Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१२ १६०९ वैशाख शुध्द ३
सके १६०९ प्रभव नाम संवत्छर वैशाख सुध त्रितीया आदितवार सु॥ सबा समानीन अलफ सन हजार १०९६ कारणे राजश्री त्रींबक काकाजी व राघो काकाजी यासि होनाजी बाबाजी व नागोजी बाबाजी देशकुलकर्णी का। सांगोला पा। माण लेहून दीधले पत्र ऐसे जे आपणास काल कठीण पडिला व पाठी कोन्ही नाही यास्तव तुह्मापासून आत्मकार्य लागी घेतले होन ५०० पाचसे घेऊन तुह्मास कर्याती सांगोलाचे देसकुलकर्णाचे तकसीम चौथी दिल्ही असे बितपसील ऐन कुलहक होन ४५ पंचेतालीस पैकी चौथाई होन ११।. सवा अकरा पैकी गाऊ तोडून दिल्हे बितपसील
३ मौजे वाडेगाऊ ३ मौजे सोनद
२ मौजे चिचाली १ माणेगाव
१ पेठ वजीराबाद होन १। मडसिंगे होन २
पैकी
------ ------
६ ५।
एकूण होन ११। सवा अकरा व कसबे सांगोलेचे इनाम चावर .॥१२॥. पैकी बाग बिघे १२॥ व जिराती चावर नीम ॥. पैकी चौथी तकसीम बिघे १८ यासि बाग बिघे
३ व जिराती बिघे
१५ तुह्मी खाऊन सुखे असावे व सदरहू गावी मोढे आपल्या गावा घाले आपण खावे दर मोढेस मीठ
.।. होन
.।. द्याल प्रा। घेत जाणे व दर गावास जुतेजोडा १ व बाजार पेठ वजीराबाद घेत जाणे व वृत्तीमुले का। मजकुरी जे उपेद्र होईल ते चौथे ठाई वाटून देऊ व वृतीमुले टका पडेल तो चौथे ठाई तुह्मी द्यावी व नवी वृत्ती जे साधेल ते तुह्मास आह्मी निमे देऊ त्यासी जो काये टका पडेल तो तुह्मी द्यावा व रान होऊन काठ व बाजे हक जो येईल तो चौथेठाई वाडून देऊन सदरहू प्रमाणे लेकराचे लेकरी खाऊन सुखे असणे यासि अनेथा करू तरी आपले कुलस्वामी साक्ष व वडिलाचे सुकृत साक्ष असे सदरहू लिहिले प्रमाणे ठाणाचा महजर करून देऊ हे लिहून दिल्हे पत्र सही आपला कोन्ही भाऊबद मुजाहीम जालिया आपण वारूं हे लिहून दिल्हे सही
बी॥ होनाजी बाबाजी व नागोजी
बाबाजी देसकुलकर्णी
गोही
नागोजी बिन रताजी माने देसमुख
का। ह्मैसवड पा। माण-दहीगाऊ
सायेवडे देसाई का। नाझरे पा। माण
अताजी माने मोकदम का। वेलापूर
अताजी बिन मानाजी माने देशमुख
पा। वेलापूर पा। मान दहीगाऊ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २११ १५९६ आषाढ वद्य ४
अज रखतखाने खुदायवंद मा। सर्क मा। रेहान खुली दाईमदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानी ता। करकंब बिदानंद सु॥ खमस सबैन व अलफ नरसीहभट बिन नारायणभट सा। पंढरपूर हुजूर मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर सवा १। मौजे गुलसरे ता। मा। प्रज तुकोजी करव्या बा। फर्मान व भोगवटा मुकासाइयानी सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती चालिले आहे फर्मान व भोगवटा + + + कागद होते ते जळाले व आपण दुकळामधे कासीस गेलो होतो त्याकरिता तसरुफाती अजी तागाईत नाही हाली आपण कासीहून आलो तरी खैर साहेबाची आहे साहेबी मेहेरबान होउनु सदरहू इनामाचे बाबे हुकूम फर्माविले पाहिजे की सदरहू इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले करणे दरम्यान भट मा। कासीम गेला होता याकरिता भोगवटा तुटला त्याची इस्कील न कीजे व फर्मान व भोगवटीयाचे कागद जलाले त्याचा उजूर न कीजे ऐसा हुकूम केला पाहिजे ह्मणौउनु मालूम केले तरी भटमजकुरास सदरहू इनाम जमीन चावर सवा १। दर सवाद मौजे गुलसरे ता। मा। प्रज तुकोजी करव्या बा। फर्मान व भोगवटे मुकासाइयानि कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असेल तेणेबरहुकुम गावी पटेलास व मोखतसर कुणबीयास व गावीचे बुढे बुढे कुणबीयास पुसौनु गहदम चालिले ऐसे कुणबी सागतील तरी सदरहू इनाम दुमाले कीजे दरम्यान भटमजकूर कासीस गेला होता त्याकरिता भोगवटा तुटला त्याची इस्कील न कीजे व फर्मान व भोगवटियाचे कागद जलाले त्याचा उजूर न कीजे दर हर साला खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक घेउनु असेली फिराउनु दीजे कदीम इनामती तजकरा रुजु पाहोन गावीचे मोकदम व कुलकर्णीयासि बरवे रीति पुसोन इनामाची जमीन पाहोन येणेप्रमाणे खूब मनास आणून पेसजी कारकीर्दी मलीक अंबर चालिले असेली तेणेप्रमाणे चालवणे मोर्तब सूद
रुजु सुरु
निवीस
तेरीख १७ माहे रबिलाखर
रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१० १५९४ ज्येष्ठ वद्य २
(फारसी मजकूर)
बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि ता। माहुळ अजीमुला अहमद एकद ऊके सु॥सन सला ++ अलफ नरसींभट बिन नारायणभट सो। पंढरपूर हुजूर येउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद मौजे देगाउ ता। मा। प्रज कुसुबडा सटवोजी दो। माहसूल व नखतयाती लवाजिमात बेठ बेगार व फर्मायसी जर बेलेकटी व पायपोसी मेजवानी व नौली सेल बैल व जगपटी व पेसकसी वा पटी सिके हुमायुन व कार इमारती व बाजे पेठ मुबारक मुतबारीके माहीनल आयाल बिअल सुरुर व बाजे कुलबाब कुलकानु उजुहाती व सायर कानुनाती व इसमे वा रसमा वा अलमे व कदमे व नकदी व जिनसी आची बा फर्मान व भोगवटा कारकीर्दी दर कारकीर्दी तसरुफात चालत आले आहे भोगवटाचे कागद होवे ते घरबराबरी जलाली बा। खु। मो। रेहान भोगवटा व तसरुफाती ता। सालगु॥ चालत आले हाली ता। मजकूर अमानत जाले आहे माहाली कारकुनानि ताजा खु॥चा उजूर करिताती रजा फर्माउनु दुमाले खु। देविले पाहिजे सरजाम होय मालूम जाले बराय मालुमती खातिरेसी आणून नरसीभट बिन नारायणभट इनामदार यासी इनाम जमीन चावर १ एक दर सवादे मौजे देगाउ ता। मा। प्रज कुसुवडा सटवोजी दो। माहासूल व नकदयाती कुलबाब कुलकानु बाबहाय सदरहु बा। फर्मान व खु॥ मा। रेहान भोगवटा व तसरुफाती ता। सालगु। जैसे चालत आले असेल ते खातिरेस आणून सदरहू इनाम दुबाला कीजे दर हर साला खु॥ ताजाचे उजूर न कीजे अवलाद व अफवाद चालवीजे तालीक लिहून घेउनु असल इनामदार मजकुरास फिराऊन दीजे मोर्तब सुदु
रुजु सुरुनिवीस
तेरीख १५ माहे सफर
सफर शूर सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०९ १५७१ मार्गशीर्ष शुध्द १४
अज रखतखाने खुदायवंद मा। शर्जामलीक रेहान खुली दयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व देसमुखानि करकब बिदानंद सु॥ खमसैन अलफ नरसींहभट बिन नारायणभट सो। पढरपूर हुजूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १। सवा प्रज तुकोजी करप्या दर सवाद मौजे गुलसरे ता। मा। देखील महसूल व नखतयाती व जमे लाजिमात व वेठी बेगारी व फर्मासी व जर बेलेकटी व पायपोसी व मेजवानी व सेल बैल व जगमपटी व पेसकसी व पटी सिके हुमायुन व कार ई सुभराती व बाजे नियत मुबारके व मुतबरके मअदनल अमज मबाअज सुरु व बाज कुलबाब कुल उजहती व सारे कानुनाती इस्मे व रस्मे + + व कदमे नखती व जिनसी जे काही हाली आहेती व पेस्तर होतील ते हक हुमान हुमायून व भोगवटे व तसरुफाती सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले आहे यावरी दुकलाकरिता आपण कासीस गेलो होतो आपणापासुनु भोगवटियाचे सदरहू कागद हारपले बाजद आपण साहेबाचे बदगीस येउनु मालूम केले तेणेप्रमाणे साहेबी आपणास खुर्दखत दिल्हे आहे ते वखती आपणानजीक कागद नव्हते साहेबाचे बदगीस सवा चावर जमीन इनाम आहे ह्मणौनु बोलावे ते चावर एक ह्मणोनु बोलिळो तेणेप्रमाणे साहेबी खुर्दखत दिल्हे ते खुर्दखत घेउनु माहालास गेळो यावरी मागती साहेबाचे बदगीस मालूम करून सवा चावराचे खुर्दखत मागावे तरी लस्कर बहुत दूरी आपणास यावया ताकती नव्हे ह्मणौउनु आलो नाही हाली लस्कर नजीक आले ह्मणौउनु साहेबाचे बदगीस आलो तरी हे खैराती साहेबाचे सबबचे काम आहे साहेबी नजर एनायत फर्माउनु खुर्दखत देविले पाहिजे व आपण फर्मानाची तालीक आणिली आहे तेथे सवा चावर आहे व गावीचे मोकदमाची व रयतीची अर्दास आणिली आहे आपणास इनाम जमीन सवा चावर आहे तो गावीचे ळोकास जाहीर आहे दरीबाब सरजाम होय मालूम जाले तरी सदरहू इनाम जमीन चावर सवा एक १। आहे ऐसे गावीचे बुढे बुढे लोक असतील त्यास पुसणे व फर्मान आहे तो माहाली तुह्मी आपले नजरेस पाहाणे खूब तहकीक करणे सवा चावर इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असेली तेणे बरहुकूम चालवणे बा। फर्मान व खुर्दखत मलीकअबर सालाबाद चालिले असेली तेणेप्रमाणे दुंबाले करणे दर हर साल खुर्दखताचा उजूर न करणे तालीक घेउनु असेली फिराउनु देणे पा। हुजूर राबिलाखर त्रिमल मोर्तब सूद
रुजु सुरु-
निवीस
तेरीख १२ माहे जिल्हेज
जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०८ १५५६ कार्तिक १५
अज रखतखाने खुदायवंद मा। सर्क मा। इतबारनमुलूक खुलीदयामदौलतहू बजानीब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि ता। महु + + सु॥सन खमस अर्बैन व अलफ बा। खुर्दखत हजरती साहेब छ १७ रबिलाखर नरसींहभट बिन नारायणभट सो। पंढरपूर हुजूर मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर एक १ दर सवाद मौजे देगाव ता। मा। प्रज कुसूबडा सटवाजी फर्मान भोगवटे मुकासाइयानि सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती चालिले आहे फर्मान व भोगवटेयाचे कागद होते ते जलाले व आपण दुकलाकरिता कासीस गेलो होतो त्याकरिता तसरुफाती अजी तागाईत नाही हाली आपण कासीहून आलो तरी खैर साहेबाची आहे साहेबी मेहरबान होउनु सदरहू इनामबाबे हुकूम फर्माविला पाहिजे की सदरहू इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले करणे दरम्याने भटमजकूर कासीस गेला होता त्याकरिता भोगवटा तुटला त्याची इस्कील न कीजे व फर्मान व भोगवटेयाचे कागद जलालेयाचा उजूर न कीजे ऐसा हुकूम केला पाहिजे ह्मणउनु मालूम केले तरी भटमा। सदरहू इनाम जमीन चावर १
एक दर सवाद मौजे देगाव ता। मा। प्रज कुसुवडा सटवाजी बा। फर्मान व भोगवटा मुकासाइयानी कारकीर्दी दर कारकीर्दी चालिलेप्रमाणे बरहुकूम गावीचे पटेलास व मोखतसर कुणबियास व गावीचे बुढे बुढे कुणबियास पुसौनु गहदम चालिले ऐस कुणबी सागतील तरी सदरहू दुमाले कीजे दरम्याने भटमजकूर कासीस गेला होता त्याकरिता भोगवटा तुटला त्याची इस्कील न कीजे व फर्मान व भोगवटेयाचे कागद जलाले त्याचा उजूर न कीजे दर हरसाल खु॥ उजून न कीजे तालीक घेउनु असेली फिराउनु दीजे कदीम इनामती तजकिरा पाहौनु गावीचे मोकदम व कुलकरणीयास बरवे रीती पुसौनु इनामा इनामाची पाहौनु येणेप्रमाणे खूब मनास आणौउनु पेसजी कारकीर्दी मलीकअबर चालिले असेल तेणेप्रमाणे चालवणे ह्मणौउनु सादीर आहे तेणेप्रमाणे चालवणे पा। हुजूर पा। मोर्तब सूद
रुजु सुरुनिवीस
तेरीख १३ माहे रमजान
रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०७ १५६० भाद्रपद वद्य १
श्रीसंभुक्षत्रसीकर
मा। हा। राजाधिराज माहाराज राजश्री कृस्णाजीपंत माहाराज स्वामी
.॥ माहाराजाचे सेवेस सेवक राजमुद्रा व देसमुख व मोकदम व बडवियानि व सेटिया माहाजन माहाप्रस्नीक स्थळ श्री क्षेत्र व पेठ सिंगणापूर का। मलेवाडी सेवेस विज्ञापना ऐसी जे माहाराजे आमच्या स्थळास ताटे थिटे आराधे मोकदम व बडवे क्षेत्र पंढरपूर या उभे वर्गास वेव्हारसमधे आमच्या थळास पाठविले असेती याची उतरे परिसोन धर्मता निवाडा करणे ह्मणउनु आज्ञापत्र लिहून पाठविले ते पत्र सिरसावदून सनाथ जाहालो परंतु आमच्या स्थळास थिटे आराधे मोकदम क्षेत्र मजकूर हे आमच्या स्थळास स्रावण वधी दसमीस आळे आळीयावरि बडवे यावे ते आले नाहीत ह्मणउनु आह्मी बडवीयासि सांगोनु पाठविले जे ताटे थिटे आराधे मोकदम चीरपत्र घेउनु येउनु आमचे स्थळी बैसले असती तुह्मी येउनु आपला निवाडा करून घेणे ह्मणउनु परंतु ते आले नाहीत मग हे मोकदम मा। आमचे स्थळी दिवस २२ बैसौनु वाट पाहिली इ॥ स्रावण वधी दसमी ता। भाद्रपद वधी प्रतिपदापर्यत बडव्याची वाट पाहिली परत बडवे आले नाहीत मग ताटे थिटे आराधे मोकदम क्षेत्र मा। यासि स्थळपत्र लिहून दिल्हे आसे माहाराजे उभे वर्गाचा हुजूर जैसा नेमु केला आसेल तेणेप्रमाणे जमानाकरवे वर्तविले पाहिजे हे विनंती पत्र वोली २० वीस
तेरीख १४ माहे जमादिलौवल सु॥ तिसा सलासीन अलफु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०६ १५४९ आश्विन वद्य ७
अज रखतखाने राजश्री तिपाजि राजे साहेब दामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि ता। करकब वा। रवा सुदु हुदेदारानि व मोकदमानि मौजे गुलसरे ता। मा। बिदानंद सु॥सन समान इसरीन अलफ गोपाळभट बिन कोनरीभट व विठळभट बिन हरीभट सो। क्षेत्र श्री हुजूर येउनु मालूम केले की आपणास इनाम जमीन चावर २ दोनी बि ता।
गोपाळभट बनि कोनरीभट चावर १ विठळभट बिन हरीभट चावर १
गज शरायनी दर सवाद मोजे गुळसरे ता। मा। व दो। नखतयाति व बाजे बाब व वेठीबेगारी व पाढेवारी व अवट व अस्व जकाती व सेतसारा व वर्हाड टका व सेताखळिळ मळे ढेळे कुळबाब बह महसुळेसी प्रज नाग पाटीळ करपा मुजरी मौजे मा। सालाबाद गहमद बा। भोगवटे वह सिके खास वजीरानि कारकीर्दी दर कारकीर्दी चाळिळे आहे हाली सालमजकुराकारणे माहाली कारकून ताजे खु॥ उजूर करिताति दरीबाब खु॥ होय मालूम जाळे तरी बो। गोपाळभट बिन कोनेरीभट व विठलभट बिन हरीभट सो। पंढरपूर यास इनाम चावर २ दोनी
गोपाळभट बिन कोनेरीभट विठलभट बिन हरीभट
चावर एक १ चावर एक १
गज शरायनी प्रज नाग पाटीळ करपा खु॥ मौजे गुळसरे ता। मा। देणे सदरहू बाबा सालाबाद गहदम भोगवटा व तसरुफाती जैसी चालिले असेली तेणेप्रमाणे दुमाला कीजे दर हर साल ताजा खु॥ उजूर न कीजे अवलाद अफलाद चालवीजे तुह्मी तालीक घेउनु असेली खु॥ इनामदार मा। दुमाला कीजे मोर्तब सूद
रुजु सुरनिवीस
तेरीख २० माहे सफर
सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
पंढरपूर-आराध्ये
लेखांक २०५ १४८० चैत्र वद्य २
(फारसी मजकूर)
अज रख्तखाने खुदायवंद अज मुलुखवानिनु खाने अजम म + रळेखा खुलिदयामदौलतहू बिजानिबु भानोबा सखदेऊ व कारकुनानि मामले परियडा बिदानंद सु॥ समान खमसैन व तिसा मया विठलभट बिन नारायणभट साकीन पंढरपूर हुजुरु मालमू केले जे आपणासि वरदका इनाम हर्ची जमीन चावर एक दर सवाद मौजे गुळसरे ता। करकंब मामले मजकूर बा। खु॥ राँ इजानेबु दिधले आहे चावरमजकुरीचा महसुलु बापूजी मुकासाई + + + + तणे उचापती केला मागता देत नाहि + + + मुकासाईमजकुराचे हुदेदार मौजेमजकूर + + + आणौनु चावरमजकूरीची उचापती केलि + + + फिराउनु देवविजे फिर्यादी एओ नेदीजे रा। स + + खु॥ मोअजम रवद छ १५ माहे जमादिलाखरु + + + दफ्तर
तेरीख १६
जमादिलाखर
खमस
तालीक सुदु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०४ श्री
राजश्री कुवरजी सीरके गोसावी यांसि
अखंडीत लक्ष्मी आलकृत राजमान्य श्नो सदासीव चीमणाजी असीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत असीले पाहिजे विशेष वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायण जोसी बोरगावकर याचा व याचे वादीयाचा ईनसाफ तुह्मी निवडुन खरे खोटे करणे ते केलेत ह्मणोन कळो आले उत्तम आहे वेदमूर्तीचे राहिले काम निर्गमुन कागदपत्र करून देणे ते देऊन त्यास निरोप द्यावा तेथे त्याचे काम आहे तरी गोसावीयानी वेदमूर्तीच्या कारभाराचा फडशा करून कागदपत्र दील्हे पाहीजे रा। छ ६ रजब बहुत१ काय लिहीणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०३ श्री १६८२ कार्तिक शुध्द ६
इनामपत्र आजनिविस्ते गुलाम मोहीद्दीन वलद महामुदजी अलिजी व गुलामअल्ली वलद गुलाम अहमद इब्रमियाजी इब्राहिमजी चौधरी प्रांत कल्याण व भिवंडी सुहुरसन इहिदे तिसैन मया व अलफ कारणे अजम मेघ श्याम बल्लाळ, उपनाम जोसि, गोत्र शांडिल, सूत्र आश्वलायन, वास्तव्य पुणे, यासि इनामपत्र लेहून दिल्हे ऐसे जे मौजे लोनाड, ता। सोनवळे, प्रांत भिंवडी, हा गाव तुह्माकडे सरकारांतून इनाम आहे ऐसीयास, मौजे मजकूरचे दुहोब्याचा हक रयतेनिसबत इजानेबाचा आहे, तो आह्मास पूर्व स्नेहावर नजर देऊन इनाम देवावा, ह्मणोन पुण्याचे मुकामी बजीद जाला त्याजवरून, तुमचे कदीमदोस्ती व स्नेहावर नजर देऊन इस्तकबिल सन मजकूर मौजे मजकूरचा दुहोब्याचा हक्क तुह्मास इनाम करून दिल्हा असे तरि, साल दरसाल पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने सदरहु हक्क घेत जावा छ ५ माहे रबिलाखर सन मजकूर. शके १६८२