Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
पौष शु. ९ शके १७१५ शुक्रवार. ता. १० जानेवारी १७९४.

* नेहमींप्रमाणे छ १ ते छ ५ बुधवार पावेतों नवाबांसंबंधीं कमठाण्याची अखबार, छ ७ जाखर.............शंकरराव भोंग यांजकडील तीनसें गाडदी बरतरफ केले.
छ. ९ रोज मकरसंक्रमण निमित्य पत्र पो.

श्री.
पोष व. ११ शके १७१५ रविवार ता. १२ दिसेंबर १७९३.

श्रीमंत राजश्री------------------------रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं---------------------------------------
विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सानमस्कार विनंति विज्ञापना, तागायत छ ९ माहे जमादिलाखर पर्यंत मुकाम बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनें करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष. स्वामीचे सेवेसीं मकरसंक्रमणयुक्त तिलशर्करासहित थैली पाठविली आहे. याचा स्वीकार होऊन उत्तरगौरवामृतसंतोषसंपन्न सेवकास करणार स्वामीं सगर्थ. सेवेसीं श्रत होय हे विज्ञापना.

श्री.
पौष शु. ९ शके १७१५ शक्रवार ता. १० जानेवारी १७९४.

विनंति विज्ञापना, दौलाचे बोलण्यांत आलें कीं ‘अजिमुदौला कोठें गेला याचा शोध कोठेंही लागत नाहीं. इंग्रजाचे मकाणास गेला ह्मणावा तर ममइ व सुरत या दों ठिकाणचीं वर्तमानें तहकीक आली. अजिमुदीला तेथें नाहीं. तेव्हां कोणे ठिकाणीं गेला. मोठे ताजुब आहे. याचा शोघ येथुनही होत आहे. व श्रीमंताचे सरकारांतूनही शोधं व्हावा. ' ह्मणोन बोलण्यात आलें. रा। छ, ७ माहे जाखर हे विज्ञापना.

श्री.
पौष शु. ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.

विनंति विज्ञापना. येथील साहुका-यांत दोन घटका रात्रीं चालीस पंचेतालीस मनुष्यें येऊन जमनादास व मोतीराम दुकानें दोन लुटुन वित्त विषय घेऊन गेले. त्या दिवसापासून शंभुनाथ ब्रजलाल, व बखतामल हुलासराये, व मनुलाल अपचलराये हे तीन दुकानदार मातबर, वरकड लहानमोठे सर्व हवालदील जाले आहेत. दुकानें आटोपून व्यवहार बंद. या प्रा। तूर्त जालें आहे. चोरीचें बंदोबस्ताकरितां किल्यांत  साहूका-यापासीं कांहीं पाहाव्याचे जवानहीं दिल्हे आहेत. परंतु साहुकार लोकांस कोणे गोष्टीचा भरंवसा वाटत नाही, असा प्रकार जाला आहे. रा छ. ७ जाखर हे विज्ञापना.

श्री.
पौष शु. ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९५.

विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग नागपुरास गेल्याचें वर्तमान यांजकडे आलें होतें. त्यावरून दौलांनी माधवराव रामचंद्र, भोंसले यांजकडील, यांजकडून सेनासाहेब सुभा यांस लिहविलें कीं, शंकरराव हरामखोरी करून पळून गेला, सरकारचा माहा सबेदार लाखोचाच. चौकशी करून जेथें शोध लागेल तेथें अटकाऊन त्यास पाठवावे.' सदरहू अन्वयें सेनासाहेबसुभा यांस भारामल यांचीही पत्रें गेलीं होतीं. त्याचे जबाब सेनासाहेब सुभा यांजकडून आले 'की हजरतीचे सरकारचा हरामखोर तो इकडील; त्याची तंबी जरूर. नागपुरांत शोध केला, परंतु कोठें आढळ पडत नाहीं. हजारों मनुष्याची अमद रफ्त. त्यांत असा चोरून जो येणार तो कोणें स्वरूपानें व कसा येतो हें कशावरून समजावें ? तलाश फार केला, परंतु शोध लागत नाहीं; याप्रा उत्तर आलें. र।। छ ७ जाखर हे विज्ञापना.

श्री.
पौष शु। ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.

विनंती विज्ञापना. उमरखेडकर का दाराकडील दोघे कारकुन भारामल यांनी समागमें नेले होते. पैकीं भगवंतराव यांस पेशजीच उमरखेडास रवाना केल्याची विनंती लिहीण्यांत आली आहे. रामराव यांस येथें पाठऊन देण्याविषई भारामलास दौलांनी पत्र दिल्हें तें पाठविलें. त्यावरून भारामल यांनी समागमें स्वार देऊन मारानलेस दौलांकडे पाठविलें. छ. ४ रोजी बेदरास आले. छ. ५ रोजी दौलांनीं रामराव यांस आह्मांकडे पाठविलें, आणि निरोप पाठविला कीं, यांस आपले जवळ ठेऊन घ्यावें. मावजी नाईक सोईटकर यांस हजर करणें वगैरे येकदोन जाबसालचा गुंता आठ पंधरा दिवसांत यांनी उरकोन उमरखेडास जावें. मजला विच्यारल्याशिवाय यांची रवानगी उमरखेडास अथवा कोठें न व्हावी, त्यास रामराव आह्मांपासीं आहेत. इतक्यावर दौलांसीं याजप्रकर्णी बोलणें होऊन जसें ठरेल तसी विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल, र॥ छ. ७ जाखर हे विज्ञापना.

लेखांक ११४                                                                                                                                    १५८६ भाद्रपद वद्य ३

                                      63                             63
                                                                                          (फारसी मजकूर)

अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी देहाय पा मजकूर सु॥सन खमस सितैन अलफ दरवज इनाम बो। नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ जुनारदार सो। का। मजकूर जमीन चावर १।२ बिता।

मौजे पसर्णी सा।                                मौजे वोझर्डे सा। हवेली
हवेली चावर .॥.                                  चावर ..
मौजे मुर्‍हे चावर
.।२

दर सवाद मौजे मजकूर यासी बा। खु॥ छ १४ जिल्हेज पौ। छ १८ मोहरम दर साल सन इसने सितैन अलफ तेथे रजा जे सदरहू इनाम जमीन दो। माहसूल व नखतयाती व बाजे उजुहाती बा। खु॥ वजीरानी मुकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाला करून चालवीजे औलाद व अफवाद चालवीजे दर हर साला खु॥चे उजूर न कीजे तालीक लेहून घेउन असल परतून दीजे ह्मणउन रजा रजेबा सदरहू इनाम दो। बाबहाय बा। भोगवटा मिसेली ठाणा दर साल प्रमाणे सन तल मजकुरासी दुमाला केले असे दुमाला कीजे तालीक लेहून घेउन असल मिसेली बदस्ते इनामदारमजकुरापासी परतून दीजे मोर्तब

         72 1

तेरीख १६               माहे सफर
सफर                     बार

श्री.
पौष पु।। ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.

श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचें पत्र.

श्री.
पौष शु। ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.

विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं राजश्री परशरामपंत भाऊ यांचे चिरंजीव रामचंद्रपंत फौजसुधां कोल्हापुर प्रांतीं येके मातबर गढीस लागोन लडाई करून गढी व गांव घेतला. फौज लुटावयास गुंतली. आपण जातीनें सेंदोनसें स्वार सुधां गांवापासोन येक कोसाचे फासल्यावर उभे होते. हे बातमी कोल्हापुरकरास समजताच त्याचे लोक हजार पांचसें येऊन रामचंद्रपंत यांस धरून घेऊन गेले. याप्रा वर्तमान लिहिलें आलें. लढाई करून प्रथम फते जाली असतां येकायेकीं अशा त-हेनें दगा जाला हें मोठें ताजुब. याप्रा बोलण्यांत आलें. त्यास याचें कचें वर्तमान सरकारांत आलेंच असेल. यांजकडे सदरहुप्रा। वर्तमान आलें. यांनीं सांगितलें त्याची विनंती लिा असे. दोन जखमां त्यास आहेत. राजश्री परशराम भाऊ तासगांवाहुन निघाले. तिकडे जाणार यैसें यांचें सांगण्यांत आलें र॥ छ, ७ माहे जाखर हे विज्ञापना.

श्री.
पौष पु।। ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.

श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचें पत्र.

श्री.
पौष शु। ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.

विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं राजश्री परशरामपंत भाऊ यांचे चिरंजीव रामचंद्रपंत फौजसुधां कोल्हापुर प्रांतीं येके मातबर गढीस लागोन लडाई करून गढी व गांव घेतला. फौज लुटावयास गुंतली. आपण जातीनें सेंदोनसें स्वार सुधां गांवापासोन येक कोसाचे फांसल्यावर उभे होते. हे बातमी कोल्हापुरकरास समजताच त्याचे लोक हजार पांचसे येऊन रामचंद्रपंत यांस धरून घेऊन गेले. याप्रा। वर्तमान लिहिलें आलें.

दोन घटिका प्रथम दिवसां नवाब जनान्याचे बंदोबस्तानसीं स्वार होऊन शिकारीस गेले. येक हरणाची शिकार करुन दोन प्रहराचे अमलांत डे-यास आले. फौजदारखानाचा माणुस उसाचे मळ्यांत जाऊन ऊंस मोडले. गांवकरी यांनी त्यांस धरुन देषढीवर आणिलें. त्या माणसास बरतरफ करावयाचा हुकुम जाला.रात्रीं च्यार घटिकेस खिलवतीमधें नवाब बरामद जाले, सरबुलदंजंग व घांसीमिया व हिसामुदौला वगैरे इसमांचा सलाम जाला. सहा घटिकेस बरखास जालें. छ. २६ रोज सोमवारीं प्रातःकालीं नबाब जनान्यासुधां शिकारीस निघोन पागावाले यांस हुकुम बाडयाबाहेर शिकारीचा, त्याप्रा तेही बाहेर हजर जाले, दोन हरणांची शिकार करून दीड प्रहरास डे-यास आले. रघोत्तमराव यांनीं पुण्याहुन सोळा उंट बंदुखी पाठविल्या त्या गुजरल्या. रात्री दौलाची अर्जी व हिंदुस्थानची अखबार गुजरली. छ. २७ रोज मंगळवारीं दोन घटिकां दिवसां नबाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस गेले. दोन प्रहरास डे-यास आले. रात्रीं दौलाची अजीं गुजरली, च्यार घटकेस खिलवतींमधें नवाब बरामद जाले, सरबुलंदजंग व घांसीमियां वगैरे इसमाचा सलाम जाला. येक प्रहरास बरखास जाले. छ. २८ रोज बुधवारीं दोन घटिकां दिवसां नवाब स्वार होऊन शिकारीस गेले. चित्ते सोडुन दोन हरणांची शिकार केली. दोन प्रहराचे अमलांत डे-यास आले. सिदी अबदुला यांजकडे गंजीकोट्यास तीनसें स्वार रवाना जाले. रात्रीं खैरसला. छ. २९ रोज गुरुवारीं दोन घटिका प्रथम दिवसां नवाब स्वार होऊन आंबईमधे गेले. तेथे भोजन जालें. दोन प्रहरीस डे-यास आले. रात्रीं दोन घटिकेस नवाब बंदोबस्तानें दौलाचेथें आले. दौला व मीर आलम वं पगावाळे व मुनपी व रायेरीया यांचा सलाम जाला. दिवाणखान्यामध्यें बरामद जाले. अजमखान पागावाले याचा भाऊ कमरुसाहेब ह्मणोन होता त्याचा वाका जाला. सबब मातमपुरसी अजमखान यास च्यार पारचे करचोबी, दिल्हे. दौला व मीर आलम यांसीं खिलवत होऊन साहा घटिकेस बरखास जाले रात्रीं लस्करांत चोंरीने जोरावरजंग याचे घोड्याचा कंडापटा वे दिलदारखानाचेथील दुषाला गेली. अर्ज जाला. छ. ३० रोज शुक्रवारीं दोन घटिकां दिवसां नवाब बंदोबस्तानें शिकारीस गेले. परिंदाची शिकार करून दीड प्रहरास माघारे आले. माहबतजंग याची अर्जी व दोन बंदग्या दालिबें गुजरलीं. दौलांनी मालेगावींहुन उंट व सवदागरी आणिले ते पाहिले. रात्रीं दोन घटिकेस नवाब दौलाचेथें आले. दौला व मीर आलम व पागावाले वगैरे लोकांचा सलाम जाला, दौला व मीर आलम यांसीं खिलवत जाली. साहुका-यांत किले बेदर येथें दरवडा पडोन जमनादास व मोतीराम यांची मालियत गेली, याचा अर्ज जाला, येक प्रहरास नवाब आपले मकानास गेले. छ. १ जाखर मंदवारीं दोन घटिकां दिवसां नवाब स्वार होऊन शिकारीस गेले. पागावाले यांनी बाडाबाहेर शिकार करून येक लांडगा धरून गुजराणिला. दोनप्रहराचे अमलांत डे-यास आले. औरंगाबाद येथील सुभेदाराची अर्जी व दालिंबे आलीं तीं गुजरलीं, र॥ छ. २ माहे जाखर हे विज्ञापना.

छ. ७ जाखरीं डांकेवर.

श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४.

विनंती विज्ञापना. येथील साहुकार मंडळी बेदरचे किल्याआंत हुकमाच. मोजीब छपरबंदी करुन दुकानें घालून राहिले. त्यास छ, ३० जावल शुक्रवारी दोन घटका प्रथम रात्रीचे समईं येकायेकीं फतेदवाड्याकडुन पस्तीस चालीस मनुष्य हत्यारबंद साता आठाचे हातांत बलम, व सात आठ तरवारी नागव्या धरून, व पांच सातजणाचे वोंठांत धोंडे, पांच साताचे हातीं कांठ्या, येकदोन पटेकरी, व तिघे टेंभे मोठे लाऊन, यात्रा प्रथम मल्हार नाइकाचे दुकानापासीं आले. त्या दुकानास साठी लाऊन येक माणुस उभा होता. त्यानें चोर असें ह्मणतांच त्यास कांठीं घालुन बसविला. पुढें नन्हुमल याचे दुकानीं माणुस होता. तोही दगडानें जाया दोन घटिका प्रथम दिवसां नवाब जनान्याचे बंदोबस्तानसीं स्वार होऊन शिकारीस गेले. येक हरणाची शिकार करुन दोन प्रहराचे अमलांत डेप्यास आले. फौजदारखानाचा माणुस उसाचे मळ्यांत जाऊन ऊंस मोंडले. गांवकरी यांनी त्यांस धरुन देषढीवर आणिलें. त्या माणसास बरतरफ करावयाचा हुकुम जाला. रात्रीं अपार घटिकेस खिलवतीमधें नवाब बरामद जाले, सरबुलदंजंग व घांसीमिया व हिसामुदौला वगैरे इसमांचा सलाम जाला. सहा घटिकेस बरखास जालें. छ. २६ रोज सोमवारीं प्रातःकालीं नबाब जनान्यासुधां शिकारीस निघोन पगाकाळे यांस हुकुम बाड्याबाहेर शिकारीचा, त्याप्रा तेही बाहेर हजर जाले, दोन हरणांची शिकार करून दीड प्रहरास डे-यास आले. रघोत्तमराव यांनी पुण्याहुन सोळा उंट बंदुखी पाठविल्या त्या गुजरल्या. रात्रीं दौलाची अर्जी व हिंदुस्थानची अखबार गुजरली. छ. २७ रोज मंगळवारी दोन घटिकां दिवसां नबाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस गेले. दोन प्रहरास डे-यास आले. रात्रीं दैलाची अर्जी गुजरली. च्यार घटकेस खिलवतीमधें नवाब बरामद जाले, सरबुलंदजंग व घासीमियां वगैरे इसमांचा सलाम जाला. येक प्रहरीस बरखास जाले. छ. २८ रोज बुधवारी दोन घटिकां दिवसां नवाब स्वार होऊन शिकारीस गेले. चित्ते सोडुन दोन हरणांची शिकार केली. दोन प्रहराचे अमलांत डे-यास आले. सिदी अबदुला यांजकडे गंजीकोव्यास तीनसें स्वार रवाना जाले. रात्री खैरसला. छ. २९ रोज गुरुवारीं दोन घटिका प्रथम दिवसां नवाब स्वार होऊन आंबराईमधें गेले. तेथें भोजन जालें. दोन प्रहरास डे-यास आले. रात्रीं दोन घटिकेस नवाब बंदोबस्तानें दौलाचेथें आले. दौला व मीर आलम व पगावाले व मुनपी व रायेरीया यांचा सलाम जाला. दिवाणखान्यामध्यें बरामद जाले. अजमखान पागावाले याचा भाऊ कमरुसाहेब ह्मणोन होता त्याचा वाका जाला. सबब मातमपुरसी अजमखान यास च्यार पारचे करचोबी दिल्हे. दौला व मीर आलम यांसी खिलवत होऊन साहा घटिकेस बरखास जालें, रात्रीं लस्करांत चोरीने जोरावरजंग याचे घोड्याचा कंडापटा वे दिलदारखानाचेथील दुषाला गेली. अर्ज जाला. छ. ३० रोज शुक्रवारी दोन घटिकां दिवसां नवाब बंदोबस्तानें शिकारीस गेले. परिंदाची शिकार करून दीड प्रहरास माघारे आले. माहबतजंग याची अर्जी व दोन बंदग्या दालिबें गुजरलीं. दौलांनी मालेगावींहुन उंट व सवदागरी आणिले ते पाहिले. रात्रीं दोन घटिकेस नवाब दौलाचेथें आले. दौला व मीर आलम व पागावाले वगैरे लोकांचा सलाम जाला. दौला व मीर आलम यांसीं खिलवत जाली. साहुका-यांत किले बेदर येथें दरवडा पडोन जमनादास व मोतीराम यांची मालियत गेली, याचा अर्ज जाला, येक प्रहरास नवाब आपले मकानास गेले. छ. १ जाखर मंदवारी दोन घटिकां दिवसां नवाब स्वार होऊन शिकारीस गेले. पागावाले यांनीं बाडाबाहेर शिकार करून येक लांडगा धरून गुजराणिला. दोनप्रहराचे अमलांत डे-यास आले. औरंगाबाद येथील सुभेदाराची अर्जी व दालिंबे आलीं तीं गुजरलीं. र॥ छ. २ माहे जाखर हे विज्ञापना.
छ, ७ जाखरीं डांकेवर.

श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४.

विनंती विज्ञापना, मिस्तर किनवी दिलावरजंग यांस नवाबनीं रुस्वसत छ. २३ जावलीं दिल्ही. इत्यादिक वर्तमानाची विनंती पेशजी लिहिल्यावरुन ध्यानांत आलें असेल. किनवीनें दौला व मीर आलम यांचा निरोप घेऊन छ २४ रोजी तीन प्रहर दिवसां लस्करांतुन निघोन मंगळवारपेठ येथें त्यांस जागा नवाबांनी दिल्ही तेथें येऊन भोजन केलें. इष्टवट व आणीक दोघे सोबती त्यांस येथे ठेविलें. किनव स्वार होऊन छ मारीं सदासिव पेंठेच्या मुकामास गेला. हैदराबादपर्यंत रथ, घोडे, पालखी, म्याना, हाथी यांची डांक बसविली. हैदराबादेस छ, २५ रोजीं पोंहचावयाचा होता. तेथुन चिनापटणीस जाणार. चेनापटणाहुन विलायतीस जाण्याचा बेत जाला. किनवीचे मुबादला दुसरा येणार, तो अद्याप येथें आला नाहीं. तुर्त इष्ट्वट आहे. तो आल्यानंतर मागाहुन विनंती लिहिण्यांत येईल. रा। छ २ महे जा खर हे विज्ञापना.

श्री.
पौष शु. ४ रविवार शके १७१५ ता. ५ जानेवारी १७९४.

विनंति विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें 'कीं टिपूनें मीरकमरुदीखां व महमद वजीरखां व आणिक येक मातबर गृहस्त या तिघांस कैद केलें. हें एक वर्तमान. व दुसरें कलिकोट-प्रांती मापिलें ह्मणोन जमीनदार मुफसद भारी जमिपतेचे आहेत. त्याजवर टिपूनें दोन कुशून पर्यदल बार व दोन रिसाले तंबीकरितां रवाना केले होते. त्यास मापिल्यांनी दोन कुशुन व दोन रिसाले टिपुकडील लढाई करून गारत केले. हें वर्तमान टिपुस समजल्यावर खुद जातीनें मापल्यावर जाण्याचा इरादा केला आहे. याप्रा। वर्तमान आहे, ह्मणोन बोलले. रा छ.२ माहे जाखिर हे विज्ञापना.