श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.
विनंती विज्ञापना. कडपे प्रांती जमीदार मुफसद यांनी जमियत धरुन हंगाम केला. याचे बोभाट नवाबांकडे आल्यावरुन असद अलीखान यांस जमियत सुध कडप्याकडे बंदो xxx ( पुढील पृष्ठे गहाळ झाली आहेत.) पृष्टांक ३४९.
( गु ) लाबाची फुले आली ती गुजरली. रात्री दोन घटिकेस चौबी बंगला उभा करविला. छ १४ रोजी सोमवारी च्यार घटिकां दिवसां नवाब बंगल्यामधे बरामद जाले. पागावाले व अर्जबेगी वगैरे लोकांचा सलाम जाला. नाच पाहुन प्रहराचे अमलांत बरखास जाले. रात्री दोन घटिकेस दलांनी सिकंदरज्याहा साहेब जादे यांस पोषाग येक खाने व जवाहिर किस्त येक व मिटाई पान फुले वगैरे सरंजाम मुनीमुदौला समागमें पाठविला. तीन घटिकेस नवाब दौलाचे मकानास आले. दौला व मीर
आलम व पागावाले व रामराया वगैरेचा सलाम जाला. कंचन्याचा नाच । होता. दौला व मीर आलम यांसी बोलणे होऊन येक प्रहर च्यार वटिका रात्रीं बरखास जालें. छ १५ मंगळवारी तीन घटिका दिवसां नवान सवार होऊन नागझरीकडे गेले, सैर करून उमदा बेगमचे बागांत आले. भोजन होऊन येक प्रहर साहा घटिकां दिवसां हवेलीस आले. रात्री दौलाच अजी गुजरली, छ १६ रोज बुधवारी दोन घटिकां दिवसां नवाब सवार होऊन शिकारीस चिते समागमे घेऊन गेले. शिकार जाली नाही. नागझरीस येऊन तेथे भेाजन करुन आराम केला. (प्र) हरास हवेलीस आले. रात्री दौलाची अर्जी गुजरली. तीन घटिकेस बंगाल्यामध्ये नवाब बरामद जाले. पागावाले अर्जबेगी वगैरेचा सलाम जाला, नाच कंचन्याचा भाउचा व अतषबाजी व रोशनी जाली. छ १७ रोज गुरुवारी पांच घटिका दिवसां नवाब नागझरीकडे सैर करुन येक प्रहर पांच घटिकेस आले.