Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ १८७ ]                                        श्री.                                      १७ जानेवारी १७७४.                                                                                                                                    

राजश्री येशवंतराव शिंदे गोसावी यासीः-
1अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। रघुनाथ बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येतील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष राजश्री सुबराव पंडित अमात्य याजकडील गांव खेड्यास व जिल्हेच्या अमलास खलेल करितां, उपसर्ग देता, ह्मणून हुजूर बोभाट आला. त्याजवरून हें पत्र तुह्मास लिहिलें असे तरी कराराप्रमाणें चालवणें नवीन काडीमात्र उपद्रव न लावणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे छ ४ जिलकाद सु।। अर्बा सबैन मय्या व अलफ बहुत काय लिहिणें.
                                                 लेखनावधि.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति, उपरि-मौजे वाघोली प।। धारूर हा गांव गणपतराव माधव यांजकडे. हालीं राजे तेजवंत यांस जागीर जाला. त्यांजकडून राये लक्ष्मीचंद आले. त्यांणीं ठाण्यास उपद्रव दिल्हा. आणि यास लिं कीं:--- ठाणें खालीं करून देणें, व्यर्थ खर्चाखालीं न येणें. याचा हुजूर जलसा होऊन राजश्री गोविंदराव कृष्ण यांणीं साफ सांगितलें कीं:-- तुम्हीं आपलें ठाणें सुखरूप घेणें. या प्रा लक्ष्मीचंद याणीं पत्र लिहिलें त्याची नकल प॥, त्यावरून ध्यानास येईल, हा मजकूर आनंदराव गणपतराव याजकडील. कोणीं श्रीमंत राजश्री नानास जवाब साफ लिहितो कीं येक दाम न देणें. त्याजवरून आह्मीं, सखो जिवाजी यांचे नांवें पत्र लिहून दिल्हें कीं:-तुमचे खर्चाविसींचा म॥र फखरुदौला यांचें लि। वरून मध्यस्तांनीं आह्मांस सांगितला. त्यास, तुह्मांस खर्चाची जरूर असल्यास जगधन यांचे दुकानींहून वीस हजार रु। खर्चास घ्यावे. त्याचे दुकानावर चिठी दोन लक्ष वीस हजार सातसें नवद रु। पंधरा आणे याची जाली, ती पुण्यास रवाना केली आहे. परभारें तुह्मांकडे येईल. त्या ऐवजांत सदरहू वीस हजार घ्याल ते मुजरा द्यावे ह्मणोन पत्र लिहून जगधन याचे दुकानीं मध्यस्ताचे सांगितल्यावरून दिल्हे आहे. याचा इतला तुह्मास आसावा ह्मणोन लिं आहे. र॥ छ। २९ मोहरम. हे विनंति.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि. तेजसिंगाकडील जागिरीचे माहाल येहतषाम जंगाकडे जाले. येविषिं र। नाना तुम्हासीं बोलले कीं:--- सरकारचा ऐवज खंदारकराकडे येणें. त्या ऐवजीं करडखेल, होकरणें हे माहाल लाऊन दिल्हे असतां दरमियान फौज पाठऊन घेतले. ते समंई हिसेबी ऐवज निघेल त्यास नांदापुर लाऊन देण्याचा करार असतां वलीजंगास नांदापुर देऊं लागले. ते समंई मध्यस्तासी नांदापुर आमचे ऐवजीं केलें। असतां यास कसें देतां ? हें बोलावें कीं नाहीं ? व जंग घराउ पुसों लागले त्यास तुम्हीं नांदापुर कबूल करूं नका असें म्हणावें कीं नाहीं ? हे गोष्ट कसी राहिली ? इत्यादिक तों लिं त्यास करडखेल राज्याजीकडे जागीर होऊन तालुक्याचे दखलास यांजकडील फौज गेली. ते समंई यांचे बोलणें कीं:---खंदारकराकडे येकंदर स्वराज्याचा ऐवज तुमचा येणें, त्या ऐवजीं करडखेल व होकरण्याचा वसूल काय पावला व बाकी काय राहिली याचे हिसेब आणवावे. अजरुये मवाजा हिसेबीं ऐवज निघेल त्यास नांदापुर हा महाल. खंदारकर तेजसिंगाचे जागिरीचा-लाऊन देतां येईल. आमचे म्ह ( ण ) णें कीं----सेवालें हा महाल उमरखेडालगता. तो ऐवजीं लाऊन द्यावा, ऐसें बोलणें. त्याजवर हिसेब येऊन ठराव व्हावा तो काहीच जाला नाहीं. खंदारकराबाबत ऐवजाचा फडच्या करून द्यावा. सेवालें नांदापुर आमचे ऐवजी माहाल, हें हमेषा मध्यस्तासीं बोलण्यांत येतच आहे याचें विस्मरण कसें होईल ? येहतषामजंगास जागीर होण्याचे पूर्वी मध्यस्तासी बोलणें जालें. यांचे म्ह (ण) णें कीं:----तुमचे सरकारचा ऐवज बाकी काय ? याचा हिशेब आणाववा. सेंवाले नांदापुराचाच आग्रह काय आहे. वाजबी बाकी निघेल त्याचा फडच्या तेजसिंगाकडून करउन देउं; आगर नांदापुर लाउन देणें जाल्यास तसे घडेल, हिसेब यावा. ऐवज तादाप काय राहिला ? हें मुख्य यांचे बोलण्यांतील रहस्य. त्यास, हालीं तुम्हीं लिं कीं हिसेबही मागाहून पाठवितों, फार उत्तम आहे. हिसेब पाठउन द्यावे म्हणजे मध्यस्तासीं बोलण्यांत येईल. मध्यस्ताचे म्ह ( ण ) णें:--- सेंवाले नांदापुर हे। सरकारांतच आहेत. जंगांसीं दिल्हे म्हणोन कोठें गेलें नाहींत, तुम्हांस आपले फडच्याची गरज, तालुक्यासी काय कारण ? ऐसें म्ह ( ण ) णें. यास विचार पाहतां माहाल आपले सरकारांत लाउन देणें ते संमंई जंगाकडून देवण्यास काय उशींर आहे ? येहतषामजंग घराउ पुसों लागले ते समंई नांदापुर घेऊं नका ऐसे त्यास म्हणावें कीं नाहीं ? ऐसा लेख. त्यास, आह्मीं जंगास म्हणावें, याणीं महाल टाकावा, मध्यस्तांनीं त्यास विचारावें, तेव्हां आम्हीं सांगितलें हें बोलणें प्राप्त, इत्यादिक लांबचे लांब बखेडा पडतों. आणि जंगास तुम्हीं माहाल हा नका घेऊं म्हंटल्यांत फळही नाहीं. हें बोलणें मध्यस्तासीं त्यांज कडूनच होणें तें व्हावें, याचें त्यांसी हमेषा बोलणें होतच आहे. हिसेब आणवावा ऐसें म्हणतात त्यास हिसेब पाठवावा. त्याप्र।। बोलतां येईल. र॥ छ २९ मोहरम हे विनंति.

श्री.
नकल.
राजश्रिया विराजित राजमान्य र॥
बाजीराव आमील व तिमाराव दे-
शपांडे प।। वसमत स्वामीचें सेवेसीं.

पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति, उपरि. प।। उमरखेड यामाहाला पासोन शाहमिर्जा यांनीं ऐवज घेतला तो नवाबाचे सरकारांतून येणें, त्या ऐवजीं प।।म।।रचे ऐवजीं चाळीस हजार रुपयांची तनखा आमची तुह्मांवर आली त्याचे नवाजपनामें दोन. पैकीं आवल हप्ता माहे र॥ वल आखरचे वायद्याचे रु।। २०,००० वीस हजार. सदरहू वीस हजार रु।। म।। मेहरबान सैद मुजवरखान आमील प।। म।।र दिल्हे ते पावले आहेत. छ ज॥ खरीं सु।। सलास तिसैन मया व आलफ, सन १२०२. बहुत काय लि॥? हे विनंति.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि:-ऐवज क्षेपनिक्षेप पदरीं पडे ऐसीं परभारें आणिक पत्रें जावीं, इकडे पाठवावयाचीं असतींल तें पाठवावीं. याविसीं स्वस्त असों नये. पैक्यास लांबण पडों नये ऐसें व्हावें म्हणोन लि. त्यास तनख्याचे ऐवजाची तपसिलाची याद लिहिलीच आहे, निकी बाकी.
२२० ७९० ॥ निघाली याची चिठी-रोषनराय यांचे मोहरेची, जगधन यांचे दुकानीं इ॥ छ २० जिल्हेज पासोन दोन महिन्यांत द्यावे याप्र।। खचित चिटी-आहे. तथापि तुमचे लिहिल्यावरून मागाहून आणिक ही परभारें ताकीद लिहिविण्यांत येईल. हालीं फखरुदौला नवे सुभेदार यांचे पत्र मध्यस्तास आले कीं:---सखोपंडत-रावपंतप्रधान यांजकडील-तनख्याचे ऐवजाचे वसुलास येथें आहेंत. हे खर्चास मागतात. यांस फार तसदी आहे. दोनदिवस बिलकुल यांस कांहीं मिळालें नाहीं. तिसरें हिवशीं पन्नास बैल गेल्याचे रसदेचे घेऊन नेऊन रोजमरा केला. याजबराबर जमयेतही आहे. त्यास, आज्ञा आल्यास काहीं ऐवज द्यावयास येईल. त्यावरून मध्यस्तांनीं आम्हांसीं सदरहू म।।र केला; आणि बोलले कीं:- तनख्याचें बाकीचे ऐवजाची चिठी जगधन याचे दुकानीं करून दिल्हीं त्यापक्षीं आह्मीं ऐवज कां द्यावा ? आणि ते ग्रहस्त खर्चाविन हैराण आहेत. जर तुम्हीं कांहीं यैवज देत असाल तरी आम्ही जगधन याचे दुकानींहून देवितों; नाहीं तरी जबाब साफ. लिहिलें असे, व रसीदीचीही नकल प।। आहे र॥ छ २९ मोहरम. हे विनंति.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शकें १७१५.

विनंति, उपरि:-तफावत कांहीं ऐवजाची आहे. त्याचे रुजुवातीविषंई हालींच्या सुम्यास नवाजषनामा पाठविला. परंतु आमका ऐवज आमके दिवसांत देणें ऐसें जगधन साहुकार यास पत्र नाहीं. याविषंई दिकत पडेल ह्मणोन लि।।. त्यास, येकंदर, तनख्यांपैकीं एक लाख येकावन हजार दोनसें रु। सवा तेरा आणे १५१२०० ०।।।-। राव पंतप्रधान यांचे सरकारांत वसूल जाहला म्हणोन आहसनुदौला, कृपावंत या उभयतांनीं आपले मोहरेनसीं वसुलाची फर्द पाठविली. परंतु वसुलाप्र॥ रसीदा असाव्या त्या नाहींत. च्यार रसीदा मात्र आल्या. त्या यांणीं दिल्ह्या. यांत १६७९५ ॥ सोळा हजार सातसें पंच्याणव रु।।याची रसीद नाहीं. त्यावरून मध्यस्तासीं आमचें म्ह ( ण ) णें पडलें कीं:----सदरहूची रसीद द्यावी; अथवा रसीद नाहीं तरी ऐवज द्यावा. यांचें ह्मणण्यांत ऐवज पावला आहे. तेव्हां उभयतांनीं आपले मोहरांनसीं दस्ताऐवज पाठविला. आमचे म्ह ( ण ) ण्यांत ऐवज पावला नाहीं. असी दोनच्यार दिवस घिष्ट पिष्ट जाली. तेव्हां मध्यस्त बोलिले कीं:----ऐवज तो पावलाच आहे. नसेल पावल्यास या ऐवजाचा जिमा आहसनुदौला व कृपावंत यांचा. त्यास आमचें ह्म ( ण ) णें :---कृपावंत आटकेंत आहेत. त्याजवरून मध्यस्तांनीं आहसनुदौला यांचे नांवें पत्र करून दिल्हें कीं तुह्मीं येक लाख येकावन हजार सातशें पंच्याणव रू। सवा तेरा आणे याची फर्द मोहरीं लिहून पाठविलीं, त्यांत सोळा हजार सातसें पंचाण्यव रु॥ सवा चौदा आणे कमी येतात, याची रसीद नाहीं, याज करितां रावपंत प्रधान यांचे सरकारचे मुतसदी तकरार करून कबूल करीत नाहींत. त्यास, तुह्मीं ज्यांस सदरहू रु।। दिल्हे असतील त्यांची रुजुवात करून द्यावी. अथवा सदरहू रु॥, जे ऐवज मागावयास येतील, त्यांचे पदरीं घालून रसीद घेउन पाठवावी. मध्यस्ताचें ह्म (ण) णें :---हे रुपये पावलेच आहेत. त्यांत गुंता नाहीं. मगर तुमचा आग्रह कीं रु।। पावले नाहींत. याज करितां हें पत्र दिल्हें आहे. हें पत्र आहसनुदौलास पावतें करून यांचें उत्तर आणवावें ह्मणजे समजेल, त्यावरून हें पत्र घेऊन पाठविलें आहे. आहसनुदोला यांजकडे रवाना करावें. त्यांनीं रुजुवात करून दिलह्यास गुंताच उरकला. रुजुवात न जाल्यास त्यांजपासोन ऐवज घ्यावा. ऐवज न दिल्यास उत्तर लिहून पाठवावें. ह्मणजे यांस कायेल करून, जगधन याचे दुकानची चिठी घेऊन पाठवावयास येईल. सोळा हजार ऐवज द्यावाच असें ठरलें नाहीं. सबब जगधनावर चिठी नाहीं. आहसनुदौला यांस मात्र पत्र कीं ऐवज दिल्हा नसल्यास तुह्मीं देणें, त्यास ऐवज आहसनुदौलाच देतींल. त्यांणीं अनमान केल्यास लवकर लिहिलें यावें. र॥ छ २९ मोहरम हे विनंति.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति, उपरि. प्रथम मध्यस्तास फर्दा दाखविल्या; ते वेळेस यांची उत्तरें काये ? ऎसें आह्मीं पुसिल्यावर मनांत कोंडून कांही गोष्टी बोलिले, त्यांत निश्चयाची गोष्ट ल्याहावया जोगती येकही नाहीं. कांहीं उत्तर करावें म्हणोन कालवाकालव करून बोलिले. सेवटीं बोलिले कीं:-- दोचौ दिवसां याजविषंई तुह्मासीं बोलूं. बलकी मीं येखादें पत्र ल्याहावें असें ठरल्यास लिहून देईन व तुम्हांसही ल्याहावयास सांगेन. त्या प्र॥ लिहून उत्तर आलियावर मग फर्दांचे ठरेल. या बोलण्याचा अर्थ आमचे मनांत आला जेः----फर्दांचा मजकूर ज्यांस लिहिला तिकडून उत्तर आलियावर निश्चय बोलणें तो बोलावा. तों परियेंत कांहीं दिवस काळहरण करावें, याजवरही यांची उत्तराविसीं निकडच लागल्यास कांहीं येक उत्तर पर्याय लाऊन द्यावें म्हणजे च्यार दिवस काळहरण जाहलें, आशा लागली, तिकडील उत्तर आलियावर बोलणें तें बोलावें. असा बेत ठरला आहे. यास दुसरें प्रदर्शन:-बाबाराव यांचा निरोप आला. त्यांत ग्रहणाचे संधीचें निमित्य आणि मध्यस्त पाठ सांगतील त्या धोरणानें आम्हासीं बोलतील असें वाटतें. त्यास, आज उद्यां दोन दिवस ग्रहणाचे गेले म्हणजे आम्हीं मध्यस्तासीं जाऊन बोलतों म्हणजे काय ते समजेल. त्यासारखें लिहिण्यांत येईल. र॥ छ २९ मोहरम हे विनंति.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि:-बाबाराव यांजकडे कोनेरपंत बोलविण्याकरितां गेले होते. त्यांजपासीं बोलिलें कीं:- आह्मीं येऊन काये करावें ? करावयाचें-हीं मोठीं मोठीं कामें ! यांचे उलगडे होणें संकट; तेव्हां आह्मीं काये करावयाचें ? याजवर हरराव बोलिलें कीं:-- नानाचा कारभार फार वोढक, तेव्हां फडचे कसे होतात ? याचें उत्तर बावाराव यांनीं त्यांस केलें कीं:---- ग्रहस्त वोढकपणास काये कमी आहेत ? कीं त्यांचा दोष तुह्मीं काढतां ? याप्र।। परस्परें आपल्यांत बोलत होते. र॥ छ २९ मोहरम. हे विनंति.

श्री.
भाद्रपद शु. १ शुक्रवार शके १७१५.

विनंति, उपरि:- र। बाबाराव यांजकडे कोनेर बाबुराव यांज बरोबर सांगून पाठविलें कीं जुजयातीच्या फर्दा सरकारच्या आल्या ह्मणजे आह्मांस कळवावें, ऐसें तुमचे बोलण्यांत पेशजी होतें. त्यास, हालीं फर्दा पाहव्या, नंतर तुमचे आमचे विच्यारें मध्यस्तांसी म॥र व्हावा. त्यास प्रथम बाबाराव बोलले कीं मला दुखण्यामुळें सामर्थ्य येण्याचें नाहीं. कसें करावें ? तेव्हां कोनेरपंत त्यांसी बोललें कीं तुमच्या बोलण्यांत आले होतें याजकरितां बापूंनीं मला तुह्माकडे प॥ आहे. त्यास येवत नाहीं असें ह्मणूं नये, पालखींत बसून यावें; बहुत बसवेना तर तेथेंच आमळसें लवावें, घर आहें; चिंता नाहीं. याजवर बोलिंलें कीं:- मध्यस्ताचे परवानगी वेगळ येतां नये, कसें करावें ? त्यास उदईक मी सांगून पाठवितों, नंतर येईन. याप्रमाणें निरोप आला. मध्यस्तास पुसल्यासिवाये येत नाहींत ऐसें समजलें. तेव्हां आपणही मध्यस्ताकडे याचा इतला कां न सांगून पाठवावा ? ह्मणोन मध्यस्ताकडे आह्मीं सांगून प। कीं:- फर्दा आल्यानंतर आह्मांस कळवाव्या ह्मणोन पहिलें बाबाराव आह्मांसीं बो ( ल ) ले होते, त्यावरून आह्मीं त्यांजकडे सांगून पाठविलें कीं फर्दा आल्या आहेत. तुह्मीं येऊन पाहाव्या. याजवरून मध्यस्त बोलिले जे:-बाबाराव यांनीं काल हा मजकूर लिहून पाठविला नंतर कांहीं बोलावयाचें आहे, असें लिहिलें होतें. त्यास आज दोन प्रहरीं मीं त्यास बोलावलें आहे. त्याचें बोलणं ऐकून घेऊन आपल्याकडे जावें ह्मणोन सांगतों. याप्र। मध्यस्ताचे बोलण्याचा मार. त्यानंतर दुसरे दिवसीं बाबाराव यांचा निरोप आला कीं:---परवानगी आली. आज अमावास्येची संधि, उदईक ग्रहण, परवां कर; याजकरितां द्वितीयेस येतों. त्यास, ते आल्यावर त्यांजला फर्दा दाखऊन मध्यस्तासीं कसें बोलणें होईल तें लिहून पाठऊं, र। छ २९ मोहरम हे विनंति.

[ १८६ ]                                        श्री.                                      १७ जानेवारी १७७४.                                                                                                                                    

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री आपाजी शामराव गोसावी यासीः -
सेवक रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार सु।। अर्वा सबैन मया व अलफ राजश्री सुबराव पंडित अमात्य यांच्या गांवास घासदाण्याचा उपसर्ग करितां ह्मणून हुजूर विदित जालें त्याजवरून हे पत्र तुह्मांस सादर केलें असे तरी पंडित मशारनिलेंकडील गाव खेड्यास उपसर्ग न करणें कराराप्रमाणे चालविणे नवीन काडीमात्र उपद्रव न करणें. फिरोन बोभाट येऊं न देणें जाणिजे छ ४ जिल्काद आज्ञा प्रमाण.
                                                                                                            लेखनावधि.