लेखाक ४६
१६०९ पौष वद्य १
श्री
अखडितळक्ष्मी अलंकृतराजमान्य राजश्री गंगाजी दादाजी
सुबेदार व कारकून प्रात राजापूर गोसावियासि
पूर्वक कविकलश छदोगामात्य आसीर्वाद सुll समान समानीन अलफ तिमाजीनाईक बिन कान्होवानाईक देसाई ताl देवरुख यात व रामाजी गोविंद या मधे वृतीचा कथला लागोन हुजूर भांडत आळे ऐसियास राजश्री छत्रपती स्वामीचा तह आहे की ज्याची वृति तीस पंचतीस साला चाळोन भोगवटा असेल तो च वृतीवत दुसरा कथळा करील तरी त्यास समध नाही त्या वरून राजश्री प्रल्हादपत न्यायाधीश यास सागितळे की याचा करीना तुह्मी चौकसीने मनास आणून निवाडा करणे त्या वरून तिमाजी नाइकाचा व रामाजी गोविंद याचा कथळा न्यायाधीश याणी मनास आणिता तिमाजी नाइकाचा भोगवटा साळाबाद ताl साल गुदस्त पावे तो चाळत आळा आहे यास च वृतीस समध रामाजी गोविंद मधे कथळा करितो त्यास कथळा करावया निसबत नाही । ऐसा निर्वाह करून तुह्मास आपळे पत्र लेहून पाठविले आहे ते मनास आणून त्याच्या पत्रा प्रमाणे वर्तणूक करून जैसे साळाबाद चालत आळे आहे तैसे चालवणे नवी जिकीर होऊ ने देणे तालीक लिहून घेऊन असल पत्र तिमाजी नाइकास देणे जाणिजे छ १४ रबिलोवल पा। हुजूर
बार सुरु सुद बार
पौl छ १० रबिलाखर