Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पौष व. ६ बुधवार शके १७१५ ता. २२ जानेवारी १७९५.
मामुली अखबार छ १३ माहे जाखार गुरुवार ते ता। १८ रोज मंगळवार पावेतों.
++ ++ ता १६ रोज रविवारीं............मुसारेहमुपासीं येक फरासीस नवा नौकरीचे उमेदवारीनें आला. त्याची मुलाजमत नजर जाली. जनवाड्याचा नक्षा दौलांनी दाखऊन जागा पाहून आले त्याचा बयान केला. साहा घटिकेस बरखास जालें. रारा ता छ १९ जाखर हे विज्ञापना.
छ २० जाखरीं डाकेवर.
श्री.
पौष वा ७ गुरुवार शके १७१५ ता. २३ जानेवारी १७९४.
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचें पत्र.
विनंती विज्ञापना. मौजे कमठाण्याहुन कुच नवाबानीं छ, १९ माहे नाखर बुधवारीं पाव घटिकां प्रथम दिवसां केलें, अंबारीमध्ये हाथीवर सवार जाले. खवांसीमधें दौला व मीरआलम उभयतां होते. तमाम फौज बराबर होती. सवा प्रहर दिवसां किले बेदरचे हवेलीस नवाब दाखल जाले, पांच सात मुकाम येथें होण्याचा बेत आहे. पुढें जनवाड्यास जाऊन राहावयाचा बेत निश्चय जाला. कुल असबाब डेरे वगैरे जनवाड्यावर उभा राहिला आहे. मागाहुन विनंती लिहिण्यांत येईल रा। छ.२० जाखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
पैाष वा ६ बुधवार शके १७१५ ता. २२ जानेवारी १७९४.
श्रीमंत रावसाहेव यांस मामुली हवाल्याचें पत्र,
श्री
पौष ६ बुधवार शके १७१५ ता. २२ जानेवारी १७९४.
विनंती विज्ञापना. नवाब कमठाण्याहून कुच करून पांपाड व बारोंचीस जाण्याचा बेत ठरला होता. याची ता। विनंती पेशजी लिहिली. त्यास पांपाड बारोंचीकडे जाण्याचें तुर्त मवकुफ होऊन छ १९ तारखेस नवाब कमठायाहून कुच करून किले बेदरास येण्याचें ठरलें. च्यार पांच दिवस बेदरांत राहून मग जनवाडा येथून तीन कोसांवर नैरुत्येकडे कारेमुंगी परगण्याचा गांव, येथें जाऊन राहण्याचा बेत जाला आहे. दौला जनवाड्यास जाऊन जागा पाहून आले. तेथील नक्षा करुन नवाबास आणून दाखविला. जनड्यांत लोकांची घरें होतीं, तीं तमाम खालीं करविलीं. गांवांत जाऊन नवाब राहणार. वाडा कमठाण्यास होता तो उठऊन जनवाड्याकडे नेउन बसविला आहे. पेषखाना डेरे वगैरे सरंजाम जनवाड्याकडे गेला. राज्याजीस ताकीद जाली कीं तुह्मीं जनवाडयास जाऊन तेथील राहण्याचा बंदोबस्त मिसलबंदी सुद्धा करणे. त्यावरून राज्याजी दोन दिवसांपासोन नेहमीं तेथें आहेत. जनवाड्याचे गांवाबाहेर पेठेची वस्ती आलाहिदा होती, तेथीलही घरें झाडून रिकामीं करविलीं. नवाब बेदरास येऊन च्यार पांच दिवसांनंतर जनवाडयास जाऊन राहाणार. तेथें किती मुकाम होतात व पुढें तेथून कोणीकडे शिकार करीत जाणार हें निदर्शनास येईल त्याप्रा। विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल, कारेमुंगी तालुका सरबुलंदजंग पागावाले यांजकडे आहे. त्यांनीं दोन तीनसें लोक सिंवाराचे रखवालीकरितां ठेविला आहे. तथापि कहीकवाडाचा उपसर्ग लोकांचा होतच आहे.. छ १८ जाखरीं कमाठणें येथें बागड जाली. छ. १९ अगर २० या दोन तारखेंतून येके तारखेस कुच करुन नवाब बेदरचे हवेलींत येणार. हवेलीचा झाडा जाला. रा। छ. १९ माहे जाखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पौष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारी १७९४.
मामुली अखबार छ. ५ माहे जाखर बुधवार ते छ. १४ रोज शुक्रवार.... छ.७ रोज शुक्रवारीं........आवसे परगण्यांतील येक गांवचे पाटलानें पुत्राकरितां नवाबास मानत केली होती. त्यास पुत्र जाला. सबब त्यास पाटलानें आणोन नवाबाचें पायावर घातलें. मानत केली. पाटलास शंभर रुा। नगदी व वस्त्रें मुलास नवाबांनीं इनायत केली................र।। छ. १५ जाखर हे विज्ञापनो.
छ. १७ जाखरीं रामचंद्र भिरघ्या समागमें.
श्री.
पौष व. ४ सोमवार शके १७१५ ता. २० जानेवारी १७९४.
श्रीमंत राजश्री---------------- रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं--------------------
विनंती सेवक गोविंद राव कृष्ण कृतानेक सा नमस्कार. विनंती विज्ञापना, ता। छ. १७ माहे जाखर पर्यंत मु।। बेदर येथें स्वामीचें कृपावलोकने करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष. स्वामीचे सेवेसीं येथुन पक्षियर त्याची जोडी दोन पिंजरे समवेत पा आहे. हे जोडी नानाप्रकारचे पांखराच्या बोल्या त-हेत-हेनें बोलत आहेत. व येकास येक लढाईही चमत्कारानें करीत असतात. हे पाखराची जोडी सरकारचे शिकारखान्यांत असण्या योग्य जाणुन रवाना केली आहे. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्टं करितील. उत्तर खाना व्हावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
र।। छ १९ जाखरीं डांकेवर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पौष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारी १७९४.
विनंती विज्ञापना. हषमतजंग यांचे शरीरीं समाधान नव्हतें सबब भातांबरें येथून हैदराबादेस जाऊन राहिले. तेथें हषमतजंग यांचा काल जाला. या प्रा। वर्तमान येथें छ. १३ जाखरीं आलें. छ. ११ तेरखेस वारले. रा। छ १५ जाखर हे विनंती (?).
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पौष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारीं १७९४.
विनंती विज्ञापना. नवाबाकडील जासुदाचा सवाई नाईक यास दौलांनी येथुन पुण्याकडे छ. १४ जाखरीं पत्रें समागमें देऊन बाबाराव गोविंद यांजपासीं जाण्याचें सांगोन खाना केलें. तो येथून दरमजल गेला. येकवीस दिवसांत सवाई नाईक यानें फिरोन हजुर यावें यैसी ताकीद त्याजला दौलांनी केली आहे. सवाई नाइक याचे समागमें हरका-याच्या जोड्या च्यार दिल्या आहेत. यैसेंही यैकिलें कीं सवाई नाइक यानें बाबाराव यांची पत्रें नवाबांकडील डांकेवर परभारां रवाना करीत जावीं. पूर्वी रघोत्तमराव यांजपासीं लाखोटे येऊन रवाना होत होते. तसें असूं नये. याजकरितां नाइकास पाठविलें. दोहींतुन कोणता प्रकार होते हें निदर्शनास येईल.रा। छ, १५, माहे जाखर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पोष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारी १७९३.
विनंति विज्ञापना. दौलांकडे छ, १३ जाखर गुरुवारीं अस्तमानीं आह्मी गेलों. नव खरीदीचे घोडे वमा दवाना परंडे वगैरे जवळ तालुक्यांतून आल्या त्या पाहात होते. असदअलीखान वगैरे जवळ होते. ताळभुपाल येथील पठाण नौकर यांचे सरकारांत राहिले आहेत, त्यांनीं नजरा केल्या. त्यानंतर चोबी बंगल्या पुढील सायवानामधें बैठक जाली, मीरआलम यांस बोलाऊं पाठविलें. तेही आले. येथून कुच होऊन मौजे पांपाड व बोरोंवी या जाग्यास नवाब जाणार हेंही दौलाचे बोलण्यांत आलें. तेथील नक्षा आला तो दौलांनी दाखविला, बेदराहून ईशान्य कोनास पांपाड बोरोंची वंजरातीरीं आहेत. तेथून संगारडी पेठ पंधरा कोसावर आहे. या प्रा बोलण्यात आलें. रा छ, १५ माहे जा।खर हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पौष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारी १७९४.
छ. १५ जाखरी डांकेवर.
श्रीमंत राव सो यांस हवाल्याचें पत्र.
श्री.
पौष व. २ शनिवार शके १७१५ ता. १८ जानेवारी १७९४.
विनंति विज्ञापना. नवाब कमठाण्यावर राहिल्यास कमकसर दोन महिने होत आले. सैर शिकार जाली. सांप्रत येथून कुच करून मौजे बोरोंची व मौजे पापाड पा। हसनाबाद बेदराहून आठ कोस व कमठाण्याहून बारा कोस येथें जाण्याचा बेत ठरला आहे. दोन्हींही गांव वंजरातीरीं आहेत. तेथून संगारडी पंधरा कोस, सदाशिव पेंठ सतरा कोस आहे. बोरोंची व पापाड येथील जागा पाहण्याकरितां लछीराम व हरका-याचा नाईक व हरका-याच्या जोड्या याप्रा पा होते. जागा पाहून आले. नक्षा दौलास आणोन दाखविला. कमठाण्याहून कुच होण्याची तारीख छ. १७ व छ, २२ जाखर दोन आहेत. यांतून कोणे तारखेस कुच करणार त्याप्रा। वर्तमानाची विनंति मागाहून लिहिण्यांत येईल, येथून निघोन जनवाडा तीन कोसांवर, येथें मुक्काम होऊन तेथून पांपाडास जाणार. पांपाड हा रुख हैद्रराबादचा आहे. पांपाडाहून आग्नेय दिशेस हैदराबाद आहे. बेदर आठ कोस पाठीमागें राहिलें. तेथून षिकार करीत कोठें कोठें फिरतात हें पहावें. रा छ, १५ जाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११६ १५८६ माघ शुध्द ३
अज रखतखाने खुदायवंदखान अलीस्थान खाने अजम शर्जाखान खलदअयाम दौलतहू बजानीब कारकुनानी पा। वाई बिदानंद सु॥ खमस सिर्तन अलफ दरीविला गिरमाजी त्रियंबक जुनारदार सो। कसबे पा। मा। हुजूर मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद कसबे मा। दो। माहासूल नकदयाती व खा। गला व तूप व वेठबिगारी व फर्मासी कुलबाबा बा। खु॥ वजीरानि चालिले आहे पा। मा। साहेबास मुकासा अर्जानी जाला साहेबी हि दुमाले खुर्दखत मर्हामत केले ता। सालगु॥ चालिले सालमा।री एक तकसीम देउनु दोनी तकसीमा जणो नेताती दरीबाब सरजाम होय ह्मणौनु मालूम जाले जुनारदार मजकुराचा इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी वजीरानि चालिले प्रमाणे हाली कारकीर्दीस हि खु॥ सादर आहे तेणेप्रमाणे ता। सालगु॥ चालिले असता साल मा।री नवी जिकीर करून सदरहू इनामपैकी एक ता। देउनु दोनी तकसीमा जणा नेता हा काय माना आहे रसीदन मिसाल ता। सालगु॥ चालिलेप्रमाणे दुमाले करून आदा करणे फिर्यादी येऊ ने दीजे तालीक लिहून घेऊन असल खु॥ परतोन दीजे पा। हुजूर मोर्तबू सूद
रुजु शुरु -
निवीस
तेरीख १६ माहे रजबू
रजब
पौ॥ छ २५ माहे जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पौष व. १ शुक्रवार शके १७१५ ता. १७ जानेवारी १७९४.
रा छ, १४ जाखरीं डांकेवर.
श्रीमंत राजश्री----------------------रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं -----------------------
विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सा। नमस्कार विनंति विज्ञापन' ता छ. १४ माहे जमादिलाखरपर्यंत स्वामीचें कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष, राजश्री गोविंदराव भगवंत यांचे लिहिण्यांत आलें की 'इंग्रज प्रकणीं नवाबाचे थैलीपत्र श्रीमंतास आलें. त्यांत सर्व साधनें इंग्रजाचे कल्गांची. तेव्हां सरकारांत राजश्री पाटीलबावासहित विचार जाला या प्रमाणेंच नवाबांनी मान्य करावे.' त्याजवरून मुषीरुलमुलुक यांसी बोलण्यांत येऊन भवति न भवति जाली. आणि त्यांनीं ल्याहावयास सांगितलें त्या अन्वयें राजश्री गोविंदराव यांस जाब लिा आहे. सेवेंत विनंनि करतील ते ध्यानांत येऊन उत्तराविषयीं आज्ञा जाली पाहिजे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ११५ १५८६ आश्विन शुध्द १
अज दिवाण पा। वाई ताहा मोकदमानी देहाय २ बि॥ मौजे बोरखल सा। नीब मौजे किणही सा। कोरगाउ पा। मा। सु॥सन खमस सितैन अलफ दरवज बदल इनाम नरसीभट बिन रंगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट चित्राउ सो। का। मजकूर जमीन चावर १॥ दीड दर सवाद देहाय
मौजे बोरखल चावर मौजे किणही चावर
१ .॥.
पा। मा। यास इनाम बा। खु॥ रा। छ २७ जिल्हेज पौ। छ १७ मोहरम दर सन + + + इसने सादर असे + + + + + + + बा खुर्दखत वजीरानी चालिलेप्रमाणे चालवीजे तालीक लेहून घेऊन असल परतोन दीजे ह्मणउन रजा रजेबरहुकूम भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ छ २७ सफर जमीन सदरहू दो। बाबहाय दुबाले केले असे सालाबादप्रमाणे सन तल मजकुरास चालवीजे तालीक लेहून घेउन असल परतोन दीजे मोर्तबू
तेरीख २९ माहे सफर
सफर