लेखाक १७
(प्रारभीच्या काही ओळी फाटल्या आहेत)
(सिका फाटका)
सरदेसाई मामले प्रभावली यासि आज्ञा ऐसी जे तुह्मी विनतिपत्र पाठविले ते प्रविष्ट होऊन लिहि +++ विदित जाहाले आपण स्वामीचे पायासी एकनिष्ट + + + णूक करितो याकरिता रागणियाहून आपले अनी बहुता प्रकारे केले तेव्हा (?) कडून श्रमी जालो आहो प्रस्तुत विशालगडा आहो राजश्री कृष्णाजीपत स्वामीचे दर्शनास येतील त्या समागमे दर्शनास येतो आपुले सर्वविशी गोमटे करून चालविले पाहिजे ह्मणोन लिहिले तरी तुह्मी स्वामीचे पायासी निष्ठा धरून वर्तणूक करिता ये गोष्टीने स्वामीस तुमचे विशी चालवणे अवशक आहे तुह्मी आपले समाधान असो देणे तुमचे वेतन स्वामी चालवितील आणि गोमटे करितील राजश्री कृष्णाजी परशराम स्वामीचे दर्शनास येतील त्या समागमे तुह्मी स्वामीचे दर्शनास येणे आणि ऊर्जित करून घेणे तुमचे वतनाचा हक लाजीमा इम चालत असेल तेणे प्रमाणे स्वामीने हि करार केले असे आपले समाधान असो देणे जाणिजे निदेश१ (१ येथून अक्षर निराळ्या वळणाचे) समक्ष
सुरु सूद बार