Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ७५
१६१९ श्रावणवद्य ८
श्री
राजेश्री भानजी गोपाल सुभेदार व कारकून, वर्तमान भावी सुभे प्रात कराड मोसावियासि
अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य रामचद्र निलकठ अमात्य हुकुमतपना नमस्कार सु।। समान तिसैन व अलफ कसबे कराड येथील क्षेत्रीचे ब्राह्मणास मौजे सैदापूर प्रा। कराड या गावचे नाम शिवापूर ठेऊन अग्रहार करून दिल्हे आहे ते समई मौजे मा।रचे वृत्तिवत यानी विदित केले की ब्राह्मणास मौजे मा।र अग्रहार करून दिल्हे आहे ऐसीयास आपले ईनाम आदलशाहचे कारकीर्दीस चालत होते ते राजश्री कैलासवासी छत्रपती स्वामीस हा देश, अर्जानी जाहला त्यानी अमानत केले आहेत ते देविले पाहिजेत ह्मणोन विदित केले त्यावरून मनास आणूनी मौजे मा।रच्या वृत्तिवतास ईनाम होते त्या पौ। देविले असे जमीन
पाटील बीघे कुलकर्णी बिघे
.। . ५
श्रीरेणुका देवी सुतार बिघे१५
५
माहार पाच बिघे आबिकरी पाच बिघे ५
५
येकूण पच्याहतर बिघे जमीन देविली असे तर तुह्मी मनास आणून याच्या ईनामत्ती पूर्वी आदलशाहाचे कारकिर्दीस चालत होते ते मनास आणोन त्या पौ सदरहू जमीन अवल दूम प्रतीची जमीन नेमून देऊन याचे दुमाले करून यास व याचे पुत्रपौत्रादिवशपरपरेने चालवित जाणे नवीन पत्राचा आक्षेप प्रतीवर्षी करीत न जाणे या पत्राची तालीक लेहून घेऊन असल पत्र परतोन भोगवटियास देणे जाणीजे छ २१ मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४७ श्री १६०१ ज्येष्ठ शुध्द ५
राजमान्य राजश्री त्र्यंबक गोपाळ सुभेदार व कारकून सुभा पुणे गोसावी यांस
सेवक अनाजी दतो नमस्कार सु॥ सन समानीन अलफ सीवाजी गोसावी याचे पिते माहादाजी गोसावी मोरगावकर यास इनाममौजे मोरगाऊ ता। कर्हेपठार पा। मा।र एथे सालाबाद चालत आहे साल गुदस्ता चालिले आहे ह्मणऊन एऊन सांगितले तरी ता। साल गु॥ जैसे चालिले असेल तैसे च चालवणे तालीक लेहोन घेऊन असल परतोन देणे नवी जिकीर न करणे रा। छ ३ जमादिलावल पा। हुजूर
सुरू सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७४
१६१९ श्रावणवद्य २
श्रीराम
सौ। मोकदमानी मौजे सैदापूर उरुप सिवापूर पा। कराहाड यासी रुद्राजी चदो देसकुलकर्णी पा। कराहाड सु।। समान तिसैन अलफ बो। सनद राजेश्री पडितराउ तेथे आज्ञा केली की श्रीचा अभिसेक बारा महिने वेदमूर्ती वीरेस्वरभट बिन विस्वनाथभट गिजरे सेकिन का कराहाड हे राजेश्री : छत्रपत स्वामीचे तीर्थपुरोहित यासी आज्ञा केली जे श्रीचा अभिसेक बारा महिने करावा तेणेकरून राजेश्री छत्रपती स्वामीचे कल्याण व राज्याचे कल्याण होये ह्मणोन वेदमूर्तीस अभिशेक मागितला त्यास उपजीविकेस इनाम जमीन दर सवाद मौजे सैदापूर उरुफ सिवापूर तेथे जमीन विघे । तीस असल देविले आहेती वेदमूर्तीचे दुमाला कुलबाब कुलकानू हालीपटी व पेस्तरपटी दुमाला केले आहे सदरहू जमीन भटगोसावी याचे दुमाला करणे ह्मणोन आज्ञा आज्ञेप्रमाणे राजेश्री सरसुभाची सनद आहे त्याप्रमाणे वेदमूर्तीचे दुमाला इनाम स्वाधीन करणे दुसरेने बोभाट येऊ न देणे जाणिजे रा। छ १५ माहे मोहरम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ७३
१६१९
अज रख्तखाने खुदायेवद खान अजम अकरम न्यामतखान किलेदार व फौजदार किले मछीद्रगड सुहुर समान तिसैन अलफ सन ४१ ता। देसकानी प्रा। क-हाड व मोकदमानी मौजे सैदापूर पा। मा। हा गाव जुनारदार भटजी सेकीन का। क-हाड यास ईनाम कुलबाब कुलकानू ईनाम दिले असे जुनारदार मजकुरास दुमाला मौजे मजकूर करणे जुनारदार किर्दी मामुरी करून सुखे राहतील व बाजे रयता व मोहतर्फा कुले आणून गाव मामुरी करून सुखरूप असणे बलकुबलीस किले मजकुरा खाले जन पोगड घेऊन येणे ये बाबे तुह्मास अजार लागणार नाही तालिक लेहून घेऊन असल परतून माघारे दीजे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ७२ १
६१८ श्रावणवद्य १०
स्वस्ति श्रीनृपशालिवानशके १६१८ घातनाम सवत्सरे दक्षणायने वरीसारितु श्रावणवदी दशमी तदिनी वेदमुहुर्ती मोरेश्वरभट बिन विश्वनाथभट व तिमणभट बिन भास्करभट गिजरे वृतवत मौजे वडगाऊ का। प्रा। करहाड यासी व जोगोजी पटेल व बहिरो ब्रह्माजी कुलकर्णी मौजे मजकूर सुहुरसन सबा तिसैन अलफ लेहून दिले पत्र, ऐसे जे पूर्वी वृतवत होता भोगवटा उठला होता हाली समस्त मिलोन तुह्मास मिरासी करून दिली असे सेत बाबती धुराग धोडा कोठार. जमीन धुरुग मुले बिघे ४२५ पचवीस पटिया दोनी दिले असे व घरजागा नजिक धार सेटी तुलहस्त अर्जहस्त सेत व जागा मिरासी करून दिली असे लेकराचे लेकरी दिली असे सुखरूप राहणे यासी कोणी हिलाहरकत करील त्यासी ब्रह्महत्येचे पातक व वाराणसीमधे गोहत्या वध केलेचे पातक हे आपले ईमान सही
हजीर मजालसी
मौजे मजकूर
मलजी पटेल यव मानाजी पा। शमन खेत्रोजी बिन धाऊजी मुलीक
बिन शेखूभाई वेसराखा मौजे कारवे खोतवाडी मौजे येबू
गणेशभट बीन तिमणभट जोसी मौजे रखमाजी बिन नरसोजी पटेल
केडेगाव व हिगणगाव दत्ताजी बिन + + + + पटेल
मौजे नेरली का। सुवरे
भैरोजी बिन खडोजी पाटील अंताजीराम कुलकर्णी मौजे
खडो अताजीराम कुलकर्णी मौजे
अनत कुलकर्णी मौजे ता। अपसिगे वीरवडे
खादल सुवली
भिकाजी जागनाळे देशकुलकर्णी का।
निमसोड माईणी व गावकुलकर्ण देह
६ साहा
मौजे गुलसरे १ मौजे सिरसोडी
मौजे आबेड १ मौजे गोरेगाऊ
कसबे निमसोड मौजे वळेचेगाऊ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ७१
१६१७ आषाढवद्य १४
दा। बो। मोकदमानि मौजे दुसेरे पा। करहाड सु। सीत तिसैन अलफ कारणे
साहेबाचे बदगीस लेहून दिल्हा हाजीर-जमान-कतबा ऐसा जे बीजमानत बो। कासी पा। व जोगोजी पा। व नारोवा कुलकर्णी मौजे वडगाव यासि हुजूर आणून रजा फर्माविली जे तुह्मी सुभा येऊन गावीची हकीकत हाजीर करावी कस्ट मशाखत करून गाव लावावा तेथील जो आकार होईल तो सुभाचे सनदेने ज्यास देऊन त्यास द्यावा दरम्याने मुकासी ह्यणऊन कोण्ही येईल याचे फितवियात न पडावे सुभा आकार करून ज्यास देऊन त्यास द्यावे हिलाहरकत फितवा फादडा न करावा. येखादेचा जमान मागितला तरी आपण जमान असो गावीची कीर्दी मामुरी करितील जे समई सुभाचा हुकूम येईल ते वेलेसी हाजीर होतील हिलाहरकत फितवा फादडा करणार नाहीत सुरलित वर्ततील ह्यणऊन जमान मागितला तरी आपण हाजीरजमान असो सदरहूप्रमाणे वर्ततील जरी वर्तनात तरी हाजीर करून हाजीर करू न सको तरी त्याचे तालुकातीचा जाब करून हा कतबा सही (नागर)
तेरीख २७
जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ७०
१६१५ श्रावणवद्य १४
आज्ञापत्र राजश्री कर्णराजा भोसले देसमूख प्रा। क-हाड व सरदेसमुखी माहाय ताहा मोकदमानी मौजे वडगाव पा। मजकूर सु।। अर्बा तिसैन अलफ वेदमूर्ती विस्वनाथभट बिन नरहरभट गिजरे सो। कसबा क-हाड ब्राह्मण भले योग्य कुटुबवछल योगक्षेम चालविला पाहिजे याकरिता मौजे मजकुरी देशमुखीचा इनाम आहे त्यापैकी जमीन बिघे ४३ तीन बिघे वृतीकरून दिल्ही असे लेकराचे लेकरी चालवावे ऐसा निछय केला आहे तरी तुह्मी मौजे मजकूर देशमुखीचा ईनाम पैकी सदरहू जमीन भटगोसावी याचे स्वाधीन करणे तेथील उपभोग भटगोसावी करतील प्रतिवर्शी नूतन पत्राचा आक्षेप न करणे तालीक लेहून घेऊन असल परतोन देणे छ २७ जिल्हेज मोर्तब सुद तीन बिघेयाचे उत्पन्न भटगोसावियाचे पदरी घालणे दरसाला ताजा खुर्दखताचा उजूर न करणे जाणिजे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ६९
१६०६ माघकृष्ण ७ रविवार
श्री
कृस्णा ककोद्मती
स्वस्तिश्री नृप शालवान सके १६०६ वरशे रक्ताक्षी नाम सवत्सरे माघमासु कृ(ष्ण) पक्षे सप्तमी रविवासरे तदिनी वेदमूर्ती राजेश्री, रुद्रभट गिजरे वास्तव्य क-हाड याप्रती कानोजी राजे सिरके दडवत विनति उपरी आह्मी श्री - सगमीचे तीर्थपुरोहितपण तुह्मास दिले असे तुह्मी श्री अभिसेख करणे प्रतिवरसी वरसासन होन ७ सात तुह्मास देऊन ते क्षेत्री, भक्षून आह्मास,आसीरवाद देणे आमचे वौशपरपराने जो होती ते तुमचे वौशेपरपरेने चालवितील हे विनति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ६८
१६०२ पौष शुद्ध १०
मूळ बाळबोधीत लिहिले आहे
श्री काळभैरवप्रसन्
श्री काळभैरव साक्ष
शके १६०२ वर्षे रौद्रनाम सवत्सरे पौष शुद्ध १० दशमी तद्दिनी राजेश्री रुद्रभट्ट गिजरे याशि अपदेभट्ट गिजरे यानि खडपत्र लेहून दिले जे तुह्मी वाराणशिहुन आलेशि आणि विभाग मागितला तरि अह्मी तुह्मास भाग दिधला यास तपशिल घर व वृत्तिचे धान्य व भाडि व वृत्ति व सहितेचा भाग व देव व लिग व पश्चादि पच धातु ऐसा तृतीय भाग तुझा तुज दिला असे व सर्वाचा भाग व तोला मासा रुका अडक वडील दादा असता तुझा तुज दिला होता तो तुह्मास पावला व वृत्तिचे कागदहि तृतीय भाग दिला असे व अणाचा भाग तृतीय दिला असे व अमचा अह्मास पावला परस्परे कोणाचे कोणा सबध अर्थ अर्थ लेकराचे लेकरी सबध नाहि व यास अन्यथा करील तो देव ब्राह्मणाचा अपराधी व पचमहापातकाचा दोषी अह्मी अपल्या सतोषे तुमच्या करभागी अश अला त्यास अह्मी परसात अपल्या अशात गज दोनि पश्चम भागी वाटे कारणे दिले होते यांनतर दुर्मति सवत्सरी अधिक वदि दशमीस पत्र फालिले दोघे झगडो लागलो मग सभासतानि उभयतास समजाउन गज १ देविला वाटे कारणे गजा वेगली भीति सरदेची भिति उभयतानि यालावि यावेगलि पश्चमेची भिति रुद्रभटाची हे सत्य वळि २२ पत्र प्रमाणे अपदेभट्ट मान्य चिरास उत्तरे मिति २३
गोही पत्रप्रमाणे गिजरे तिमणभट्ट
साक्षी हरिभट वैद्य साक्षि
महादेव भट्ट वैद्य साक्षि नरहरि भट्ट वैद्य
अपदेभट्ट वलवाडे साक्षि माहादे भट्ट ढवली पत्रप्रमाणे साक्षि
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ६७
१६०० चैत्रवद्य ११ रविवार
मूळ तालिक बाळबोध
॥०॥ सदाव्रताधीशप्रसन् ॥०॥
॥०॥ स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शके १६ सोवळाशे ०॥
॥०।। वर्षे काळयुक्ताक्षी नाम सवत्सरे चैत्रवदि ०॥
॥०॥ येकादशी रविवासरे तद्दिने मल्लारि गोस्वामी ०॥
॥०॥ सदाव्रति तपोनिध मुकाशी इनाम मौजे ०॥
।।०॥ नाडोली यीहिं राजेश्री वेदमूर्ति ०॥
॥०॥ विश्वनाथभट्ट गिजरे वास्तव्य क-हाड क्षेत्रे ०॥
॥०॥ यासि भूमिदान इनाम मौजे मजकुरी रुके ०॥
॥०॥ ४३ तीन अक्षइ परपरा दिला आहे यासि ०॥
।l० ।। सहसा उछेद न करावा यदर्थी उछेद करणारा ०॥
॥०॥। स शास्त्रमर्यादेमधे शफत जे लिहिले ते ०॥
॥०॥ आहेति कुलबाबेने यासि दिला आसे ०॥
॥०॥ यासि अन्यथा करील त्यास कुळक्षय ०॥
॥०॥ गुरुद्रोह होयील. यासि देवब्राह्मण साक्ष