Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५८ १५७९अजू रख्तखाने खुदायेवद सा। अबदुलाखान मा। रेहान खुलीदयाम दौलतहू बजानेब कारकुनानी पा। क-हाड बिदानद सु।। समान खमसैन अलफ आपदेउभट बिन कृष्णभट जुनारदार हुजूर मालूम केले की आपणास , इनामजमीन 'चावर निम '॥ दर सवाद मौजे कोणेगाउ पा। मा। देखील, महसूल व नख्तयाती सजमीळ वा जिकाती व बेठबेगार व फर्मासी कुल उजूहती बा। फर्मान पारसी व हुजती मुकासाइयानी व ठाणे सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती बा। खूम हजरती बडे मलिक साहेब व तसरुफाती मलिक अलीशान ता। सालगु।। चालिली आहे हाली सालमजकुराकारणे पा। मजकूर साहेबास मुकासा अर्जानी जाला आहे माहाली कारकून ताजा खुर्दखताचा उजूर करिताती नजर येनायेत. फर्माउनु ताजा खुर्दखत म-हामत होय मालूम जाले तरी सदरहू इनाम चावर नीम बा। फर्मान हुमायून व सालाबाद कारकीर्दी व दर कारकीर्दी व भोगवटे वजिरानी व खुर्दखत हजरती बडे मलिक साहेब व कारकीर्दी मलिक अजम तसरुफाती बडे मलिक साहेबाचे कारकीर्दीपासूनु ता। सालगु।। जे चालत आली असेली तेणे बा। हुकूम खातिरेस आणउनु दुमाले कीजे अवलियाद व अफलाद चालवीत जाणे दर हर साल ताजा खुर्दखताचा उजूर न कीजे तालिक लेहुनु घेउनु असेली भटमजकुरापासि फिराउनु देणे पा हुजूर रा। चिताखान मोर्तब सूद
रुजू सुरु निसीस
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४४ १५८६ आश्विन वद्य २
अजरख्तखाने माहाराज राजश्री माणकोजी बल्लाळ साहेब दामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि व देसपांडियानि पा। सुपे बिदानद सु॥ खमस सितैन अलफ दरीविले राजश्री माहादाजी गोसावी क्षेत्र मोरेस्वर पा। पुणे हुजूर एउनु मालूम केले जे इ. इ. इ.
तेरीख ३० माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५७
१५७५ चैत्रशुद्ध ३
बजानेब कारकुनानि पा। क-हाड बिदानद की सु।। सन सलास खमसैन अलफ
दरीविले अतभट बिन आपदेभट नादूरदार सो। पा मजकूर हुजूर मालूम केले जे आपणासी इनाम जमीन ॥ दर सवाद मौजे कोणेगाउ कुलबाब कुलकानू दुबाला असे सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असे हाली साहेबास मुकासा अर्जानी जाहाले माहाली ताजा खुर्द खताचे उजूर करिताती ह्मणून तरी हे काय माना असे आता रसीदन खुर्द खत जुनारदार मजकुराचे इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी ता। साल गुदस्त भोगवटा तसरुफाती चालिले प्रमाणे इनाम दुबाला कीजे तालीक लिहोन घेउनु असल परतून दीजे.
तेरीख १ माहे जमादिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४३ १५७१ आश्विन शुध्द १४
अज रख्तखाने राजश्री सीवाजि राजे दामदौलतहू बजानेबु कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। पुणे बिदानद सु॥ खमसैन अलफ दरीविले श्रीमाहादाजी गोसावी क्षेत्र मोरेस्वर याचे बाप श्री मल्हारिबा गोसावी व वडील भाऊ श्री गणेश गोसावी देउलानजीक जमीन बिघे ६ स ता।
देउलापासुनु आग्नी भागी देउलापासुनु नैरुत्य कोनी वाडि-
विहीर कदीम जमीन बिघे यानजीक जदीद जमीन बिघे३ तीन
३
सदरहू जमीन मुस्तैद करून तेथे फुलझाडे व बाजे सबजी व जिनस हाए पेरून चालत आले आहे कदीम भोगवटियाचे गुमशूद जाले भोगवटेप्रमाणे सनद जालियाने सदरहू जमीन कीर्दी करून फुलझाडे व बाजे जिनस वडील करीत आले तैसे आपण करीन ह्मणउनु मालूम केले बिनाबरा इलतमेश खातिरेसी आणौनु श्रीमाहादाजी गोसावी क्षेत्र श्री मोरेस्वर जमीन बिघे ६ बितपसील
देउलापासुनु आग्नी भागी देउलापासुनु नैरुत्य कोनी वाडि-
विहीर कदीम बिघे जमीन यानजीक विहीर जदीद जमीन ३ बिघे तीन
३
सदरहू जमीन यास दिल्ही असे तेथे फुलझाडे व सबजी व नैशकर व केळी हर जिनस लावितील ते सुखे लाऊ देणे कुलबाब कुलकानू बाबहाए हाल स इस्तकबाल व पेस्तर जे होतील ते कुल दुमाले केले असे दुमाले करणे सनद गुमशूद जाली ह्मणौनु इस्कील न करणे दर हर साल ताज्या खुर्द खताचा उजूर न करणे तालीक घेउनु असेली खु॥ फिराउनु देणे मोर्तब सूद
तेरीख १२ माहे सौवाल
सौवाल सुरू सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ५६
१५५५ अधिक वैशाख शुद्ध ९
अज रख्तखाने मसुरल अनाम
नरसोजी हणगोजी धारराउ कृस्णाजी रामजी साउजी
अबाजी घादजी वा सिवजी भापतराउ
नाइकवाडी पा। करहाड मोकासाई मौजे कोणगाउ ता । हुदेदारानि मोकदमानि मौजेमजकूर मालूम दाद सु॥ सन सलास सलासीन अलफ दरवझ इनाम अतीभट बिन अपदेभट मौजेमजकूर नीम चावर ॥ बा फर्मान रवा असे तुह्मी हरकत करूउनु इनाम दुबाला करीत नाही हे काय मणजे अतीभट मशारनिलेचे इनाम दुबाला कीजे उजुरु न कीजे मा। माहासुल वा नकदयाति जकाये बा। फर्मान रवा असे कुलबाब दुबाला कीजे तालीक लिहून घेउनु असल मिसेली परतून दीजे दरसाल मिसेलीचे उजूरु न कीजे मा| भटमजकुराचे इनाम आपुले कुणबियास लावतील मोकासियानी करावेया निसबत नाही हे बाबे ताकीद असे मो।
तेरीख ७ सौवाल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ५५
१५४९ वैशाख वद्य ४
फारसी मजकूर
अज दीवाण पा। करहाड ता। मोकदमानि वा रैयानि मौजे कोणेगाउ पा। मजकुरु बिदानद को हर्ची सु।। सन सबा अशरीन अलफ फर्मान हु।। छ २५ माहे जिल्हेज दर साल सबा अशर व अलफ सादीर असे जमीन चावर. ।। दर सवाद मौजे मजकूर बा । इनाम बदल सदका हजरती सिलेमानी बो । आपदेभट बिन कृस्णभट जुनारदार बाजे ऊ द अवलाद व अफवाद ऊ बमोजिब फर्मान साबिका मुतैन रवा अस्त
मौजे कोपर्ड खुर्द मौजे मजकूर चावर
.|. .||.
मेबायद के जमीन मजकूर बराये की सालाबाद रवा सूदा 'अस्त बादमा दस्तूर । भोगवटा 'दीदा रवा दारद व बो। माहासूल व नकदयाति’ वा जमील वा जिमात वा बेठबेगार वा फर्मायसी व कुल उजुहाति दुंबाळे ऊ मायद व हर साला फर्मान मूज दादन तल हद व देहीनि फर्मान साल बसाल जारी सानद वा तालीक बदफ्तर सीतीदा असली फर्मान बाजे गुजारद बा। फर्मान बाजे गुजारद बा । फर्मान जरूर अद ह्मणौउनु तरी बा । फर्मान सदर्हू प्रमाणे इनाम भटमजकूर दुबाले केले असे दुबाला कीजे तालीक लेहून घेउनु असल मिसेली परतोनी दीजे मो ।
तेरीख १७ माहे शाबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५४
१५२४ चैत्र शुद्ध १० गुरुवार
श्री
श्री सकलगुणसपन्न यजनयाजनादिकषट्कर्मनिरत राजमान्य राजश्री वेदमूर्ती मोरेश्वरभट व वीरेश्वरभट गिजरे गोसावी यासी श्रीकराच्याये पडितराय नमस्कार राज्याभिषेकशके २९ चित्रभानु सवत्सर चैत्र शुद्ध दशमी गुरुवासरे मौजे सैदापूर राजेश्रीकैलासवासी स्वामीनी समस्त ब्राह्मण क्षेत्र क-हाड यास सर्वमान्य आग्रहार देऊन सिवापूर नाव ठेविले तेथील विभाग ब्राह्मणपरत्वे करून जाबीता करून घ्यावयाविषई राजश्रीनी आह्मास आज्ञा केली आह्मी ब्राह्मण मनास आणून नावनिसीवार नेमणूक करून पूर्वी जाबीता करून दिला आहे त्या पैकी जे कोण्ही गयाल मयत होतील त्याचे असामीचे जाबीते मध्ये नेमणूक आहे यैसियास जाबीतेचे वेळेस ब्राह्मण नव्हते ते कोणकोण्ही आह्मा पासी येऊन विदित करिताती की जाबीतेचे वेळेस आपण सनीध नव्हतो आपल्या योगक्षेमाची काही अनुकूलता होय यैसे केले पाहिजे ह्मणून विदित केले यैसियास सदरहू जाबीते मध्ये असामीचे नेमणूक आहे त्यापैकी गयाळ मयत असामीचे नेमणूक पैकी भले ब्राह्मण साक्षर कुटुबवत्सल जाबीते मध्ये ज्याची नेमणूक नाही त्यास यथायोग्य मनास आणून त्यास सदरहू ऐवज नेमून देऊन पावित जाणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे तुह्मास एकतर हे पत्र दिल्हे आहे जाणिजे छ ८ जिल्हेज सु।। सलास मया अलफ पा । हुजूर हे विज्ञप्ती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ५३
१५१२ कार्तिक वद्य १
अज् रस्तखाने खुदायेवंद मलिक सर्के मालिक बाबाजी काजेआगळे दमदौलतहू ता। हुदेदारानि व मोकदमानि व रयानि मौजे कोडोली पा। क-हाड मालूम दाद की हर्ची सु।। सन तिसैन व तिसा मया जमीन बिघे १५ दरवझ इनाम बद्दल सदका बो। रघुनाथभट बिन भानीभट जोसी जुनारदार मौजेमजकूर हद महसुलेसी दुबाला कीजे तकरार न कीजे असल खुर्दखत जोसीमजकुरासी परतौनु देईजे तालीक तुह्मी लिहून घेईजे मोर्तब छ १४ माहे मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४२ १५७१ आश्विन वद्य १४
अज रख्तखाने राजश्री सीवाजि राजे दामदौलतहू बजानेबु कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। पुणे बिदादन सु॥ खमसैन अलफ दरीविले श्री माहादाजी गोसावी मोरेस्वरकर हुजूर मालूम केले जे आपणास इनाम मौजे मोरगौ ता। कर्हेपटार पा। मा। तेथे जमीन चावर निमे विहीरटिके सेत कळस रुके ३॥. साडे तीन देखील नख्तयाती व महसूल व सेलबैल व पायपोसी व खर्चपटी व तोरणभेटी व मोईन सादीलवार व सरदेसमुखपटी व स्थलजकाती व भेटी व उलफापटी व बकरीद व मुशाहिरा देसकुलकर्णी व गावकुलकर्णी व बाजे इकलाजिमेदारानि व तूप व बकरे व खामदल व कडबा व पाडेवार चालत आले असौनु हाली हुदेदार मोजे मा।र इस्कील करून पटियाची तसवीस लावितो ह्मणउनु मालूम केले बिनावरा इलतमेश खातिरेसी आणौनु श्री माहादाजी गोसावी मोरेस्वरकर इनाम मौजे मोरगाव ता। कर्हेपठार पा। मा। जमीन चावर निमे सेत विहीरटिके चावर निमे .॥. कलम रुके
३॥ देखील नख्तयाती व महसूल व सेलबैल व पायपोसी व खर्चपटी व तोरणभेटी व मोईन सादीलवार व सरदेसमुखपटी व स्थलजकाती व भेटी व उलफपटी व बकरीद व मुशाहिरा देसकुलकर्णी व गावकुलकर्णी व बाजे हकलाजिमेदारानि व तूप व बकरे व खामदल व कडबा व पाडेवारी व पेस्तर नविया पटिया होतील त्या कुल दुमाले केलिया असेती वेठी अगर जेवा कोण्हे बाबे एक जरा तसवीस नेदणे दर हर साल ताज्या खुर्द खताचा उजूर न करणे तालीक घेउनु असेली खु॥ फिराउनु देणे
तेरीख १२ माहे सौवाल
सौवाल सुरू सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ५२
गोदो पटेल मौजे सेरी याप्रती केसवराय पंडित मजमूम मालिक दिवानआला आशिर्वाद उपरी रघुभटासि व गोविंदभटासि'मौजेमजकुराचे जोइसीचे
वेव्हार होते तेथें चि, निवाड करणे ह्यणौउनु त्यासि तेथे पाठविलेया तुह्मी रघुभटावरी ज्यादती केले हे काय. ह्मणिजे आता हकहुरा व समस्त महजन कसबे करहाड व हकहुवार होउनु धर्मता निवारिता ज्याचे मिरासि होईल त्यासि देवणे अधर्म न कीजे ब्राह्मणाचे घर तुरकासी दिल्हे ह्यणे हे काय आहे आता याचे घर यासी दीजे दुसरेनी फिरीयादी आलेया बरवे नव्हे जाणिजे लिखितदरशणे रघुभटाचे घर रघुभटाचे दुबाला करूनु वेव्हारासि न पाठविसी तरी तू जाणेसी पटेलगी करूनु वाईट काम हाती धरणे हराम आहे ते हे बरवे नव्हे याचे असबाबू घर देउनु याचे दुबाला करूनु खुर्द वेव्हारसी पाठविजे मोर्तबू