चैत्र वद्य ९ शके १७१६,
ती. २४।४।१७९४
विनंती विज्ञापना. निस्तर किरकपात्रिक इंग्रजाकडील वकील बाहेर डेर देऊन राहिला होता. त्यास इंग्रजी दोन पलटणे नवाबाकडे नोकरीत आहेत. ती कडयेप्रांत होती. तेथुन येलंगदलाकडे आणविली. हैदराबादेस पलटण सरदार सुधां आल्याचे वर्तमान आल्यावरून पलटणांतील लोक व सरदार याची देखरेख करण्याकरितां किरकपात्रिक येथुन छ २२ रमजानी निरोप घेऊन हैदराबादेस गेला. पलटणे पाहुन मागती बेदरास येणार. वरकड इष्टवारट वगैरे त्याचे सोबती मंगळवार पेटेंत पूर्वजाग येऊन राहिले. राछ २३ रमजान हे विज्ञापना.