लेखांक ४५
१६०९ पौष शु।। १४
देवरुख-देसाई
श्रीतालीक
अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य
राजश्री गगाजी दादाजी सुभेदार व
कारकून प्रात राजापूर गोसावियासि
सेवक प्र-हाद निराजी न्यायाधीश नमस्कार सु॥ समान समानीन अलफ ता। देवरुख येथील देशमुखीचा वेव्हार तिमाजी ना। बिन कान्होवा ना। देशमूख या मध्ये व रामाजी गोविंद या मध्ये वेव्हार लागोन हुजूर भाडत आले हुजूर याचा करीना राजश्री छदोगामात्य याही मनास आणोन निर्वाह केला की राजश्री छत्रपती स्वामिचा तह की ज्याचे वृतीस तीस पसतीस वर्षे भोगवटा चालला असेल तो च खरा दुसरियास कथला करावयासी समध नाही ह्मणौन आज्ञा तरी तिमाजी ना। याचे देशमुखीचा भोगवटा सालाबाद आजी तीस वरसे चालत आला आहे या प्रो। चालो देणे रामाजी गोविंद नवा च कथला करितो त्यास कथला करावयास समंध नाही सालाबाद चालत आहे त्या प्रोl चालो देणे या पत्राची तालीक लेहोन घेऊन असल तिमाजी ना। यासि देणे छ १२ माहे रबिलोवल १