छ माारी, दुस-या प्रकर्णी येक पत्र.
–श्रीमंत राजश्री---------------रावसाहेब
--स्वामीचे सेवेसी --------
विनंती.-सेवक गेविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंतीं विज्ञपना. सागाइत छ २९ माहें षाबानपर्यंत मुआबदेर येथे स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. इकडील कितेक वर्तमान अलाहिदा पत्रांत लिहून सेवेसी पाठविलं त्याजवरुन ध्यानात येईल. सांप्रत राजश्री नाना यांचे सांगण्यावरून रघोतमराव नबाबाकडील यांणी पुर्णियाहुन नबाबास व मुषीरुलमुलुक यांस स्वराज्याचे कलमबंदीचे फडच्याविसी पत्रे लिहिली, त्याजवरून नबाबांनी व कारभारी यांनी मजकुर बोलण्यांत आणिला व अदवनीचे स्वराज्याचे फडच्याविस पत्र राजश्री नाना थम नवाबांनी पत्र लिहिलें ।
कलमबंदी प्रकर्णी गोविंदराव भगवंत यांस पत्रं लिहिली. हा सर्व मजकुर सविस्तर लिहिला आहे. राजश्री नाना शेत निवेदन करतील, त्याजवरुन ध्यानांत येईल. उत्तराविस आज्ञा जाली पाहिजे. सेवसीं श्रुत हाय हे विज्ञापना,
र॥छ २ माहे रमजान रवानगी टप्यावरुन.
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचे पत्र,