लेखांक १५५ १५९८ मार्गशीर्ष वद्य २
राजश्री एसाजी राम हवालदार व कारकून सा। नीब गोसावी यासी
अखंडितलक्षुमीअलंकृतराजमानी
सेवक एसाजी मल्हारी सुभेदार व कारकुनानी पा। वाई नमस्कार सु॥ सबा सबैन अलफ बा। सनद राजश्री राघो बलाल सरसुभेदार माहालनिहाय छ १३ माहे सौवाल पौ छ मा।र माहे सौवाल तेथ अगन्या की वेदमूर्ती नरसींभट बिन रंगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट चित्राउ सो। कसबे वाई यानी हुजूर येउनु मालूम केले जे आपले इनाम जमीन चावर २बि॥
मौजे बोरखल चावर १ मौजे किण्ही चावर .॥.
पसर्णी चावर .॥.
एकून चावर दोनी आपले इनाम सालाबाद चालिले आहे तरा साहेबी दुमाले मिसली कारकुनास दिल्हे पाहिजे ह्मणउनु तरी याचे इनाम सदर गावी आहे त्यास सालगु॥ भोगवटा मनास आणून भोगवटेप्रमाणे दुमाले करणे + + + + + + तालीक लेहून घेऊन असल परतोन दीजे ह्मणउनु अग्न अगनेप्रमाणे मौजे बोरखल सा। नींब जमीन चावर १ एक दुमाले केले असे दुमाले कीजे बा। भोगवटा सालाबाद पाहून दुमाले कीजे तालीक लेहून घेउन असल परताने दीजे छ १५ माहे सौवाल मोर्तब सूद