Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक २४०                                                                                                                              १५७१
                                                                                             

रुजू
निगावान                                                                          177

अज दिवाण ठाणे पा। पुणे ता। मोकदमानि मौजे मोरगौ पा। मा। मु॥ खमसैन अलफ बो। माहादाजी गोसावी मुकाम मोरगौ पा। मा। मालूम केले जे आपणास इनाम बा। खु॥ छ १९ माहे जिल्हेज पौ। छ २३ माहे मोहरम सन खमसैन अलफ तेथे मजमून की बो। माहादाजी गोसावी सो। श्री हुजूर एउनु मालूम केले जे देवाच्या देवळानजीक विहीर आहे त्याखाले जमीन बिघे 305६ सा आहे ते सालाबाद चालत आली आहे बिता।

देउळापासून आग्नी भागी                      देउळापासून नैरुत्य कोनी
विहिरनजीक जमीन 305३                        वाडियानजीक जमीन बिघे
                                                        तीन 305

एणेप्रमाणे सालाबाद चालिले आहे परंतु भोगवटियाकारणे कागद नाही तरी साहेबी नजर एनायत फर्माउनु सदरहू जमीनीचे खुर्दखत मर्‍हामत केले पाहिजे दरीबाब सरंजाम होए मालूम जाले तरी श्री भगवंत मोरेस्वर सो। मोरगौ देवळानजीक जमीन बिघे 305६ सदरहूप्रमाणे कीर्दी करून सबजी व फुलझाडे व हरजिनस पेरतीस ते दुमाले करणे उजूर न करणे तालीक घेउनु असेली परतोन देणे दर हर साल उजूर न करणे पा। हुजूर शाहा अजम हैदरशा ह्मणौउनु रजा बा। रजा बा। भोगवटियाप्रमाणे सालाबाद चालिले असेली तेणेप्रमाणे चालवणे तालीक घेउनु असेली इनामदारमजकुरापासी फिराउनु देणे मोर्तब सुद

                                                                                                                                 72

लेखाक ४२
१७४२ कार्तीक शुद्ध १२

श्री

राजश्री गणोवानाईक बिन प्रल्हादनाईक व राघोबानाईक बिन दादोवानाईक सरदेसाई मामले प्रभावली व सुभा दाभोल यासि आज्ञा केली ऐसी जे सु॥ इहिदे अशरीन मया तैन व अलफ स्वामीचे शेवेसी तुह्मी हुजूर करवीरचे मुकामी येऊन विनती केली की कसबा सगमेस्वर येथे पूर्वी आमचा वाडा होता त्या वाड्यात कैलासवासी माहाराज

कारणा मुले राहिले पुढे वाडा धग्ध जाहाला त्या वाड्या वर दादोवानाईक सरदेसाई याणी घर बाधिले त्याज वरून जोसीयाणी गैरवाखा समजाऊन माधवराव पडित प्रधान यासी आज्ञापत्र देऊन वाडा मोडविला त्याज वर त्या च वर्षी दादोवा-नाईक सरदेसाई याणी आपला मजकूर समजाऊन पडित-प्रधान यासि वाडा बाधू देणे ह्मणोन आज्ञापत्र न्हेले परतु जोसीयाचे भिडे मुले वाडा जाहाला नाही त्यासि हाली कृपा करून आमचा वाडा आह्मी बाधितो त्याज विसी आज्ञा जाहली पाहिजे ह्यणोन विदित केले त्याज वरून मनासी आणिता तुमचे वाड्यात कैलासवासी माहाराज राहिले व तुह्मा जवलील कागदपत्र व भोगवटा पाहून पेशजी प्रधानपत यासि आज्ञापत्र दिल्हे आहे हे जाणून व हाली चवकसी करून वाड्याची जागा तुमची खरी हे जाणोन तुह्मास आज्ञापत्र सादर जाहाले असे तरी तुह्मी कसबे माlरी जुन्या वाड्यावरील जागे वर घर बाधून सुखरूप राहाणे जाणिजे रा। छ १० माहे मोहरम लेखन  खासा

बार

लेखाक ४१
१७२२ सुमारे 

श्री 

रामराजा कानडा नरपती अनागोदीस राज्य करीत होते ते समाप्त जाले शके १३२२ ताl शके १७०८ पराभवनामसवत्छरे सन सबा समानीन मया व अलफ पावे तो वर्षे जाहली ३८६

तपसील

विज्यापूरची पादशाहात इ॥ शके १३२२ विक्रमनामसवत्सरे सन इहिदे समान मया

लेखाक ४०
१७१५ श्रावण वद्य ५

श्री 

स्वस्ति श्रीनृपशाळिवाहानशके १००८ क्षयनामसवछरे क्षत्रियकुलावत जयशेखराय राजा याणी श्रीधर व सहस्रशर्म ब्राह्मण यासी तोरगल समीप जोतिषाची वृत धारादत करून दिल्या नतर राजे शात जाहाले उपरात राज्यास अधिकारी नाही तेव्हा हत्तीच्या सोडेत माल देऊन नगरचे लोक जमा करून हत्ती फिरविला तेव्हा हातीने माल विद्यारण्य स्वामियाच्या गलात घातली त्यास हे सन्यासी याज करिता त्याचा सिश्य वीरबुक समीप होता त्याच्या गला ती माल स्वामीनी घालून त्यास राज्याभिषेक केला आणि त्या गावचे नाव विद्यानगर ठेविले स्वामीनी त्या राज्याचे प्रधानत्व करून सामराज्य केले त्यापासून त्या राज्याची वशावल

१ वीरबुक यास पुत्र नरसाणा नाईक
१ त्याचा पुत्र हरिहरराय
१ त्याचा पुत्र देवराय
१ त्याचा पुत्र नरसिगराय
१ त्याचा पुत्र वीर नरसिगराय
१ त्याचा पुत्र रामदेवराय
१ त्याचा पुत्र कृष्णराय
१ त्याचा पुत्र अचु तराय
१ त्याचा पुत्र सदासीवराय
१ त्याचा पुत्र रामराय
-----
१०

या प्रोl वीरबुक या पासून रामरायपर्यत अकरा पिढ्या त्याणी राज्य केले रामराय रक्षतगडी तालुके बागलकोट नजीक कृष्णातीर येथे आले होते ते समई अदलशाहा विज्यापूर व कुतुबशाहा हैदराबाद व निज्यामशाहा दौलताबाद या त्रिवर्गाही राजेयास मारून राज्य घेतले शके १३२२ श्लोक पराभवोब्दे माघे च शुक्ल पक्षे च पचमी शुक्रवारे च माध्यान्हे रामराज रणे हते ॥ पुढे राज्य यवनाचे जाहाले सदरहू हकीकत सिवाजी नरसिगराव गुमस्ते जेयगौडा लिगापा देसाई व सरदेसाई व नाडगौडा सरकार तोरगल पोl कोटनूर याज पासून लिहोन घेतली असे शके १७१५ प्रमादीनामसवछरे श्रावण वद्य ५ इदुवार मु॥ कसबे पुणे   

लेखाक ३९ 
१७१२

श्री

आन्यासाहेब
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ११७ साधारणनामसवत्सरे भोमवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शिवछत्रपती स्वामी याणी समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री माधवराव पडित प्रधान यासि आज्ञा केली ऐसी जे कसबा सगमेस्वर येथे कैलासवासी तीर्थस्वरूप माहाराज साहेब याचा वाडा आहे त्या जागे वरी हाली राजश्री सदाशीव दादाजी माहूलगकर सरदेसाई वाड्याच्या जुन्या जोत्या वरी याणी घर बाधिले ह्मणोन जोसी याजकडून हुजूर गैरवाका समजाऊन देऊन पेशजी आपणास आज्ञापत्र सादर जाहले आहे ऐ सरदेसाईयाणी घर बाधिले आहे व बाग त्या नादणूक कसबे मजकुरी कैलासवासी माहाराज गडाहून येऊन राहिले होते तेव्हा व त्यापूर्वी सी जाहली आहे त्याची चौकसी वाजवी न्याय. . . ह्मणोन दाखले निसी वैवाट चालत आली आहे... .. सरदेसाई याज कडे चालू द्यावी जाणिजे बहुत लिहिणे तरी सुज्ञ आसा

बार   बार

लेखाक ३८
१६७२ श्रावण शुद्ध ४

श्री आई आदिपुरुष
पुरवणी तीर्थरूपाचे सेवेसी

विनती उपरि दरबारचे वर्तमान तरी श्रीमत मातुश्री आईसाहेब पुणियास आलियाचे वर्तमान आपणास कलले च आहे त्याआलीकडे वर्तमान आषाढ वद्य त्रयोदसीस राजश्री प्रधानपताच्या वाड्यात आली होती नव्या दिवाणखानिया मध्ये बैठक केली होती च्यार घटका रागरग जाहाला तदनतर गोशालेमध्ये बसोन घरातील अवघ्या बायका बोलाऊन आणून अवघ्यास वस्त्रे दिली प्रधानपती मातुश्रीस दोन पोषाख एक चादणी व एक कलसपाकी ऐसे दोन दिल्हे पोहोच्या जडित दोन व एक मोत्याची माल दिली येणे प्रमाणे सत्कार जाहाला राजश्रीचे वर्तमान तरी मातुश्री आजीतागायत हे कर्म खोटे आहे ऐसे ह्मणत आहेत परतु याचे विचारे जी गोष्ट घडली आहे हे विपर्यास जाहाल्याने राज्यात दुर्लौकीक आपण याचे पदरी मातबर पूर्वी याणी विच्यार न करिता हे गोष्टी कैसी केली हा लौकिक जनात हे च प्रतिपादावे तरी आज नऊ वर्षे मातुश्रीने नव्हे ह्मणऊन हटात्कार केला आहे होय ह्मणावे तरी मातुश्रीचा आग्रह नव्हे ह्मणावे तरी जनविरुद्ध गोष्ट याज करिता हे हि विचारात पडिले आहेत या गोष्टीचे रुजू मोझे बहुत मनास आणून मातुश्रीच्या तोडे हे च गोष्ट खरे ऐसे साक्षी मोझ्या निसी करून स्थापावे ऐसे आहे परतु ती आइकत नाही या करिता करवीरवासियास आणावे ऐसा मातुश्रीच्या विचारे निश्चय जाहाला त्याज वरून राजश्री पत या समागमे राजश्री विखाजी नारायण व राजश्री हरी राम घोरपडे या कडील समागमे देऊन आणावयास रवानगी केली ते आजी चतुर्थीस निघोन गेले येणे प्रमाणे याचे मुदे त्याणी मान्य

लेखाक ३७
श्री १६९२

तालीक १/३

आखडितलक्ष्मीआलकृत राजमान्य
राजश्री कृष्णाजी विश्वनाथ गोlसि

शेवक माधवराव बलाल प्रधान नमस्कार सुll इहिदे सबैन मया व अलफ शके १६९२ विकृतिनामसवत्छरे दादोवानाईक बिन सदासीवनाईक व नारोवानाईक बिन केशवनाईक सरदेसाई मामले प्रभानुवली व सुभा दाभोल याचा व आनदराव बिन यसवतराव चवाण देशमुख साडे च्यार, माहाल मामले हमजाबाद व भास्कर बाबाजी वोक खोत मौजे कोतलुम ताl वालबे व बदरे मोकासी ताl चिपलूण वगैरे याचा दाभोल सुभाचे सरदेशमुखीचा कजिया लागोन मनसुफी साल तिगस्ता पासून हुजूर पडली आहे त्यास सरदेसाई ह्मणतात की दाभोलसुभाची सरदेशमुखी वतनी परपरेने वडील वडील अनभवीत आले मध्ये कैलासवासी सिवाजी माहाराज याचे कारकीर्दीत अवघ्या वतनदाराबरोबर आमचे हि हक मना जाहाले होते ते राजाराम साहेबाचे कारकीर्दी पासून चालते जाहाले त्याज वर हबसीयाचा अमल दाभोल सुभात जाहाला तेव्हा त्याणी मागती मना केले त्या उपरी आमचे आजे दादोवानायक बिन रगोवानायक हबसी याज कडे हाले आहेत त्यास हबसीया पलीकडे याचा भोग(व)टा कधीच नाही हबसी याज कडे अमल जाहाला तेव्हा दादोवानायक त्याजला भेटले नवते ते समई त्याणी आह्मास पत्रे पाठविली की सरदेशमुखीचे वतन याचे नसता याजला हक तुह्मी देता हे कामाचे नवे म्हणोन पत्रे पाठविली तीन वजिनस आम्हापांसी आहेत म्हणोन विनती करून पत्रे दाखविली त्याज वरून मनास आणिता सुभे माlरचे सरदेसाईपणाच्या वतनाचे दाखलेयाची पत्रे शभरा वर्षा पैलीकडील व आलीकडील दादोवानायक बिन सदासीवनायक याज पासी आहेत याचे आजे दादोवानायक बिन रगोवानायक हबसीया कडे रुजू नवते त्या पूर्वीचे हबसीयाचे ताकीदपत्र चवाण वगैरेयाणी आणुन दाखविले त्या च पत्रा वरून हबसीयाचे अमला अगोधर सरदेसाईयाचा भोगोटा होता ऐसे दिसते परंतु आणखी भोगवाटियाचा पुर्ता शोध करून अक्रा माहालचे वतन याचे जाहाले तरी याजकडे चालवावे त्यास हबसीयाचे कारकीर्दीस अक्रा माहाल याजकडे चालिले त्याज वर आगरेयाचे अमलात तीन माहाल चालिले तो भोगवटा कैलासवासी  तीll नानासाहेबी मनास आणून तीन महालचे सरदेशमुखीचे वतन याज कडे चालविले त्यास याची मनसुफी हुजूर पडली असता सरसुभाहून सदरहू तीन माहाल अमानत करावयाचे कारण नाही याज करिता हे पत्र तुम्हासव सादर केले असे तरी ताl चिपळूण व ताl दाभोल व ताl सावर्डे एकूण तीन माहाल देखील मीठबदर येथील सरदेशमुखीचा हक लवाजिमा तुलाजी आगरे याचे अमलाचे अखेरी पर्यत चालिला असेल त्या प्रोl सरदेसाई याजकडे चालवणे आलीकडे सरकारच्या 

लेखांक २३९                                                                                                                              १५७०
                                                                                             

श्रीमोरेस्वर

श्रीमंता सकलात्मया प्रभुवरा पूर्णा + विश्वंभरा ।
दाता तूं भुवनत्रयी बहु बरा आहेसि मैरेस्वरा ॥
कल्याणास सी + प्रवत्मव मुनिवरा प्रत्यक्ष विश्वेश्वरा ।
होसी तूं अरिमर्दना दिनसखा निर्धार हो ईश्वरा ॥१॥


पूर्णत्वे परिपूर्ण पूर्ण वससी व्यापूनिया शंकरा ।
ऐसीया गुणरागराजगदिशा होसील सर्वेश्वरा ॥
श्रीमत् ह्मादेंव मल्हरा विज्ञप्‍ति जी आइका ।
तूझीए चरणांबुजी मन असो जगम ईनायका ॥२॥

स्वामीयाचे सेवेस सेवक चरणानुचर दासानुदास मुद्गल रुद्र देसकुलकर्णी पा। पांडिया पेडिगौ व पा। कडेवलित ता। पा। चांभारगोदे व पा। रासीन सरकार अहमदानगर साष्टांग नमस्कार विनति विनवावया कारण ऐसे जे आपणास माहाराजे हाती धरून आपली वृत्तीस्थापना केली आहे तरी आपली मिरासी परगणे पाच एथील देसकुलकरण व चिटणिसीची यारिदी माहाराजाचे विलेस मिरासी करुनु लेकराचे लेकरी दिधली असे ते सुखे खाणे सके १५७० विरोधी सवछरे सन हजार १०५९ सदरहू माहालास तैनाती रुपये ३० तीस

पा। पांडियापेडिगौऊ व हवेली रुपये १२305
पा। कडेवलित रुपये                      ७305
पा। चाभारगोदे रुपये                     ७305
पा। रासीण रुपये                          ४305

सदरहूप्रमाणे देत जाउनु याखेरीज श्री आपणास आणीक वृत्ती अगर थोरसे कार्य एनाती केले तेथे माहाराजाचे विलेस आज्ञेप्रमाणे देउनु हे लिहिले सही यासी साक्षी देव असे

लेखाक ३६
श्री १६९० ज्येष्ट वद्य ५

स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ९५ सर्वधारीनामसवत्सरे जेष्टबहुलपंचमी भानुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शिवछत्रपति स्वामियाणी समस्त राजकार्यधुरधरविश्वासनिधि राजमान्य राजश्री आबाजीराव कृष्ण पंडित प्रतिनिधी यासि आज्ञा केली ऐसी जे तुह्मी साहेबाचे शेवेसी योग्य पाहोन तुह्मा वरी तीर्थरूप माहाराज मातुश्री आईसाहेब कृपालु होऊन राजश्री नरसिगराव सिदे व यसवतराव सिदे सुभेदार यासि पाठऊन हुजूर किले पनालियाचे मुकामी आणिले आणि प्रतिनिधीचा हुदा सागीतला वस्त्रे दिल्ही व प्रतिनिधीचा सरजाम सुधा व बाबती किले भुदरगड व समानगड व कलानिधिगड व पारगड व भिवगड व अजिरे येथील सरजामाच्या बाबती पूर्ववत् प्रमाणे करार करून दिल्या असेत तरी तुह्मी सदरहू किले मजकूर व बाबती पुरातन आहेत त्या प्रमाणे अनभवीत जाणे अणी स्वामीच्या पाया पासी एकनिष्टपणे वर्तोन स्वामीस सतोषी करून आपले सेवेचा मजुरा करून घेणे व तुह्मास जामीन राजश्री सुलतानराव सिदे यासि हुजूर घेतले असेत जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा

तेरीख १९
मोहरम सुll तिसा सी(तै)
न मया अलफ बार

लेखाक ३५ श्री

सकलगुणालकरण अखडितलक्ष्मीआलकृत राजमान्य
राजश्री कृष्णराव स्वामी गोसावियासि

पोl बालाजी बाजीराव कृतानेक नमस्कार विनती उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिले पाहिजे विशेष करवीरच्या बदोबस्तास राजश्री सदासीव राम व विसाजी नारायण पाठविले असेत तरी तुह्मी आपले जमावा नसी यासि सामील होऊन हे सागतील त्या प्रोl बदोबस्त करावा किले कोट याचे आज्ञेत वर्तत ते करावे हे जमाव आणवितील ते वेलेस पाठवावा + छ २४ जमादिलावल बहुत काय लिहिणे लोभ असा दीजे हे विनति