लेखांक २४१ १५७१ ज्येष्ठ शुध्द ३
अज रख्तखाने राजश्री सीवाजी राजे दामदौलतहू बजानेबु कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। पुणे बिदानंद सु॥ खमसैन अलफ दरीविळे माहादाजी गोसावी सा। क्षेत्र श्री मोरेश्वर हुजूर एउनु मालूम केले जे श्रीदेवीच्या देउलानजिक देवाची फुलझाडे लावावयासि जमीन ते मल्हारबा गोसावि आपले बाप व गणेश गोसावि आपले वडील भाऊ चालिले आहे बिघे ६ सा ता।
देवलापासुनु आग्नी भागी विहीर देउळापासून नैरुत्य कोनी
कदीम जमीन बीघे तीन ३ वाडियानजीक विहीर जदीद जमीन
बिघे तीन ३
एणेप्रमाणे जमीन मुस्तेद करुनु तेथे फुलझाडे लाविली आहेति यासि पहिलेपासुनु भोगवटियाचे कागद नाहीत साहेबी नजर एनायत करुनु हाली सदरहू जमीनीचे अजरामर्हामती करुनु खु॥ देविले पाहिजे बिनाबरा इलतमेस खातिरेसी आणुनु श्री मोरयादेव सा। मोरगौ देउलानजीक देवाची फुलझाडे लावयाची जमीन बिघे ६ ता।
देउलापासुनु आग्नि भागि विहीर देउलापासुनु नैरुत्य कोनी वाडिया
कदीम जमीन बिघे ३ नजीक विहीर जदीद जमीन
बिघे ३
एणेप्रमाणे जमीन मुस्तेद करुनु फुलझाडे लाविली आहेति हे जमीन देवाच्या फुलझाडाबदल अजरामर्हाती इनाम करुनु दिधले असे गावीचे जमीन कुल सदरहू जमीन बा। देणे यासि मुसलमान होउनु इस्कील करील त्यास मकेची सवगद व हिंदु होउनु इस्कील करील त्यास श्री देवाची आण असे दर हरसाल ताजेया खु॥ च उजूर न करणे तालीक घेउनु असेली खु॥ फिराउनु देणे मोर्तब सुदु
रुजु सुरुनिवीस
तेरीख १ माहे रजब
रजबू
सुरू सुद