Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८०
१६१९ भाद्रपद शुद्ध १
श्री
राजश्री जाधवराऊ सेनापती गोसावी यासि
सकलगुणालकरण अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य श्नेहाकित रामचद्र नीलकठ आसिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीयकुशललेखन करणे विशेष क-हाडक्षत्री बहुत थोर सिस्ट ब्राह्मण आहेत त्यास राजगृहीहून धर्मादायाचा विभाग पावोन योगक्षेम त्या ब्राह्मणाचा चालत नाही याकरिता हाली सैदापूरगाव होता त्यास सीवापूर नाव ठेऊनु समस्तब्राह्मणांस अगृहार करून गाव दिल्हा आहे तरी तुह्मी आपले तर्फेने मौजेमजकुरास कोणे हि गोष्टीचा उपसर्ग न लागे ते गोष्ट करवणे वरकडहि सरदारास ताकीद करून कोणचा हि उपसर्ग न लागे असी गोष्ट करणे अवघे ब्राह्मण मिलोन अगृहार अनभऊनु राजयास अभ्युदय चितीत असी गोष्ट केली पाहिजे छ २९ मोहरम बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ७९
१६१९ भाद्रपदशुद्ध १ शनिवार
श्री
श्रीसकलगुणमडित अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य राजश्री भानजी गोपाळ मुख्य देशाधिकारी व देसलेखक वर्तमान भावी सुभा प्रात क-हाड गोसावी या प्रती श्रीकराचार्य पडितराऊ आश्रीवाद राज्यभिशेकशक २४ ईश्वरनामसवत्सरे भाद्रपदसुध प्रतिपदा मदवासरे वेदमूर्ती वीरेश्वरभट बिन विस्वनाथभट गिजरे सेकीन कसबे क-हाड हे राजश्री छत्रपती श्वामीचे तीर्थपुरोहित यासी आज्ञा केली जे श्रीचा अभिशक बारा महिने करावा तेणेकरून राजश्री छत्रपती श्वामीचे कल्याण व राज्याचे कल्याण व्हावे ह्मणौन वेदमुहुर्तीस अभिशेक सागितला त्यासी उपजीवकेस ईनाम जमीन दर सवाद मौजे सैदापूर उर्फ मौजे सीवापूर तेथे जमीन बिघे तीस देविले आहेत वेदमुहुर्तीचे दुमालेकरणे कुलबाब कुलकानू हालीपटी व पेस्तरपटी दुमाले केले आहे सदरहू जमीन वेदमुहुर्तीचे श्वाधीन करणे ते भुमीचा उपभोग करून घेतील प्रतिवरसी नूतनपत्राचा आक्षेप करीत नव जाणे प्रती लेहून घेऊन मुख्यपत्र वेदमुहुर्तीपासी परतून देणे छ २९ मोहरम सुहुरसन समान तिसैन अलफ पा । हुजूर हे आशीर्वाद
बारसूद
पौ छ ५ माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ७८
१६१९ श्रावणवद्य ८ नतर महिन्याभरानें
श्री कृस्णा
अज सरसुभा राजश्री भानजी गोपाल सरसुबेदार व कारकून सुबा प्रात क-हाड
ताहा मोकदम मौजे सिवापूर पा। क-हाड सुहुरसन समान तिसैन अलफ बा। सनद राजश्री छत्रपति स्वामी छ २१ मोहरम शके २४ ईश्वर नाम सवत्सरे श्रावण बहुल अस्टमी गुरुवासरे व बा। सनद राजश्री पडितराऊ छ २१ मोहरम पैवस्तगी छ १२ सफर तेथे आज्ञा केली ऐसी जे कसबे क-हाड ए स्थलीच्या ब्राह्मणास पूर्वी आदलशाहाचे कारकीर्दीस कितेक वृत्ती होत्या त्यास अलीकडे तीर्थरूप माहाराज राजश्री कैलासवासी छत्रपती स्वामीस देश अर्जानी जाला त्याही कुल वतनदाराच्या वृत्ती अमानत केल्या त्या बराबरी ब्राह्मणच्या हि वृत्ति अमानत करून ब्राह्मण पाहोन त्यास धर्मादायाची मोई करून दिल्ही होता त्या प्रमाणे चालत आले साप्रत धामधूम जाली त्या मुले देश खराब पडला यास्तव देवविल्या धर्मादाया प्रमाणे चालत नाही ह्मणून हे ब्राह्मण कष्टी होताती असीयासि हे राज्य ह्मणजे म-हास्ट देवा ब्राह्मणा चे आहे एथे इ इ इ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५२
अज रख्तखाने खोदायवंद समसीखान खूलीदयामदौलतहू + + + बिदानद सु॥ सलास + + + अलफ इ. इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५१ श्री १६३३ आषाढ वद्य ६
आज्ञापत्र समस्तसेनाधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री जयसिंग जाधवराऊ सेनापती ता। मोकदमानि मौजे मोरगाऊ ता। कर्हेपठार प्रा। पुणे सु॥ इसन्ने असर मया व अलपु मौजे मजकुरी रा। जनार्दन गोसावी याचा इनाम पूर्वीपासून चालत आहे त्यास कुलकानु व हकदार जो। वेठी माफ असता सांप्रत तुह्मी उपसर्ग लाविता ह्मणून विदित जाहाले तर पूर्वापार यास माफ असतां हाली नवी कानू करावयास कायी गरज हे रीती बरी नाही याजउपर पूर्वीपासून जनार्दन गोसांवी याचे चालत आले असेल तेणेप्रमाणे चालवणे वेठी जेठा व बाजे कानूकाननातीचा उपसर्ग न देणे छ १९ जनादिलावल मोर्तब सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५० श्री १६२३ आषाढ शुध्द १२
रसीद ता। जगंनाथ गुमास्ते मोजे सिपोर प्रा। रासीन सु॥ सन ११११ बिदानद की महजर सिपोराचा केला होता तो तुह्मी आणून कल्हारगौचे मुकामी दिल्हा तो पावला छ १० सफर मा। सूद सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४९ श्री १६०३
राजश्री वेंकाजी जिवाजी हवालदार व कारकून ता। करेपटार गोसावी यासि
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य सो। विनायक उमाजी देशाधिकारी व देशलेखक प्रांत पुणे नमस्कार सुहुरसन इसने समानैन अलफ सीवाजी गोसावी मोरेस्वरकर हुजूर एऊन मालूम केले जे इ. इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७७
१६१९ श्रावणवद्य ११ सोमवार
श्री
श्री सकल-गुण-मडित वेदशास्त्रसपन्न राजमान्ये
राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्र क-हाड स्वामीचे सेवेसी
विनती श्रेहपूर्वक राजा कर्ण भोसले देसमूख व सरदेसमूख पा। मजकूर दडवत सु॥ समान तिसैन आलफ तीर्थ-स्वरूप राजश्री छत्रपति स्वामी कृपाळू होऊन मौजे सैदापूर पा। क-हाड याचे नाव शिवापूर ठेऊन अग्राहर करून देणे ह्मणऊन राजेश्री रामचद्र पडित अमात्य यास - आज्ञा केली त्यावरून त्यानी सर्वमान्य आग्रहर करून दिल्हे ऐसे असता तुह्मी समस्त ब्राह्मण आह्मापासी येऊन विदित केले की स्वामीची देसमुखी व सरदेसमुखी मौजे मजकुरी हक आहे तो आपणास धर्मादाऊ दिल्हा पाहिजे ह्मणऊन विदित केले त्या वरून तुह्मास देसमुखी व सरदेसमुखी याचा जो हक आहे तो तुह्मास धर्मादाऊ करून दिल्हा असे ऐसीयास तुह्मी वौसपरपरेने पुत्रपौत्री भक्षून अह्यास व राजेश्री छत्रपति श्वामीस कल्याण चितून सुखरूप राहणे यासि अन्यथा करील त्यास धर्मशास्राची वचने आहेत
स्वदत्ता पर दत्ता वा योहरे स्वदत्ता द्विगुण पुण्य
च्च वसुंधरा । श्वधिष्ठा पर-दत्तानु-पालन।।
या कृमी भूत्वा पितृभि परदत्तापहरण स्वदत्त
सहमज्जति ॥१॥ निष्फल भवेत्॥
ऐसी पातके स्मरोन यासि कोणी कथला करणार नाही तुह्मी सुखरूप राहणे श्वस्ति श्री शके २४ ईश्वर नाम सवत्सरे श्रावण वदी एकादसी इदु वासरे तारिख २४ मोहरम बहुत काये लिहिणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४८
अजरख्तखाने राजश्री बजाजी नाईक साहेब ताहां कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि तपे करेपठार पा। पुणे सु॥ इसन्ने समानेन अलफ सन १०९१ दरवज बो। सिवाजी गोसावी वलद गणेशभट सेकीन मोरेस्वर हुजूर एउन मालूम केले जे इ. इ. इ.
तेरीख २५
रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ७६
१६१९ श्रावणवद्य ८ शुक्रवार
श्री
जाबीता राज्याभिषेकशके २४ ईश्वर नाम सवत्सरे श्रावणवदी आस्टमी भृगुवासरे पुरातन नाम मौजे सैदापूर हाली सीवापूर नाव ठेऊन श्रीक-हाड क्षेत्रवासी समस्त ब्राह्मणासी खेरीज पुरातन ईनामदार व हकदार करून पुरातन सीमा पुस्ता राजश्री पत अमात्य यानी कृष्णाककुद्मतीसगमी सहिरण्यकुशोदक अग्रहार करून दिले त्याचे नेमणुक नावनिसीवार करून दिल्हे त्या प्रा। पाववावे मौजे मजकूर अदलशाहाचे कारकीर्दीस चावरातीचे मोईन प्रा। अज् जमीन बा। धुरुंग झाडा चावर १९
माहाल मजकूर व बाजे खर्च
माहाल मजकूर होनु बाजे खर्च अग्रहारची खटपट करावी ३४ तुबार दर माहे देखील लिहिणार व कागद करून आणावे लागताती १ अफराद दर माहे यासी दससेरी सो । ४ खडी जो कार्येभागासी, जातील येतील त्यानी येकून च्यार होनु : - यथाविभागे वाटोन घ्यावे येकूण नेमणूक प्रा। मौजे मजकुरीचे उत्पन वाटून घ्यावे व मौजे मजकुरी वसातीमुले मोहतर्फा व नख्तबाब घरटका व पुसटका व नदीशकर व तरकारी व रोकडा व जकायत व वोरनवी व बाजे उत्पन होईल ते ब्राह्मणानी नेमुणूक प्रा । येथा विभागे वाटोन घ्यावे ब्राह्मणा वेगले कोणास घ्यावयास ग्रज नाही सु।। समान तिसैन अलफ छ २१ माहे मोहरम