Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख व. ११ मंगळवार शके १७१५.
विनंति ऐसि जे–सांवतखान आमची भेट होऊन गेल्यानंतर मध्यस्ताकडे आह्मीं सांगोन पाठविलें कीं, “सेनासाहेबसुभा यांजकडून सांवतखान आले. आमची भेट जाली. खान म।।र यांस हुजुरचे आपले भेटीकरितां बादमगरबा घेऊन येतों,' याचे उत्तर मध्यस्तांकडून आलें. ‘ फार उत्तम आहे. खानमार यांस आपलें समागमें घेऊन अस्तमानीं यावें." खानास इस्तकबालीविषंई माधवराव रामचंद्र यांनीं मध्यस्तास अगोदर विचारिलें होतें. “इस्तकबालाचें प्रयोजन नाहीं " याप्र।। त्यांनीं सांगितलें. नेमाप्रमाणें अस्तमानीं आह्मीं मध्यस्ताकडें जाऊन खान आले त्यांची भेट करविली. सेनासाहेबसुभा यांचें खरितापत्र व वस्त्रें जवाहीर मध्यस्तास आणिलें तें खानांनी पावतें केले. आगतस्वागत बोलणें जालें. मध्यस्तांनी नबाबाकडें अर्ज करविला की “गोविंदराव, सेनासाहेबसुभा यांजकडील सांवतखान यांस मुलाजमतीकरितां घेऊन आले. ईर्षाद यावी. यांजला समागमें घेऊन बंदा हजर होईल”. च्यार घटका रात्रीं नबाब लालबागेनजीक चांदणीचे फर्षावर बारामद जाले. येण्याविषई मध्यस्ताकडें हुकुम आला. मध्यस्त, मी सांवतखानांसहित नवाबापासी जाऊन खान म।।र यांची मुलाजमत करविली. सेनासाहेबसुभा यांजकडील खरितापत्र व लग्नसमंधी वस्त्रें, जवाहीर गुजराणिलें. चंदा कंपनीचा नाच होता, मध्यस्त व मी समीप होतों. असद अलीखान प्रकर्णी खमम येथील हाथींचा जंगलातला व चोबीना वगैरे प्रकर्णी बोलणें जालें, मध्यस्तानीं सालगिरेकरितां नबाबास जवाहीर घावयाचें आणिलें तें दाखविलें. इत्यादिक होऊन फुलाचे हार बहुत प्रेमानें नवाबांनीं आह्मास व सांवतखान यांस दिले. याप्र।। खान म।।र यांचे मुलाजमतीचा तपसील कचा ध्यानांत यावा सबब विनंति.।। छ. २४ सवाल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख व. ११ मंगळवार शके १७१५.
विनंति ऐसा जे–राजश्री रघोजी भोंसलें सेनासाहेब सुभा यांजकडून सांवतखान, नबाबाकडें येण्याकरितां नागपुराहून निघोन बेदरानजीक चार कोसांवर आल्याची विनंति छ. २० सवालचे रवानगींत लिहिल्यावरून ध्यानांत आलें असेल, खान मार यांनीं, राजश्री रामचंद्र दादो यांचे चिरंजिव माधवराव येथें आहेत, त्यांजला बोलाविलें. म।। र निले गेले. त्यांसमागमें खानानीं आह्मांकडे सांगोन पाठविलें कीं 'सेनासाहेब सुभा यांची आज्ञा आह्मांस आहे कीं आधीं आपल्याकडे जावें. आपण मध्यस्ताची भेट करवून हुजुरची मुलाजमत करवावीं ऐसें आहे. यास्तव आपले भेटीस कोणे समई यावें ? इतला व्हावी,” याचा निरोप माधवराव रामचंद्र यांसमागमें पाठविला कीं, * “तुह्मांस सेनासाहेबसुभा यांची आज्ञा याप्रा। फार उत्तम आहे. यावें. " त्यावरून छ. २२ रोजीं प्रात:कालीं खान म।।र आह्माकडे आले. समागमें पंचवीस पठाण निवडक होते. भेट होऊन सेनासाहेब सुभा यांचे पत्र व वस्त्रें, लग्नाचीं आह्मांस होतीं तीं, खान म॥र यांनीं दिलीं. मध्यस्ताची व हुजुरची मुलाजमत केव्हां हें विचारिल्यावरून 'अस्तमानीं होईल ' याप्र॥ सांगोन खान मार यांस निरोप दिला. आपले स्थळास गेले. र। छ. २४ सवाल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख व ११. मंगळवार शके १७१५.
राजश्री नाना स्वामीचे सेवेसी,
विनंति ऐसी जे. इकडील वर्तमान छ२० शवालीं पत्राची रवानगी केल्यावरून सविस्तर ध्यानांत आलें असेल. सांप्रत येथील वर्तमान अलाहिदा पुरवणीपत्रीं विनंति लिहिली आहे; त्यावरून अवलोकनांत येईल. उतरें पेशजी व हलीं एकंदर खाना करण्यास आज्ञा जाली पाहिजे. र॥ छ. २४ सवाल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
( शके १७१५ ज्येष्ट शु. ७ )
विनंति ऐसी जे. बेदर येथील किल्ल्यांतील हवेली नीट करावयाचे काम नवाबांनीं लाविलें. कारखाना ज्यारी आहे. मध्यस्तांनींही आपली हवेली तयार करण्याचें काम चाली लावलें, वरकड कोणीं कोणीं छपरें घातलीं. साहुकार सराफ, उदमी, बकाल यांणीं छपरें घालावीं कीं नाहीं येविषयीं मध्यस्तास विच्यारिलें होतें. “सांगतों ' या प्रा बोलत गेले. हैदराबादेकडे नबाब बरसात तेथें करावयास जाणार, याप्रा बोलवा फार होती. त्यावरून साहुकार वगैरे मंडळींनीं छपरें न घालितां पालावर काम आजपर्यंत चालविलें. सांप्रत छ. २७ शवालीं सर्वत्रांस हुकूम जाला कीं आपलाली छपरबंदी करून राहणें. त्यावरून छपरें घालावयास सावकार वगैरे लोक लागले आहेत. या हुकुमावरून तमाम लोकाची खातरजमा कीं च्यार --------, गवत मिळत नाहीं. सरकारचें गवत कांहीं आहे तें------ मध्यस्तांनीं सांगितलें पंधरा हजार प्र॥ -------- हालीं करतात. पुढें आणखी महाग होईल. कडब्याची वैरण गावगना कांहीं आहे. ती विकूं नये. एसी ताकीद आहे. जनावरास वैरण मिळणें कठिण पडलें. महिन्यानंतर रानांत ही गततें होतील. र॥ छ. ६ जितकाद हे विनंति.
माहे शवाल उर्फ वैशाख मास छ. २४ रोज मंगळवार,
टप्यावर पुण्यास.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७३ श्री
श्रीशिवभक्तपरायण तपोनीध भवानगीर गोसावीयासि प्रती वजश्री राजा शिव छत्रपति उपरि तुह्मी पत्र पाठविले ते प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला मौजे इडमिडे गाव इनाम आहे त्यास पूर्वी ताकीदपत्रे दिल्ही परतु माहालीचे कारकून व इत्यादीक उपसर्ग देता राहात नाही मिरासपटीचे रोखे करिताती यामुले आपणास टका भर सुरलीत चालत नाही तरी येविशी पारपत्य केले पाहिजे ह्मणोन लिहिले ते विदित जाले ऐसीयास हाली तुमच्या लिहिल्यावरून देशाधिकारीयास व पांडवगडकरीयास व लस्करच्या लोकास ताकीदपत्रे पाठविली आहेती व गावास ही आज्ञापत्र दिल्हे आहे देऊन गावीचा वसूल घेऊन गोसावियाच्या मठा जवल अन्नछत्र चालवीत जाणे याउपरी माहालीचे व इत्यादीक काही उपसर्ग होणार नाही आपले समाधान असो दीजे छ २४ रजब जाणिजे बहुत काय लिहिणे
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
( शके १७१५ जेष्ठ शु. ७ )
यादी गाडद पयदल रिकाब हमराही नवाबाचे सरकारांत हजर.
७००० कदम रिसालेपैकीं
५००० मुसा रेहमु जमीयेत करार येकंदर तेरा हजार; पैकीं मोजदाद हैदराबाद येथें ८००० पैकीं,
२००० तैनात हैदराबाद कीले गोलकुंडा व रखवाली शहर.
१००० कोयलकुंड्याकडे खजिंना आणावयाकरितां रवाना.
---------
३००० बाकी हमराही.
१००० पटालं बायेकापैकीं आजमासें
१३००० तेरा हजार पायेदल गाडदची जमीयेत रिकाब हमाराही असे. छ, ६ माहे जिलकाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७२
मोहबतशारी मुखत अनुवारी खाने अजम अकरम चांदखान नाईकवाडी
किले वदन दाममोहबतहू
अजी मोहीबसाद कुलदिल एकलास आवधूत तिमाजी देसकुलकर्णी पा। वाई सलाम बाजद सलाम येथील खुसी जाणौउनु मोहिबी आपले खुसी लेहवया कलम इशारत फर्माविले पाहिजे ऊ की नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ यास इनाम मौजे उझर्डे जमीन चावर ॥ अर्ध ऐसीयास ते गाउ मुकासा मोहीबास अर्जानी जाहाला आहे भोगवटाबदल मोहीबाचे मिसेली पाहिजे याबदल त्याचा औलाद शंकरभट मोहीद नजीक भोगवटा कागद घेऊन आले आहे मोहिमी खातिरेस आणउनु आपले कागद करूनु देऊन साल दर साल खैराती चालविले पाहिजे मोहीब बडे असेत व आहेत दराजमाये लिहिणे हे आह्मास जरूर आहे यावास्ते लिहिले आहे हे किताबत
ई
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
( शके १७१५ ज्येष्ट शुद्ध ७ )
यादी गाडद प्यादे वगैरे जमीयत पयेदल नवाबाचे सरकारांत ब।। जाबीता दफ्तर
१४४५० रिसाले कदीम.
५०० फौजदारखा
५०० महमद जहीरुदी
३०० येतमादखां
१०० जीवनखा
२०० गालबुदौला
१५० गुलाम महदखां
४५० रसूलखां
४५० मुसाइसमत
२५ नवाजषअलीखां
६०० ऐमीनुदौला
१५० सेखवली महमद
७५ सेखहसनखां
१०० महमद ताहेर
३०० दिलावरुदौला
३०० महमदमुजफर
१२०० अबदुल करीम
७५० सैद उमरा
१००० तेजसिंग हजारी व शाहमहमदखां
२०० सेख जथे
३०० महममद शाबान
४०० ज्यानेसारजंग
२०० रायेराया
२००० सयेकुल मुलुक
१००० रफाउलमुलुक
२०० मीरदौरा
३००० तैनाती हैदराबाद
-------
१४४५०
१००७ गाडद मुसा रेहमुमये मुसापेरु व मुसा
१७००० प्यादे
१०००० असदअलीखां
२००० मलक ईसा
२००० सिदी अबदुला
१००० अमीखां आरब
२००० अलहयावरुदौला
------------------
१७०००
११५० कामाठी
८०० जमाल अलीखां
२०० महमद दिलेर
१५० काजम अलीखां
-----------
११५०
५०० कारीगराज व गोलंदाजान व बरकंदाजान रिसाले राये तुळजाराम.
१२०० पटालं बायकाची
-----
४४३००
चवेतालीस हजार तीनशें गाडद कुल पर्यदलची जमीयत दफ्तरची. पैकीं तेरा हजार रिकाब हमराही बमोजीब याद आलाहिदा. बाकीची जमी येत तालुक्यांत आसद अलीखां वगैरे ठिकाणीं आहे. छ. ६ माहे जिलकाद, सु। अर्बातिसैन मयाव अलफ,
(रविवार तारीख १६ जून १७९३ इ. )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १७१ ] श्री. २६ जानेवारी १७४५.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ७१ रक्ताक्षी नाम संवत्सरे माघ शु।। ५ मंदवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहूछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराव पंडित अमात्य हुकमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः -
जिरंजीव राजश्री रामराजे बावडेयासी तुह्मांजवळ आहेत ह्मणून तीर्थस्वरूप महाराज मातु श्री काकी साहेबांनीं स्वामीजवळ सागितलें. त्याजवरून आह्मीं राजश्री भगवंतराऊ नहरही दफ्तरदार दी ।। मजमू यासी पाठविलें. त्याणीं तुमची भेट घेऊन चिरंजीवास पाहून आले. सकलअर्थ कळविला. त्याचें तुमचें बोलणें होऊन राश्री सदाशिवराम पंडित यास गुप्तरूपें तेथें तुह्मीं पाठविलें आहे. त्यास तीर्थस्वरूप मातु:श्रीसाहेबांचें विद्यमानें राजश्री गोविंदराव खंडेराव चिटणीस याणें भेटोन दोन तीन वेळां त्यांशी बोलणें ठरविलें त्याप्रमाणें चिरंजीवास पानगांवीं पाठवून द्यावें. तिकडेही सूचनेस भगवंतराव पाठविले जातील येथून तुह्मांकडे शिवराम पंडित यासी व मग गोविंदराव यासी पाठवावे असें ठरलें आहे. त्यास मागाहून पाठविले जातील. भगवंतराव दप्तरदार यासी पानगांवीहून नेहमी इकडे व तुम्हांकडे येण्यास जाण्यास आज्ञा केली आहे शिवराम पंडित यांणीं स्वामीसन्निध विनंति केली कीं, आमचा जिल्हा जातीचा सरंजाम व वतनें व इनामगांव व कुलअकत्यार लिहिण्याचा दरख पूर्वी चालत आल्याप्रमाणें चालविला जाईल, याप्रमाणें स्वामीचें वचन आलें, परंतु आमचा जिल्हा स्वामीनीं प्रतिनिधीस दिल्हा, प्रधान पंडिताकडे मोठे मोठे गांव गुंतले , व दरकाचें लिहिणें ठाई ठाई होतें, महादाजी गदाधर यासी स्वामीनीं मजमू सांगितली आहे, त्याणें दरख राहिला नाहीं, आह्मीं पेशजी आलों ते समयीं स्वामीनीं मजमू व छंदोग्य अमात्यपद आह्मास देऊन ठेविलें, इतक्यांत श्रीमंत राजश्री आबासाहेबीं येऊन स्वामीस विनति केली, तेव्हां स्वामीनीं त्याजपासून शपथ घेऊन त्याचे स्वाधीन केलें, त्याप्रमाणें त्याणीं पुन्हा आह्मांस इकडे येऊदेखील दिल्हें नाहीं, असे पुढें जाहलें, तरी आमचा सेवकाचा परिणाम काय ? त्याजवरून मातु श्रीसाहेबांचे पायावर हात ठेऊन श्रीबालकृष्णजीचीं व श्रीअंबाबाईचीं फुलें तुळसी शिवराम पंडित अमात्य याचे हातीं दिल्हीं तीं तुह्मीं घेणे. त्याचीही शपथ स्वामीनी घेतली आहे प्रतिनिधीकडे तुमचा जिल्हा उत्तम आहे त्याचे मुबदला मिरज तालुका व चिरजीव कुसाजी व येसोजी भोसले याचा तालुका व गाव खेडीही मोबदला दिल्हीं जातील जुनेरचें सरदेशमुखीचें वतन तुमचें तुह्माकडे चालविलें जाईल. व शिवराम पंडिताची स्त्री सौभाग्यवती दुर्गाबाई याणीं रामराजे यासी फार फार जपून संरक्षण केलें ह्मणून कळलें त्यास दुर्गाबाईस साडीचोळीबद्दल प्रांत क-हाड येथील सरदेशमुखीचें वतन, स्वामीचें आहे तें , तिजला इनाम करून देऊन चालविलें जाईल तुमचे पूर्वी लाख रकम मजमू व मजमूकडील मुतालकी, फडणिसी व सरदप्तरदारी वतनी आहे, त्याप्रमाणें करून दिल्हे जातील. महादाजी गदाधर याणीं दरबाराची जुनी राहटी राखिली नाहीं यामजुळे पायमाली आहे, तशी पुढें होणार नाहीं स्वामीनीं शपथपूर्वक मारनिल्हेजवळ दिल्ही आहे तुह्मीं कोणेविशीं संशय न धरणें. तुमचें उर्जित स्वामी करितील संपूर्ण राज्यांतील मजमूं व फडणिशा व दप्तरदा-या व किल्लेच्या जिल्हेच्या सबनिशा पेशजीपासून वतनीं तुह्मांस दिले आहेत, त्याप्रमाणें स्वामी चालवितील जाणिजे छ ३ जिल्काद सु।। खसम अर्बैन मया व अलफ.
मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
विनंति ऐसी जे-नबाबाकडील फौज व गाडद याची सुमारी शोध करून दप्तराच्या यादी तलाशानें मेळवून अलाहिदा तपसिलाच्या यादीं पाठविल्या आहेत.
बितपसील
२ स्वाराच्या---
१ येकंदर फौज सुमारी;
१ रिकाब हमराही
----
२
२ पयेदल---
१ येकंदर सुमारी;
१ रिकाब हमराही.
-----
२
ऐकूण च्यार यादी पाठविल्या आहेत, अवलोकनें ध्यानांत येईल. रा छ, ६ माहे जिल्काद हे विनंति.
यादी फौज सवार जमियत नयाबाचे सरकारांत बमोजीब जाबीता दफ्तर--
२१८७० जागीरदार
७०० रावरंभा निंबाळकर
३०० कल्याणराव जगदेवराव निबाळकर
३० बाळा बाई
५० भवानराव निंबाळकर
५०० तेजसिंग खंदारकर
२०० पदमसिंग खंदारकर
१५० जोधासिंग खंदारकर
१०० दारकोजीराव पाटणकर
७५ साबाजी घाटगे
६० चडचणकर सिंदे
५० मानसिंगराव हके
२५ रुस्तुमराव पांढरे
३०० अषज्या उल्मुलुक
७५ महंमद अजमखां बिज्यापुरी
४ ० ० महंमद हुसेनखां घवाले
३० दावरजेंग
२५ हसन अल्लीखां
७५ महंमद सुलतान खां
३५० सैद दाउद अली खां
५०० महंमद हिंदायेतुला खां
२०० महमद रहिमान खां
३०० महमद कबीर खां
२०० लोदी खां
२०० जमालखां लोहानीं
३०० महमद हींदायत खां
७०० रफाउलमुलुक
११० मीर दौरा पिसर मरिआलम
२१ सैद ररूल
१००० महमद रोषन खां.
८०० महमद सुभानखां व मोहीब अली
१००० सलाबतखां
२५ सैदउसमाईल
७५ सैद अहमद
५० सैद निज्याम
१५० नामदार खां
२००० वजीर खां
५०० महमद अमीबा आरब
१०० बदरुदौला
१००० बहलोल खां
१०० अलावलखां
५०० अलहयावरुदौला
५०० सनावरुदौला
१५० हसेन खां बिज्यापुरी
२०० सिकंदरुदौल
२२५ चिमणा राजे
३०० राये राया
१०० गोविंदराव कृष्ण
७५ माणको माधवराव
१०० रघोतमराव
२५० शंकरराव भोंग
५० त्रिमलराव
४००० असद अलीखां.
१५०० मलकईसा
१००० सिद्धी अबदुला
१०० नारायणराव वशंपायन
----------
२१८७०
८००० पागा
५००० शमषुल उमर
३००० सयेफुलमुलुख
-----
८०००
६४०१ रिसालदार
२१५० शमषुल उमरा
२००० सयफुलमुलुख
६०० बहादर अलीखां
७० जी तनखां
१३ अबदुल करीम
२५० कुतुब उलउमरा
१५० आमन उलमुलुक
५०० षुजान उलमुलुक
३२ बखत्यार जेंग
१६ ० ज्यानेसीर जेंग
५० करीमदाद खां
१७ हषम व कुवत जेंग
२५ अजमन मुलुक
१०० फतउदी महमदखां
१८ महमद जहीरुदीखां
६३ महमद जीवनखां
९३ यमीनुदौला
७० सयेद हसनखां
-------
६४०१
१००० मनसबदार व सायरचे लोक अजमासें
-------------
३७२७१
१२२०० नवनिगादास्त करार जाबीता
५००० महमद अजम बीडवाला
२००० रामचंद्रराव मुंगीकर राजे
२००० सवाराज निगादास्त मा तेजवंत भारामल
२७०० सवराज मुतफर्कात म॥रोशनराये
५०० सिवबा महजारी नागपुराहून आला तो.
-------
१२२००
---------
४९४७१
येकुणवनास हजार च्यारसें येकाहत्तर स्वाराची फौज येकंदर दफ्तराची. पैकीं वीस हजार मोजदाद रिकाब हमराही; बाकी फौज रोषनखां व दौलतखां व असदअलीखां वगैरेकडील तालुक्यांत ज्याबज्या सदरहू प्रो आहे. छ. ६ जिलकाद सु। अर्बाति सैन मया व अलफ.
१ आरबी सन ११९४-फसली १२०३-हिजरी १२०७.
यादी फौज सवार स्वारीसमागमें हमराही रिकाब नवाबाचे सरकारांत हजर.
४७९० जागीरदार--
१५० राव रंभाजी निंबाळकर
२०० तेजसिंग खंदारकर
१५० पदमसिंग खंदारकर
५० दारकोजीराव पाटणकर
२५ साबाजी घाटगे
४० चडचणकर सिंदे
२५ हके
२०० अषज्या उलमुलुक
२५ दावरजेंग
२० हसनअलीखां
७५ सुलतानखां
३०० दाउदअलीखां
१५० रहिमानखां
१०० कबीरखान
७५ लोदीखान
१०० जमालखां लोहानी
२० सैद रसूल
५०० सलाबतखां
७५ सैद उसमाल व सैद अहमद
१०० नामदारखां
१०० बदरुदौला
१०० अलावलखां
३०० अलहयावरुदौला
२०० सनावरुदौला
१०० हसनखां विज्यापुरी
१०० सिकंदरुदौला
२०० चिमणा राजे
२०० रायेराया
१०० गोविंदराव कृष्ण
३० माणको माधवराव
४० नारायणराव येशवंतराव
६०० असदअलीखांपैकीं.
--------
४७५० १
५५०० पागा---
३००० शमषुल उमरा
२५०० सयेफुलमुलुक
-----------
५५०० २
-------------
१०२५०
४७७५ रिसालदार---
१५०० शमषुल उमरा
१५०० सयेफुल मुलुक
५०० बहादर अली खां
५० जीवन खां
१२ अबदुल करीम
२०० कुतबुल उमराब
१२५ आमनउमुलुक
४०० षुज्यान उलमुलुक
२५ बखत्यारजेंग
१२५ ज्याने सीरजंग
५० करीमदाद खां
१७ हषम व कुवत जंग
२० अजमन मुलुक
७५ फतउदी महमद खान
१६ महमद जहीरुदी
५० जीवन खां
६० यमीनुदौला
५० सैद हसन
---------
४७७५ १
--------
१५०२५
५००० नव निगादाष्ती पो हजार
२००० महमद अजम बीडवाला
१००० मुंगीकर राजे
५०० राजे तेजवंत पौ
१००० रोशनराये पौ। मुतफकात
५०० सिवबा महजारी
-----------
५०००
-----------
२००२५
वीस हजार पंचवीस स्वार रिकाब हमराही बेदरापासून पांच कोस, दहा, पंधरा, वीस, पंचवीस कोस ज्याबजा उद्गीर, निठूर, हसनाबाद, कौलास या तालुक्यांत चराईस आहेत. -- --- स्वार बेदराबर नवाबापाशीं -- -- माहे जिलकाद सु॥ अर्वातिसैन मया व अलफ. ( रविवार तारिख १६ जून १७९३ इ.)