लेखाक ४८
१६१८ आषाढ वद्य १
+ + + अनत सरसुबेदार व कारकून वर्तमान व भावी सुभा प्रात राजापूर गोl
अखडीतलक्ष्मी अलकृत राजमान्य
सेवक रामचद्र नीलकठ अमात्य नमस्कार सुहूरसन सबा तिसैन अलफ तानकोवा-नाईक देशमुख तपे देवरुख याणी हुजूर येऊन विदित केले की राजश्री कैलासवासी छत्रपती स्वामीस देश अर्जानी जालिया वरी मुलकातील वतनदाराचे हक व इनामती दिवाणात अमानत केलिया बराबरी आपला हि हक व इनाम अमानत करून रयतनिसबतीने हक दाभोली लारी २०० दोनी से करून दिल्हा त्या प्रमाणे चालत आहे ऐसियासि हाली मुलूख खराब पडला या करिता सारा हक पावत नाही त्या वरून साल गुदस्ता यासी पडी जमीन भात मली जमीन बिघे ३ तीन याच्या थळा मध्ये देवविली होती त्या पैकी काही मा + + + जमीन देवविली आहे परतु तेणे करून आपला औकात चालत नाही या करिता स्वामी कृपालू होऊन आपला हक आहे त्या खेरीज इनाम देवविला पाहिजे ह्मणौन तपसिले विदित केले त्या वरून मनास आणून हे एकनिस्ठ जाणोन यास मध्ये जमीन देवविली आहे ते दूर करून + + चा हक रयतनिसबती दोनी से लारी आहेत त्या करार करून त्या खेरीज + + + भात मली जमीन बिघे २ दोनी अवल दूम सीम तीन ही प्रतीची +++ नेमून देवविली आसे तरी सदरहू प्रमाणे दोनी बिघे जमीन भात मली नेमून देऊन यास व याचे पुत्रपौत्रादि वौशपरपरेस चालवीत जाणे सदरहू जमीन देवविली आहे या पैकी साल गुदस्ता याच्या हका मध्ये जमीन देवविली होती त्या पैकी माहालीहून जमीन नेमून दिल्ही असेल त्याची कीर्दी साल मजकुरा कारणे याणी केली असेल ते जमीन वजा करून उरली जमीन पडीपैकी + + + + हून नेमून देऊन चालवीत जाणे नवीन पत्राचा आक्षेप साल दर साल करीत नव जाणे तालीक लेहोनु घेऊन असल पत्र परतून भोगवटियासि देशमुख मजकुरा जवलि परतून देणे जाणिजे छ १४ जिल्हेज सदरहू दोनी बिघे जमीन इनाम देवविली आहे या पैकी ह्या मध्ये जमीन देवविली होती त्या वरी कीर्दी केली असेल ते जमीन वजा करून उरली जमीन पडी पैकी देणे निदेश समक्ष
बार सुरू सूद बार
पौl छ १६ रविलाखर