लेखांक २०४ श्री
राजश्री कुवरजी सीरके गोसावी यांसि
अखंडीत लक्ष्मी आलकृत राजमान्य श्नो सदासीव चीमणाजी असीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत असीले पाहिजे विशेष वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायण जोसी बोरगावकर याचा व याचे वादीयाचा ईनसाफ तुह्मी निवडुन खरे खोटे करणे ते केलेत ह्मणोन कळो आले उत्तम आहे वेदमूर्तीचे राहिले काम निर्गमुन कागदपत्र करून देणे ते देऊन त्यास निरोप द्यावा तेथे त्याचे काम आहे तरी गोसावीयानी वेदमूर्तीच्या कारभाराचा फडशा करून कागदपत्र दील्हे पाहीजे रा। छ ६ रजब बहुत१ काय लिहीणे