लेखांक २०७ १५६० भाद्रपद वद्य १
श्रीसंभुक्षत्रसीकर
मा। हा। राजाधिराज माहाराज राजश्री कृस्णाजीपंत माहाराज स्वामी
.॥ माहाराजाचे सेवेस सेवक राजमुद्रा व देसमुख व मोकदम व बडवियानि व सेटिया माहाजन माहाप्रस्नीक स्थळ श्री क्षेत्र व पेठ सिंगणापूर का। मलेवाडी सेवेस विज्ञापना ऐसी जे माहाराजे आमच्या स्थळास ताटे थिटे आराधे मोकदम व बडवे क्षेत्र पंढरपूर या उभे वर्गास वेव्हारसमधे आमच्या थळास पाठविले असेती याची उतरे परिसोन धर्मता निवाडा करणे ह्मणउनु आज्ञापत्र लिहून पाठविले ते पत्र सिरसावदून सनाथ जाहालो परंतु आमच्या स्थळास थिटे आराधे मोकदम क्षेत्र मजकूर हे आमच्या स्थळास स्रावण वधी दसमीस आळे आळीयावरि बडवे यावे ते आले नाहीत ह्मणउनु आह्मी बडवीयासि सांगोनु पाठविले जे ताटे थिटे आराधे मोकदम चीरपत्र घेउनु येउनु आमचे स्थळी बैसले असती तुह्मी येउनु आपला निवाडा करून घेणे ह्मणउनु परंतु ते आले नाहीत मग हे मोकदम मा। आमचे स्थळी दिवस २२ बैसौनु वाट पाहिली इ॥ स्रावण वधी दसमी ता। भाद्रपद वधी प्रतिपदापर्यत बडव्याची वाट पाहिली परत बडवे आले नाहीत मग ताटे थिटे आराधे मोकदम क्षेत्र मा। यासि स्थळपत्र लिहून दिल्हे आसे माहाराजे उभे वर्गाचा हुजूर जैसा नेमु केला आसेल तेणेप्रमाणे जमानाकरवे वर्तविले पाहिजे हे विनंती पत्र वोली २० वीस
तेरीख १४ माहे जमादिलौवल सु॥ तिसा सलासीन अलफु