[ १५९ ] श्री. २९ नोव्हेंबर १७३८.
तालीक.
राजश्री जानोजीराव निंबाळकर गोसावी यासीः -उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे राजश्री भगवंतराऊ रामचद्र व राजश्री मोरेश्वर रामचद्र व राजश्री शिवराम रामचंद्र यांचे कुळकर्ण व जोशीपण पुरातन मौजे तांदळी ता। राजणगाव येथील असतां नारो दत्तो व यादो तुकदेव पानगे कुळकर्णास व जोशीपणास नडले होते, आणि कज्या करीत होते त्यावरून मौजे मजकूरचे मुकादम व समाकुल पाढरी बलुते हुजूर आणून इनसाफ मनास आणिता पंडितमशारनिल्हेजें वतन कुळकर्ण व जोशीपण खरे होऊन पानगे खोटे झाले त्यावरून पडितमानिल्हेचे वतनपत्र अलाहिदा करून दिले आहे. तरी तुह्मीं आपलेकडून अमलदारास ताकीद करून कुलकर्ण व जोशीपणाचे वतन सुरळीत चाले तें केले पाहिजे पानगे यास वतनाशीं कज्याकटकट करावया सबध नाही त्याणी यजीदखत लेहून दिल्हे आहे तर पडितमानिल्हेचे वतन सुरळीत चालवणें ह्मणवून अमिलास पत्र देविलें पाहिजे रा । छ २७ शाबान बहुत काय लिहिणें.