Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक ११२                                                                                                                                    १५८५ भाद्रपद शुध्द १३
                                                                                                                                                     
ताा

अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी देहाय पा। मजकूर सु॥ सन अर्बा सितैन अलफ दरवज इनाम बो। नारायणभट बिन गोपिनाथभट चित्राउ जुनारदार सो। का। मा। जमीन चावर १।२ बि॥

मौजे पसर्णी सा। हवेली चावर                             मौजे उझरडे सा। हवेली चावर
नीम .॥.                                                          नीम .॥.
मौजे एकसर सा। मुर्‍हे चावर .।२
दर सवाद मौजे +++++ बा। खु॥ रा। छ १४ जिल्हेज पौ। छ १८ मोहरम दर + + सन इसने सितैन अलफ तेथे रजा जे सदरहू इनाम जमीन दो। महसूल नखतयाती व बाजे उजुहाती बा। खु॥ वजीरानी मुकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ चालिले असेल तेणेप्रमाणे दुबाला करून चालवीजे औलाद अफलाद चालवीजे दर हर साला खु॥चे उजूर न कीजे तालीक लेहून घेऊनु असल परतून दीजे ह्मणौन रजा रजेबा सदरहू इनाम देखील बाबहाय बा। भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ सन सलास सितैन अलफ छ ११ सफर चालिले प्रमाणे सन तल मा।रासी दुबाला केले असे दुबाला कीजे तालीक लेहून घेऊन असल खुर्दखत इनामदार मजकुरास फिराऊन दीजे

तेरीख ११
सफर

श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. तिमाराव देशपांडे वसमतकर परागंदा जाला. त्याजला धरावयाकरितां सैद मुनवरखान व बाजीराव अमीन याणीं उद्योग बहुत केला. परंतु हस्तगत जाला नाहीं. सांप्रत तिमाराव याचे राहण्याचा गांव मौजे लोक पा। वसमत येंयें सैद मुनवरखान व बाजीराव हजारपांचसें लोकांनिसी जाऊन गांवास महासरा केला. आंतुन गोळी चालती. तिमाराव याचा पुतण्या व चीज वस्त वगैरे तेथें आहे. लोक येथील गढही मजबुत आहे. गढी घेऊन तिमाराव याचीं मुलें मनुष्यें चीजवस्त जे तेथें असेल ते हस्तगत करावी. याप्रों सैद मुनवरखान व बाजीराव यांस ताकीद व उभयतांची कुमक करण्याविसीं भारामल यांसही याची आज्ञा आहे. मकान अद्याप यांचे हातीं आलें नाहीं. होईल त्याप्रों विनंती लिहिण्यांत येईल. तिमाराव यास विठ्ठलपंत सुभेदाराकडील आश्रा ऐसेंही यांचेथें वर्तमान आहे. रा छ. २४ जमादिलावल हे विज्ञापना

श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. हरबाजी नाईक बिडवई याचे दुकान औरंगाबाद व हैदराबादेंतील व येथील तिन्हींही जप्त करून लोकांच्या ठेव्यासुद्धां रोकड व वरत व जी कापड चिजवस्त सुद्धां यैवज घेऊन मारनिलेचा यैवज ज्याजकडे येणें तो व ह्याचे दाखल्याने निवडून काहाडोन ज्याजकडे यैवज त्याचे मागें चौपदार लाऊन बै मुरवतीनें कितेकांपासोन यैवज घेतला, व घेतात, इतकेंही होऊन हरबाजी नाईक यांचा पुतण्या व स्त्री व त्रिंबक नाईक वगैरे गुमास्ते यांची सुट. का नाहीं. साडेबारा लक्ष माथां आहेत. त्यांपैकीं हा यैवज जो जमा होईल तो घेऊन बाकीचाही फडच्या त्यांनीं करावा. तेव्हां मुक्तता. हैदराबादेतील गुमास्ते वह्यांसुद्धां आणिले आहेत. ह्याची रुजुवात येक येकाची होत आहे. मोठा घोळ घातला. तसेंच लक्ष्मीचंद साहुकार यांजकडे अपराध नसतां वित्तविषय पंधरा सोळा हजार पर्यंत जिंदगी सरकारांत घेतली. हालीं कृष्णमा करोडे याचा यैवज कोणे साहुकारापासीं काये तो सांगणें व मुचलके लेहुन देणें. याप्रा तमाम साहुकारांस तगादा केला. याचें काय होतें तें पाहावें. सर्वांवर गजब जाला आहे. निर्व्हा नाहीं. र॥ छ. २४ जावल हे विज्ञापना.

श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना, कृष्णमा करोडा वारल्यानंतर करोडगिरीचें काम त्याचे पुत्राकडे दौलांनीं ठेऊन कृष्णमाचा भाऊ पापमा याचे हातें कारभार घेतला. यैवज सरकारचा कृष्णमाचे बेरजे अन्वयें बहुत येणें. त्याचा निर्वाह होईना. सबब पापमा दुखणें आलें ह्मणोन निरोप घेऊन गेला. त्यानंतर रामया ह्मणोन दुसरा भाई कारभारावर होता, त्यास यैवजाची सख्ती लागली, तेव्हां त्यानें हैदराबादेस जाऊन पांच लक्षांची तोड पाडितो ह्मणोन रुखसत घेऊन हैदराबादेस गेला. यैवजास ठिकाण नाहीं, कृष्णमा याचे हाताखाले हासन अली खान ह्मणोन होता. त्यानें तीन लाखाची सरबराई केली. सबब त्याजला करोडगिरीचे नयाबत मीरआलम यांचे विद्यमानें सांगोन काम चालविलें. परंतु यैवज बहुत येणें. त्याचा तगादा खान मार यास सख्त आहे. व कृष्णमाची अमानत साहुकार वगैरे जेथें जेथें जसी, त्याचाही शोध करून तगादा होत आहे. कादरखान पहिला करोडा व नुरमहंमदखान सिदी इमामखानाकडील यांजकडेही करोडगिरीचें संधान आहेच. पुढें काय ठरतें त्याप्रों लिहिण्यांत येईल. र।। छ. २४ जावल हे विज्ञापना.

श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५, ता. २८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. चेनापटणाहुन व्यंकटराम दिला याजकडील दोन अखबारां आल्या,त्या पा।। आहेत. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्ट करतील, अवलोकनें मा।।र ध्यानांत येर्ईल. उत्तराविषीं आज्ञा व्हावी, र॥छ. माहे जावल हे विज्ञापना.

श्री.
मार्गशीर्ष वा १ शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. राजश्री माहादजी सिंदे यांस नवाबांनी पेशजी देन च्यार वेळां यैवज येथुन हुंड्या वरचेवर पाठविल्या. येविषींची विनंती राजश्री नाना यांनी सेवेसीं केलीच असेल, बाबाराव गोविंद इकडुन गेले ते समईंही दाहा लाखाच्या हुंड्या त्यांचे बराबर र।। जाल्या. सांप्रत पांच लक्षांच्या हुंड्या राव सिंदे यांजकडे पाठवावयाकरितां यांनीं तयार केल्या आहेत. लौकरच रवाना होतील. यैसें वर्तमान यैकण्यांत आलें, मागती याची तहकीक करून लिहुन पाठवितों. र॥ छ. २४ जावल हे विज्ञापना.

श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३

विनंति विज्ञापना. मिस्तर किनवी दिलावरजंग बाहादुर इंग्रजाकडुन नबाबापासीं वकींलीचे कामावर आहेत. त्यासे यांची बदली इंग्रजांनीं करून यांचे कामावर दुसरा वकील पाठविला. तो येणार. सबब येथुन किनवी नबाबाची व दौलाची रुखसत बेऊन जाणार, किनवीनें आपला सरंजाम कुल असबाब येथुन हैदराबादेस रवाना केला. रुखसत होऊन दरमजल जाणार, हा मार मीरआलम यांस विच्यारला. त्याचे सांगण्यांत कीं दिलावरजंग यांची तंगीरी१ होऊन जातात पैसे नाहीं. पलटणचे स्वारीहून आल्यापासोन दिलावरजंग यांची तबियत दुरुस्त नाहीं. येथील आवहवाही माफिकत नाही. सबब लाड बहादुर व नवे जनरालास यांनी सांगितले कीं मी विलायेतीस जातो. तर प्रकृत हुषार होईल. त्यावरून दिलावरजंगास हुकुमही आला कीं तुह्मीं विलायेतीस तबियत आराम होण्याकरितां यावें, त्यावरून जातात. यैसे यांचे बोलण्यांत. सारांश किनवी येथुन रवाना होत आहे. मागाहुन विनंती लिहिण्यांत येईल. किनवी येथुन जाणार, येथील कामावर मिस्तर इष्टवट यास ठेविलें. दुसरा किनवीचे मुबादला येणार तोंपर्यंत काम इष्ठवटानें चालवावें यैसें ठरलें आहे. र॥ छ २४ जावल हे विज्ञापना.

श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेबर १७९३.

विनंती विज्ञापना. दोलाचे तबियतीचें वर्तमान पेशजी विनंती लिहिल्यावरून ध्यानात आलें असेल. छ १५ रोजीं रात्रीं नबाबाकडे दौला आंतील वाटेनें म्यान्यांत बसौन गेले होते. राजश्री कल्याणराव व बाबाराव यांजकडील पत्रें आली. त्या प्रकरणीं बोलणें पांच सहा घटिका पर्यंत होऊन आपले मकानास आले. प्रकृतीस समाधान नाहीं. सबब दौला आपले येथें दरबार पहिल्या (प्रमाणे ? ) करीत नाहींत. फार करून जनान्यांत असतात. येका दो दिवसाआंत दोन तीन घटिका मर्दाना करून मीरआलम राजाजी रोषनराव वगैरे कोणी कोणी येतात त्यांस बोलावून घेऊन कांहीं जाबसाल होतो. छ २० रोजी दौलांनी स्नान केले. तमाम लोकांनी सतके नगदी रु. व खुर्दा व उडीद तेल, तीळ वगैरे जिन्नस तसदीक केलें. दौलास समाधान झाल्याच्या त्याचे लोकांनीं नजराही केल्या. दौलांनी तबियत आराम झाल्याची नवाबास नजर पाठविली. सांप्रत दौलाची प्रकृत कांहीं स्वस्थ जाल्याप्रा आहे; परंतु निस्तोष आरोग्य नाहीं. ज्वर पहिला होता तो नाहीं. शम आहे. खोंकलाही बहुतसा नाहीं. शब्द हळुवट जाला, चेह-यावर व अंगावर नकाहत व शरीरीं अशक्तता आहे. रा छ २४ जावल हे विज्ञापना.

लेखांक १११                                                                                                                                    १५८३ श्रावण शुध्द ९
                                                                                                                                                     
मुसना दर के
                                                                                                                                                                              अकरा रा
                                                                                                            
                                                      63          79

अज रखतखाने खुदायवंद खाने शर्जाखान खलदयामदौलतहू बजानीब कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा। वाई बिदानंद सु॥ इसने सितैन अलफ दरीविले बो। नरसीभट बिन रगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट चित्राउ सो। कसबा पा। मजकूर हुजूर येऊनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १॥ दीड दर सवाद देहाय बिता।

मौजे बोरखल जमीन                         मौजे किण्ही चावर
चावर १                                           नीम ..

येणेप्रमाणे देखील महसूल व नखतयाती व बाजे बाब बा। खुर्दखत वजीरानी मुकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद चालत आले असे हाली पा। मजकूर साहेबास मुकासा अर्जानी जाला आहे माहली कारकून ताजा खुर्दखताचा उजूर करितात साहेबी नजर एनायत फर्माउनु खुर्दखत मर्‍हामत कराविया रजा फर्माविली पाहिजे ह्मणौनु तरी बराय मालुमाती खातिरेस आणौनु सदरहू इनाम जमीन चावर १॥ दीड दर सवाद दुदेह ए पो। मजकूर दो। महसूल नखतयाती बा। खुर्दखते वजीरानी मुकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ चालिले असेली तेणेप्रमाणे दुमाले करून चालवीजे अवळाद व अफळाद चालवीजे दर हर साल ताजा खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असेल खुर्दखत इनामदार मजकुरास फिराउनु दीजे पो। हुजूर मोर्तब सूद

                                                                                                                                                                                                                              72 1
                                                                                                                                                                        रुजू शुरु -
                                                                                                                                                                         निवीस

तेरीख ७                  माहे जिल्हेज
जिल्हेज

 

 

श्री
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.

विनंती विज्ञापना. उमरखेडकर कागदाराची पत्रें पेशजी आह्मांस आलीं त्यांत त्यांनीं लिहिलें होतें कीं भगवंतराव यांचे शरीरीं समाधान फार नाही. यास्तव कोणेही प्रकारें त्यांचे येणें उमरखेडास व्हावें. रामराव, भारामल यांजपाशी राहून भगवंतराव यांम वाटे लावील यैमी ताकीद यावी. त्यावरून हा मार दौलांसीं
बोलण्यात आला होता. त्यांनी तेजवंतास पत्र पाठविलें कीं भगवंतराव यांस ऊमरखेडास पावतें करून द्यावें. त्या ग्रा। तेजवंताचे पत्र आलें. दुसरें, तालुक्यास इजा लागों नये ऐसी ताकीद तेजवंतास आधीं जावी. हाही मार दौलांसी पेशजी बोलण्यांत आला. त्यांनीं तेजवंतास सदर्हु अन्वयें निक्षून लिहिल्यावरून तालुकियास उमरखेडचे कोठे उपद्रव न देतां ईर्षादेबमेजीब इंदुर बोधनाकडे कामगिरीस दरकुच जातो. याप्रा तेजवंताचे लिहिण्यांत ह्मणोन दौलांनी सांगितले. हलों रामराव यांची सुटका व्हावी दस्तऐवज फिरोन द्यावा. येसें दोलासीं आमचे बोलणे. याचे यानी असें ठराविलें कीं रामराव यांस येथेंच आणवितो. दस्तऐवजहि आणवावे यैसे आह्मी बोललो. दौलाचे ह्यगणें कीं असल दस्तावेज येथें आणिल्यास तुह्मीं, छातीवर बसोन घ्याल. यास्तव नकला पाठवाव्या ऐसे भारामलास लिहितों, आह्मीं उत्तर असल दस्तयैवज येथें आपण आणवावें. आह्मीं आपल्यापासीं बोलुनच घेऊ. याप्रा बोलणें जालें. परंतु अस्सल कागद भारामेल यांजपासीं असोन त्याच्या नकला येथें व रामराव यास पाठवावें, यांप्रा दौलांनीं दोन पत्रें तयार करून दिल्हीं, पै।। येक पत्र परभारा उमरखेडकर कादिराकडे मुजरद र।। केलें व येक पत्र राजश्री गोविंदराव भगवंत यांजकडे डोकवर पा आहे. मारनिले सेवेसीं प्रविष्ट करतील रा। छ २४ जावल हे विज्ञापना.

श्री

विनंती विज्ञापना. उमरखेडाहून कादाराचीं पत्रें इकडें येंत गेलीं कीं भगवंतराव व रामराव उभयतां भारामल तेजवंत यांचें समागमें अटकेंत आहेत. त्यांची मोकळीक व्हावी व तालुकीयास इजा न लागे यैसा बंदोबस्त होऊन तेजवंतास पत्रें यावीं, त्यावरून दौलांसी बोलण्यांत येत गेलें. सांप्रत उमरखेड प्रकरणीं ता मार रा. गोविंदराव भमवंत यांनी लिहिल्या अन्वयें दौलासी जाले कीं तेजवंतास आपले पत्र 'उमरखेडचे कारकून दोघे तुह्मीं समागमें नेलें त्यांस उमरखेडास पाठवून द्यावें. त्यांस त्यांजपासून दस्त ऐबज लेहून घेतला तो फिरोन द्यावा. आणि तालुकियांस उपद्रव परिछिन्न लागों नये' या अन्ययें एक पत्र आह्मापासी द्यावें ह्मणजे सरकारांत रवाना होईल. व एकंदर मारही आपण तेजनत२ यांजकडे पाठवून सरकार हुकुमाप्रमाणें त्यांजकडून अमलांत येण्याचे करावें. याजवर दौलाचें बोलणें की ' उमरखेड करांनी मावजी ना यांस चीजबस्त सुद्धा दिल्हे नाहीं. व भोंगाचे भावाचा पत्ता लावून द्यावा त्यास हजर करावें ते केलें नाहीं यास काय करावे?' याचे उत्तर इकडुन की ‘उमरखेडकर कादारांनी दोंही सरकारची दोस्ती येखलास जाणून भोंगाची मुलें, मनुष्यें चीजबस्त जे शोधांत आली तें तेजवंत याचें हवाला केलीं. भोंगाचा भाऊ तेथें नाहींच त्यांपक्षीं यानी काय सांगावे ? मावजी नाईक गैरहजर आहे. उमरखेडकरानीं आपले प्रयत्नास कांहीं कमती केली कीं काय ? कारकून दोन्ही माहली पाठवावे. आणीकहि शोध लागेल त्यांत कसूर करणार नाहींत. या आनव्ये मोठे झटापटीची बोलणी भवती न भवती फार कांहीं जाली. याजवर एक दो दिवसानंतर आणीकहि या समंधे दौलांसीं बोलणें जालें. दौलांनी सांगितलें कीं तेजवंताची पत्रें आली त्यांत उमरखेडचे दोघे कारकून समागमें होते त्यांतून भगवंतराव यांस शरीरी समाधान नाही. सबब उमरखेडास र।। केलें. रामराव मात्र जवळ आहे. मावजी नाईकाचा शोध फार केला. हलीं मालेगांवचे यात्रेस गेल्याचा ठिकाणा लागला, त्याची कन्या व जावई धरले, व मावजी नाईकचे पत्यावर उमरखेडकराची माणसेंहि गेल्याचे वर्तमान आहे, तहकीक करून मागाहून लिहान, या प्रा भारामल यांचे पत्रांतील मजकूर ह्मणोन बोले.. याजवर आमचें बोलणें कीं भगवंतराव यास उमरखेडास रा केलें उत्तम आहे, रामराव यासही रवाना करावें. दस्तऐवज फीरोन देवावा, उमरखेडास इजा लागे नये. या प्रा। तेजवंतास निक्षूण पत्र द्यावें. दौलानी सांगितलें कीं रामराव यास येथें पाठवून देण्याविषयीं पत्र तयार करविलें. तेजवंत मारिनिलेस येथें पाठवून देतील. उमरखेड तालुक्यांत उपद्रव करूं नये यैसे पेशजी भारामल यांस पत्र गेलें, उमरखेडापासोन बावीस कोसाचे फासल्यावर तेजयंत आहे. हल्लीं इंदूर, बोधन, म्हसें, मुधोळ, या प्रांती कामगिरीस जाण्यावियीं भाराम लास पत्रें गेली तिकडें जातील. पेशजीहि उमरखेड तालुक्यास फौचेचा उपद्रव जाला नाहीं. सोईटावर तीन मुकाम होते. परंतु काडीस ढका लागला नाहीं. आतांहि इजा लागणार नाहीं. मारनिलेस ताकीद आहे. या प्रा बोलून रामराव यांस येथें पाठविण्याविषी भारामल यास पत्र देण्याचा मसविदा ठराविला तो दाखविला. आज उद्यां पत्र मोहर होऊन आलें ह्मणजे रवाना करष्यांत येईल. ता विनंती मागाहून लिहीन. पत्रें दौलाकडून आलीं. यावितीं अलाहिदा पुरवणी लिा आहे त्यावरून ध्यानांस येईल रा। छ २४ जावल हे विज्ञापना.