Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखाक ३४
१६५४ आषाढ वद्य ९

हु

 सुज्याअतशार सिदी साद सुभेदार सुभा मामले दाभोल व प्रात राजापूर मालूम बाशद सुहूरसन सलास सलासीन मिया व अलफ आके दादोवानायक बिन रगोवानायक सरदेशाई सुबैन मजकूर येही मौजे धामापूर तर्फ सगमेश्वर सुभा राजापूर हा आपला कदीम गाव मराठे तर्फेन आपणास इनाम आहे सरकार तर्फ + + णी मौजे माlरा वर आहे ते मेहेरवान होऊन आपणास माफ केली पाहिजे म्हणोन अर्ज केला त्या वरून मेहरवान होऊन मौजे मजकूरची खडणी सरदेशाई माlरइलेस माफ केली असे तर जे साली जे खडणी मौजे माlरा वर मुकरर होत जाईल त्याचा सालमजकुरा पासोन सालाचे सालात माफी खर्च लिहीत जाणे ताजे सनदेचा उजूर न करणे नकल घेऊन असल सरदेशाई या नजीक देणे पाl हुजूर रोl श माl जबानी रघुजी भिकाजी नाईक बोरकर अफराद राl छ २२ माहे मोहरम सन *१४ जुलूस (* हा जुलूस 'महमदशहा'चा) मोर्तब सूद

बार सूद

लेखांक २३८                                                                                                                               १५६९ मार्गशीर्ष वद्य ६
                                                                                               मिर्जा राजा

                                                                                                         238

                                                                                           फारसी मजकूर

अज माहाल खालिसा शरीफ ता। सेखदारानि व कारकुनानि व देसमुखानि व देसपांडियानि पा। पुणे सु॥ सामान सितैन अलफ सन हजार १०७७ दरीविला राजश्री माहादाजी गोसावी इ. इ. इ. हाली वा। मा।र पातशाही खालिसा जाले आहे इ. इ. इ.

तेरीख १९ माहे जमादिलाखर

लेखाक ३३

हु
अजम सिदीसाद दाममह
बतहू

 मोहिबानीपन्हाही मखलिसान दस्तगाह अजी श्रीनिवासपडित प्रतिनिधी.. आकी येथील खुसी जाणऊन खुद खुसी कलमी मरकूम करीत जाणे दिगर माहाराज राजश्री स्वामीचे सरदेशमुखीचे वतन आहे त्यासि पातशाहानी नर्मदा आलाकडे सरदेशमुखचे वतन बाहाल केले आहे वरघाटे वतनी अमल चालत आहे कोकणप्राते सरदेशमुखीचा अमल जाला नाही त्यासि वतनी अमल चालवावया विसी अमलदारास हुकूम केला त्यासि माl विसोवानाइक सरदेसाई मामले प्रभावली व मामले दाभोल येही माहाराजाचे सेवेसी अर्ज केला जे दोनी मामलियाचे सरदेशमुखीचे वतन पुरातन आपले आहे त्या प्राl चालत आहे त्यासी स्वामीनी कृपालु होऊन वतनी अमल चालवावा ह्मणऊन अर्ज केला त्या वरून हे वतनदार पुरातन याचे सरदेशमुखीचे वतन चालवणे महाराजास जरूर या करिता दोनी मामलेयाचे वतन याचे यासी मोकरर करून दिल्हे असे हक लाजिमा इनाम पुरातन चालत आहे त्या प्रमाणे मोकरर केला असे आणि खासा वतनी अमल माहाराजाचा दोनी मामलेयाचा चालावा या स्तव सरसरदेशमुखीचे वतन मोकरर करून दर सदे पचोत्रा हक रयत निll मोकरर केला असे त्या प्राl चालेल ये विसी कोणी खेलेल करील त्यासी ताकीद केली पाहिजे दराज काय लिहिणे

लेखाक ३२
श्री १६५२

राजश्री सेखोजी आगरे सरखैल
गोसावियासि

 सकलगुणालकरण अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य श्री श्रीनिवास परशराम प्रतिनिधी आसीर्वाद विनती उपरी येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे विशेष राजश्री प्रहरादनाईक सरदेसाई मामले प्रभावली व दाभोल हे हुजूर राजश्री स्वामीसनिध सेवा करितात व राजश्री दादोवानायक सरदेसाई मामले मजकूर हे हि हुजूर येऊन हाजीर जाले ऐसियसि याच्या हक लवाजिमा व इनामतीस गोसाविया कडून खलेल जाहाली आहे ह्मणऊन विदित जाले तरी हे हुजूर या राज्यात दखल नसते तरी याच्या वतनास खलेल करावी हे उचित च होते परतु हे दखल होऊन स्वामी सनिध सेवा करितात ऐसे असता याच्या वतनास खलेल करावी ऐसे नाही हे पुरातन वतनदार हे आपल्यास हि अवगत च आहे याचे हरएक विसी अगत्य धरून चालवावे हे विहित आहे या उपरी गोसावियानी आपल्या कडील कमावीसदारास ताकीद करून मामले मजकूरचे हक व लवाजिमा व इनामती सुरलीत पेसजी पासून भोगवटा आहे त्या प्रमाणे यास प्रविष्ट हो तो + + + ... ... .. . ... जाणिजे छ १० जिल्हेज बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा

 

लेखाक ३१
श्री १६५१ आषाढ वद्य ५

तालीक

स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ५६ सौम्यनामसवत्छरे आशाढबहुलपचमी भृगुवार क्षत्रियकुलावतस श्री राजाशभुछत्रपती स्वामी याणी समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री कान्होजी आगरे सरखेल यासी आज्ञा केली ऐसी जे राजश्री शाहू राजे दाजी रागण्याखाले चिकवाडीस आले ते समई कितेक गड किले त्यास हस्तगत होऊन सपूर्ण राज्यात फितवा जाहाला तन्मुले राजश्री गणोवानायक सरदेशाई मामले प्रभानवली व मामले दाभोल यासी भेटावे लागले विसाजीनाईक हुजूर होते ते हि शिधुदुर्गास स्वारी जाली तेव्हा मागाहून न पुसत गेले या करिता त्या वरी इतराजी जाली ते प्रसगी राजश्री रामचद्र पडीत हुकमतपन्हा होते त्याणी राजश्री शिवाजी राजे दाजी या जवल विनती केली की त्याचा दायाज कानोवानाईक आहे त्यास वतनाची पत्रे करून द्यावी ह्मणजे गणोवानाईक यासी आपल्या वतनाची पत्रे दुसरियासी दिल्ही ऐसे भय निर्माण होऊन स्वामीच्या पायासी सादर होऊन निष्टेने वर्ततील ऐसे विदित केले त्या वरून कानोवानाईकास पत्र करून दिल्हे होते परतु त्यास वतनाशी अधिकार नाही. त्या मुले त्याचा भोगवटा जाला नाही त्या उपरि विशालगडचे मुकामी खरनामसवत्छरी गणोवानाईक याणी राजश्री शिवाजी राजे दाजी याचे दर्शन घेतले ते नाईक मशारनिले वर कृपालु होऊन सदरहू पत्र कानोवानाईकास दिल्हे होते ते रद करून गणोवानाईक याचे वतन यासी सुरलीत करून देऊन पत्रे दिल्ही गणोवानाईक याणी बहुत निष्टेने वर्तोन वतनीधदा चालऊन शेवा केली त्या प्रमाणे त्याचे बधु राजश्री अतोवानाईक स्वामीच्या पायासी निष्टेने वर्तत आहेत ऐशास कानोवानायक या पासी पेसजीचे पत्र होते ते तुह्मास दाखऊन याचे वतनाची कथला आरभिला आहे ह्मणऊन विदित जाले तरी पूर्वापार वतनाचे खावद गणोवानाईक कानोवानाइकास वतनासी दरकार नाही त्यासी एक निमित्ये पत्र दिल्हे होते की गणोवानाईक यासि भय निर्माण व्हावे त्या वरी गणोवानाईक दर्शनास आल्या नतर कानोवानाईक यास दिल्हे पत्र रद केले असता त्या पत्रा वरून त्यास याच्या वतनासी कथला करावयासी गर(ज) नाही या करिता तुह्मी कानोवानाईकास ताकीद करून याच्या वतनासी कथला न करीत ते गोष्ट करणे गणोवानाईक याचे बधु राजश्री दादोवानाईक व अतोवानाईक व पुत्र राजश्री प्रल्हादनाईक व केशवनाईक सरदेशाई पूर्वापार वतनदार एकनिष्ट आहेत याचे वतन यास सुरलीत चालवणे जाणिजे बहुत काय लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा

लेखाक ३०
श्री १६५१ आषाढ वद्य ३

स्वस्ति श्रीराज्याभिषेकशके ५६ सौम्यनामसवत्सरे आशाढबहुलपचमी भृगुवार क्षत्रियकुलावतस श्री राजा शभुछत्रपति स्वामी याणी राजश्री कान्होवा नाईक यासि आज्ञा केली ऐसी जे पूर्वी राजश्री गणोवा नाईक सरदेसाई माl प्रभानवली व दाभोल यास राजश्री शाहूराजे दाजी याची जाऊन भेटी घ्यावी लागली होती त्यास भयप्रदर्शन व्हावे ह्मणून तुह्मास राजश्री शिवाजीराजे दाजी याणी रागण्याचे मुकामी पत्र करून दिल्हे त्या उपरि विषालगडचे मुकामी खरसवत्सरी गणोवानाईक याणी हुजूर येऊन दर्शन घेतले तेव्हा तुह्मास पत्र दिल्हे होते ते रद करून त्याचे वतन त्यास चालवावयाची पत्रे दिल्ही ऐसे असता तुह्मी रागण्याचे मुकामीचे पत्र राजश्री कान्होजी आगरे सरखेल यास दाखऊन याच्या वतनासी कथला माडला आहे तर ऐसे करावयास तुह्मास गरज काय या उपर याच्या वतनासी कथला एकदर न करणे फिरोन हुजूर बोभाट येऊ न देणे याच्या वतनासी तुह्मास समध नाही जाणिजे निदेश१ (१ येथून अक्षराचे वळण निराळे आहे) समक्ष

रुजु सुरु सूद बार

लेखाक २९
श्री १६४८ भाद्रपद वद्य ८

राजमान्य राजश्री रामभाऊ बावाजी मुतालीक अमात्य यासि श्रीमत् मातुश्री राजसबाई साहेब उपरी सुहूर सन सबा अश्रीन मया अलफ राजश्री अतोवा नाईक सरदेसाई मामले प्रभावली या कडील सगमेस्वर माहाली देशमुखीचे कोड आसुरडे मौजे कुभारखणी हे दोन्ही कोड इनाम याज कडे चालत आहेत हे वतनदार प्रमाणीक याचे चालवणे साहेबास आवस्यक याज करिता तुह्मी याचे सदरहू इनामास व वरचील हक इनामतीस तिजाईचे तगादा न करणे याज कडील तिजाई हुजरून माफ केली असे छ २१ माहे मोहरम बहुत लिहिणे तरी तुझी सुज्ञ अस

लेखाक २८
श्री १६४६ चैत्र वद्य ८

स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ५० क्रोधीनामसंवछरे चैत्रबहुलअष्टमी भानुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शभुछत्रपती स्वामी याणी राजश्री गणोवानाईक व विसोवानाईक व दादोवानाईक व अतोवानाईक गोत्र कौशीक सरदेसाई मामले प्रभानवली व मामले दाभोल यासि दिली वतनपत्र ऐसे जे तुह्मी पूर्वी स्वामीसनिध आपल्या वतना विशई विनति केली होती व हाली तुमचे पुत्र प्रल्हादनाईक व केशवनाईक व शामजीनाईक बिन गणोवानाईक याणी किले पनालाचे मुकामी विनती केली की मामलेमजकूरचे सरदेशमुखीचे वतन महत्कदीम आपले मामले प्रभानवली खाले ताl मलकापूर व ताll असडोली हे दोनी माहाल वरघाटे आहेत येथील कदीम सरदेशमुखी इदलशाहाचे कारकीर्दीस आपले वतन चालत होते त्या आलाकडे कितेक दिवस मुकाशा मुले दो माहालचा भोगवटा आपला राहात आला आहे तरी स्वामीनी मेहरवान होऊन वा वतनाचा भोगवटा बहुत दिवस राहिला आहे तो जीर्णाधार करावयासि माहाराज समर्थ आहेत ह्मणऊन विस्तारे विनती केली त्यावरून मनास आणिता मामले प्रभानवली खाले सदरहू दोनी माहाल कदीम चालत होते अदलशाही मुकाशा मुले व या राज्यात वरघाटे तीर्थरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामीनी नूतन सुभे केले तेव्हा तरफ मलकापुरा खाले आणिखी च्यार माहाल देऊन स्वतत्र सुभा केला व ताl तारलेयाचा सुभा स्वतत्र केला त्या खाले आणिखी माहाल व ताl असडोली हा माहाल दिल्हा त्या मुले वतनाचा भोगवटा राहिला ऐसे दिसोन आले परतु कदीम वतन इदलशाई कारकीर्दीस प्रभावनली खाले हे दोनी माहाल चालत होते दरम्याने भोगवटा राहिला नाही ह्मणऊन वतनदाराचे वतन उठावे ऐसे नाही तुह्मी वतनदार प्रामाणीक स्वामीच्या पायासी तीर्थस्वरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामी पासून हा कालपर्यत एकरूप निष्टेने वर्तत आहा तुमचे चालवणे हे स्वामीस परम अवश्यक या स्तव स्वामी तुह्मावर कृपाळु होऊन ताl मलकापूर व ताl असडोली या दोनी माहालचे सरदेशमुखीचे वतन कदीमप्रमाणे तुह्मास अजराम-हामत करून दिल्हे असे तर तुह्मी सदरहू दोही माहालचे वतन आपले दुमाला करून घेणे या वतनास हक व लवाजिमा व जकायतीस विस्वा वर निसबत मामले प्रभानवलीचे बाजे माहाल प्रमाणे घेत जाणे या वतनसमधे तुमचे माथां शेरणी रुपये ६००
                            ताl मलकापूर ३००            तl असडोली ३००

एll साहा से रुपये रास करार केले असेत याचा वसूल हुजूर होईल सदरहू वतनाच्या सनदा अलाहिदा माहालचे नावे सादर आहेत तुह्मी सदरहू दोही माहालचे सरदेशमुखीचे वतन तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वशपरपरेने अनभवणे आणि वतनाची सेवा करून सुखरूप राहाणे जाणिजे सदरहू शेरणीचा ऐवज हुजूर पावऊन पावलियाचा जाब घेणे तेणे प्राl मजुरा होईल जाणिजे

लेखांक २३७                                                                                                                               १५६९ अश्विन वद्य १३
                                                                                                 

                                                                                                                237

रवां सूद

अज रख्तखाने राजश्री सीवाजी राजे दामदौलतहू बजानीब कारकुनानि ता। कडेपठार पा। पुणे बिदानंद सु॥ समाम अर्बैन अलफ दरीविले गणेशभट बिन मल्हारिभट भगत मोरया हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर निमे .. दर सवाद मौजे मोरगौ ता। मजकूर देखील नख्तयाती व महसूल बा। फर्मान हुमायुनु व खुर्द खत वजिरानि कारकीर्दी दर कारकीर्दी व बा। खुर्दखत माहाराज साहेबु व सनद सुभा ता। साल गुदस्ता सन सबा चालिले आहे सालमजकुराकारणे मा। दादाजी कोडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा जाली ह्मणउनु माहाली कारकुनु ताज्या खुर्द खताचा उजूर करिताति दरीबाब सरजाम होए मालूम जाले गणेशभट बिन मलारिभट भगवत मोरया यासि इनाम जमीन चावर निमे .॥ दर सवाद मौजे मजकूर देखील नख्तयाती व महसूल बा। फर्मान हुमायुन व खुर्द खत वजिरानि कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असेल तेणेप्रमाणे मनासि आणउनु दुमाले करणे दर हर साल ताज्या खुर्द खताचा उजूर न करणे तालीक घेउनु असेली इनामदारमजकुरापासी फिराउन देणे मोर्तब सुदु

                                                                                                                                                                                                                                            161 3

तेरीख २६                 माहे रमजा
रमजान                   सुरू सूद

लेखाक २७
श्रीआईआदिपुरुष १६४३

श्रिया सह चिरजीव राजमान्य राजश्री श्रीनिवासराऊ यास प्रति कृस्णाजी परशराम आसीर्वाद उपर येथील कुशल जाणून आपले कुशललेखन केले पाहिजे या नंतर राजश्री अतावानाईक सरदेसाई आपल्या दर्शनास आले आहेत पूर्वी पासून हे आपले पदरचे याची स्थापना सर्वप्रकारे आपले वतन ऐसे मानून तीर्थस्वरूप राजश्री बावाही केली आहे त्या प्रमाणे सर्वविसी याचा अभिमान धरून आपण स्थापना केली पाहिजे हे आह्मा पासी आहेत ते आपणा जवली च आहे ऐसे चितात धरून दया केली पाहिजे च्यार राजे जाहली आहेत यास आधार आपल्या विरहित दुसरियाचा नाही थोर वतनदार ब्राह्मण ह्मणऊन तीर्थस्वरूपी आपले पुत्र ह्मणऊन चालविले आहे त्याचे वादी तुह्मी आहा याचा अभिमान धरून चालणार आपण सर्वज्ञ आहेत याचे विसी चिरंजीव आपणास विनती करितील तदनरुप याचे कृपा केली पाहिजे बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद१ (१ हे सबध पत्र कृष्णाजी परशुरामाच्या हातचे आहे)