लेखाक १२
श्री १६२९ चैत्र वद्य ६
स्वस्ति श्रीराज्याभिषेकशके ३३ सर्वजित्सवत्सरे चैत्रबहुलशष्ठी मदवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शिवछत्रपति याणी राजश्री गणावानाईक सरदेसाई मामले दाभोल व प्रभावली यासि आज्ञा केली ऐसी जे मुख्य ताम्र निधन पावल्या वरी शा उदितसिग याणी स्वदेशास जावयाचा विचार केला ते प्रसगी शामलाने विशालगड आपले स्वाधीन करणे ह्मणून राजकारण लाविले हे तुह्मास कललिया वरी तुह्मी आपले मुतालीक कृष्णाजी भास्कर यास लेहोन उदितसिगास उपदेश करऊन ते गोष्टी राहाविली आणि त्यास आपला नायब तेथे ठेऊन किला कृष्णाजी भास्कर याचे स्वाधीन करून जावे ये गोष्टीचे दृढीकरण राजश्री कृष्णाजी परशराम यास सागोन केले ह्मणून माlरनिलेनी लिहिले व तुह्मा कडील गोपाल अनत व उदितसिगा कडील प्रचीतराऊ हुजूर आले व कृष्णाजी परशराम याणी बालाजी लिगोजीस पाठविले त्याणी विनती केली त्या वरून हि कलो आले ऐसियास तुह्मी स्वामीचे एकनिष्ट सेवक पहिले पासून निष्टने सेवा करीत आले आहा तुह्मा पासून स्वामिकार्यास अतर होऊ पाहाते की काय शामलाचा पराश्रम स्थलावरी होऊ न दिल्हा उदितसिगाने नायब ठेऊन किला कृष्णाजी भास्कर याचे स्वाधीन करावासा करारदाद केला हे अति उत्तम केले तुह्मा कडील कृष्णाजी भास्कर ते जागा आहेत ते बरे शाहाणे माणूस आहे तरी च हा प्रसग होऊन आला ये गोष्टी वरून स्वामी सतोषी होऊन त्यास अभयपूर्वक समाधानपत्र व वरकड वतनदारास अभयपत्रे सादर केली आहेत उदितसिग यास हि समाधानपत्र पाठविले आहे तरी तुम्ही जाल्या निर्वाहप्रमाणे विचार घेऊन त्याचे जाणे होय कार्य सिधीस पावे तुमचे सेवेचा मुजरा होय ऐसी गोष्टी करणे स्वामीस तुमचे चालवणे अगत्य आहे त्यास राजश्री परशराम पडित प्रतिनिधी त्या प्राते पाठविले आहेत तुह्मी त्याचे आज्ञे प्रोl स्वामीसेवा करणे ते तुमच्या उर्जिताचा निश्चय करून हुजूर लिहितील तदनुसार स्वामी तुमचे ऊर्जित करून चालवितील ये विसा समाधान असो देणे जाणिजे१ (१ येथून अक्षराचे वळण निराळे आहे) लेखनालकार
रुजु सुरु – निवीस सुरु सूद बार