Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक ५१

साक्ष कामाक्षी वा हनुमत वा
क्रुस्णाभागीरथी
मल्हारजी गोदाजी सही [निशाणी नागर आकृति]

 स्वस्ति श्री सके १४६४ वरीख सुभक्रुत नाम सवछरें फळगुण वदी तेरसू वारु सणी तदीनी मौजे करुवे थळ गोदोजी बिन देको पटैळू वा ++++ को पटैळू बिन वासुदेउव पटैळ वा रवळ जयेक बिन काव जयेक वा नमादेऊ बिन रमागुडी व चिळोदेऊ बिन कमाल गुडी वा माद पुजगुडी बिन ऐदू गुडी व कान्ह जयेक बिन एळू गुडी वा माद गुडी बिन डाई गुडी वा एकदेऊ बीन रूपगुडी हे मुख करुनु समस्ती क्रिस्णा भट भान भट गीजरे सी लिहुनु दिले व्रीतीपत्र ऐसे जे तुमचया वडिले सी आमचेया वडिलानी पूर्वानिपूर्वी जोतिसव्रीती दीली होती तैसी ची आता आह्मी तुजदीली असे तुवा आपुले लेकुरा चे लेकुरी वीर्ती चालविजे हे आमचया वडिला चे सत्या भाक हेयाबोला सि अनेथा नही.

गोही

डाया बिन लखमण सुतारु करुवे                 लाहिया नेमदेऊ न्हावी करुवे
तान्हा बिदू डोई गुडी तरळ करुवे               सेदा दरणे बीन पोमा दरणे करुवे
भीकु लाहीया अहीर करुवे                        माळ दरणे बीन रीवा दरणे करुवे
तुका बीन साया गाव्हर करुवे                    साया लुया गाव्हरु करुवे

मीया आबास साहेबू हवाल करुवें
क्रोस्णोबा नरसीबा सेणवी मौजे करुवे
लिखिते पिलोबा भानोबा कुळकर्णी करुवे
चदनं मांदा मादई जमादारु करुवे
+ + + सेटी बीन दामो सेटी
+ + ळ कसबे करड सही

लेखांक ५०

(3) क-हाड-गिजरे

[फारसी दोन ओळी]
साक्षी कामाक्षा तथा हानुमानू
[नागराचे चिन्ह]

 श्री स्वस्ति श्री साकु १४२९ वरीखे परभा वछरे आस्विनु वादि पचमी आद्यातवारु तेया दिवसी करुवे थाळ देको पाटैलु बीन इनाएकु पाटैलु वा खेळो पाटैलु वा नेगो पाटैलु वीगकरु वा वाटगुडी पिसळ वा साईदे पाटैलु वा तुकतेऊ वा रामीदेऊ वा सोनु गुडी वाडिका वाडिगा गुडी पु हे मुख्य करुनु सामास्ता पाटैलु गिजरेया भानाभट गोविदभटे सी वर्तीपत्र जोतिक आमचे गावी ची जैसी पूर्वी आमचा वडिले तुह्मा सी दिल्ही होती तैसी ची आह्मी दिल्ही ते तुवा आपुली (या) लेकुरा चा लेकुरी चालावीजे हे आमा ची सत्या हेया बोला सी आन्यथा नाही.

गोही

कानोजी मरारजी चोरडे                   एकोजी केसोज साळीवा सोl
मादा उदोबा सेटी करुवे                  निगुडी पाl सातारे
मायी नाईक करुवे                         पुरखादेऊ मोईगुडी सोl करुवे बाबू
लाखुमण बाळो सुतारु करुव            डोईगुडू ताराळू करुवे माळ दुदुमी
भाई सेटी याईसेटी सोनारु कारुवे      माळ दुदुमी सेटी मेहतरी कारुवे
राघो तुकदेऊ पाl सेडे तळघाटू

खडो पलिदेऊ कुळकर्णी रामरामे
नगरकुलकर्णी कll क-हाड सही
मालिक चदन साहेबु हवल करुवे
गुडो अतोबा निसिदा कारुवे

लिखिते भानोबा राघोबा
कुळकरणी कारुवे
पत्राप्रमाणे साक्ष्य अतो लाहीदेऊ

लेखाक ४९
१६२५ वैशाख वद्य ११

श्रीशकर 


  वेदमूर्ति राजमान्य राजश्री गोविंदभट रेमणे नामजाद व कारकून वर्तमान व भावी तपे देवरूख यासि परशराम त्र्यबक प्रतिनिधी नमस्कार सुहूर-सन सलास मया व अलफ माl तानकोवानाईक बिन कान्होवानाईक देसाई ताl मजकूर हुजूर येऊन विनंती केली की आपणास हक व इनामत चालत आहे तेणे करून अवकात चालत नाही आपण कटुबवछ(ल) आहे स्वामीच्या पायशी निष्ठेने वर्तणूक करीत आहो अशास स्वामीनी वरकड वतनदारास हक इनामती जाजती करून स्थापना केल्या आहेत तर श्वामीनी कृपाळू होउनु पेशजी चालत आहे त्या खेरीज जाजती इनामती करून देउन वतना वरी स्थापना होऊन योगक्षेम चाले यैसे केले पाहिजे ह्मणुनी त्यावरून मनास आणून तानकोवा-नाईक देसाई ताl मजकूर याणी एकनिष्ठपणे वर्तोन स्वामिसेवा केली खटपटे आणि कुटुंबवछल आहेत याचे चालवणे अगत्य या करीता कृपाळू होऊन पेशजी हक मोईन करून दिल्ही आहे ते व इनामत दोन बिघे चालत आहे त्या खेरीज हाली नूतन इनाम पडजमीन पैकी राजश्री अनाजीपताचे कारकीर्दीस जमिनीस धारा गलेयास नीर्ख असेल त्या प्रमाणे इनाम खेरीज दाभोली लारी १०० एके से रास इनाम देविले आहे तरी तुह्मी ताl मजकूर पैकी सदरहू बेरिजेची जमीन हकदार ईनामदार खेरीज करून कुलबाब कुलकानू देखील हालीपटी व पेस्तर पटी चालू प्रतीची पडजमीन नेमून देऊन चतु सीमा करून देऊन याचे दुमाले करणे त्याची कीर्द करून उपभोग करितील यासी व याचे पुत्रपौत्रादि वशपरपरेने इनाम चालवणे साल दर साल ताजे सनदेचा आक्षेप न करणे या पत्राची तालीक लेहून घेउनु मुख्य पत्र नाईक माlरनुले जवलि परतोन भोगवटियास देणे जाणिजे छ २४ जिल्हेज पाl हुजूर

बार     सुरु सूद      बार

लेखाक ४८
१६१८ आषाढ वद्य १

+ + + अनत सरसुबेदार व कारकून वर्तमान व भावी सुभा प्रात राजापूर गोl

 अखडीतलक्ष्मी अलकृत राजमान्य

सेवक रामचद्र नीलकठ अमात्य नमस्कार सुहूरसन सबा तिसैन अलफ तानकोवा-नाईक देशमुख तपे देवरुख याणी हुजूर येऊन विदित केले की राजश्री कैलासवासी छत्रपती स्वामीस देश अर्जानी जालिया वरी मुलकातील वतनदाराचे हक व इनामती दिवाणात अमानत केलिया बराबरी आपला हि हक व इनाम अमानत करून रयतनिसबतीने हक दाभोली लारी २०० दोनी से करून दिल्हा त्या प्रमाणे चालत आहे ऐसियासि हाली मुलूख खराब पडला या करिता सारा हक पावत नाही त्या वरून साल गुदस्ता यासी पडी जमीन भात मली जमीन बिघे ३ तीन याच्या थळा मध्ये देवविली होती त्या पैकी काही मा + + + जमीन देवविली आहे परतु तेणे करून आपला औकात चालत नाही या करिता स्वामी कृपालू होऊन आपला हक आहे त्या खेरीज इनाम देवविला पाहिजे ह्मणौन तपसिले विदित केले त्या वरून मनास आणून हे एकनिस्ठ जाणोन यास मध्ये जमीन देवविली आहे ते दूर करून + + चा हक रयतनिसबती दोनी से लारी आहेत त्या करार करून त्या खेरीज + + + भात मली जमीन बिघे २ दोनी अवल दूम सीम तीन ही प्रतीची +++ नेमून देवविली आसे तरी सदरहू प्रमाणे दोनी बिघे जमीन भात मली नेमून देऊन यास व याचे पुत्रपौत्रादि वौशपरपरेस चालवीत जाणे सदरहू जमीन देवविली आहे या पैकी साल गुदस्ता याच्या हका मध्ये जमीन देवविली होती त्या पैकी माहालीहून जमीन नेमून दिल्ही असेल त्याची कीर्दी साल मजकुरा कारणे याणी केली असेल ते जमीन वजा करून उरली जमीन पडीपैकी + + + + हून नेमून देऊन चालवीत जाणे नवीन पत्राचा आक्षेप साल दर साल करीत नव जाणे तालीक लेहोनु घेऊन असल पत्र परतून भोगवटियासि देशमुख मजकुरा जवलि परतून देणे जाणिजे छ १४ जिल्हेज सदरहू दोनी बिघे जमीन इनाम देवविली आहे या पैकी ह्या मध्ये जमीन देवविली होती त्या वरी कीर्दी केली असेल ते जमीन वजा करून उरली जमीन पडी पैकी देणे निदेश समक्ष

 

बार       सुरू सूद      बार
पौl         छ १६         रविलाखर

लेखाक ४७ 
१६१६ आषाढ शुद्ध ७ 

श्री

अज दिवाण ठाणा तपे देवरूख ताl रयानी व ह्माडिगे मौजे उजरे खुर्द ताl + + सुll खमस तिसैन अलफ बदल देणे वृत वेदमूर्ति मादेभट बिन हरभट पुरोहित गोत्र कौसिक आस्वलायन सूत्र + + + स्थल मौजे मजकूर पैकी बाl सनद सुभा छ २० रमजान साल गुll तेथे आज्ञा की वेदमूर्ति भट गोसावियानि राजश्री छत्रपती स्वामी संनिध चजीचे मुकामी जाऊन आपणास वृत करून दिली पाहिजे ह्मणौनु विनति केली त्या वरून राजश्री स्वामीने मनास आणिता बहुत भले ब्राह्मण सिष्ट सत्पात्र देखोन यासि नूतन वृति करून दिली तपे मजकूर पैकी दाभोली लारी २०० दोनसे लारीची वृति करून दिली ऐसीयासी ब्राह्मण सिष्ट आहेत यासि पुत्र पोत्री चालिले पाहिजे या करिता यासि धर्मादाय पावत होता तो दूर करून सदरहू दोनसे पैकी हाली करार दाभोली लारी १०० एकसे लारीची वृती ,करार केली असे राजश्री अनाजीपताचे कारकीर्दीस जमिनीसि धारा व गलियासि निर्ख आहे त्या हिसेबी शभर लारीची पड जमीन चतु सीमा करून नेमून देणे ह्मणौनु राजश्री पडितराऊ याही लिहिले आहे त्या वरून सदरहू संभर लारीची वृती देविली असे सदरहू तहप्रमाणे पडजमीन मौजे उजरे खुर्द पैकी नेमून देणे सालमजकुरा पासून लागवड करून योगक्षेम चालवितील या प्रमाणे भट गोसावियासि पुत्रपौत्री पालीत जाणे सदरहू जमिनीच्या चतुसीमा करून सुभा लिहोन पाठवणे या प्रमाणे सनद सादर होईल ह्मणौनु आज्ञापत्र सादर होईल त्या वरून मौजे मजकूर पैकी पड जमीन स्थल गौलवाडा नेमून दिला असे चतुरसीमा

पूर्वेकडेस तलवडेचे परयापासून मारगा पावे तो सीमा मरग अरवली नजीक पाई व गोठण सीमा उतरे कडेस वेतालाची मली व ह्माराडी पासून तहद चोरपरया देवरूख सीमा पस्चमेस मारग व आखडका नजीक तहद सीमा परया तलवडी सीमा दक्षणेस चोरपरिया देवरुखची सीमा पासून तहद वेतालाची मली व ह्माराडी पावेतो सीमा

येकूण जमीन चावर पाच हाताचे काठीने ०l९ २ll पैकी वजा खडक झाड अजमासे ३lll१॥ बाकी जमीन ०l५l१ येकूण गला दसेरी ३ll०lll० एकूण एक बेरीज दाभोली लारी

जमीन मोजमाप 

एकूण गला दसेरी खडी तीन खडी पाउणे अकरा मण एकून लारी एकसे एकूण जमीन सवा पचतीस बीघे एक पाड थल गौलवाडा मौजे मजकूर पैकी हद सीमा करून मोजून दिली असे देखील झाड माड दिले असे पुत्रपौत्री चालवीत जाणे वेट बेगार व तडीतकसिमेचा उपसर्ग न लावणे प्रती लिहोन घेऊन असल भटगोसाविया जवल परतून देणे राl छ ५ जिलकाद

लेखांक २४१                                                                                                                                १५७१ ज्येष्ठ शुध्द ३                                                                                            


                                                                                      241

अज रख्तखाने राजश्री सीवाजी राजे दामदौलतहू बजानेबु कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। पुणे बिदानंद सु॥ खमसैन अलफ दरीविळे माहादाजी गोसावी सा। क्षेत्र श्री            मोरेश्वर हुजूर एउनु मालूम केले जे श्रीदेवीच्या देउलानजिक देवाची फुलझाडे लावावयासि जमीन ते मल्हारबा गोसावि आपले बाप व गणेश गोसावि आपले वडील भाऊ चालिले आहे बिघे 305६ सा ता।

देवलापासुनु आग्नी भागी विहीर                        देउळापासून नैरुत्य कोनी
कदीम जमीन बीघे तीन 305३                              वाडियानजीक विहीर जदीद जमीन
                                                                   बिघे तीन 305

एणेप्रमाणे जमीन मुस्तेद करुनु तेथे फुलझाडे लाविली आहेति यासि पहिलेपासुनु भोगवटियाचे कागद नाहीत साहेबी नजर एनायत करुनु हाली सदरहू जमीनीचे अजरामर्‍हामती करुनु खु॥ देविले पाहिजे बिनाबरा इलतमेस खातिरेसी आणुनु श्री मोरयादेव सा। मोरगौ देउलानजीक देवाची फुलझाडे लावयाची जमीन बिघे 305६ ता।

देउलापासुनु आग्नि भागि विहीर                        देउलापासुनु नैरुत्य कोनी वाडिया
कदीम जमीन बिघे 305३                                     नजीक विहीर जदीद जमीन
                                                                   बिघे 305

एणेप्रमाणे जमीन मुस्तेद करुनु फुलझाडे लाविली आहेति हे जमीन देवाच्या फुलझाडाबदल अजरामर्‍हाती इनाम करुनु दिधले असे गावीचे जमीन कुल सदरहू जमीन बा। देणे यासि मुसलमान होउनु इस्कील करील त्यास मकेची सवगद व हिंदु होउनु इस्कील करील त्यास श्री देवाची आण असे दर हरसाल ताजेया खु॥ च उजूर न करणे तालीक घेउनु असेली खु॥ फिराउनु देणे मोर्तब सुदु

                                                       281 1

 

                                                         रुजु सुरुनिवीस

तेरीख १                                                                                 माहे रजब
रजबू

                                                              सुरू सुद

लेखाक ४६
१६०९ पौष वद्य १

श्री 
अखडितळक्ष्मी अलंकृतराजमान्य राजश्री गंगाजी दादाजी
सुबेदार व कारकून प्रात राजापूर गोसावियासि

पूर्वक कविकलश छदोगामात्य आसीर्वाद सुll समान समानीन अलफ तिमाजीनाईक बिन कान्होवानाईक देसाई ताl देवरुख यात व रामाजी गोविंद या मधे वृतीचा कथला लागोन हुजूर भांडत आळे ऐसियास राजश्री छत्रपती स्वामीचा तह आहे की ज्याची वृति तीस पंचतीस साला चाळोन भोगवटा असेल तो च वृतीवत दुसरा कथळा करील तरी त्यास समध नाही त्या वरून राजश्री प्रल्हादपत न्यायाधीश यास सागितळे की याचा करीना तुह्मी चौकसीने मनास आणून निवाडा करणे त्या वरून तिमाजी नाइकाचा व रामाजी गोविंद याचा कथळा न्यायाधीश याणी मनास आणिता तिमाजी नाइकाचा भोगवटा साळाबाद ताl साल गुदस्त पावे तो चाळत आळा आहे यास च वृतीस समध रामाजी गोविंद मधे कथळा करितो त्यास कथळा करावया निसबत नाही । ऐसा निर्वाह करून तुह्मास आपळे पत्र लेहून पाठविले आहे ते मनास आणून त्याच्या पत्रा प्रमाणे वर्तणूक करून जैसे साळाबाद चालत आळे आहे तैसे चालवणे नवी जिकीर होऊ ने देणे तालीक लिहून घेऊन असल पत्र तिमाजी नाइकास देणे जाणिजे छ १४ रबिलोवल पा। हुजूर

बार     सुरु सुद   बार
पौl छ १० रबिलाखर

 

लेखांक ४५
१६०९ पौष शु।। १४

 

देवरुख-देसाई
श्रीतालीक

अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य
राजश्री गगाजी दादाजी सुभेदार व
कारकून प्रात राजापूर गोसावियासि

सेवक प्र-हाद निराजी न्यायाधीश नमस्कार सु॥ समान समानीन अलफ ता। देवरुख येथील देशमुखीचा वेव्हार तिमाजी ना। बिन कान्होवा ना। देशमूख या मध्ये व रामाजी गोविंद या मध्ये वेव्हार लागोन हुजूर भाडत आले हुजूर याचा करीना राजश्री छदोगामात्य याही मनास आणोन निर्वाह केला की राजश्री छत्रपती स्वामिचा तह की ज्याचे वृतीस तीस पसतीस वर्षे भोगवटा चालला असेल तो च खरा दुसरियास कथला करावयासी समध नाही ह्मणौन आज्ञा तरी तिमाजी ना। याचे देशमुखीचा भोगवटा सालाबाद आजी तीस वरसे चालत आला आहे या प्रो। चालो देणे रामाजी गोविंद नवा च कथला करितो त्यास कथला करावयास समंध नाही सालाबाद चालत आहे त्या प्रोl चालो देणे या पत्राची तालीक लेहोन घेऊन असल तिमाजी ना। यासि देणे छ १२ माहे रबिलोवल 

लेखांक ४४
श्रीरामप्रा

सौमित्राचे बाणी इद्रजित निकुबळे पडिला ॥ बाहु तयाचा सुलोचने प्रति सांगू पातला ॥ सुखसमेळीं सति असतां भुज द्वारि पडिला ॥ ओळखिला कर पतिचा जिव सुमतीचा घाबरला॥ हे अकस्मात विज माथा पडली की काय ॥ जशी गार जळाची पडता वीरुनी जाय । कशि गत जाहली प्राणनाथ मज सागा हो तुमची ॥ प्रौढप्रतापी देशधडी तुह्मी केली सुरचमुची ॥ सुलोचना पतिव्रता सुदरा दुहिता शेषाची ॥ इद्रजिताची काता गेली गुढी उभउन येशाचा ॥धृ॥१॥ घेउनी कागद दौत लेखणी भुजे पाशी बसली ॥ कळावा जी मज लिहुन काय गत कोठे ही घडली ॥ प्रेत करे त्या धरुनि लेखणी अक्षरे वर लिहिली ॥ निकुंबळे काळाचि उडि येउनि मजवर पडली ॥ वीर लक्ष्मणाचे बाणी पडले शीर ॥ रुढाची शकलें केली मारुन तीर ॥ शिर घेउन गेले आहे जेथे रघुवर ॥ स्मरण आहे जी भाष जाहाली येकाति तुझि आमुची ॥ वाट पाहात मी उभा राहिलो तव आगमनाची ॥ सुलोचना पतिव्रता ॥२॥ समजला लिखितार्थ मनी गौरीहर आठविला ॥ मृत्युलोकिची वस्ति आमुचा ऋणानुबध सरला ॥ सखीयानी भुज पतिने मजला सुळारि पाठविला ॥ उभा तिष्टतो धनी माझा गे बहुत वेळ जाहाला ॥ हे फोडुनिया भाडार वाटिले धन ॥ शुक साळोंख्या मयुरे दिलि सोडून । लिहिली भिती वर चित्रे करिति रुदन ॥ ह्मणति निर्मिले कोणी उपेक्षा का केली आमुची ॥ कोण कर्म वोढवले तुटली सुखसगत तुमची ॥ सुलोचना ॥३॥ बाहुनिया भुज सीबिके प्रयाण लके प्रति केले ॥ दशाननाने पाहुनि भुज लिखितार्थ वाचिले॥ ह्मणे अद्रुष्ट ह संकट कैचे वो घडले ॥ इद्रजीत सुत निधान माझे मृत्युपथा गेले ॥ हे मदोद 

लेखाक ४३
श्री


करीणा मौजे निवे बुll ताll देवरुख येथील पूर्वापार स्थीत गाव कोणाचा पूर्वी विज्यापुरीहून किले खीलणायासी नवद गाव तनखा देवले हातखबे हरचीरी देवरुख येथे चौकसी.. माहाली नेमून दिल्हा ते काली मामले प्रभावली माहाल मौजे मजकूर हा गाव वेढत असता टोळकृत होऊन आगरे नाबूद जाहाली सारे रयत गाव टाकून देशातरास गेले अकरा वर्षे गाव कुली वोसाड पडिला त्या वरी शके १५०३ व्रशासवत्सरी राजश्री सोमोवानाईक सरदेसाई मामले प्रभावली याणी विज्यापुराहून पातशाहा पासून मौजे-मजकूर इनाम व खोती मिरास करून आणिली आणि गावची लावणी केली गावीचे कदीम रयता परागधा होऊन गेले होते त्या मध्ये पाल्या व कुवलेकर कुणबी व गुरव व म्हार हे गावात आणिले व हातखबे विलायतीहून विठोबा मोघा उर्फ करबलकर त्यास गावात आणून सिध्धेस्वर वाडेयात आगर व सेत भूमी व गावची महाजनकी देऊन ठेविली व ढवला व अमृत्या व खडकार व इतर रयतां आणून वाडीमजकुरा पासून गावची माहामुरी केली व वाडे तीन वसविले मधील वटार व खालील वटारी आगर माडणी केली खा। घर गावात बाधले आगर माहामूर जाहालिया वरी तानो बलाल राजवाडकरी चिपुलणाब्राह्मण गावात आपलिया घरी जागा देऊन आवारीपणास ठेऊन त्याच्या हवाला खा। बाग व सेत केले व गणोवा सेवड्या याचे हवाली खाइल्या आगरी वरी दाहिजाचे आगर करून ठेवला त्या वरी चवीस वर्षे गाव इनामत व खोती नायक माlरनिले कडे चालिली त्या वरी इनामत दिवाणातून दूर जाहाली खोती मीरास नायक यास चालत असे त्याउपरी तानो बलाल राजवाडकर मजकुराचे अनुसधान करून विसोवा राजवाडकर गावात आला त्यास किनरा गोसावियाच्या जागा होता तो घरा बाधावयासी दिल्हा त्या पासून राजवाडकर गावात आहे तानो बलाल राजवाडकर मृत्य पावला त्याचे वसीचे देशातरास गेले त्याचे कोणी नाही याज प्रो। कितेक काल गेले याज वरी दोन वर्षे वलव्यामुले सेते बुडाली व आगरे बुडाली गावआगरी हि आगरे टाकून पलाले जुजवी वस्ती कोणी गावात राहिले त्याज उपरी विसा वर्षी सिवाजी माहाराज याचे राज्य जाहाले ढवलेयाचे आगरावरी रामाजी राजवाडकर करबलकराचे आगरावरी भानजी मधील वटारी हरबा याज प्रो। राहिले खोती देशमूखाचे निा॥ चालत आली सिवाजी माहा(रा)ज येऊन माlरनिलेस भेटोन गावची कमाविसी मागत होते नाईक कमाविसी न सागत मग बालाजी रघुनाथ सेणवी याणी भानजी विठल याचे अगत्य धरून गावची कमाविसी सागावी ह्मणौन बहुत प्रकारे सागीतले त्या वरून नाइकी भानजी विठल यासी कारभार सागीतला व आपण नायकी जाऊन रामभट हरडीकर याज कडील कुणबी घेऊन भानजीचे स्वाधीन केले त्या वरी भानजीने पाच वर्षे गावची कमाविसी चालविली गावचा कारभार न वोढे दिवाणची बाकी राहिली वसूल न पडे तेव्हा भिकाजी विस्वनाथ नायकी आपणा कडून कमाविसीस आपणा जवलून कमाविसीस आपणाकडून ठेविले त्या वरी हगामसीर बाकीचा व कर्ज येणे त्याचा तगादा लागला. तेव्हा कुणबी फिताऊन रयता घेऊन पलोन राजापूर प्राते गेला याचे राज्यात बटाई जाहाली खोतास गावा मध्ये उपजीविका नाही तेव्हा केशवनायक सरदेसाई होते त्याणी गावची खोती नारायणभट हरडीकर व भानजी राजवाडकर यासी चालवावयासी सागीतली ते चालवीत होते मग माहाराज सभाजी राजे याचे राज्यात नरसापा कानडा सुखवस्तू गावात दोन वर्ष राहिला मग त्याणे लबाडी कबजीबावाचे वगीने तीन वर्षे गावची खोती केली गाव न सोडी तेव्हां रगोवानायक सरदेसाई याणी सेवड्या व हरडीकर व राजवाडकर या तीघास गावीहून बोलाऊन आणून त्याज कदीम आगरी सेवड्या पुढे दिवाणात उभा करून वेव्हार सागोन पडतपावसी कानडा याची खोती दूर करून विठोबा सेवड्याचे स्वाधीन कारभार खोतीचे समधे केला त्यास गावचे उगवणीस मध्यस्थ नारभट हरडीकार व भानजी राजवाडकार घेतले त्याउपरी भालेराई जाहाली काही दिवस धामधुमीत चौघाचा रिगाव चालत होता त्या उपरी दोन तीन वर्षे गाव कुली वोसाड पडिला मग राजश्री रामचद्रपती रामाजी गुडेकार यासी चाकरी बदल गाव मुकासा करून दिल्हा तेव्हा राजवाडकर रामाजीचे अर्धल करून होते रामभट व शभुभट हरडीकर बाहेर होते गावात येऊन कुणबाबा देऊन होते पाच सात वर्षी रामाजीचा मुकासा दूर जाहला त्या वरी हरडीकरी व राजावाडकार खोती करू लागले मग राजश्री नीलप्रभु याचे कारकीर्दीस गणोवानायकी त्याची खोती दूर करून सभाजी अनत आबेकर खोतीचे मुतालकीस ठेविले तेव्हा गावी लुकसान आले मागती गणोवा नाइकी रामभट हरडीकर यासी खोती सागीतली त्याणी चौ दिवाणात जावयासी गाठ न पडे याकरिता विठोबा राजवाडकर यास वाटा दिल्हा त्या उपरी ती वर्षानी नारो गोरपाडा याची धामधूम होऊन मुलूक व गावचे लोक परागधा जाहाले तेव्हा विठोबा राजवाडकर बावडे प्रात वेगसरास गेला रामभट हरडीकर च्यार कुणबी होत ते हाती घेऊन देवरुख माहाली राहिले होते त्या उपरी दाहा अकरा वर्षी अतोवा नायकी रामभट हरडीकर यासी गावची लावणी करावयासी सागितली तेव्हा भानजी राजवाडकर वेगसराहून