लेखाक १८
१६२९ कार्तीक वद्य १२
श्री
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ३४ सर्वजितसवत्सरे कार्तिकबहुलद्वादशी इदुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शिवछत्रपति याणी समस्त राजकार्यधुरधर विस्वासनिधि राजमान्य राजश्री कृष्णाजी परशराम यासि आज्ञा केली ऐसी जे राजश्री गणोवा नाइक सरदेसाई व कृष्णाजी भास्कर यास हुजूर दर्शनास यावयाची आज्ञा केली आहे तरी तुह्मी उभयतास निरोप देऊन हुजूर स्वामीच्या दर्शनास पाठऊन देणे बहुत लिहिणे सुज्ञ असा
बार