Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९०
१६२४ मार्गशीर्ष शुद्ध ११
कौलनामा अज दिवाण ठाणा पा। कराराबाद ता। मोकदमानि व रयानि मौजे सैदापूर प्रा। मा। सु।। सन १११२ कारणे दादे कौलनामा लिहून दिला ऐसा जे देसक हजूर येऊन जाहीर केले जे मोजणीमुळे टका देवत नाही रकमालियाचा च्यार साला कौल सादर केलिया गाव आबाद करून रकमा कौला प्रा। भरून देऊ ह्मणऊन बराये अर्ज खातिरेसी आणून मौजे मजकुरास कौल सादर केला असे जे इ।। सन ११११ ता। सन १११४ कारणे रकमाली भरून देणे बा।/
सन ११११ सन १११२ सन १११३ रु सन १११४ रु
१९४।- ३८६।।। ५८३।- ११३।।-
येणे प्रो। सदरहू सालदरसाल बेरीज देऊन गाव कीर्द मामुरी करून सुखे असणे दरी बाब कौल असे जाणिजे मोर्तब सुद
तेरीख ९ माहे रजबु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८९
१६२४ अधिकज्येष्ठ वद्य ११
अजदिवाण ठाणे मसूर ता। मोकदमानी व रयानी मौजे सैदापूर ऊर्फ सीवापूर पा। क-हाड सु॥ ११०७ मालूम दानद की मौजे मजकूर कुलबाब कुलकानू ब्राह्मणास ईनाम करून दिल्हे असे मौजे मजकुरी जे जमा आकार होईल ते ब्राह्मणास दिल्ही असे ये बाबे हिला हरकती न करणे दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे मोर्तब
तेरीख २४ माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८८
१६२३ माघवद्य ८
श्रीशकर
सौजन मोकदमानि मौजे सैदापूर प्रा। क-हाड यासि बहिरो राम गुमस्ते व कारकून दि।। रा। गिरजोजी यादव देसमूख प्रा। मजकूर सु।। ११११ मौजे मजकूर हक सालमजकूर देणे ऐसीयास मौजेमजकूर राजश्री वेदमूर्ती ब्राह्मण क्षेत्र यासी अघ्रार आहे यदा पाऊस होऊन पिका माफक पाऊस नाही ह्मणऊन नापीक जाहले गावामधे तारा नाही गावामधे अघ्रार समधे ब्राह्मणास काही प्राप्त नाही थोर ब्राह्मण योग्य त्यास क्षुद्र उपद्रव करिता येत नाही ह्मणऊन हक सालमजकूर नापिकाकरिता नख्त रुपये ११ अकरा रास केले असे तरी सदरहू रुपये घेऊन पावलियाचे सनद देणे जाणिजे छ २१ रमजान मोर्तब सुद
मोर्तब
सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८७
१६२१ भाद्रपदवद्य ११ शनिवार
श्रीस्वस्ति श्री राज्याभिषेकशके २६ प्रमाथी नाम सवत्सरे भाद्रपद बहुल येकादसी मदवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजाराम छत्रपति याणी वेदमूर्ती मोरेश्वरभट गिजरे यासि आज्ञा केली अैसी जे तुह्मी स्वामी समीप येऊन विदित केले की राजश्री कैलासवासी स्वामीने आपले पत्र विश्वनाथभट गिजरेयास क-हाड क्षेत्र सनिध कृष्णाकोयना ++ दा नदी येथील तीर्थपुरोहितपण आपले वृती करून देऊन इनाम करून दिल्हे ते धामधुमे करिता गेले तरी स्वामीने आपले नाव पत्र करून दिल्हे पाहिजे व आपणास स्वामीने उभयता नदीचा नित्याभिषेक दिल्हा आहे त्यास मौजे शिवापूर ता । क-हाड हा गाव क्षेत्रीचे ब्राह्मणास अग्रहार करून दिल्हा आहे तेथे यथाविभागे काही ईनाम देविला पाहिजे ह्मणोन विनती केली यावरून स्वामी तुह्मावरी क्रुपाळू होऊन कृष्णावेण्या येथील आपले तीर्थउपाध्येपण स्वामीने तुह्मास करार केले असे तरी तुह्मी पुत्रपौत्रादिवषपरपरेने चालवीत जाणे व तुह्यास उभयता नदीचा नित्याभिषेक सागितला आहे यास्तव मौजे शिवापूर पैकी तीस बिघे ईनाम दिल्हा असे सनद राजश्री श्रीकराच्यार्य पडितराउ याची सादर आहे तेणेप्रमाणे ईनामाचा उपभोग करून सुखरूप असणे जाणिजे निदेश समक्ष
रुजू सुरू निविस
सुरू सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८६
१६२१ आषाढशुद्ध १० सोमवार
श्री
वेदशास्त्रसपन राजमान्ये राजेश्री समस्त ब्राह्मणसमुदाये अग्राहार
मौजे सीवापूर वा। क-हाड गोसावी यासी
श्रेहाभिलासी श्रीकराच्यार्ये पडीतराये नमस्कार प्रमाथीनाम सवत्सरे आशाडसुद दशमी इदुवासरे तुह्मी समीप येऊन विदित केले की मौजे मजकूर अग्राहार अह्मास समस्त ब्राह्मणास आपण विभाग करून दिला त्याचे नावनिसीवार जाबीता करून दिला आहे त्या मध्ये ऐसियास ग्रामसमधी कार्येभाग आमचे राजग्राहास व लस्करास व परमुलकी राजग्रहास ब्राह्मणानी जावे लागते जे समई ज्या कार्या कारणे जावे ते कार्ये होये जे तोवरी ब्राह्मणास वेचखर्च लागतो त्या बद्दल वरशास मध्ये सदिलवार खर्च नि॥ भट ब्राह्मण गला खडी दसेरी सोळुले मापे ३४ तीन खडी नेमून दिला आहे त्यासी कार्येभागाचे समई कार्या कारणे भलते येका ब्राह्मणास जा ह्मटिले तरी त्यासी कदाचित् अनकूल पडते कदाचित् पडत नाही तेव्हा कार्येभागास अतर पडते या निमित्य त्या कार्यास आह्मी समस्तानी समते करून ब्राह्मण नेमिले आहेत
बाबदेवभट बिन महादेभट बिन नरसीभट बिन
अतभट निलकठभट गीजरे विस्वरूपभट खीरसागर भट अरणके
१ १ १
महादेभट बिन चवडभट ढवलीकर महादेभट आप्पाभट गिजरे १
१
मलारजोसी बिन गोविंदभट जोसी गोपालभट बिन गोविदभट टोणपे १
१
येणे प्रमाणे सात जण नेमिले आहेत याचे नावे सदरहू तीन खडी गला यथाविभागे नेमून दिल्हा पाहीजे तेणे कडून तो खर्च खाऊन सात जण पर्याये पर्याये समई कार्या कारणे नेहमी जाऊन कार्येभाग करून येतील ह्मणऊन तुह्मी समस्तानी विदित केले त्या वरून मनास आणिता नेहमी ब्राह्मण असिलिया वेगले अपिक्षित कार्ये होईना यास्तव या कार्या कारणे जाबीतिया मधे सादिलवार नि॥ भट ब्राह्मण दसेरी सोळुले गला खडी तीन नेमिला आहे तो सदरहू सात जणास समविभाग वाटून दिल्हे असे तुह्मी त्याचे समविभागे देत जाणे आणि ग्रामसबधी कार्ये त्याचे हातून घेत जाणे त्यात कार्यास जो नव जाये त्याचा विभाग सदरहू ब्राह्मण जे कार्ये करणार त्यास तुह्मी समते वाटून देत जाणे कागदपत्र अग्राह्मरसमधी वेदमूर्ती मोरेश्वरभट बिन विस्वनाथ गिजरे या पासी देत जाणे छ ८ मोहरम सुरूसन मया अलफ पा। हुजूर
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८५
१६२१ ज्येष्ठशुद्ध १
श्री
राजश्री महादाजी सोनदेऊ देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी पा। क-हाड गोसावीयासि अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य सेवक शकराजी नारायण सचिव नमस्कार सु।। तिसा तिसैन अलफ वेदमूर्ती ब्राह्मण-समुदाय वास्तव्य कसबे क-हाड क्षेत्र यास राजश्री छत्रपति स्वामीनी यास आघ्रार मौजे सैदापूर पा। क-हाड हा गाऊ आहे त्याचे नाव सिवापूर ठेऊन क-हाड क्षेत्री ईस्वरसवछरी जन्माष्टमीचा पर्वी यथायोग्य सकल्प करून राजश्री स्वामीच्या नावे धाराउदक घालून अग्रहार देऊन राजमुद्रेची सनद राजश्री रामचद्र पडित याणी करून हे पेशजी का। मजकूरच्या ब्राह्मणास धर्मादाऊ मोईन होती व आदलशाहाचे वेळेसी इनामत होती ते कुली दूर करून ब्राह्मणसमुदायास मौजे मा। अग्रहार दिल्हा आहे याची सनद सुभे मजकुरी आलहिदा राजश्री स्वामीचीं सादर आहे त्याप्रमाणे मौजेमजकूर सर्वमान्य ब्राह्मणास यथाविधभागे भूमि वाटून देऊन सर्वमान्य खेरीज हकदार व इनामदार करून त्या प्रा। सुरक्षित चालवणे दर हर साल नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रति लिहून घेऊन असल परतून देणे जाणिजे छ २९ जिलकाद पा। हुजूर
बार सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८४
१६२० आषाढ शुद्ध ८
श्री
स्वस्ति श्री राज्याभिषेकशक २५ बहुधान्य नाम सवत्सरे आशाढ शुध अस्टमी भोमवासर दीत्रियकुलावतस श्री राजाराम छत्रपति याणी राजश्री भानजी गोपाळ मुख्य देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी सरसुभा प्रात क-हाड यासि आज्ञा केली ऐसी जे वेदमूर्ति ब्राह्मणसमुदाय वास्तव्य कसबे क-हाड क्षेत्र याणी स्वामीसमीप वसतगडीच्या मुकामी येऊन विदित केले की आपण ब्राह्मणसमुदायास आदलशाहाचे वेळेसी इनाम भूमि चालत होती त्या उपरी महाराज राजश्री कैलासवासी स्वामीस देश अर्जानी जाला त्याही कुल वरघाटे वतनदार याची इनामे अमानत केली ते समई आपली इनामत ही अमानत करून ब्राह्मण पाहोन त्यास धर्मादायाची मोईन करून देऊन पाववीत होते तेणेकडून योगक्षेम चालवून क्षत्रवास करून आपली सत्कर्माचरणे करून राहिलो होतो त्या उपरी अलीकडे देशात ताब्राची प्राबल्यता विशेष जाली होती तेणेकडून देश उद्वस जाला कितेक ब्राह्मण स्थलातरे गेलो होतो ऐसियास महाराजाचे प्रतापे कडून पुन्हा मागती देश स्वामीस हस्तगत जाला आहे महाराज देवब्राह्मणप्रतिपालक आहेत यास्तव महाराजाचे राज्यात आह्मी अवघे ब्राह्मणसमुदाय येऊन पुन्हा स्वस्थली राहिलो परतु देश कितेक खराब पडिला आहे याकरिता धर्मादाऊ मोईन प्रमाणे पावोन आपला योगक्षेम चालत नाही यास्तव राजश्री रामचद्र पडित अमात्य याशी ईस्वर सवत्सरी वसतगडीच्या मुकामी होते तेथे विनति केली त्यावरून त्याही मनास आणून धर्मादाऊ मोईन प्रमाणे पावत नाही ह्मणून धर्मादायाची मोईन होती व आदलशाहाचे वेळेस इनामत होती ते कुली दूर करून ब्राह्मणसमुदायास अग्रहार मौजे सैदपूर पा। क-हाड हा गाऊ आहे त्याचे नाव सिवापूर ठेऊन क-हाड क्षेत्री ईस्वर सवत्सरी जम्नास्टमीचा पर्वी यथायोग्य सकल्प करून स्वामीच्या नावे धाराउदक घालून अग्रहार देऊन आपले पत्र व राजमुद्रेचे पत्र करून दिल्हे आहे व ब्राह्मण पाहोन यथाविभाग भूमी वाटून देवऊन राजश्री पडितरायाचे पत्र करून देवविले आहे त्याप्रमाणे मौजे मजकूर कुलाबाब कुलकानू हालीकटी व पेस्तरपटी व जलतरुपाशाणनिनिधनिक्षेप सर्वमान्य खेरीज हकदार व इनामदार करून चालत आहे ऐसियास स्वामी या प्राते आले आहेत तरी सदरहूप्रमाणे अग्रहार चालविलेया स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चितून आपली स्नानसध्यादिक सत्कर्माचरणे करून क्षेत्री वास करून राहोन हाणून विस्तारे श्रुत केले त्यावरून मनास आणिता ब्राह्मणसमुदाय विशेश बहुत थोर विद्वाण आहेत याचा योगक्षेम चालून सुखरूप क्षेत्रवास करून राहिले पाहिजेत ह्यणून रामचद्र पडित अमात्य येही आदलशाहाचे वेळेसी इनाम होता व आपल्या राज्यात धर्मादाऊ होता तो कुली दूर करून मौजे सैदापूर पा। क-हाड या गावचे नाम सिवापूर ठेऊन मौजे मजकूर प्राचीन सीमायुक्त खेरीज हकदार व इनामदार करून कुलबाब कुलकानू हालीपटी व पेस्तरपटी व जलतरुपाशाण व निधिनिक्षेप सहित सर्वमान्य दिल्हे आहे त्याप्रमाणे करार करून दिल्हे असे तरी ब्राह्मणसमुदाय क्षेत्र कसबे क-हाड यास व याचे पुत्रपौत्रादि वौशपरपरेस उत्तरोत्तर चालवीत जाणे नवीन पत्राचा आक्षेप प्रतिवर्षी करीत नव जाणे सदरहू गाव कसबे मजकुरीच्या ब्राह्मणास अग्राहार करून दिल्हा आहे यास कोणी म-हास्ट होऊन खलेल करील त्यास श्रीवाराणसीमध्ये गोहत्येचे पातक व मूसलमान होऊन जो खलेल करील त्यास त्याच्या महजबाचा शपत आहे ये विशी धर्म शास्त्रीची वाक्ये
स्वदत्ता परदत्ता वा यो होत वसु- स्वदत्ता द्विगुण पुण्य परदत्तानुधरा ।।
सविस्टाया कृमि र्भूत्वा पालन।। परदत्तापहारेण स्वदत्त निष्फल
पितृभि:सह मज्जति ॥१॥ भवेत ||१||
ऐसी पातके स्मरोन वेदमूर्तिसमुदायास सदरहू गाव अग्रहार चालवणे नवीन पत्राचा आक्षेप प्रतिवर्षी करीत नव जाणे या पत्राची प्रति लेहोन घेऊन मुख्य पत्र परतुन भोगवटीयास वेदमूर्ती जवळी देणे लेखनालकार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८३
१६२० ज्येष्ठवद्य १३
श्री
श्री सकलगुणमडित अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य राजश्री भानजी गोपाळ मुख्यदेशाधिकारी व देशलेखक प्रात क-हाड वर्तमान व भावी गोसावी यास प्रति श्रीकराचार्य पडितराये आसीरवाद राज्याभिशेक शक २५ बहुधान्य नाम सवछरे जेस्ट वदि त्र्ययोदसी स्थिरवासरे वेदमूर्ति ब्राह्मणसमुदाये वास्तव्य क-हाडक्षेत्र यानी समीप येऊन विदित केले की आपणास पूर्वी आदलशाहाचे वेळी गाउगना इनाम होते तेणे कडून आपला योगक्षेम चालत होता त्या उपरी देश राजश्री माहाराजास हस्तगत जाहाला त्या वेळेस इनाम अमानत ठेऊन ब्राह्मणास धर्मादाये दिल्हे होते तेणे कडून योगक्षेम करून होतो त्या नतर ताम्राचे राजक्रात जाली त्यामुले देश उद्धस्त जाला आह्मी ब्राह्मणसमुदाये येऊन राजश्री रामचद्र पडित याचे दरशण घेतले त्यानी मौजे सैदापूर पा। क-हाड हा गाऊ कृस्णाकोहिनासगमी आहे तो आह्मास अग्राहार करून दिल्हे आणि सिवापूर नाव ठेविले आह्मी तेथे काही कीर्दी करून आपले अन उत्पन्न होत आहे स्वामी या प्रातास आले भोगवटीयास आपले पत्र दिल्हे पाहिजे ह्मणौऊन विदित केले त्या वरून मनास आणिता वेदमूर्ति ब्राह्मणसमुदायास राजश्री रामचद्र पडित अमात्य यानी मौजे मजकूर अग्रहार करून दिल्हे या विसी त्याचे पत्र आहे व आह्माकडील ही पत्र आहे ऐसियास येथील उत्पन्न होईल तेणेकडून स्नानसध्यादिक सत्कर्मे करून राजश्रीस व राज्यास कळ्याण चितून असतील यास्तव मौजे सैदापूर पा। क-हाड परियायेनाम सिवापूर हे गाऊ ब्राह्मणसमुदायास वास्तव्य क-हाड यास सर्वमान्य इनाम पुत्रपौत्रादिवशपरपरेने दिल्हे आहे सुरक्षित चालवणे येथे हालीपटी व पेस्तरपटी कुलबाब कुलकानू खेरीज हकदार व इनामदार करून जलतरुपाषाणनिधिनिक्षेपसहित सर्वमान्य इनाम करून दिल्हे आहे उत्तरोत्तर चालवणे प्रतिवरसी नूतन पत्राचे आक्षेप न करणे मुख्य पत्राची प्रति लेहून घेऊन मुख्य पत्र परतोन देणे छ २६ जिल्हेज सुहुरसन तिसा तिसैन अलफ पा। हुजूर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८२
१६२० ज्येष्टवद्य १३
श्री
कैलासवासी
श्री सकलगुणमडित अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य राजश्री तिमाजी यमाजी देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी सुभा प्रात सातारा गोसाविया प्राती श्रीकराचार्ये पडितराय आसिर्वाद राज्याभीशेकशके २५ बहुधान्य नाम सवत्सरे जेष्टबहुल त्रयोदसी स्थिरवासरे वेदमूर्ती गोपालभट बिन रामभट गिजरे वास्तव्य कसबे क-हाड यानी वसतगडीचे मुकामी समाप येऊन विदित केले की आपले वडील वेदमूर्ती आपदेभट बिन कृष्णभट गिजरे यासी पूर्वी इदलशाईचे कारकीर्दीस मौजे कोणेगव्हाण ता। उबरज प्राप्त सातारा येथे ईनाम भुमी चावर अर्ध होता बहुत दिवस चालत होता त्या अलीकड वेदमूर्ती आपले पितामह नरहरभट बिन आनतभट हे हि काहीयेक दिवस उपभोग करून करीत होते त्या उपेरी हा देश राजश्री स्वामीस हस्तगत जाहला ते समयी कुल ईनाम अमानत करून धर्मादाय धान्य देविले होते ते पावत होते त्या अलीकडे वेदमूर्ती वाराणसीस गेले हा देश हि ताब्राचा उपद्रवा करिता उध्वस जाहला आपण हि स्थानचळण होऊन गेलो होतो साप्रत राजश्री चा देश राजश्री स हस्तगत जाहाला ऐकोन स्वस्थलास आलो असो व वेदमूर्ती नरहरभट वाराणसीस वास्तव्य करीत आहेत योगक्षेम चालावयास उपाय नाही तरी पूर्वील आपली. ईनाम भूमी आपणास देविल्या तेथे अन्न उत्पन्न करून आपला आपला योगक्षेम चालवून व वेदमूर्ती वाराणसीस आहेत त्यास हि काही अन्न प्रविस्ट होईल तेणेकरून श्नानसध्यादीक वैश्वदेवादीक सत्कर्मे आचरोन अहिर्निषी राज्यास अभिवृधी चितून सुखरूप राहून ह्मणून त्यावरून मनास आणिता वेदमूर्ती नरहरभट वाराणसीस वास्तव्य करीत आहेत व गोपालभट हि भले ब्राह्मण विद्यासपन्न कुटुबवत्सल आहेत त्याचा योगक्षेम चालिला पाहिजे ह्मणून मौज मजकूर पैकी ईदलशाही कारकीर्दीचा ईनाम भुमी बिघे दिल्हे बितपसिल नरहरभट बिन अनतभट गिजरे वेदमूर्ती गोपालभट बिन रुद्रभट वास्तव्य वाराणसी बिघे ।० गिजरे वास्तव्य क-हाड बिघे ।० येकून अर्ध चावर भूमी ईदलशाही कारकीर्दीचे मोईनेचा दिल्हा असे तरी तुह्मी सदरहू प्रमाणे मौजे मजकूर पैकी भुमी वेदमूर्तीचे दुमाला करून पुत्रपौत्रादिवशपरंपरेने चालवणे तेथे वेदमूर्ती अन्न उत्पन्न करून आपला योगक्षेम व वेदमूर्तीचे पितामह नरहरीभट वाराणसीस आहेत त्याचा योगक्षेम चालऊन स्नानसध्यादिक वेदाध्यायन सत्कर्मे आचरोन अहिर्निशी राज्यास अभिवृधी चितून सुखरूप असतील प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे प्रती लेहून घेऊन मुख्यपत्र वेदमूर्तीपासी परतून देणे जाणिजे छ जिल्हेज सु।। तिसा तिसैन अलफ हे आशीर्वाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८१
१६१९ पौष शुद्ध १४
श्री
राजश्री सुभानजी नलगे हवलदार व रायाजी बालिजी सबनीस किले मलकार्जुनगड गोसावीयासि
अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य स्नो। रामचद्र नीलकठ अमात्य आसिर्वाद अनुक्रमे नमस्कार सुहुरसन समान तिसैन अलफ मौजे सईदापूर ता। क-हाड हा गाव क-हाडकर ब्राह्मणास अग्रहार दिल्हे मौजे मजकूर खराब तेथील मोकदम बापूजी पाटील याने तुमचे तक्षिमेचे सेत मौजे भडकबे येथे केले होते त्यास कौल देऊन आपल्या वतनावरी आणो ह्या बदल जोगोजी जाधव बारगीर किले वसतगड यास पाठविले ऐसीयास तुह्मी आपली सेते मळून घेऊन पटेलमजकुरास वतनावरी जावयास रजा द्यावी ते गोष्टी न करिता पटेलमजकुरावरी गजर करून मा।र देऊन गुरे ढोरे देखील बिशाद कैद केली आणि रजा देत नाही हे गोष्टीने तुमचे हीत कैसे होईल ब्राह्मणास गाव अग्रहार दिला हुजुरून कौल त्यास दिल्हा असता त्यास मार देऊन नागविले आहे हा अन्याये येकवेळ क्षमा केला या उपरी पत्रदर्शने पटेलमजकुराची गुरे व वस्त भाऊ बरा बजरा देऊन आपल्या वतनावरी जावेया रजा देणे फिरोन बोभाट आला ह्मणजे तुमची भीड राहणार नाही हे बरे समजणे आणि पटेलमजकुरास कोणी मारिले काशा बदल मारिले तो फत्तेखान मुसलमान आहे तो कोणाकडील त्याचा शोध करून त्यास सजा देणे आणि त्यास हुजूर पाठविणे आणि बापूजी पाटिलास निरोप देऊन गावापरी रवाना करणे व त्याची वस्तभाव जरा वजरा नेली असेल ते फिराऊन देणे हे पत्र लिहिले आहे याप्रमाणे वर्तणूक केली नाही आणि बोभाट आला ह्मणजे रायाजीपती तुह्मास शब्द विशेश लागेल हे जाणोन लिहिले प्रमाणे वर्तणूक करणे जाणिजे छ १२ जमादिलाखर निदेस समक्ष