श्री
मार्गशीर्ष शु। ५ रवीवार शके १७१५ ता. ८ दिसेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. दौला शिकारीकरितां श्रीक्षेत्र प्रमेर या राणांत छ २६ राखरीं गेले. शिकार करुन नंतर क्षेत्रानजीक श्रीचें देवालयानजीक आंबराई आहे तेथें बसले. गांवातील ब्राह्मणांची घरे वगैरे जागा पाहाण्यास कोन्हा कोन्हास पाठऊन शोध करविला. पुढे चंपांशष्ठी यात्रेचे दिवस. हाजरत येथें रवान लाअपजा१ होणार ह्मणोन बोलोन करोडगिरीकडील मुतसदी व पंचोत्र्य वाले कारकुन यांस बोलाऊन सांगितले की ' लश्कर क्षत्रा समीप. याजकरितां बेपारी उदमे येण्यास व पंचोत्र्याचे दहशती मुळें व गाफिली करतील, त्यांस दिलशाचें२ कौल ज्याबज्या पाठऊन मामुल प्रो यात्रा करवणें ' व त्यावरुन करोडे यांणीं हुमणाबाद कलबर्गे व सुळेपेठ वगैरचे बेपारी यांस कौल पा कीं तुह्मीं खातरजमेनें बवसवास माल घेऊन यात्रेस येऊन खरीदी फरोख्ती करणें, या प्रो तेथें येक प्रहर बसोन कारभार केला. षोहरत आम जाली कीं ब्रह्मणांचीं घरें खाली करवितात. नवाब येथें येणार. त्याजवरुन क्षेत्रींचे ब्राह्मण समस्त भयभीत होऊन अह्मांकडे आले आणि वर्तमान सांगितलें की “हे क्षेत्र प्राचीन यास कधींही उपद्रव जाला नाहीं. तो आतां होणार. आह्मां ब्राह्मणांचे वाली श्रीमंत किंवा प्रसंगी तुह्मीं अहांत. हें अरीष्ट निवारण होय तें करावें" ह्मणोन बहुत घाबरे जाले. त्यावरुन दौलांकडे सांगुन पा। की “हें क्षत्र देवब्राह्मणाचें येथें मागें उपद्रव जाला नाहीं, आणि पुढेंही होऊं नये. ब्राह्मणांनी वर्षाचा धान्य संग्रह संसारकृत्याचा व सांप्रत यात्रेमुळें येजमान येणार याजविसीं आधिक संग्रह करून ठेविला आहे. व घरोघर बालातनी व दुखनाइत मुलें लेंकरें. यास या हिंवाळ्या दिवसांत कोठें घेउन जावें? कदाचित नबाबांची मर्जीच जाण्याविशीं असल्यास, यात्रेचा तमाषा पाहाणें तरी गांवा पासेन फासल्यानें डेरे उभे करून येक दोन राहिल्यास चिंता नाही. परंतु ब्राह्मणांस उपद्रव करून घरें खालीं करवणें हें चांगलें नाहीं" याप्रों सांगुन पाठविल्यावरुन दौलांनी उत्तर पा। कीं आह्मीं क्षत्रास जाऊन जागा पाहुन आलों, त्या प्रों हाजरतीस अर्ज केला. परंतु अद्याप निश्चय नवता. हाल तुमचे लिहिल्यावरुन अर्जही करितों. बहुत करून ते जागा नापसंत होईल. तथापी मागती इरादा केला तरी पुन्हां अर्ज करितों. तुह्मीं ब्राह्मणाची खातरजमाकरून क्षेत्रास वाटे लाऊन द्यावें. या प्रों उत्तर दौलांकडील आल्यानंतर सर्वत्र ब्राह्मणांची खातरजमा करून क्षेत्रास पा. रा। छ ४ माहे जा। दिवल हे विज्ञापना.
छ ११ जावलीं डांकेवर
मार्गशीर्ष शुा १३ रविवार शके १७१५ ता. १५ डिसेंबर १७९३..
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचें पत्र-