वैशाख शुद्ध ३ शके १७१६.
ता. २।५।१७९४
विनंती विज्ञापना, दौलाचे बोलण्यात आले की “ रुकमारडी व दमारडी जमीदार बाळकोंडकर शंकरराव भोंग यांची मालियेत घेऊन कबीले सुद्धा फरारी होऊन देवगडचांद्यास गेले. त्यांचा पत्ता तेथे लाऊन रायेल पुरुषोत्तम येथे आला. तेजवंत यांची पत्रे या मजकुराची रधी भोंसले सेनासाहेब सुभा यांस गेली होती. त्याचा जबाब त्याजडून आला की ' जमीदार चांद येथे आहेत. परंतु यकायेकी पाटीस आल्यास हात कसे द्यावें? कांहीं येक त-हेनें जमीदारास तेथून काढून देऊ, तुमचे हस्तगत होतील या अन्वये लिहिले आले ह्मणोन बोलले,' र।। छ २ माहे शवाल हे विज्ञापना.