लेखांक २११ १५९६ आषाढ वद्य ४
अज रखतखाने खुदायवंद मा। सर्क मा। रेहान खुली दाईमदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानी ता। करकंब बिदानंद सु॥ खमस सबैन व अलफ नरसीहभट बिन नारायणभट सा। पंढरपूर हुजूर मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर सवा १। मौजे गुलसरे ता। मा। प्रज तुकोजी करव्या बा। फर्मान व भोगवटा मुकासाइयानी सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती चालिले आहे फर्मान व भोगवटा + + + कागद होते ते जळाले व आपण दुकळामधे कासीस गेलो होतो त्याकरिता तसरुफाती अजी तागाईत नाही हाली आपण कासीहून आलो तरी खैर साहेबाची आहे साहेबी मेहेरबान होउनु सदरहू इनामाचे बाबे हुकूम फर्माविले पाहिजे की सदरहू इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले करणे दरम्यान भट मा। कासीम गेला होता याकरिता भोगवटा तुटला त्याची इस्कील न कीजे व फर्मान व भोगवटीयाचे कागद जलाले त्याचा उजूर न कीजे ऐसा हुकूम केला पाहिजे ह्मणौउनु मालूम केले तरी भटमजकुरास सदरहू इनाम जमीन चावर सवा १। दर सवाद मौजे गुलसरे ता। मा। प्रज तुकोजी करव्या बा। फर्मान व भोगवटे मुकासाइयानि कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असेल तेणेबरहुकुम गावी पटेलास व मोखतसर कुणबीयास व गावीचे बुढे बुढे कुणबीयास पुसौनु गहदम चालिले ऐसे कुणबी सागतील तरी सदरहू इनाम दुमाले कीजे दरम्यान भटमजकूर कासीस गेला होता त्याकरिता भोगवटा तुटला त्याची इस्कील न कीजे व फर्मान व भोगवटियाचे कागद जलाले त्याचा उजूर न कीजे दर हर साला खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक घेउनु असेली फिराउनु दीजे कदीम इनामती तजकरा रुजु पाहोन गावीचे मोकदम व कुलकर्णीयासि बरवे रीति पुसोन इनामाची जमीन पाहोन येणेप्रमाणे खूब मनास आणून पेसजी कारकीर्दी मलीक अंबर चालिले असेली तेणेप्रमाणे चालवणे मोर्तब सूद
रुजु सुरु
निवीस
तेरीख १७ माहे रबिलाखर
रबिलाखर