श्री वैशाख शुद्ध ३ शके १७१६,
ता. २।५।१७९४
विनंती विज्ञापना. मीर पोकद अली सिकंदरज्याहा बहादुर साहेब जादे यांचा निका दौलाचे नातास लागावयाची साअत छ २६ रमजानी ठरुन रात्री दौलाचे हवेलीस नवाब जनान्यासहित साहेबजादे मंडळीस घेऊन आले. नवाबाचे हुकमाप्रा दौलांनी आम्हांकडे षादीचा रुका सुर्ख रंगीन कागदावर लेहुन पाठविला की तुम्ही यावे. त्यावरून च्यार घटिका रात्रि आम्ही गेलो मोर पोकद अली, व सुभान अली व जुल फिकर अली व तैमूर अली च्यार साहेबजादे दौलाचे दिवाणखान्यामध्ये मजलस करून बसले होते, मीर आलम व इंग्रजाकडील वकील मिस्तर इष्टवारट व बेहतषामजंग आदि करून दरबारची इसमें तमाम अमीर मनसबदार सरदार मुतसदी हजर होते, मी जातांच मीर पकद अली यांनी आपले जवळ बसऊन पटणचे मोहिमे च्या वगैरे गोष्टी सुरु केल्या. मीर आलम व इष्टवारट सहित बेलणें एक वटिका होत. नाव जनान्यांत व दौला खटपटीस होते. साहेबजादे मज्यालस करून कंचन्याचा नाच होता. इतक्यांत निक्याचा साअत समय होतांच मिर पकद अली यांस असाल बोलाऊ आला. चौघे साहेबजादे महालांत जाऊन मीर कदअली यासी दौलाचे नातीचा निका लागला. त्यानंतर नबाब दिवानखान्यामध्ये वरामद जाले. मजला बाजुस जवळ बैसउन घेतले. सर्वांच्या नजरा जाल्या. कंचन्याचा नाच होता. दौलांनीं शरबताचा प्याला आपले हातीं घेऊन नबाबापुढे येऊन प्याला धरला. प्रथम प्याला नबाबांनी प्राशन केला. दुसरा प्याला दौलांनी पुढे केला तो नबाब प्राशन करावयास गेले तो प्याला माघारा सरकाउन घेतला. याप्रमाणे दोनतीन वेळां व्याहीपणाचे नात्याने मषकरीचा अनुकार दाखविला. हा संप्रदाय करून दौलाचे हातचा प्याला घेतला. दौलास बसावयाचा हुकुम जाल्याप्रमाणे बाजूस बसले. नबाब मजकडे पाहुन बोलले की * तुह्मीं षादीकरितां त्याची खेष कोणें प्रकारची ? याचा बयान थोडा सांगण्यांत संयुक्त तत्र्हेचा केल्यावरून नबाब कांहीं हास्यमुख होऊन संतोष जाले. मिस्तर इष्टवारट इंग्रजाकडील याने कलकतेकर जनरलाचे पत्र गुजराणिलें. तें दौलांनी वांचून दाखविलें. कंचनाचा नाच समाप्त करुन खुषालखान वे कल्याणखान यांचे लेक येथे प्रस्तुत आले आहेत, त्यांचे गायन दोन घटिका जालें मिश्री रुपेरी वर्खाची पानदान भरून आह्मांपुढे ठेविली, अभार उमरा येवन लोक यांस शरबताचे प्याले दिल्हे. याप्रमाणे समारंभ होऊन दहा घटिकां रात्री बरखास जाली. राछ २ पाबान हे विनंती विज्ञापना.