डांकरााछ २ डॉकवरून
श्री
वैशाख शुद्ध ३ शके १७१६,
ता. २।५।११७९
मामुली पत्र डांकेबरोबरचे श्रीमंतांस,
श्री
वैशाख शुद्ध ३ शके १७१६,
ता. २।५।१७९४
विनती विज्ञापना. मीर पोकद अली सिकंदरज्या बाहादुर साहेबजादे यांस दलाची नात नवाबांना केली. त्याचे शादीचे निक्याचा साअत छ २९ रमजाम रविवारी ठरून नवाबानीं सुभान अली वगैरे साहेबजादे यांजकडुन सांगेन पाठविलें की तुह्मी षादीचे सुर्ख रंगी पोषाग जवाहीर घालुन सि. कंदर ज्याहा यांचे हवालेस हजर असणें त्या प्राो ते पोकद अली यांचे मकानास तयार होऊन गेले. तीन प्रहर दिवसां पोकदअली आदिकरून साहेबजादे यांची याद केली. हजर जाले. दौलांनी सिकंदर ज्याहा यांस पोषाक जरी कारचोबी व जवाहीर सिरपेंच जिगा तुरा दस्तबंद भुजबंद कंठी पोहत्या जोड याप्रों पाठविले. नवाबास व माहालांतही वस्खें जवाहीरखाने किम्ती पाठविघ्या. मगरबाचे समई जनाने देवढीपासोन दौलाचे हवेली पर्यंत कनाता पडदे देऊन बंदोबस्त करउन नवाव जनान्यासाहत साहबजादे समवेत दौलाचे हवेलीस आले. समारंभाचा तपशील अलाहिदा पुखणांवरून ध्यानांत येईल. छ. २ माहे षवाल हे विज्ञापना.