Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९८ श्री १६५१ कार्तिक शुध्द ६
आज्ञापत्र राजश्री पंत प्रधान ताहा मोकदमानी व रयान मौजे मोहू ता। वाजे रा। कल्याण सु॥ सलासीन१ मया व अलफ. मौजे मजकूर पेषजीच्या मोकासियाकडून दूर करून हाली राजश्री बालाजी माहादेव यास मुकासा दिल्हा आहे. तरी तुह्मी यासी रुजू होऊन मौजेमजकुरी कीर्द अबादानी करून कुलआकारप्रमाणे माशरनिलेकडे वसूल देत जाणे. दुसरियाकडे न देणे. जाणिजे छ ४ माहे रबिलाखर पा। हुजूर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९७ श्री १६४४ भाद्रपद शुध्द १३
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ४९ शुभकृतनाम संवत्सरे भाद्रपद शुद त्रयोदसी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभू छत्रपति स्वामी याणी देशमुख व देशपांडे ता। पाल यासि आज्ञा केली ऐसी जे राजश्री महादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण उपनाम जोशी गोत्र शांडिल्य सूत्र आश्वलायन हे स्वामीचे पुरातन सेवक तीर्थरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामीपासून बहुत निष्ठेने सेवा केली व तीर्थस्वरूप राजश्री संभाजी राजे काका याची सेवा केली व त्याउपरी तीर्थरूप राजश्री कैलासवासी स्वामी चजीस असता ताम्राचे संकट प्राप्त जाहाले ते समयी माहादाजी कृष्ण हे संताजी घोरपडे व जाधवरायासमवेत फौजा घेउनु गेले ते समयी विशेषात्कारे सेवा केली याकरिता यावरी राजश्री कैलासवासी स्वामी कृपाळू होऊन चजीचे मुकामी यासी मौजे खवली ता। पाली प्रा। मजकूर हा गाव कुलबाब कुलकानू खेरीज हकदार व इनामदार करून जलतरुपाशाणनिधिनिक्षेपसहित हालीपटी व पेस्तरपटी देखील इनाम अजरामर्हामत देउनु सनदा दिल्ह्या त्यावरि मा।रनिलेनी व त्याचे पुत्र राजश्री बाळाजी महादेव यानी राजश्री शिवाजी राजे दाजी याची सेवा केली त्यावरून त्याणी हि मौजे मजकूर यासि इनाम चालवावयाची आज्ञा करून पत्रे दिल्ही त्या प्रमाणे गाव यास इनाम चालत च आहे ऐशास, महादाजी कृष्ण व गोविंद कृष्ण व बाळाजी महादेव व रामचंद्र महादेव व कृष्णाजी महादेव हे स्वामीचे एकनिष्ठ सेवक, यामधे बाळाजी महादेव याणी वडिलवडिलापासून स्वामीची सेवा एकनिष्ठेने केली व हाली करित आहेत याचे चालविणे स्वामीस अगत्य, याकरिता तीर्थरूप राजश्री कैलासवासी स्वामीनी मौजे खवली हा गाव चंदीचे मुकामी माहादाजी कृष्ण यास इनाम वंशपरंपरेने दिल्ह्याप्रमाणे स्वामीनीहि चालवावयाची आज्ञा केली असे तरि, यास मौजे मा।र पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने इनाम चालवणे या पत्राची प्रती लेहून घेउनु अस्सलपत्र भोगवटियास याजवळ परतोन देणे निदेशसमक्ष
रुजू
सुरु सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९६ श्री १६४४ अधिक श्रावण शुध्द ८
मा। अनाम देशमुख व देशपांडिये ता। वाडे सरकर जुनर यासि बाजीराव बलाल प्रधान सु॥ सलास अशरीनमया व अलफ मौजे तारणे बु॥ हा गाव वेदमूर्ती राजश्री रामजोसी वास्तव्य मौजे बोरगाव ता। हवेलि मामले दाभोल यास पूर्वीपासून कुलबाब कुलकानु जलतरुपाषाणनिधीनिक्षेप चतुसीमा खेरीज हकदार देखील हालिपटी व पेस्तरपटी इनाम आहे त्याप्रमाणे हालि करार केला असे तरी तुह्मी मौजे मजकूर वेदमूर्तीस पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम चालवणे प्रतीवर्षी नुतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची तालिक लेहून घेऊन असल पत्र भोगवटीयास वेदमूर्तीजवल परतोन देणे जाणिजे छ ६ सौवाल पा। हुजूर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९५ श्री १६४३ माघ वद्य १२
आज्ञापत्र समस्त राजकार्यधुरंधर वीस्वासनीची राजमान्य राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान ता। मोकदम मौजे तोरणे ता। वाडे प्रात जुनर सु॥ ईसने अशरीन मया अलफ मौजे मजकूर पूर्वीपासुन वेदमूर्ती राजश्री रामजोसी बिन बालजोसी वास्तव्य मौजे बोरगाव ता। हवेलि प्रात दाभोळ यासि इनाम आहे तेणेप्रमाणे हालि करार केला आहे तरी वेदमूर्तीसी रुजु होऊन मौजे मजकूरचा वसूल याजकडे देत जाणे प्रतीवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे मौजे मजकूर यासि व याचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने चालवीत जाणे या पत्राची प्रती लेहोन घेऊन मुख्य पत्र याजवलि भोगवटेयास परतोन देणे छ २५ रबीलाखर आज्ञा प्रमाण
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १९५ ] श्री. २१ मे १८१७.
राजश्री कमाविसदार मा। हाय व समस्त सरनाईक सरदार गोसावी यासीः - पो। अमृतराव रघुनाथ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असावे. विशेष आपण पत्र पाठविलें तें पावलें. पूर्व रुणानुबंधाचे अर्थ व श्रीमंत महाराज यांचे लक्षाचे भाव लिहिले ते व राजश्री बच्याजी अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो । बाजीराव रघुनाथ प्रधान आशीर्वाद व नमस्कार. सुरुसन सबा अशर मैयातैन व अलफ. त्रिंबकजी डेंगळा कुपणी इंग्रजबहादर याचे कैदेतून पळून बड करीत आहे त्याची चौकशी गांवगन्ना करून डेगळा मजकूर याचा ठिकाण लावून जिवंत अगर मेलेला सरकारांत हावाला करून देईल त्याजला बक्षीस दोन लक्ष रुपये व हजार रुपयाचे गांव इनाम इंग्रजबहादर याचे विद्यमाने दिल्हा जाईल याप्रमाणें खातरजमा राखोन सरकार चाकरी करून दाखवावी याची पुरती चौकशी करून जो त्रिंबकजीस धरून आणोन देईल त्याजवरी सरकारची सरफराजी होईल. येविशीं जो कोणी अनमान करील त्याजवर सरकारची इतराजी होईल. व समस्त गरीब रयत ब्राह्मण व ह्माराठे व परदेशी व मुसलमान व वाणी उदमी व बेरड, भिल्ल, माग, रामोशी व रहेदार वगैरे जे कोणी त्रिंबकजी डेगळा याचा पत्ता अमुक जाग्यावरी आहे असा प्रत्यक्ष सरकारात दाखवून देतील त्यास पाच हजार रुपये बक्षीस व एक चावर जमीन इनाम इग्रजबहादूर याचे विद्यमानें पावेल डेगळा मजकूर याचा पत्ता ठावोक असोन जर कोणी सरकारांत समजावयास आळस केला असें विदित जाहलें तरी त्याचें पारपत्य होईल त्रिंबकजी डेंगळा बंडवाला याच्या मिलाफांतील इसम १२.
१ बापू गाईकवाड सेट फलकर.
१ भागोजी.
१ रविराव शिंदे लोणीकर.
१ तिमापा वडारी
१ माहादाजीपत नातेपोतेकर
१ गोधोजी डेंगळा.
१ सयाजी मुळे.
१ अप्पाजी पा। कुंरुबवीकर.
१ निंबाजी यादव फलटणकर.
१ महीपंत डेंगळा.
१ बापू बारडकर.
१ दाजी डपळे.
------------
१२
येणेंप्रमाणें येकूण बाराजण याचे कुटुंबाचीं मुलेंमाणसें कैद करून बेड्या घालोन बंदोबस्तीनें हुजूर पोचते करणें व त्यांचीं घरें जमीनदोस्त करून घरांतील चीजवस्तू सुतळीचे तोड्यासुद्धां जप्त करून त्याचा आकार होईल तो ज्याजती शिबंदी वगैरे खर्च लागेल. त्याऐवजीं घेणें व त्यांची इनामवतनवृत्ती असतील त्या जप्त करणे या बाराजणांपैकीं जे कोणी त्रिंबकजी डेंगळा यांसी धरून आणोन देतील त्याचा अपराध माफ होईल वर लिहिलेप्रमाणें बक्षीस पावेल. या बाराजणाखेरीजकरून बंडाचे मिलाफी स्वार व पायदळ व कारकून व शागिर्दपेशा वगैरे बडाची चाकरी सोडून आपलाले घरीं येऊन जमेदार व मोकदम यासी रुजू होऊन राहिले असतां त्यास बंडाचे मिलाफाचा अपराध माफ केला जाईल बडाची चाकरी सोडून न आलेस वर बाराजणाचे पारपत्य करावयाचें लिहिलें आहे त्याप्रमाणें याचे पारपत्य करणें बंडाचे मिलाफी गरीब लोक यांतून कोणी त्रिंबकजी डेगळा याचा पत्ता लावून प्रत्यक्ष सरकारांत दाखवून देईल त्यासही वर लिहिल्याप्रमाणें बक्षीस पावलें जाईल जाणिजे. छ ४ रजब सिक्का आज्ञाप्रमाणें मोर्तब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १९४ ] श्री. २३ डिसेंबर १८००
सलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलकृत राजमान्य राजश्री सुबराव पंडित स्वामी गो। यासी : -
पो। अमृतराव रघुनाथ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असावे. विशेष आपण पत्र पाठविलें तें पावलें. पूर्व रुणानुबंधाचे अर्थ व श्रीमंत महाराज यांचे लक्षाचे भाव लिहिले ते व राजश्री बच्याजी जिवाजी याचे पत्रावरून अवगत जाहालें. ऐशास पूर्व स्नेह आहे तो परस्परें वृद्धिंगत असावा हें उचित आहे. आह्मीं भिवंडीस स्वस्थ आहों. श्रीमंत महाराज यांचे क्रियेचा अवलंब असे रा। छ ६ शाबान. बहुत काय लिहिणें लोभ कीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९४ श्री १६४३ माघ शुध्द १
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४८ प्लव संवत्सरे माघ शुध प्रतीपदा रवीवासरे क्षेत्रीयकुलावतंस श्री राजा शाहु छत्रपती स्वामी याणी वेदमूर्ती रा। रामजोसी बिन बाल जोसी वास्तव्य मौजे बोरगाव ता। इवेली प्रा। दाभोल यास दिल्हे इनामपत्र ऐसे जे तुह्मी किले सातार्याचे मुकामी स्वामीसनीध येऊन विनंती केलि की मौजे तोरणे ता। वाडे प्रा। जुनर हा गाव पूर्वीपासून आपणास इनाम आहे आपण उपभोग करीत आलो मध्ये अवतारामुळे व आपण माहायात्रेस गेलो यामुळे इनामगावचा भोगवटा राहिला आहे तर स्वामीनी कृपाळु होऊन मौजे मजकूर पूर्ववत इनाम चालवावयाची आज्ञा केलि पाहिजे ह्मणोन विदित केले व पूर्वील पत्रे दाखविली त्यावरून मनास आणिता तुह्मी बहुत थोर जोतिशी सत्पात्र विद्यावत याज निमित्य स्वामी तुह्मावरी कृपाळु होऊन मौजे मजकूर कुलबाब कुलकानु देखील हालिपटी व पेस्तरपटी इनाम करार करून दिल्हा आहे तर तुह्मी मौजे मजकूरचा उपभोग पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने करून स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चितुन सुखरूप राहणे लेखनालंकार
ॠजुसुरनवीस सा। मंत्री
बारमुद सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १९३ ] श्री महालक्ष्मी प्रा।.
˜ श्री. ° श्रीमहालक्ष्मी
त्रैलोक्याभयदात्रीश्रीकर - २१ सप्टेंबर १७९६.
वीरनरेश्वरी l मुद्रा तस्या
जगन्तातुर्वर्वर्ति सकलेश्वरी ll
आज्ञापत्र श्री देवी संस्थान क्षेत्र करवीर याणी राजमान्य राजश्री सुबराव पंडित अमात्य यासी आज्ञा केली ऐसीजे : - पेशजी किल्ले गगनगड जकायतच्या ऐवजी वो। राजश्री रघुनाथ भट सावगावकर प्रधान नि।। सस्थान याचे विद्यमानें वर्षासन शारदी नवरात्र उत्साहास नक्त रुपये व सामान नारळ व पाने विडेची व सुपारी व हळद व सोंल येणेंप्रमाणें चालत होतें प्रस्तुत हल्लीमानीमुळें ऐलीकडे येत नाहीं याजवरून आज्ञापत्र सादर होऊन सस्थान नि।। गडी पाठविले आहेत. नवरात्र उत्साह समीप आला आहे. त्यास पूर्ववत नगद रुपये व सामान पाठवून द्यावे. बहुत काय लिहिणें. सुमा सबा तिसैन मया व अलफ जाणिजे. रवाना छ १९ माहे रबिलावल.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९३ श्रीरामवरद १६२० आषाढ शुध्द ९
राजश्री रामाजी पंताजशी हवालदार व कारकून वर्तमान व भावी ता। चीपुलण गोसावी यांसि
अखंडित लक्ष्मी आलंक़ृत राजमान्य
श्नेहांकित माहादाजी बलाल सभासद नामजाद व कारकुन सुभा मामले दाभोल नमस्कार अनुक्रमे आसीर्वाद सुहुरसन तीसा तीसैन अलफ बदल देणे इनामती वेदमूर्ती राजश्री रामजोसी बिन बलाल जोसी गोत्र शाडिल्य सुत्र अस्वलायन वास्तव्य बोरगाव ता। हवेली प्रात मजकूर बा। सनद राजश्री छत्रपती स्वामी राज्याभीशक शक २५ बहुधान्यनाम सवछरे आस्वनि शुध शस्टी भृगुवासर छ ५ माहे रबीलाखर पो। छ १ जमादिलावल तेथे आज्ञा जे वेदमूर्ती बहुत भले थोर विद्यावत आपलि स्नानसध्यादीक सद्कर्माचरण करून आहे ते याणी स्वामीसमीप साताराचे मुकामी येऊन विदित केले की आपणास धर्मादायाची मोईन आहे ते धामधुमीच्या प्रसगाकरिता मोईन प्रमाणे पावत नाही या करिता आपला योगक्षेम चालत नाही तरी स्वामीनी आपणास नुतन इनाम जमीन उतरोतर चालविले पाहिजे ह्मणजे त्याची कीर्दी करून उत्पन होईल ते भक्षुन स्वामीस व स्वामीचे राज्यास कल्याण चितोन आपलि स्नानसध्या करून राहोन ह्मणोन त्यावरून मनास आणीता वेदमूर्ती भले सीस्ट याचे चालविणे हे स्वामीस अगत्य ह्मणोन वेदमूर्ती वरी सतोशी होऊन धर्मादायाची मोईन होती ते दूर करून नुतन इनाम दाभोलि लारि ३०० तीनसे याचा बदल
कीर्दी जमीन बदल मजकुरी पैकी पड जमीन दाभोलि लारि अडी-
लारि पन्नास ५० चसे २५०
→पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
एकून सेते ठिकाणे तीन एकून जमीन पाच बिघे पावणे पाच पांड यासि धारा देखील हकदार पावणे पाच खंडी, चौदा, सेर, रनास वजा माहाली वसूल घेणे हकदारी गल्ला साडेचार मण दोन सेर बाकी गल्ला ४॥ ॥॥४ साडे चार खंडी, सात पायली, रास याची किमती दरखडीस निर्खे लारी १५ पंधराप्रमाणे दाभोळी लारी ६८। सवा अडसस्ट लारीची वृत्ती तर्फ मजकूर पैकी नेमून दिल्ही असे तुह्मी वेदमूर्तीचे स्वाधीन करणे कीर्द करून उपभोग करितील यासी व याचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरा चालवणे नवीन पत्राचा आक्षेप सालदरसाल करीत नव जाणे या पत्राची तालीक घेऊन अस्सल पत्र वेदमूर्तीजवळ परतून भोगवटेयासी देणे छ ७ मोहर(म) मोर्तब सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९२ श्री १६१८ वैशाख वद्य ९
अखंडित लक्षमी आलंकृत राजमान्य राजश्री नारो दामोदर सुभेदार व कारकुन प्रांत जुनर गोसावी यांसि
सेवक शंकराजी नारायण सचीव समस्कार सु॥ सबा तिसैन अलफ राजश्री रामजोशी बोरगावकर याणी हुजुर येऊनु विदित केले की मौजे तोरणे तर्फ वाडे हा गाव आपणास इनाम दिल्हा आहे त्यास कारकून ताजे सनदेचा उजूर करिताती तरी साल मजकुराकारणे ताजा ताकीद रोखा दिल्हा पाहिजे ह्मणवुनु विदित केले तरी पेशजी इनामाची सनद सादर आहे त्या प्रमाणे गाव दुमाले करून इनाम चालवणे दरदर साल ताजे सनदेचा उजूर न करणे, छ २२ जमादिलाखर पा। हुजूर