Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १००
१६३७ वैशाख शुद्ध ७
कौलनामा ता। जुनारदार कसबे कराराबाद सु।। सन ११२४ दादे कौल ऐसा जे तुमचे बाबे स्वरूपजी यादव देसमूख व देसपाडे पा। मजकूर यानी अर्ज केला जे मौजे सैदापूर जमीन वरले तरफेने इनाम दिल्हा होता धामधूम करिता परागदा जाले ह्यणऊन जाहीर केले बराये अर्ज खातिरेस आणून तुह्मास कौल सादर केला असे तरी तुह्मास वरले तरफेने जमीन जे सुदामद चालत आली आहे हे तुह्मी कीर्दी करून सुखरूप राहाणे सरकारचे तरफेने तुह्मास तगादा लागणार नाही खातीरजमा राखोन लावणी करणे कोन्हे बाबे शक आदेशा न धरणे दरी बाब कौल असे छ ५ माहे जमादिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९९
१६३७ चैत्र शुद्ध १३
श्री
श्रीमत् श्रौतस्मार्तकर्मानुष्ठानपरायण विद्यावृत्तसपन्न राजमान्य राजश्री समस्त
ब्राह्मण क्षेत्र क-हाड स्वामिगो।
पोष्य श्रीकराचार्ये पडितराय कृतानेक नमस्कार येथील कुशल जाणून स्वकीय लिहिले पाहिजे या उपरि राजश्री राजाराममहाराजांनी तुह्यास समस्त ब्राह्मणास मौजे सैदापूर परगणे क-हाड हे गाव शिवापूर पर्यायनाम ठेऊन अग्रहार करून दिल्हे ह्याचा विभाग ब्राह्मणपरत्वे करून द्यावया आह्मास आज्ञा केली त्या आज्ञेप्रमाणे तुमचे समते विभागाचा जाबिता आह्मी करून दिल्हा आहे व अवघे ब्राह्मण हि त्या प्रमाणे चालत आहा अलीकडे साप्रत मन्मथसवत्सरी रामनवमी महोत्सवाप्रसगे तुह्मी पनाळेस आलेत तेव्हा तुह्मी समस्त आह्मा पासी येऊन प्रसग केला की आपण पूर्वी अग्रहाराचा विभाग व तेथील व्यवस्था जे करून देऊन पत्रे दिल्ही आहेत त्यास पूर्वील व्यवस्थेचा विपर्यास करून अलाकडे पत्र दिल्हे आहे ऐसियास आपण धर्मपरायण आहेत पूर्वव्यवस्थेस विपर्यास जालियाने आह्मा समस्तास समत नाही त्यामुळे आह्मी समस्त श्रम पावू यास्तव आपण पूर्वव्यवस्थेस विपर्यास होऊ न द्यावा ह्मणौन तरी जे आह्मी पूर्वी व्यवस्था करून पत्रे दिल्ही आहेत ते च प्रमाण अलीकडे आह्मा पासून पूर्वील व्यवस्थेस विपर्यास करून पत्र मागोन घेतले असेल तरी ते रद असे तुह्मी पूर्वील व्यवस्थे प्रमाणे सुखरूप राहाणे मन्मथसवत्सर चैत्रशुत्ध त्रयोदशी भौमवार हे विज्ञप्ती तुह्मी बोलिलेत की अग्रहारीचे वडीलपण पाचा जणास देऊन पत्र दिल्हे आहे ह्मणौन ऐकतो ऐसे बोलिलेत तरि पाचा जणाचे वडीलपणाचे पत्र आह्मा पासून कदाचित् घेतले असेल तरी ते मिथ्या असे पक्ती, २९ हे विज्ञप्ति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९८
१६३७ चैत्रशुद्ध ४ रविवार
श्रीस्वस्ति श्री राज्याभिषेकशके ४१ मन्मथनाथ सवत्सरे चैत्र सुध चतुर्थी रविवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शभु छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रात कराड यासि आज्ञा केली ऐसी जे वेदमूर्ती मोरेश्वरभट गिजरे याणी पनालाचे मूकामी स्वामी सनिध येऊन विदित केलें की राजश्री थोरले कैलासवासी स्वामीनी क-हाडक्षेत्र सनिध कृष्णाकोइना येथील आपले तीर्थपुरोहितपण आपले पिते विश्वनाथभट यास वृती करून देऊन पत्र दिल्हे तदनुरूप कैलासवासी स्वामीनी हि तीर्थपुरोहितपणाचे पत्र दिल्हे व उभयता नदीचा नित्याभिषेक सागोन त्यास मौजे शिवापूर पा। मजकूर या गावपैकी इनाम भुमी बिघे ।तीस देऊन पत्र दिल्हे आहे तेणेप्रमाणे स्वामीनी हि आपणास उत्तरोतर चालवावा विंशई भोगवटियास पत्र दिल्हे पाहिजे ह्मणून विदित केले व तीर्थस्वरूप कैलासवासी स्वामीचे पत्र आणून दाखविले त्यावरून हि कळो आले ऐशास हे भले ब्राह्मण सत्क्षेत्री स्वामीचे पुरोहितपण थोरले कैलासवासी पासून व कैलासवासी स्वामीपासून करीत आले आहेत त्याप्रमाणे तीर्थपुरोहितपण व कैलासवासी स्वामीनी उभयता नदीचा नित्याभिषेक सागोन मौजे मजकूर पैकी तीस बिघे इनाम दिल्ह्याप्रमाणे चालविणे हे स्वामीस अवश्यक व तेणेकडून स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण आहे याकरिता तुह्यास हे आज्ञापत्र सादर केले आहे तरी तुह्मी कैलासवासी स्वामीच्या पत्राप्रमाणे तीर्थपुरोहितपण व उभयता नदीचा नित्याभिषेक व यास मौजे शिवापूरपैकी इनाम जमीन बिघे तीस ऐसे मोरेश्वरभट गिजरे यास पुत्रपौत्रादिवशपरपरेने चालवणे नवीन पत्राची अपेक्षा न करणे या पत्राची प्रत लेहून घेऊन मुख्यपत्र भोगवटीया निमित्य वेदमूर्तीजवळ परतोन देणे लेखनालकार
रुजू सुरू सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९७
१६३३ कार्तिक शुद्ध ५
श्री
श्री राजा शाहु चरणि दृढ भाव सेनापति धनसिग सुत सताजी जाधवराव
'आज्ञापत्र समस्तसेनाधुरधर विस्वासनिधी राजमान्य राजश्री सताजी जाधवराऊ सेनापती ता। मोकदमानी मौजे सैदापूर पा। क-हाड सु।। इसने मया असर अलफ मौजे मजकूर वेदमूर्ती राजश्री ब्राह्मण समस्त क-हाडकर यास राजश्री स्वामीनी अग्राहार करून दिल्हे आहे ऐसीयास मौजे मजकुरी सरदेशमुखी आमचा खासगत ईनाम आहे त्याचा ऐवज आमचा होईल तो आह्मी ब्राह्मणास आपले तर्फेने दिल्हा आहे आकार प्रमाणे सरदेशमुखीचा ऐवज बिलाकुसूर साल दरसाल देत जाणे आमचे कमावीसदार असतील वर्तमान भावी कोण्ही उपसर्ग लावणार नाहीत जाणिजे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे तालीक लेहून घेऊन अस्सलपत्र भट गोसावियासि भोगवटेयास देणे जाणिजे छ ३ शोवल
मोर्तब सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९६
१६३१ श्रावणशुद्ध ४ शुक्रवार
श्री
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३६ विरोधी नाम सवत्सरे श्रावण शुध चतुर्थी भृगुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी याणि राजश्री कृस्णाजी बलाल देशाधिकारी व लेखक प्रा। क-हाड यासि आज्ञा केली ऐसी जे वेदमूर्ती मोरेश्वरभट गिजरे वस्ती क-हाड हे तीर्थपुरोहित यास श्री कुकुद्मतीसगमी श्रावणमासीचा अभिषेक करावयाची आज्ञा केली आहे त्यास पूजेची आनकूलता व वेदमूर्तीचा उलुफा व दक्षणा मोईन करून दिली आहे बि॥
पूजा व नैवयद् मोईन वेदमूर्ती
रुपये ७ll उलुफा
७।। ५ दक्षणा
---------
१२ ।।
येकूण वीस रुपये रास देविले असे साल दर साल प्रमाणे आदा करणे जाणिजे लेखनालकार
रुजु
तेरीख 3 जमादिलाखर
सुहुरसन अशर मया अलफ बार सुरू सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९५
१६३१ ज्येष्ठशुद्ध ७
श्री
आज्ञापत्र राजेश्री नारो प्रल्हाद अजहत देसमूख ता। मोकदमानी मौजे सैदापूर ता। हवेली प्रा। क-हाड सु॥ असर मया अलफ मौजे मजकूर समस्त ब्राह्मण क-हाडकर यासी अग्रहर पुर्वी पासून चालत आला आहे त्यासी सरदेसमुखीचे वतन राजश्री स्वामीनी राजश्री चद्रसेन जाधवराय यास दिल्हे आहे यैसीयासी मौजे मजकूरची सरदेसमुखी ब्राह्मणाचा गाव ह्मणऊन न घ्यावी ये विसी जाधवराऊ या कडील ही पत्र आहे तर सरदेसमुखीचा उपसर्ग ब्राह्मणास व रयेतेस न लावणे जाणिजे छ ५ रबिलाखर मोर्तबसूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९४
१६३० मार्गशीर्षशुद्ध १२
श्री
आज्ञापत्र समस्तसेनाधुरधर विस्वासनिधी राजमान्य राजश्री चद्रसेन जाधवराऊ सेनापती ता। मोकदमानी मौजे सैदापूर पा क-हाड सु।। तिसा मया अलफ मौजे मजकूर क-हाडकर ब्राह्मणास अग्रहार हुजरून दिल्हा आहे ऐसियास मौजेमजकूरची सरदेशमुखी आपणास राजश्री छत्रपति स्वामीनी दिल्ही ऐसियास हा गाऊ ब्राह्मणास ईनाम ब्राह्मणाचे चालविणे आपणास अगत्य याजकरिता आपली वतनी सरदेशमुखीचा ऐवज ब्राह्मणास दिल्हा आहे गावीचे आकारप्रमाण सरदेशमुखीचा ऐवज होईल तो वेदमूर्तीस पावता करणे आह्माकडील आणीक सरदेशमुखीचा उपसर्ग लागणार नाही प्रतिवर्षी नूतन पत्राचा उजूर न करणे तालीक लेहून घेऊन मुख्यपत्र भोगवटियास देणे जाणिजे छ १०रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९३
१६२८ अधिकज्येष्ठ वद्य ११
कौलनामा अज् दिवाण ठाणे पा। मसूर ता। समस्त ब्राह्मण ईनामदार मौजे सैदापूर ऊर्फ सिवापूर कर्याती हवेली पा। क-हाड सु॥ ११०७ दादे कौलनामा ऐसा जे तुह्मी समस्त ब्राह्मण हुजूर येऊन अर्ज केला की आपणास महतकदम मौजे मजकूर ईनाम चालत आले आहे यास साहेबी आपले तर्फेने कौलम-हामत केलिया आपण गाव आबादान करून उत्पन्न होईल ते भक्षून स्नानसध्या अनुष्ठान करून आसीर्वाद देऊन कृष्णातीरी सुखे असो स्वामीस आसीर्वाद देऊ ह्मणोन अर्ज केला बराय अर्ज खातिरेस आणून कदीम सनद पाहून कौल म-हामत केला असे कोणे बाबे शक न धरणे गावी जे उत्पन्न होईल ते भक्षून सुखे असणे कोणे बाबे शक न धरणे आपले तरफेने काही आजार लागणार नाही दरी बाब कौल असे मोर्तब
तेरीख २४ माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९२
१६३६ चैत्रवद्य ५ गुरुवारस्वस्ति श्री राज्याभिषेकशके ३० तारण नाम सवत्संरे चैत्र बहुल पचमी
श्री. शिव नरपति हर्ष निदान मोरेश्वर सुत नीलकठ प्रधान
श्री. आई आदिपुरुष श्रीराजा शिव स्वामी कृपानिधी तस्य परशराम त्रिवक प्रतीनीधी
श्री राजा शिव छत्रपति याणी सुबेदारानी व कारकुनानी व लोक सुभे लस्कर व बाजे यासी आज्ञा केली ऐसी जे मौजे शिवापूर प्रा। क-हाड हा गाव स्वामीनी क-हाड क्षेत्रीचे ब्राह्मणास सर्वमान्य अग्रहार करून दिल्हे आहे तेथे तुह्मी मार्गी येता जाता नसता उपसर्ग लाविता ह्णणोन विदित जाले तरी गाव सर्वमान्य ब्राह्मणास दिल्हा असता तेथे तुह्मास उपसर्ग द्यावया गरज काय साप्रत हे आज्ञापत्र सादर केले असे तरी या उपरी मौजे मजकूरचे वाटे नव जाणे अत पर उपसर्ग देईल ह्यणिजे मुलाहिजा होणार नाही ऐसे जाणोन आज्ञेप्रमाणे वर्तणूक करणे निदेश समक्ष
रुजू सुरु निविस
सुरू सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ९१
१६२५ मार्गशीर्ष शुद्ध ५ गुरुवार
श्री
श्रीसकलगुणसपन्न यजनयाजनादिषट्कर्मनिरत वेदमूर्ती राजेश्री मोरेश्वरभट व वीरेश्वरभट बिन विश्वनाथभट गिजरे वास्तव्य क्षेत्र क-हाड गोसावी यास श्रीकराचार्य पडितराय नमस्कार राज्याभिषेकशके ३० सुभानु सवत्सर मार्गशीर्ष शुध पचमी गुरुवासरे मौजे सैदापूर पा। क-हाड हे गाव राजश्री कैलासवासी याणी क-हाड क्षेत्रीचे तुह्मा समस्त ब्राह्मणास अग्रहार सर्वमान्य देऊन अग्रहाराचे नाव सिवापूर ठेविले ऐसीयास अग्रहार सपादायाविषई तुह्मी उभयतानी श्रम बहुत केले सवर्च खर्च पडिला त्याची अनुकूलता तुह्मी केली त्याउपरी अग्रहारी लावणीसचणी व्हावी त्यास मौजेमजकुरावरी देशमुख व सरदेशमुख राजश्री राजा कर्ण याचे कुलकारभारी रा। सुदर तुकदेउ याचे विद्यमाने देशमुखी व सरदेशमुखीची बाकी होती व रा। भानजी गोपाळ सरसुभेदार पा। मजकूर याचे हिसेबी माहलमुळे बाकी होती त्या बाकीचे भयास्तव पाटीलकुलकर्णी गावावरी येऊ न शकेत तेव्हा तुह्मी कर्जवामे काढून सदरहू दोन्ही बाकियाचा भाग वारिला त्यावरी पाटीलकुलकर्णी गावावरी आले परतु मौजेमजकूर पूर्वी बहुत दिवस खराब पडले होते तेथे कीर्द व्हावी त्यास पाटीलकुलकर्णी व रयता आणाव्या त्यास पोटापाणियास वही बुडली यास दिल्हे वेगळे कीर्द होई ना यास्तव त्यास हि कर्जवामे काढून घातली ते मुदल गला व नक्त याचे दिढीवाढी व कळातर देखील बेरीज बहुत झाली तेव्हा अग्रहारीचे पाटीलकुलकर्णी तुह्मापासी येऊन बजीद झाले की तुमचे कर्जाचे सदरहू दोनी बाकी तुह्मी वारिल्या व आह्मास पोटापाणियास वही बुडल्यास दिल्हे त्यातागाईत मुदल व दिढीवाढी कळातर देयास आह्मास शक्ति नाही आह्मी तुह्मास मौजेमजकुरी पाणियाखालील अवल भूमी आहे त्यात काठीमुळे ६२।।। पावणेतीन बिघे कुलबाब व कुलकानू हालीपटी व पेस्तरपटी व हकदारी देखील पुत्रपौत्री वृत्ति करून गावसबधेच वृत्तिपत्र करून देतो या पावणेतीन बिघेवरी जे बाब व कानू व हालीपटी पेस्तरपटी व हकदारी बैसेल ते आह्मी गावावरी देऊ तुह्मी आह्मावरी कृपा करून मान्य केले पाहिजे ह्मणून तुह्मास पाटीलकुलकर्णी वजीद होऊन बोलिले त्यास तुह्मी विवेक केला की हे अग्रहार बहुता ब्राह्मणाचे आहे येथे रयतानी शका सोडून कीर्द केलीयाने बहुतास उपभोग होईल ऐसा विवेक करून सदरहूप्रा। मान्य केले मग पाटीलकुलकर्णी यानी मौजेमजकुरी पाण्याखालील भूमी बिघे २॥। काठीमुळे पावणेतीन बिघे पुत्रपौत्री कुलबाब कुलकानू हालीपटी व पेस्तरपटी व हकदारी देखील वृत्ति करून दिल्ही आणि वृत्तिपत्र दिल्हे ते तुह्मी दाखविले ऐशीयास तुह्मी मौजेमजकूर अग्रहार सपादायाविषई बहुत श्रम केले व वेचखर्च पडिला तो अनुकूल केला व अग्रहार झाल्याउपरी मौजेमजकुरी सदरहू देशमुखीसरदेशमुखीसबधे बाकी व माहलमुळे बाकीचा भाग वारून गावावरील कजिया वारिला व पाटीलकुलकर्णियास व रयतास पोटास वही बुडल्यास कर्जे दिल्ही त्याचा हिसेबाप्रा निर्वाह पाटीलकुलकर्णी याचेने व्हावयास त्यास शक्ति नाही ह्मणून त्याणी आत्मसतोषे पाणियाखालील पावणेतीन बिघे काठीमुळे वृत्ति करून तुह्मास दिली तेणेप्रा। तुह्मी पुत्रपौत्री उपभोग करून सुखरूप असणे येथे कोण्ही कटकट करील त्यास ब्रह्मद्रोह घडेल जाणिजे छ ३ शाबान सु।। अर्बा मया अलफ पा। हुजूर हे विज्ञप्ति
बार