Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखाक १९
१६२९ कार्तीक वद्य १२

श्री 


स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजितसवत्सरे कार्तीकबहुलद्वादसी इदुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शिवछत्रपति याणी राजश्री गणोवानाइक सरदेसाई मामले दाभोल व प्रभावली यासि आज्ञा केली ऐसी जे विनतीपत्र पाठविले ते प्रविष्ट जाहाले आपण स्वामीच्या पायाशी एकनिष्टेने वर्तणूक करीत असता आपला गैरवाका विदित करणार करितात तेणे करून स्वामीचा बद निशा होऊन नस्ती तुफाने आपणा वरी उठतात राजश्री शाहूराजे याकडील कागदपत्र माणूस आपणा कडे आले नाही जरी हे गोष्ट आपणाकडे शाबीत जाहाली तरी स्वामीने शासन करितील त्यास मान्य आहो आज्ञा जाहालिया सेवेसी येऊन ह्मणून हे वर्तमान कितेक तपसिले भावभग्ती निष्टेने लिहिले ते विदित जाले ऐशास तुह्मी वतनदार एकनिष्ट आहा हे यथार्थ च आहे तुह्मी एकनिष्टेने वर्तणूक करीत असता नस्ते तुफान तुह्मा वरी कोण ठेऊ पाहातो दर्शनास यावयाची गोष्ट लिहिली तरी या पेक्षा उत्तम ते काय आहे तुह्मी व कृष्णाजी भास्कर ऐसे हुजूर दर्शनास येणे ये विशी राजश्री कृष्णाजी परशराम यास हि आज्ञापत्र सादर केले आहे ते देणे आणि तुह्मी व कृष्णाजी भास्कर ऐसे हुजूर येणे लेखनावधी

रुजु सुरु
निवीस सुरु सुद बार

लेखाक १८
१६२९ कार्तीक वद्य १२

श्री 

स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ३४ सर्वजितसवत्सरे कार्तिकबहुलद्वादशी इदुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शिवछत्रपति याणी समस्त राजकार्यधुरधर विस्वासनिधि राजमान्य राजश्री कृष्णाजी परशराम यासि आज्ञा केली ऐसी जे राजश्री गणोवा नाइक सरदेसाई व कृष्णाजी भास्कर यास हुजूर दर्शनास यावयाची आज्ञा केली आहे तरी तुह्मी उभयतास निरोप देऊन हुजूर स्वामीच्या दर्शनास पाठऊन देणे बहुत लिहिणे सुज्ञ असा

बार

लेखाक १७

(प्रारभीच्या काही ओळी फाटल्या आहेत)

(सिका फाटका)

सरदेसाई मामले प्रभावली यासि आज्ञा ऐसी जे तुह्मी विनतिपत्र पाठविले ते प्रविष्ट होऊन लिहि +++ विदित जाहाले आपण स्वामीचे पायासी एकनिष्ट + + + णूक करितो याकरिता रागणियाहून आपले अनी बहुता प्रकारे केले तेव्हा (?) कडून श्रमी जालो आहो प्रस्तुत विशालगडा आहो राजश्री कृष्णाजीपत स्वामीचे दर्शनास येतील त्या समागमे दर्शनास येतो आपुले सर्वविशी गोमटे करून चालविले पाहिजे ह्मणोन लिहिले तरी तुह्मी स्वामीचे पायासी निष्ठा धरून वर्तणूक करिता ये गोष्टीने स्वामीस तुमचे विशी चालवणे अवशक आहे तुह्मी आपले समाधान असो देणे तुमचे वेतन स्वामी चालवितील आणि गोमटे करितील राजश्री कृष्णाजी परशराम स्वामीचे दर्शनास येतील त्या समागमे तुह्मी स्वामीचे दर्शनास येणे आणि ऊर्जित करून घेणे तुमचे वतनाचा हक लाजीमा इम चालत असेल तेणे प्रमाणे स्वामीने हि करार केले असे आपले समाधान असो देणे जाणिजे निदेश१ (१ येथून अक्षर निराळ्या वळणाचे) समक्ष

सुरु सूद बार

लेखाक १६ 
१६२९ वैशाख शुद्ध १२

श्रीशकर

राजश्री चिमणाजी बलाल देशाधिकारी व लेखक वर्तमान
व भावी सुभा प्रात मलकापूर गोसावियासि

अखडितलक्ष्मी अलकृत राजमान्य श्री परशराम त्र्यबक प्रतिनिध
प्रतिनिधी आषीर्वाद नमस्कार सुहुरसन सबा मया अलफ राजश्री गणोवानायक सरदेसाई मामले प्रभावली याणी विनति केली आपण स्वामीचे पायासी निष्ठा धरून किले विषालगड ताब्रा खाले होता त्यास राजश्री उदितसिग किलेदार होते त्यासी राजकारण करून स्वामीस किला हस्तगत करून दिल्हा त्यास स्वामीनी कृपालु होउनु वतनाचा जीर्णोद्धार करून घ्यावा ऐसे केले ऐसेयासी प्रभावली मामलेया खालील मलकापूर माहाल तेथील सरदेशमुखी आपले वतन अदलशाही कारकीर्दीस चालले या राज्या पासून वरघाट सुभा अलाहिदा कमाविषी मुले आपला भोगवटा चालता राहिला देशकुलकर्णी मामलेयाचे माहालचे कुलकर्ण चालवीत आहेत सरदेशमुखी वतन चालत नाही तरी स्वामीनी कृपालु होऊनु करार करून चालविले पाहिजे ह्मणून त्या वरून मनास आणून पुरातन मलकापूरचे गाऊ प्रभानवली मामल्या खाले वोढले असतील तेथील सरदेशमुखी वतन याचे यास करार करून दिल्हे असे तरी तुह्मी याचे वतन याचे दुमाले करून सरदेशमुखीचे कार्यभागास मुतालिक ठेवितील त्या पासून सेवा घेउनु हक व लावाजिमा बर निll मामल्या प्रमाणे चालवीत जाणे सदरहू प्रमाणे यास व याच पुत्रपौत्रादिवशपरपरेने वतन सरदेशमुखी चालवणे या पत्राची प्रती लेहून घेउनु मुख्यपत्र परतून भोगवटियास माlरनिले जवली देणे छ १० सफर पाl हुजूर

बार सुरु सूद बार

पौl छ १५ सफर

लेखांक २३३                                                                                                                                 १५५८ वैशाख शुध्द ६
                                                                                                 

                                                                                                                 233

                                                                                                                 फारसी मजकूर

                                                                                                                  177

अज दिवाण मामले दौलतमंगल ताहा हुदेदारानि व मोकदमानि रैयानि मौजे मोरगाउ तर्फ करेपठार का। जेजुरी मामले मजकूर बिदानंद के सु॥ सीत सलासीन व अलफ दरीविला गणेशभट बिन मल्हारी भट भगत मोरया इ. इ. इ. जमीन चावर .. इ. इ. इ. मोर्तब सूद

तेरीख ४

माहे जिल्हेज

 

लेखाक १५
श्री १६२९ वैशाख शुद्ध ११

राजाश्रियाविराजित राजश्री गणोवा
नाइक सरदेसाई मामले प्रभावली
व मामले दाभोल गोसावियासि

सेवक परशराम त्र्यबक प्रतिनिधी नमस्कार सुहुर सन सबा मयां व अलफ विषालगड ताब्राने हस्तगत केला होता ते समई तुह्मी व सरदेशकुलकर्णी मामले प्रभावली व सरदेशमुख ताl खीलणा याणी व प्रभावली मामलियाच्या देसकानी एकनिष्टपणे सेवा केली किला ताब्राकडे होता तो आपले स्वाधीन करून घेऊन राजश्री स्वामीचा किला स्वामीस नजर केला याकरिता तुह्मा वरी कृपालु होऊन तुह्मास व सरदेशकुलकर्णी मामले प्रभावली यास व सरदेशमुख ताl खीलणा यास व वरकड प्रभावली मामलियाच्या देसकास हकाची तिजाई सालोसाल माफ केली असे तरी तुह्मास तिजाईचा तगादा लागणार नाही छ ९ सफर बहुत काय लिहिणे

सुरु सूद बार

लेखाक १४
१६२९ वैशाख शुद्ध ११

श्री आईआदिपुरुष

श्रिया सह चिरजीव राजमान्य राजश्री आपास परसराम त्र्यबक अनेक आसीरवाद उपरि येथील कुषल जाणून स्वकीय लिहिणे विशेष राl गणोवानाईक सरदेसाई मामले प्रभावली व मामले दाभोल यासी व सरदेशकुळकर्णी मामले प्रभावली व सरदेशमुख ताl खिलणा याणी व वरकड वतनदार देसक मामले प्रभावली याणी कस्ट मशाखत करून मोगला कडे विशालगड असता निष्टेस अतर केले नाही उदितसिग ताब्राचे निसबतीने विशालगडा वरी होता त्याजपासून किला आपले स्वाधीन करून घेऊन राजश्री स्वामीचा किला स्वामीस नजर केला निष्टेस अतर केले नाही या करिता यास हकाची तिजाई माफ केली असे तुह्मी तिजाईचा तगादा न देणे जाणिजे छ ९ सफर जाणिजे लोभ१  असो देणे हा आशीर्वाद

लेखांक २३२                                                                                                                                   १५५२

ता।

अज रख्तखाने मा। हजरती राजश्री बाजी + + नाईक + + + बजानेबू कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि ता। करेपटार पा। पुणे सु॥ इहिदे सलासीन दरवज बा। इनाम बो। गणेशभट बिन मल्हारिभट सा। मोरेस्वर हुजुर एउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन इ इ इ स्वामीस मुकासा अर्जानी जाला इ. इ. इ.

 

लेखाक १३
श्री १६२९ वैशाख शुद्ध ११

अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य
राजश्री धोडो भास्कर गोसावियासि

सेवक परशराम त्र्यबक प्रतिनिधी नमस्कार सुहूरसन सवा मया व अलफ राजश्री गणोवानायक सरदेशाई व देशकुलकर्णी मामले प्रभावली याणी स्वामीच्या पायासी एकनिष्ठता धरून विशालगड ताब्रास होता तो हस्तगत करून दिल्हा व वरकड माहालोमाहालीचे वतनदाराही दुतर्फा सुरलीतपणे वर्तणूक केली या करिता या वरि कृपालु होउनु हकाची तिजाई माफ करून दिली आहे तरी तुमचे निसबतीने माहाल आहेत तेथील तिजाईचा उसूल न घेणे सालोसाल तिजाई माफ सुरलीत चालवणे जाणिजे राl छ ९ सफर जाणिजे

बार

लेखाक १२
श्री १६२९ चैत्र वद्य ६

स्वस्ति श्रीराज्याभिषेकशके ३३ सर्वजित्सवत्सरे चैत्रबहुलशष्ठी मदवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शिवछत्रपति याणी राजश्री गणावानाईक सरदेसाई मामले दाभोल व प्रभावली यासि आज्ञा केली ऐसी जे मुख्य ताम्र निधन पावल्या वरी शा उदितसिग याणी स्वदेशास जावयाचा विचार केला ते प्रसगी शामलाने विशालगड आपले स्वाधीन करणे ह्मणून राजकारण लाविले हे तुह्मास कललिया वरी तुह्मी आपले मुतालीक कृष्णाजी भास्कर यास लेहोन उदितसिगास उपदेश करऊन ते गोष्टी राहाविली आणि त्यास आपला नायब तेथे ठेऊन किला कृष्णाजी भास्कर याचे स्वाधीन करून जावे ये गोष्टीचे दृढीकरण राजश्री कृष्णाजी परशराम यास सागोन केले ह्मणून माlरनिलेनी लिहिले व तुह्मा कडील गोपाल अनत व उदितसिगा कडील प्रचीतराऊ हुजूर आले व कृष्णाजी परशराम याणी बालाजी लिगोजीस पाठविले त्याणी विनती केली त्या वरून हि कलो आले ऐसियास तुह्मी स्वामीचे एकनिष्ट सेवक पहिले पासून निष्टने सेवा करीत आले आहा तुह्मा पासून स्वामिकार्यास अतर होऊ पाहाते की काय शामलाचा पराश्रम स्थलावरी होऊ न दिल्हा उदितसिगाने नायब ठेऊन किला कृष्णाजी भास्कर याचे स्वाधीन करावासा करारदाद केला हे अति उत्तम केले तुह्मा कडील कृष्णाजी भास्कर ते जागा आहेत ते बरे शाहाणे माणूस आहे तरी च हा प्रसग होऊन आला ये गोष्टी वरून स्वामी सतोषी होऊन त्यास अभयपूर्वक समाधानपत्र व वरकड वतनदारास अभयपत्रे सादर केली आहेत उदितसिग यास हि समाधानपत्र पाठविले आहे तरी तुम्ही जाल्या निर्वाहप्रमाणे विचार घेऊन त्याचे जाणे होय कार्य सिधीस पावे तुमचे सेवेचा मुजरा होय ऐसी गोष्टी करणे स्वामीस तुमचे चालवणे अगत्य आहे त्यास राजश्री परशराम पडित प्रतिनिधी त्या प्राते पाठविले आहेत तुह्मी त्याचे आज्ञे प्रोl स्वामीसेवा करणे ते तुमच्या उर्जिताचा निश्चय करून हुजूर लिहितील तदनुसार स्वामी तुमचे ऊर्जित करून चालवितील ये विसा समाधान असो देणे जाणिजे१ (१ येथून अक्षराचे वळण निराळे आहे) लेखनालकार

रुजु सुरु – निवीस सुरु सूद बार