Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०२ श्री १६८२ भाद्रपद वद्य ९
चिरंजीव राजमान्य राजश्री सदाशिव चिमणाजी यासि बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेले पाहिजे विशेष वो। राजश्री गोविंद जोशी बोरगावकर याणी हुजूर येऊन विदीत केले की मौजे गधारे ता। अंबरनाथ हा गाव निमे व मौजे गोवेली ता। बरे प्रात कल्याण पौ। जमीन बिघे ५ पाच येणेप्रमाणे जविधनकर मोगल याणी आपणास इनाम दिल्हा त्यास, जीवधनकराकडील जागीर सरकारात जपत जाहाली होती, तेव्हा सरकारचे पत्र सुदामतप्रमाणे चालवणे ह्मणोन कल्याणास सादर जाहाले त्याजवर सरकारातून जागीर जीवनधनकराकडे दिल्ही मोगलाने सुदामतप्रमाणे चालविले फिरोन जीवधनकिल्ला व जागीर सरकारात घेतली, तेव्हा सन समानामध्ये सुभाहून मागील कागदपत्र भोगवटा पाहून एकसाल चालविले त्याउपरि सन तिसापासून वसुलाचा तगादा चालविला आहे इ इ रा। छ २३ सफर, सु॥ इहिदे सितैन मया अलफ बहुत काय लिहिणे ? हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०१ श्री १६७५ कार्तिक शुध्द १
वेदमूर्ती राजश्री गोविंद जोशी बीन रामजोशी बोरगांवकर गोत्र शांडिल्य सूत्र आश्वलायन वास्तव्य को। कल्याण गोसावी यांसि:-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सुहुरसन अर्बा खमसैन मया व अलफ तुह्मी हुजूर को। पुण्याचे मुकामी येऊन विनंति केली की आपणास अंगारकाने१ जमीन इनाम दिल्ही आहे गावगना बीघे
६ मौजे बार्हावे ता। अंबरनाथ प्रांत कल्याण येथे राजश्री मानाजी
आंगरे वजारतमाब याणी करार करून दिल्ही बीघे५ मौजे गोवेली ता। बार्हेटीवोले प्रांत भिवंडी येथें कैलासवासी सेखोजी
आंगरे याणी करार करून दिल्ही बीघे
-------११
एकूण अकरा बीघे जमीन इनाम करार करून देऊन पत्रे करून दिल्ही आहेत. सांप्रती अंगारकाकडील मुलूक सरकारांत आला आहे. तरी स्वामीनी अंगारकाच्या पत्राप्रमाणें चालवावें इ. इ. इ. छ ९ मोहरम. आज्ञाप्रमाण
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०० श्री १६५५ कार्तिक शुध्द २
मा। देशमुख व देशपांडे व समस्त जमीदार तर्फ पाल प्रांत चेऊल यांसि
बाजीराऊ बलाल प्रधान सुहुरसन अर्बा सलासीन मया अलफ राजश्री बाळाजी माहादेऊ व राजश्री कृष्णराऊ माहादेऊ व राजश्री रामचंद्र माहादेऊ याचे पुत्र नारो रामचंद्र जोशी शांडिल गोत्री याचे पिते माहादाजी कृष्ण यासि रा। शंकराजी पंडित सचिव याणी चदीस वेढा पडिला होता त्या समई फौजा देऊन पाटविले कष्टमशागत बहुत केली याजकरिता चंदीचे मुकामी मौजे खवली तर्फ मजकूर हा गाव पुत्रपौत्री जलतरुपाषाणसहित इनाम दिल्हा आणि पत्रे सादर केली त्यास, आजिपर्यंत मौजे खवली मशारनिलेकडे कुलबाब कुलकानू ऐवज पावत आहे तेथे खलेल करावे ऐसे नाही शामळ व सरखेल याचा गाव यासि सुरक्षित चालवितात, वसूलसारा गावचा याजकडे पावत आहे त्याप्रमाणे याजकडे पावेल तुह्मी त्या गावास वसुलाविसी अथवा वेठबेगारीकरिता उपद्रव न लावणे पुढे मशारनिलेस मौजेमजकूर सुरळित चालवणे दुसरा कोण्ही उपद्रव देईल त्यास ताकीद करीत जाणे सालदरसाल ताज्या सदेचा उजूर न करणे जाणिजे छ ३० जमादिलावल पा। हुजूर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
सनद बमोहर वजारतपन्हा महमद बकर दीवान मुतसद्दीयान मोहिमात हाल व इस्तकबाल सरदेसमुखान व अदीकारियान व देसपांडियान का। कल्याण प्रा। मुरजन सरकार तलकोकन निजामन्मुलकी मुजाख सुभे खोजिस्तेबुनियाद जनार्जन व गणेश सा। का। कल्याण बअदालत अलिया बहजूर शाहमत बशरत मर्तबत मातबरखान आमदे बवे वतन पटवारगिरी का। मा। नमूदे देशपांडिया प्रा। मजकूर अज राये तमुरदी व ताजदी माया राहे दखल शाखतारा खुद मुतसरीफा चू ई मुकदमा अज जमीदारा रयाया का। मा। तहकीक नमूदे इस्तीहसाग गर्दीद जमे का। मा। ईजदर नमूद की गोविंद देसपाडिया अज कदीम आयाम व अज आदा व अज बमुतसरीफा पाडगिरी का। मा। चीनाची सर आ मुफसल दर जीमे तहरीर या फाता लेहज्या कलमी मेगरदीद गोविंद देसपांड्या पांडे का। मा। दानिस्तां सिरस्ते कागद प्रा। मा। व का। मा। मेगिरीफाते दासद व कसबे रास रीला व सामील वोनसी नासन दरीबाब कदगणे तमाम दानद --------------------------------- सरे नीम जनार्जन वगैरे दरवजा बमोहर वजारतपन्हा हाजी सफीखान मरहूम व धरमगदास मुतफा बदफतर दीवानी रुजू नमूदे बूदन अजाहम खिजमतनिवीसीदगिरी मोहतर्फा व जराये बअमलहुकाम साबक इसबत गरदीदे पांडेगिरी का। मा। तालूक निसबत व दारद फारिस्ते जमीदारा अज दफ्तर दीवानीयानी हजूर रसीद बूद मुलाहिजा नमूदे इस्म बालाजी वलद आऊजी मुतजमीन अमल पांडेगिरी का। मा। दर आमदे गोविंद देसपांड्या अज जाब मुतसरीफ कदमस्त सन ३९
याखेरीज साक्ष मनास आणिता बीतपसील → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सदरर्हूप्रमाणे पचाइतानी हरदूजनाच्या सनदापत्रा व साक्षे मनासी आणिल्या त्याजवरी रूबरू महमुदजी अल्लीजी चोधरी प्रा। कल्याणभिवंडी यासि सत्य घालून हकीकत पुसली की, कोन्हाची रूरयात न करिता वाजवी असे ते हकीकत सांगणे त्यावरून मानिलेनी सत्य स्मरोन सांगितले की, निलाजी साबाजी याचे वडिलापासोन आजपावेतो कसबियाचे कुलकरण चालवीत आले आहेत, दुसरा कुलकर्णी आपण जाणत नाही, रामाजी आत्माजी याचे वडील पेसजी निसिदे सरकारतर्फाने होते, त्यानी सरकारातून मुशाहिरा घ्यावा आणि चाकरी करावी, दरीब्याचे लिहिणे ल्याहावे, याप्रमाणे पेसजी चालत होते, आपणास ठावके आहे तैसे च, तुकोजी लंकटराऊ अदीकारी ता। वाजे यासी हकीकत पुसिली त्यानी हि आपले सत्य स्मरोन सांगितले की, निलाजीचे वडील कसबियाचे कुलकर्णी हे आपण जाणतो, पेसजी मातबरखान फौजदार व महमद बकर दीवान याचे अमलामधें जनाजीप्रभु व गणेशप्रभु रामाजीचा वडील याणी येऊन कजिया केला होता, त्याची हकीकत जे आपणास ठावकी होती ते जाहीर केली आहे, हाली पुसिले तर निलाजीचे वडील कुलकर्णी, याशिवाय कुलकर्णी दुसरा आपण जानत नाही येणेप्रमाणे च समस्त रयेत का। मा। यासी शपत की, हिंदुधर्म असेल त्यास श्रीज्ञानदेवीची (शपत) देऊन व मुसुलमानास, कुरानाची सपत्य देऊन पुसिले, त्यास, समस्तानी आपलाले सत्य स्मरोन सांगितले की, निलाजीचे वडिलासिवाय दुसरा कुलकर्णी कसबियास आपण जानत नाही त्यावरून रामाजी वगैरे कुलकर्णी नाही, हे सर्वाचे मते जाले कुलकर्णासी यासी संबंध नाही नीलाजी साबाजी याचे गोहीसाक्षे व सनदपत्रा व भोगवटा व हकलाजिमा कुलारगवार व शिलोतर पाडा नानूचा रकम ढेप मुडे ३ तीन व तळे राहाटई व आबेराई व ताडे व तेल व पाने व सेव व सबाजी हे सर्व रुजू आले त्यावरून, निलाजी साबाजी वगैरे कसबियाचे कुलकर्णी हे खरे जाले यासी बिलाहरकत करील तो दीवानचा गुन्हागार हा महजर लिहिला सही बतेरीख छ ६ माहे मजकूर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
येणेप्रमाणे सनदा आहेत त्यास, सनदामधील तपसिल आहे की, कुलकर्णासी तालूक नाही, निविसिदे खरे, हक रयेतनिसबत देविला होता ह्मणोन सनद जाली, त्यास, तहकीकात करिता तो हि हक रयेतनिसबतीचा भोगवटा चालला नाही. → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सदर्हू रामाजीच्या सनदा व शाहिदी पंचाइतामधे मनास आणिता, रास्ती इनसाफे पहाता, रामाजीचे वडील कुलकर्णी रुजू होत नाही, सरकारतर्फाने निसिदे पेसजी दरबीयाचे कामकाज चालवीत होते, यामुळे कुलकर्णासी दावा करू लागला, त्यास पंचाइतीचे मते व सनदापत्राशाहिदी मनास आणिता, कुलकर्णासी व रामाजीची निसबत नाही, कसबेमजकूरचे कुलकर्ण निलाजीचे वडीलपासोन निलाजीचे ऐसे खरे जाले, रामाजीसी व कसबियाचे कुलकर्णासी निसबत नाही याउपरि निलाजीस पंचाइतानी सांगितले की, तुह्मी आपलया सनदा व साक्षे आणून रुजू करणे त्यावरून निलाजी देसपांडिये यानी जाहीर केले की, पूर्वी रामाजीचे वडिल जनाजी एसप्रभु व गणेश प्रयाग यानी शहामतव बसालत मर्तबतखानवालाशान नवाब मातबरखान याजवळ कुलकर्णासाठी फिर्याद जाले होते, ते समयीचे साक्षीपैकी हजीरमज्यालस तुकोजी लंकटराव अदकारी ता। वाजे व गोविंदना। बुरकुले बजान का। मा। यास बोलावून हकीकत मनास आणणे त्यावरून, त्यास बोलावून पंचाइतानी पुरसीस केली त्यावरून -
तुकोजी लंकटराव यानी व गोदवाना। बुरकुले यानी हकीकत सांगितली की, जनाजी एसप्रभु व गणेश प्रयाग याही नबाब मातबरखान याजवळ नवाब फिर्याद केली होती, तेव्हा जमीदार व रयत हालीमवाली मातबरपोख्ते जमा करून तहकीक केले, ते समयी जनाजी व गणेश प्रभु पूर्वी निसिदे होते, निलाजी देसपांडे याचे वडील कुलकर्णी का। मा। ऐसे खरे जाले त्याजवरून सनद वजारतपन्हा महमद बकर दीवान यानी गोविंद बलाल देसपांडे कसबियाचे कुलकर्णी खरे करून सनद दिधली रामाजीचे वडिल पूर्वी निसिदे दीवानतर्फाचे होते ऐसे खरे जाले, कुलकर्णासी निसबत नाही. त्याजवर वंजारतपन्हाची सनद पंचाइतीमधे आणविली त्याची नकल बजिन्नस येणेप्रमाणे -
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
(३)
(१५९३ पौष)
अज माहाल ठाणे कसबे कल्याण व ता। अंबरनाथ मा। मुरजन बज्यानेबू त्रिंबकजी राजे पाटल देसमुख व अदीकारी का। कल्याण व ता। अंबरनाथ व देसपांडिये मामले मजकूर व सेटियानी व महाजनानी व मीठपावगीयानी व ताफेखुमानी व जरीबदारानी व जीरातियानी व रयानी कसबे कल्याण सु॥ इसन्ने सबैन अलफ सुभाहून खुदखत छ ११ साबान पौ। छ १४ मिनहू सादर जालें तेथे रजा जे हजरून राजश्री पंतपेशवे व राजश्री पंत मजूमदार याचे खुर्दखत छ २४ रजब पौ। छ ५ साबान सादर जाले तेथे रजा त्रिंबकजी नरसप्रभु येऊन सांगितले की, आपली मिरास कसबे कल्याणीचा हुदा निसीदगिरी व कुलकर्ण दीवानातून मुशारा दरमहा कथली टके १० व कागद बाब टका १ एकून टके ११ सरकारी खर्च घालून देत व आपले हाते काम घेत होते, सालाबाद मदातकदम चालत आले आहे, मोगलाचे कारकीर्दीस पेसजी राजश्री साहेबाचे कारकीर्दी मोरोपंत आबाजी माहादेऊ सुभेदार असता हि चालिले आहे, यावर मोगलाई अमलमधे देसमुख व देसपाडिये यानी कुसूर करून आपणासी दखल होऊ दीधले नाही, मोगलानी चिटनीवीस व नाईकवाडी याचा मुशाहिरा सरकारपैकी खर्च पडत होता तो रयेतनिसबत लावून आदा करून त्यापासून चाकरी घेतली, आपला सरजाम सदर्हू कुसुराकरिता होऊन आला नाही दरीबाब राजश्री साहेबाची ताकीद रोखा मोरोपंत नारोजी भिकाजी सुभेदार सरदेसमुखी व देसमुखी व देसपांडेई यासी घेऊन गेला, आमा माईलेने हि सरंजाम केला नाही, हाली माहाल साहेबास अर्जानी आहे, चिटनीस व नाईकवाडी निसबती आपला विसरजाम करून आपली मिरास सालाबादप्रमाणे चालती केली पाहिजे ह्मणोन कसबेचे कुलकर्ण व हुदेनिविसिदगी त्रिंबकजी नरसप्रभूची मिरास सालाबाद महतकदम पिढीदरपिढी चालत आली असता, देसपांडिये दखल होऊन कसबेचे कुलकर्ण न चालवावयास काय गरज आहे ? ताकीद करून हाल खुद ठेवणे आणि सालाबादप्रमाणे वर्तवणे त्रिंबकजी नरसप्रभूची मिरास सालाबादप्रमाणे चालत आली तेणेप्रमाणे मोगलाचा अंमल व पेसजी राजश्री साहेबास माहाल अर्जानी जाला असता, कसबेमजकूर मोरोपत आबाजी माहादेऊ सुभेदार चालविले असेल ते च मुदतीस चिटनिवीस व नाईकवाडी याचे हि जैसे चालिले असेल त्याचे व हालीचे रवेसीने तहकीकात चालवीत असाल ते च रवेसीने त्रिबके नरसप्रभूची मिरास चालवणे कुसूर कोण्हास करू न देणे गई न करणे ह्मणोन रजा सादर जाली आहे ह्मणोन तुह्मास व रयेतीस बोलावून हकीकत मनास आणिता तुह्मी सांगितले की, कसबेचे कुलकर्ण त्रिबकजीप्रभूचे नाही, पेसजी निसीदगी सरकारातून मुशाहिरा देऊन चालवीत असत ह्मणोन हकीकत सांगितली ऐशियास, हुजरून खुदखत सादर जाले आहे की, हाली चिटनिवीस व नाईकवाडी याचे जे रवेसीने चालत असेल ते रवेसीने त्रिंबक नरसप्रभूचे चालवणे ह्मणोन खुदखत सादर जाले आहे तर, त्रिंबक नरसप्रभु याचे हवाले का। मा।रचे निविसीदगी केली आहे यासि मुशाहिरा जे रवेसीने चिटनिवीस व नाईकवाडी पावतात ते च रवेसीने सदर्हू दरमाहे देखील कागदबाब अकरा टके प्रा। सालाची बेरीज होईल ते रयेतनिसबत वाटणी करून घेऊन आदा करणे तालीक घेऊन अस्सली फिरावून देणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
(२)
(१५९० माघ शुध्द ४)
मशरुल अनाम देसमुख व देसपांडे मामले कल्याण व रयान कसबे मामले मजकूर प्रती राजश्री शिवाजी राजे सा। सितैन अलफ, त्रिंबक नरसप्रभु हुजूर येऊन मालुम केले की, कसबे मामले मजकूरचे कुलकर्ण व हुदेदारी आपली मिरास सालाबाद मादात कदम चालिले असता हाली मोगालाचे कमाविसीमधे कसूर करून चालो देत नाहीं, बाजे समिरासदार चिटणीस व नाईकवाडी आहेत त्याचा हकमुशाहिरा पेसजी सरकारात होता, हाली रयतेनिसबतीने लाविला आहे, आणि त्याचे चालवितात, आपला मुशाहिरा हुदेदारीचा दरमाहे कथली टके १० व कागद बाब दरमाहे टका १ एक पेसजी सरकारात खर्च पडत होता, हाली बाजे मिरासदाराप्रमाणे रयेतनि सबब लावून आपले चालवीत नाही ह्मणून मालूम केले तरी बाजे मिरासदाराचे चालवावे आणि यासि कुसूर करून न चालवावे यास काय गरज आहे ? इतकियाउपरि यासि कुसूर न करणे जेणेप्रमाणे चिटणी व नाईकवाडी याचा हक रयेतनिसबत लावून त्याचे चालवीत आहा तेणेप्रमाणे त्रिंबकजी प्रभूचा हुदेदारीचा मुशाहिरा रयेतनिसबत लावून हुदेदारी कसबे मामलेमजकूर सालाबाद मादात कदमप्रमाणे चालवणे दुसरियाने फिरयादी येऊ न देणे छ २ रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
सदरर्हू सनदा पंचाइतानी मनास आणिल्या त्यास, त्रिंबक नरसप्रभु औरंगाबादेस जाऊन खिलाफ मालुमात करून वजारतपन्हा बाजीसफीखान याची सनद धरमगदास दीवान यास घेऊन आला त्यास, धरमगदास दीवान यानी त्रिंबक नरस प्रभु यास सनद दिल्ही त्यात पटवारी अगर कुलकर्णी ऐसे नाही कदम चालत आले आहे तेन्हेप्रमाणे चालवणे, त्यास नविसीदगिरी व हुदेदारी सरकारातून मुशारा घेऊन दीवान तर्फेने चाकरी करावी, ऐसे होते ते पचाइताच्या मते तहकीक जाले की त्रिबक नरस प्रभु नविसीदे व हुदेदार सरकारतर्फेचा नवकर होता, कुलकर्णासी तालूक नाही दीवानतर्फेचा चाकर अजीसबब त्यास ताकीद की दामदीरम सरकारचा तफावत न करणे जमीदार असता, तर ऐसी सनद हासील न होती ऐसा पंचाइताचे मते निवाडा जाला
राजपत्रे २ दोन बित्तपसील
(१)
(१५९० माघ शु॥ ४)
मसरुल अनाम राजश्री नारो भिकाजी सुभेदार व कारकून सरदेसमुखी सरकार महालहाय तलकोकन प्रती राजश्री शिवाजी राजे सु॥ तिसा सितैन अलफ त्रिंबकजी नरस प्रभु हुजूर येऊन मालूम केले की, कसबे कल्याणजे कुलकर्ण व हुदेदारी आपली मिरास सालाबाद माहात कदम कारकीर्दी मलिकबर बाजे कारकीर्दी दर कारकीर्दी चालत आले असे, हाली मोगलाचे कमाविसीमधे देसमुख व देसपाडियानी कुसूर करून चालो देत नाहीं चिटणीस व नाईकवाडी यांचा मुशारा सरकारी पोते खर्च पडत होता तो हाली मिरासदारानी रयतेनिसबत लावून त्याचे चालवितात, आणि आपणास हुदेदारीचा मुशारा दरमाहे टके १० व कागदबाब दरमाहे टका १ एकून टके ११ होते हे चालवीत नाही, तर आपला हि मुशारा सदरर्हू रयतेनिसबतीने लावून चालवीत व कुलकर्ण हि बिलाकुसूर चालवीत ऐसे केले पाहिजे ह्मणून मालूम केले, तर बाजे मिरासदाराच्या मिरासीच्या मिरासी चालवावया आणि यासी कुसूर करावया काय गरज आहे ? हाली तुह्मी देसमुखदेसपाडियासी ताकीद करून त्रिंबक प्रभु मजकूराचे कुलकर्ण व हुदेदारी सालाबादप्रमाणे हुदेदारीचा मुशारा बाजे मिरासप्रमाणें रयतेनि सबतीने देत ते करणे बोभाट येऊ न देणे छ २ रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
त्याजवर शाहमत व बसालत मर्तबत नवाब मातबरखान व वजारतपन्हा महमद बकर दीवान याचे अमलास रामाजी याचा अजा जनाजी येस प्रभु व गणेश प्रयाग हरदूजनानी फिर्याद केली की कसबेकुलर्ण वतन आपले आहे, त्यावरून नवाबाही जमीदार हालीमवाली व रयत मातबर पोख्ती आसामिया जमा करून रास्ती इनसाफ केला, तेव्हा जनाजी प्रभु व गणेश प्रभु याचे वडील निसीदे होते त्यास सरकारातून मुशाहिरा पावत असे, यांस कुलकर्णासी समध नाही, ऐसे खरे जाले, मग आपले आजे गोविंद बलाल यासि सनद कुलकर्णाची द्यावयास महमद बकर दीवान यास सागोन पाठविले, त्यास दिवानमशारनिले एही सागितले की आपण आपले रूबरू इनसाफ पाहोन सनद करून देऊ, त्याजवरून जमीदार व रयत मातबर व पोख्ती आनून इनसाफ केला, तेव्हा गोहीसाक्षे भोगवटा व सनद मनास आणिता जनाजी प्रभु व गणेश प्रभु यासी कुलकर्णासी तालूक नाहीं, आपले आजे गोविंद बलाल कुलकर्णी ऐसे खरे जाले, त्यावरून दिवानमशारनिले याही करून दिधली, ते सनद बजिनस आहे, व ते समयीचे शाहीद मनसुफीत होते त्याची नावे बितपशील -
प्रयागजी दिनकरराऊ अदीकारी ता। वनखल
भानजी मुरार अदीकारी ता। सोनवल
संभाजी येवतराऊ अदीकारी ता। गोरट
रायाजी भालेराऊ अदीकारी ता। राहूर
गोविंदनाईक बुरकूले बजान का। मा।
१
येणेप्रमाणें होते यासि ठाऊक आहे यापूर्वी त्याचा आपला वतनामुळे कथला जाला नाही आपण आपले वतन कुलकर्णपण हा कालपावेतो करीत आले आहे साहेबी रास्ती इनसाफ केला पाहिजे
हरदूजणी आपली हकीकत होती ते सांगितली
याची तहकीकात केली बितपशील -
रायाजी अप्पाजी व नारो भगवान व नारो गणेश यांच्या सनदा व शाहीद यास पुरसीस केली → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९९ १६५३ आश्विन वद्य १४
१महजर बतरीक सुरत मजलस बहदूर श्रीमंत माहाराज कृष्णराव मा। महमुदजी अल्लीजी व इमाम बक्ष वा। मियाजी चोधरी, प्रांत कल्याणभिवंडी, सरकार तलकोकन, निजामनमुलकी सुभे खोजिस्तेबुनियाद, व विठोजी देसमुख प्रगणे मुरजन व आदीकारी ता। अंबरनाथ वगैरे व बाजे हाली व मवाली रयानी कसबे कल्याण, सुहुरसन इसने सलासीन मया अलफ, सन जलुसी १३, मुताबीक सन हिजरी सन हजार ११४४, बतारीख छ २७ माहे रबिलाखर निलाजी साबाजी व बालाजी तिमाजी बिरादर निलाजी मजकूर व गणेश सुंदर देसपांडे मामले मुरजन व कुलकर्णी कसबे कल्याण व पेठ नवेनगर याजवर रामाजी आत्माजी व नारो भगवान व नारो गणेश प्रभु गुप्ते साखीन कसबे कल्याण, हे राजश्री पंतस्वामी याजकडे जाऊन फिर्याद जाला की, कसबेमजकूरचे कुलकर्ण आपले आहे, दर्म्यान देसपांडे मजकूर आपणास दखल होऊ देत नाही, आपण वतन खातात तर साहेबी इनसाफ करून आपले वतन आपणास देविले पाहिजे याजवर, राजश्री पंतमशारनिले स्वामी याही निलाजी देसपांडे प्रगणे मजकूर यासी बोलाऊन कसबेमजकूरचे कुलकर्णाची हकीकत पुरसीस केली त्याजवर, देसपांडेमजकूर, याणी हकीकत जाहीर केली की, रामाजी मजकुरासी वतनासी तालूक नाही, साहेबी इनसाफ केला पाहिजे त्याजवर, हरदौजनाची हकीकत व सनदा मनास आनून हरदौजनाचे मुचलके व जामीनी घेऊन पंचाइतावर इनसाफ सोपिला त्यास संमत देऊन आज्ञा केली की, रास्ती इनसाफ करणे ऐसीयासी, पंचाइनाती हरदूजनास आज्ञा केली की, साक्षे व सनदा घेऊन येणे, त्यास, प्रथम अग्रवादी राजाजी आत्माजी व नारो गणेश व नारो भगवान यासि हकीकत पुसिली त्याही जाहीर केले की, आपण कसबे-कुलकर्णी, तरनिसीदे, तरहुदेदार, तरकारकीर्दी मलिकंबर ता। अमल माहाराज छत्रपति, आपले वडिलाही अमल केला आहे, आपल्या वडिलाखेरीज कसबेमजकूरचा अमल दुसरियाने केला नाही, अलीकडे मोगलाईपासोन वर्षे ४३४४ त्रेताळीस चवेताळीस पावेतो भोगवटा जाला नाहीं, पूर्वीच्या आपणाजवळ सनदा असनात आहेत, व आपले वडिलाचा भोगवटा हि आहे, त्याचे गोहीसाक्षे आहेत, रुजू करून देऊ, ह्मनून रामाजीमजकुरानी जाहीर केले याजवर, निलाजी देसपाडे यास बोलाऊन पुरसीस केली की, तुमचे वतनाची हकीकत करारवाके असेल ते जाहीर करणे त्यावरोन निलाजीमजकूर याही आपली हकीकत जाहीर केली की, कसबेकुलकर्ण कदीम आपले वतन आहे, वडिलवडिलापासोन आपला भोगवटा आजपर्यंत चालत आला आहे, कसबेमजकूरची रयत ताएफेदर आहे त्यास आणून तहकीक करावे, पूर्वी महाराज छत्रपति स्वामी याचे अमला अगोदर मोगलाई अमल होता तेव्हा कसबेमजकुरी मोहतर्फीयाचे दरीबे होते, त्याजवर इनामदार काजी व मुफती व खतीब व मुल्लाफकीर फुकरा वगैरे त्यास रोजबरोज देणे असे, त्यास ज्याचा हक्क त्यास पोहचला पाहिजे, याजकरिता रामाजी आत्माजी याचा वडील निसीब ठेविला, त्याणे सरकारातून मुशाहिरा घेऊन दरीबीयाचा वसूल कुलकर्णीयाचे मारुफातीने करून रोजदारास पोहचवावा,