लेखांक २०९ १५७१ मार्गशीर्ष शुध्द १४
अज रखतखाने खुदायवंद मा। शर्जामलीक रेहान खुली दयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व देसमुखानि करकब बिदानंद सु॥ खमसैन अलफ नरसींहभट बिन नारायणभट सो। पढरपूर हुजूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १। सवा प्रज तुकोजी करप्या दर सवाद मौजे गुलसरे ता। मा। देखील महसूल व नखतयाती व जमे लाजिमात व वेठी बेगारी व फर्मासी व जर बेलेकटी व पायपोसी व मेजवानी व सेल बैल व जगमपटी व पेसकसी व पटी सिके हुमायुन व कार ई सुभराती व बाजे नियत मुबारके व मुतबरके मअदनल अमज मबाअज सुरु व बाज कुलबाब कुल उजहती व सारे कानुनाती इस्मे व रस्मे + + व कदमे नखती व जिनसी जे काही हाली आहेती व पेस्तर होतील ते हक हुमान हुमायून व भोगवटे व तसरुफाती सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले आहे यावरी दुकलाकरिता आपण कासीस गेलो होतो आपणापासुनु भोगवटियाचे सदरहू कागद हारपले बाजद आपण साहेबाचे बदगीस येउनु मालूम केले तेणेप्रमाणे साहेबी आपणास खुर्दखत दिल्हे आहे ते वखती आपणानजीक कागद नव्हते साहेबाचे बदगीस सवा चावर जमीन इनाम आहे ह्मणौनु बोलावे ते चावर एक ह्मणोनु बोलिळो तेणेप्रमाणे साहेबी खुर्दखत दिल्हे ते खुर्दखत घेउनु माहालास गेळो यावरी मागती साहेबाचे बदगीस मालूम करून सवा चावराचे खुर्दखत मागावे तरी लस्कर बहुत दूरी आपणास यावया ताकती नव्हे ह्मणौउनु आलो नाही हाली लस्कर नजीक आले ह्मणौउनु साहेबाचे बदगीस आलो तरी हे खैराती साहेबाचे सबबचे काम आहे साहेबी नजर एनायत फर्माउनु खुर्दखत देविले पाहिजे व आपण फर्मानाची तालीक आणिली आहे तेथे सवा चावर आहे व गावीचे मोकदमाची व रयतीची अर्दास आणिली आहे आपणास इनाम जमीन सवा चावर आहे तो गावीचे ळोकास जाहीर आहे दरीबाब सरजाम होय मालूम जाले तरी सदरहू इनाम जमीन चावर सवा एक १। आहे ऐसे गावीचे बुढे बुढे लोक असतील त्यास पुसणे व फर्मान आहे तो माहाली तुह्मी आपले नजरेस पाहाणे खूब तहकीक करणे सवा चावर इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असेली तेणे बरहुकूम चालवणे बा। फर्मान व खुर्दखत मलीकअबर सालाबाद चालिले असेली तेणेप्रमाणे दुंबाले करणे दर हर साल खुर्दखताचा उजूर न करणे तालीक घेउनु असेली फिराउनु देणे पा। हुजूर राबिलाखर त्रिमल मोर्तब सूद
रुजु सुरु-
निवीस
तेरीख १२ माहे जिल्हेज
जिल्हेज