लेखांक २०३ श्री १६८२ कार्तिक शुध्द ६
इनामपत्र आजनिविस्ते गुलाम मोहीद्दीन वलद महामुदजी अलिजी व गुलामअल्ली वलद गुलाम अहमद इब्रमियाजी इब्राहिमजी चौधरी प्रांत कल्याण व भिवंडी सुहुरसन इहिदे तिसैन मया व अलफ कारणे अजम मेघ श्याम बल्लाळ, उपनाम जोसि, गोत्र शांडिल, सूत्र आश्वलायन, वास्तव्य पुणे, यासि इनामपत्र लेहून दिल्हे ऐसे जे मौजे लोनाड, ता। सोनवळे, प्रांत भिंवडी, हा गाव तुह्माकडे सरकारांतून इनाम आहे ऐसीयास, मौजे मजकूरचे दुहोब्याचा हक रयतेनिसबत इजानेबाचा आहे, तो आह्मास पूर्व स्नेहावर नजर देऊन इनाम देवावा, ह्मणोन पुण्याचे मुकामी बजीद जाला त्याजवरून, तुमचे कदीमदोस्ती व स्नेहावर नजर देऊन इस्तकबिल सन मजकूर मौजे मजकूरचा दुहोब्याचा हक्क तुह्मास इनाम करून दिल्हा असे तरि, साल दरसाल पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने सदरहु हक्क घेत जावा छ ५ माहे रबिलाखर सन मजकूर. शके १६८२