लेखाक १६
१६२९ वैशाख शुद्ध १२
श्रीशकर
राजश्री चिमणाजी बलाल देशाधिकारी व लेखक वर्तमान
व भावी सुभा प्रात मलकापूर गोसावियासि
अखडितलक्ष्मी अलकृत राजमान्य श्री परशराम त्र्यबक प्रतिनिध
प्रतिनिधी आषीर्वाद नमस्कार सुहुरसन सबा मया अलफ राजश्री गणोवानायक सरदेसाई मामले प्रभावली याणी विनति केली आपण स्वामीचे पायासी निष्ठा धरून किले विषालगड ताब्रा खाले होता त्यास राजश्री उदितसिग किलेदार होते त्यासी राजकारण करून स्वामीस किला हस्तगत करून दिल्हा त्यास स्वामीनी कृपालु होउनु वतनाचा जीर्णोद्धार करून घ्यावा ऐसे केले ऐसेयासी प्रभावली मामलेया खालील मलकापूर माहाल तेथील सरदेशमुखी आपले वतन अदलशाही कारकीर्दीस चालले या राज्या पासून वरघाट सुभा अलाहिदा कमाविषी मुले आपला भोगवटा चालता राहिला देशकुलकर्णी मामलेयाचे माहालचे कुलकर्ण चालवीत आहेत सरदेशमुखी वतन चालत नाही तरी स्वामीनी कृपालु होऊनु करार करून चालविले पाहिजे ह्मणून त्या वरून मनास आणून पुरातन मलकापूरचे गाऊ प्रभानवली मामल्या खाले वोढले असतील तेथील सरदेशमुखी वतन याचे यास करार करून दिल्हे असे तरी तुह्मी याचे वतन याचे दुमाले करून सरदेशमुखीचे कार्यभागास मुतालिक ठेवितील त्या पासून सेवा घेउनु हक व लावाजिमा बर निll मामल्या प्रमाणे चालवीत जाणे सदरहू प्रमाणे यास व याच पुत्रपौत्रादिवशपरपरेने वतन सरदेशमुखी चालवणे या पत्राची प्रती लेहून घेउनु मुख्यपत्र परतून भोगवटियास माlरनिले जवली देणे छ १० सफर पाl हुजूर
बार सुरु सूद बार
पौl छ १५ सफर