लेखांक ५१
साक्ष कामाक्षी वा हनुमत वा
क्रुस्णाभागीरथी
मल्हारजी गोदाजी सही [निशाणी नागर आकृति]
स्वस्ति श्री सके १४६४ वरीख सुभक्रुत नाम सवछरें फळगुण वदी तेरसू वारु सणी तदीनी मौजे करुवे थळ गोदोजी बिन देको पटैळू वा ++++ को पटैळू बिन वासुदेउव पटैळ वा रवळ जयेक बिन काव जयेक वा नमादेऊ बिन रमागुडी व चिळोदेऊ बिन कमाल गुडी वा माद पुजगुडी बिन ऐदू गुडी व कान्ह जयेक बिन एळू गुडी वा माद गुडी बिन डाई गुडी वा एकदेऊ बीन रूपगुडी हे मुख करुनु समस्ती क्रिस्णा भट भान भट गीजरे सी लिहुनु दिले व्रीतीपत्र ऐसे जे तुमचया वडिले सी आमचेया वडिलानी पूर्वानिपूर्वी जोतिसव्रीती दीली होती तैसी ची आता आह्मी तुजदीली असे तुवा आपुले लेकुरा चे लेकुरी वीर्ती चालविजे हे आमचया वडिला चे सत्या भाक हेयाबोला सि अनेथा नही.
गोही
डाया बिन लखमण सुतारु करुवे लाहिया नेमदेऊ न्हावी करुवे
तान्हा बिदू डोई गुडी तरळ करुवे सेदा दरणे बीन पोमा दरणे करुवे
भीकु लाहीया अहीर करुवे माळ दरणे बीन रीवा दरणे करुवे
तुका बीन साया गाव्हर करुवे साया लुया गाव्हरु करुवे
मीया आबास साहेबू हवाल करुवें
क्रोस्णोबा नरसीबा सेणवी मौजे करुवे
लिखिते पिलोबा भानोबा कुळकर्णी करुवे
चदनं मांदा मादई जमादारु करुवे
+ + + सेटी बीन दामो सेटी
+ + ळ कसबे करड सही