लेखाक १९
१६२९ कार्तीक वद्य १२
श्री
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजितसवत्सरे कार्तीकबहुलद्वादसी इदुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शिवछत्रपति याणी राजश्री गणोवानाइक सरदेसाई मामले दाभोल व प्रभावली यासि आज्ञा केली ऐसी जे विनतीपत्र पाठविले ते प्रविष्ट जाहाले आपण स्वामीच्या पायाशी एकनिष्टेने वर्तणूक करीत असता आपला गैरवाका विदित करणार करितात तेणे करून स्वामीचा बद निशा होऊन नस्ती तुफाने आपणा वरी उठतात राजश्री शाहूराजे याकडील कागदपत्र माणूस आपणा कडे आले नाही जरी हे गोष्ट आपणाकडे शाबीत जाहाली तरी स्वामीने शासन करितील त्यास मान्य आहो आज्ञा जाहालिया सेवेसी येऊन ह्मणून हे वर्तमान कितेक तपसिले भावभग्ती निष्टेने लिहिले ते विदित जाले ऐशास तुह्मी वतनदार एकनिष्ट आहा हे यथार्थ च आहे तुह्मी एकनिष्टेने वर्तणूक करीत असता नस्ते तुफान तुह्मा वरी कोण ठेऊ पाहातो दर्शनास यावयाची गोष्ट लिहिली तरी या पेक्षा उत्तम ते काय आहे तुह्मी व कृष्णाजी भास्कर ऐसे हुजूर दर्शनास येणे ये विशी राजश्री कृष्णाजी परशराम यास हि आज्ञापत्र सादर केले आहे ते देणे आणि तुह्मी व कृष्णाजी भास्कर ऐसे हुजूर येणे लेखनावधी
रुजु सुरु
निवीस सुरु सुद बार