लेखाक ९४
१६३० मार्गशीर्षशुद्ध १२
श्री
आज्ञापत्र समस्तसेनाधुरधर विस्वासनिधी राजमान्य राजश्री चद्रसेन जाधवराऊ सेनापती ता। मोकदमानी मौजे सैदापूर पा क-हाड सु।। तिसा मया अलफ मौजे मजकूर क-हाडकर ब्राह्मणास अग्रहार हुजरून दिल्हा आहे ऐसियास मौजेमजकूरची सरदेशमुखी आपणास राजश्री छत्रपति स्वामीनी दिल्ही ऐसियास हा गाऊ ब्राह्मणास ईनाम ब्राह्मणाचे चालविणे आपणास अगत्य याजकरिता आपली वतनी सरदेशमुखीचा ऐवज ब्राह्मणास दिल्हा आहे गावीचे आकारप्रमाण सरदेशमुखीचा ऐवज होईल तो वेदमूर्तीस पावता करणे आह्माकडील आणीक सरदेशमुखीचा उपसर्ग लागणार नाही प्रतिवर्षी नूतन पत्राचा उजूर न करणे तालीक लेहून घेऊन मुख्यपत्र भोगवटियास देणे जाणिजे छ १०रमजान
