धरून स्नेहाची जोडी केली नाहीं. स्वार्थावर दृष्टि ते समयीं धरिली होती. हल्ली आह्मां लोकांचें अगत्य धरिलें तर यापेक्षा उत्तम तें काय आहे ? तुह्मांखेरीज आह्मांस दुसरी जोडी काय आहे ? हे घर श्रीदेवब्राह्मणांचें आहे. तुमचे वडील परंपरागत कैलासवासी राजश्री खेमसावंत भोसले सरदेसाई याणीं देवाब्राह्मणांचे ठायी निष्ठा धरून देवाब्राह्मणांची स्थापना करीत आले आहेत. तुह्मी देवाब्राह्मणांची भक्ति करितां ऐसें ऐकिलें, त्याजवरून बहुत समाधान वाटलें आह्मां लोकांचा आगत्यवाद मन:पूर्वक कायावाचामनसा निश्चयरूप असेल तर हे पत्र पावलें ते क्षणी दर्शनाचा योग घडे तो अर्थ केला पाहिजे इमान खरें, वचन सत्य असावें हे जागे आह्मीं आपले पदरीचें आहों दुसरा अर्थ नाहीं. सविस्तर वेदमूर्ति व रा धोंडो त्रिमळ सांगतां कळेल पर्जन्यकाळ समीप आला. त्वरा करावी. दर्शनांतीं सविस्तर अर्थ उभयपक्षीं कळेल चिरंजीव राजश्री आपाजीराऊ तेथे तुह्माजवळी हरघडी आहेत त्यास व जागा जतन होय तें करावे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसीं यांस ता छ. २४ माहे जावलचें पत्र + ++ + विशेष. कित्येक खुफिया वर्तमान यैकण्यांत आले तें तावार राजश्री गोविंदराव भगवंत यांस लिा आहे. सेवेसीं गुजराणतील तें अवलोकनांत येऊन उत्तराविषीं आज्ञा करणार स्वामी समर्थ. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
छ २ जाखरीं डांकेवर
श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४,
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचें पत्र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंति विज्ञापना, मिस्तर किनवी दिलावरजंग यांस रुखसत देण्याची याविषई दौलांनी नवाबास अर्जी लिहिल्यावरून दौलांस हुकुम जाला जे तुह्मीं किनवीस घेऊन च्यार घटिकां रात्रीं यावें. त्याप्रमाणें छ २२ रोज गुरुवारीं च्यार घटिकेस रात्रीं नवाब खाजगामध्यें बरामद जाले. मीर आलम व पागावाले व अर्जबेगी व रायेरायां वगैरे इसमांचा सलाम जाला. दौला आंतील वाटेनें आले. हातीं कांठी धरली होती. किनवींची याद केल्या प्रों हाजर जाले. हैदराबादहून मुजफरखान आला. त्याची हुलाजमत नजर जाली. सिदी इलेमास यांस जगत्यालची किलेदारी होऊन खिलत दिल्हा. यानंतर दौला व मीरअलम व किनवी यांसी तीन घटिका पावेतों खिलवत जाली. किनवीस सिरपेंच, जिगा व कंठी तीन दागिने जवाहीर व रुखसतीचें पानदान देऊन रुखसत केलें. त्याजवर येक घटिका दौला व मीर आलम यांसीं बोलणें जालें. प्रहराचें अमलांत बरखास्त जाली. याउपरी किनवी कुच करून जाणार. रा छ. २४ जावल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
मार्गशिर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २१ दिसेंबर १७९३.
विज्ञापना यैसीजे. येथील वर्तमान ता छ. १५ माहे जावल शुक्रवार पावेतों अखबार पत्रीं लेखन करून सेवेसीं पत्राची खानगी केली त्यावरून ध्यानास आलें असेल. तदनंतर येथील वर्तमान. छ. १६ रोज शुक्रवारीं प्रातःकालीं सरबुलंदजंग व दिलदारखान पुढें चिते घेंऊन सिकारीस गेलें. दोन घटिकां दिवसां जनान्यासहित बाड्यातआंत मौजें चिटपालाकडें गेलें. दीड प्रहरास माघारें आले. पागावाल्यांनीं वीस हरणांची शिकार करून गुजराणिली. दोन घटिकां दिवस शेष राहतां नवाब बरामद जालं पागावाले यांचा सलाम शिकारीच्या नजरा जाल्या. रात्रौ दौलाची अर्जी गुजरली. छ. १७ रोज मंदवारी प्रात:कालीं पागावाले हुकुमा प्रों बाड्याबाहेर शिकारीस गेले. नवाब दोन घटिका दिवसां स्वार होऊन जनान्यासुधां सैर करावयास गेले. येक प्रहर पांच घटिकेस डे-यास आले. पागावाल्यांनी नऊ हरणांची शिकार करून गुजराणिली. रात्री खैरसला. दौलाचे तबियतीचें वर्तमान आणविलें. छ. १८ रोज रविवारीं दोन घटिकां दिवसां नवाब शिकारीस बाडयाबाहेर गेले. पागावाले वगैरे लोकांचा सलाम जाला. शिकार करून येक प्रहर पांच घटिकेस डे-यास आले. रात्रीं साहा घटिकेस खिलवतीमध्यें नबाब बरामद जाले. सरबुलदजंग व घांसीमियां व अजमखां वगैरे इसमांचा सलाम जाला. पागावाल्यासीं बोलणें जालें. येक प्रहर दोन घटिकेस बरखास्त जालें. छ १९, रोजी सोमवारी दोन घटिका दिवसांनंतर नवाब सवार होऊन जनान्यासहित बाड्याआंत चिटपालास गेले. तेथें भोजन जालें. येक प्रहर साहा घटिकेस डे-यास आले. पागवाल्यांनी येक ससें व तीन डुकरांची शिकार करून गुजराणिली. डुकरें मिस्तर किनबीकडे पाठविलीं. रात्रीं दौलाची अर्जी -गुजरली. छ. २० रोज मंगळवारी दोन घटिकां दिवसां नवाब सवार होऊन जनान्यासहित शिकारीस गेले. दीड प्रहराचे अमलांत फिरोन डे-यास आले. दौलांनी आरोग्यस्नान केल्याचा अर्ज जाला. नवाबांनीं सथका पंचवीस बकरीं उडीद, तेल व खाना व खुर्दा याप्रों केला. दौलांनीं नजर पाठविली ती गुजरली, मिस्तर किनवी यांनी आपला असबाब हैदराबादेकडे रवाना केला. मालेगांवचे यात्रेहून पन्नास घोडीं किनवीनें खरीद करुन आणविलीं तीं आली. पागवाल्यांनिशी करार करून गुजराणिलीं. तीन प्रहरास असदअलीखान मालेगांवचे यात्रेहून तीनसे आठ घोडे खरीदी करून आणिले याचा अर्ज जाला. रात्रीं दौलाचीं अर्जी गुजरली. छ. २१ रोज बुधवारीं दोन घटिकां दिवसां नवाब जनान्यासहित स्वार होऊन गेले. आंबराईत भोजन करून येक प्रहर तीन घटिकेस डे-यास आले. तीन प्रहरास खाबगामध्यें बरामद होऊन लालन होज्यामाची याद केली. तो हजर जाला. हज्यामत करविली. च्यार घटिकां दिवस बाकी राहातां बरखास्त जालें. रात्रीं दोन घटकेस नवाब दौलाचेथें आले. दौला व मीर आलम व असदअलीखां व रायेरायां यांचा सलाम नजरां जाल्या. दौलांसी बोलणें होऊन येक प्रहराचे अमलांत नबाब आपले मकानास गेले. रा। छ. २४ जावल है विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंति विज्ञापना, नवाब कमठाण्यावर राहिले. तेथें जाग्याचा बहुत संकोच. गांवांत जागा थोडी. बाडा बाहेर मोठा दिल्हा. दोन फोस अडीच कोसांवर जेथें ज्याची सोये तसे लष्करचे लोक राहिले. तेव्हां बाहेर अथवा कमठाण्यांत राहण्याची सोये नाहीं. जाणुन बेदरचे मंगळवार पेठेंत मी पहिलें राहिलों त्याच जागीं आहे. येथुन कमठाणें तीन कोस. बाड्यामुळें कोसं कोसाचा फेर जाणें येणें होतें. नेहमी तेथें कोल्हेरपंत व च्यार जोड्या जासुद ठेविले आहेत. रा। छ. २४ जमादिलावल हे विज्ञापना.
श्री.
मार्गशिर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंति विज्ञापना, कमठाण्यावर नवाब राहिल्यास येक महिना जाला. सैर शिकार व दोलाची मिजाज मादंगी हेंच आजपर्यंत जालें, बेदरास येण्याचा बेत होता तो तुर्त राहिला. येक महिन्याचा सरंजाय कमठाण्यावर गेला. महिना पंधरा दिवस मुकाम आहेत. येकरामुदौला गफुरजंगाचे पुत्रे यांनीं आपली षादी करण्याकरितां हैदराबादेस जाण्याचा निरोप मागितला, परंतु दिल्हा नाहीं, मुलें माणसें येथेंच आणी यैसी ताकीद जाली. याचप्रों मीर आलम यांचीही मुलें माणसें आणविलीं, रा छ. २४ जावल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. दौलाची तबियत बेआराम होती. सांप्रत आराम होऊन आरोग्यस्नान केलें. नजरा व लोकांचे तसदुक सतेके जाले. छ. २१ जावल बुधवारी नवाब दोन घटिका रात्रीं दौलाचे मकानास आले. मीर अलम व असद अलीखां जवळ होते. त्यासुधां दौ (लां ) नीं नजर केली; तबियतीचें मान विच्यारून त्यानंतर दोन घटिका दौला व मीर आलम यांसीं खिलवत जाली. सात घटिकेस नवाब दौलाचे मकानाहून आपले जाग्यास गेले, रा। छ. २४ जमादिलावल हे विज्ञापना.
श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. जंगमाची येक पोर बारा वर्षांचें वयाची तिचे आईबाप पास हजार रुपये देऊन खरीद केली. तिसीं नवाबांनीं निका छ. १७ जमादिलावलीं लाविला ह्मणोन वर्तमान येकदोन मातबर योकिलें,त्यवरुन विनंती लिहिली असें खरें वर्तमान आहे. रा छ. २४ जमादिलोवल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
मागभीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. फकरुदौला ईत्फखारखान यांजकडे अवरंगाबाद येथील शहरचे सुभेदारीचें काम. त्यास जामीन हाकीम ज्याफरखान आहेत, त्यास फकरुदौला सुभेदारी करून गेल्या तागाईत सरकारांत पैसा वसूले नाहीं. याजकरितां हाकीम मजकूर यांस तगादा हालीं लागला आहे कीं तुम्ही फकरु दौलास जामीन आहां. त्यांजकडील यैवज दाखल करणें. व त्याजकडेही दस्तक सजावल यैवत्र व जमाखर्च घेऊन येणें म्हणोन बालें. दुसरें, चिमणीराजे यांजकडे दौलताबाद सरकारचे वगैरे येकंदर माहालची अमीली. याजकडुनही ताहुदाचे बेरजेचा यैवज वेमुबलग येणें. सबब मारनिलेवर दस्तक सजावले खाना करण्यास तयार जाले आहेत. रा। छ, २४ मादिलावल हे विज्ञापना.